लेख तिसरा- बेसिक वॉशेस

Submitted by पाटील on 9 February, 2014 - 06:13

या लेखात आपण काही मुलभूत जलरंगाच्या वॉशेस आणि तंत्राबद्दल चर्चा करुया
जलरंगात शिकवला जाणारा आणि महत्वाचा वॉश म्हणजे फ्लॅट वॉश , नावाप्रमाणेच रंगात काहीही बदल न करता येकसंध येका रंगाचा वॉश.
आपल्याला हवा तो रंग पॅलेट मधे काढुन त्याच्यात पाणी ब्रशने पाणी अ‍ॅड करत जायचे , साधारण पणे पहील्या वॉश साठी २५ ते ३०% रंग आणि बाकीचे पाणी असा रंग तयार करावा. ( रंग , कागद या प्रंमाणे यात फरक पडेल)
आपल्याला जेव्हढा कागद कव्हर करायचाय तेव्ह्ढा किंवा त्याहुन जास्त रंग तयार असावा कारण पॅलेट मधला रंग संपला तर पुन्हा बनवताना तशीच कंसिस्टन्सी राहील असे नाही.
वॉटरकलर करताना आपला पॅड/बोर्ड साधारण १५ ते २० अंशात पकडावा जेणे करुन रंग खालच्या दिशेने वाहिल पण ओघळणार नाही.
मोठा (१२ नं राऊंड्/किंव फ्लॅट ) ब्रश रंगाने पुर्ण लोड करुन आडवा रंगाचा पट्टा कागदावर लावावा
त्याच्या खाली डावी कडून थोडा ओव्हरलॅप करुन दुसरा , तिसरा असे पट्टे मारत हवात्या भागापुरता वॉष पुर्ण करावा. ब्रश मधे कायम रंग असला पाहीजे नाहीतर रंगात वेरीएशन येइल, येका भागत पट्टा पुर्ण झाल तर परत परत तीथे रंग लेपन करु नये
flat.jpgflat1.jpg

ग्रेडेड वॉश- जर रंगात हळू हळु पाणी वाढवीत नेले तर रंग गडद ते फिका असे ग्रेडेशन मीळते. हा झाला ग्रेडेड वॉश. रंगलेपनाची पद्धत फ्लॅट वॉश प्रमाणेच
graded wash.jpg
रिव्हर्स ग्रेडेड वॉश , यात पाण्या ऐवजी रंगाचे प्रमाण वाढवीत न्यायचे
reverse graded wash.jpg

variegated वॉश यात दोन रंगांची सरमीसळ करावी लागते
पहिल्यांदा कागदावर दोन रंगांचे पट्टे मधे थोडी जागा ठेऊन मारायचे (फ्लॅट वॉश प्रंमाणे) आणि नंतर ब्रश धुउन, साफ ओल्या ब्रशने हे पट्टे येक् मेकात मिसळायचे. हे मिसळताना कागद /बोर्ड आण्खी तिरका /वर्ची बाजू खाली/खालची बा़जू वर असा हालवावा, याने दोन्ही पट्टे व्यवस्थीत येक मेकात मिसळतात
verig.jpgverig2.jpg

हे वॉशेस मारताना जर पातळ रंग किंवा पाणी पड्ले तर ते वॉशेस खराब होतात , याला कॉलिप्फ्लॉवर इफेक्ट असे म्हणतात. काही चित्रात टेक्चर तयार करायला याचा वापर होतो , मात्र इतरवेळी हे टाळावयास हवे

cauliflwr.jpg

कलर लिफ्टींग - रंग थोडा ओला असतानाच साफ ब्रश पाण्यात बुडउन स्पंज किंवा कापडाने टीपून घ्यावा. त्या ओल्या ब्रशने आपण हवा तिथला रंग काढू शकतो. रंग खुप ओला असताना कलर लिफ्ट कराय्ला गेल्यास कॉलीप्लॉवर तयार व्हायची शक्यता असते म्हणुन थोडा रंग सुकू द्यावा, मात्र पुर्ण सुकल्यावर रंग लिफ्ट करणे कठीण असते खास करून रंग staining असेल तर.
कलर लिफ्ट करताना कागद खराब हॉनार नाहि इतपतच ब्रशचा भार द्यावाlifting.jpg

सॉफ्ट्नींग - रंग लेपन केल्यावर त्याच्या बाहेरील भागाच्या कडा ओळ्या ब्रशने सॉफ्ट करण्याच्या या तंत्राचा बराच वापर होतो.
soft.jpg

आता मी येक जादू करणार आहे , सगळ्याना त्यांच्या बालपणात ट्रांस्पोर्ट करणार आहे
आपण सगळयांनी लहानपणी घर, आकाश, डोंगर, रस्ता , पक्षी (४ , ४ आकड्यांचे) असे लँड्स्केप काढले असेल.
तेच लँडस्केप आपण या बेसि़क ट्क्नीक्सनी काढणार आहोत.

प्रथम खालील स्केच साधारण क्वार्टर साईझ हँड्मेड पेपर वर काढुन घ्या
s1.jpg
पॅलेट मधे , कोबाल्ट ब्लू, लाल, गँबोज किंवा लेमन यलो, ऑकर यलो असे रंग काढुन घ्या/ हे रंग नसतील तर दुसरे त्याच्याशी मिळते जुळते रंग घ्या

त्यानंतर घर वगळून क्षितिजा पर्यंत कोबाल्ट ब्लू चा फ्लॅट वॉश द्या.( १२ नं ब्रश)
1_3.jpg
तो वॉश ओला असतानाच gamboge yellow ने पुढचा पट्टा मारा.
पुढे ब्लू आणि gamboge yellow येकत्र करुन तयार होणार्‍या हिरव्या रंगाचा वॉश कंटीन्य करा .अशाने चित्राचा बहुतेज भाग रंगउन होईल.
2_3.jpg

आता घराचा भाग (छप्पर सोडुन ) ऑकर यलोने रंगवा , अजुन आपला पहैलाच वॉश असल्याने सगळ्या रंगाची कंसिस्टन्सी ३० टक्के रंग+ ७० % पाणी अशीच ठेवा
3_0.jpg
आता आकाशाचा निळा रंग सउकला असेल. पॅलेट मधे निळा+ थोडा लाल मिक्स करुन जांभळा रंग १२ नंबर ब्रशनेच डोंगराकडे लाउन घ्या.
रत्यावरचा हिरवा रंग थोडा लिफ्ट करुन घ्या
घराचे छ्प्पर यलो+लाल रंगात रंगवा
पॅलेट मधे तयार हिरव्या रंगात थोडा नीळा अ‍ॅड करा, हे थोडे दाट झालेले रंग घेऊन घरा मागे फॉलिएज रंगवा
फॉलिएज / डोंगराचा थोडा खालचा भाग सॉफ्ट करा
हे चित्र सुकु द्या.
त्यानंतर चार नंबर राऊंड ब्रशने लाल,निळा+ हिरवा असे मिश्र्ण करुन लिनिअर ,कॅलिग्राफी स्ट्रोक्स्ने रस्ता , घराचा दरवाजा ,कुंपण इत्यादी काढुन तसेच ४ वाले पक्षि रंगवुन चित्र संपवा. कूठेही चित्रात बारीक काम किंवा कोरत बसु नका.
final.jpg
साधारण तिन टप्प्यत आप्ण हे चित्र केलेय, कुठेही फार डीटेल्स न टाकता वॉटर्कलर्रस च्या प्रॉप्रटीजचा वापर करुन हे चित्र सहज करता येते.
हे चित्र तुमच्या मित्र मैत्रिणीना देऊन त्यानाही त्यांच्या लहानपणात घेउन जायची जादु तुम्ही करु शकता.

या आठवड्यात अशा वॉशेस तसेच सोप्या चित्राचा सराव करा
या आधिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
पुढिल लेख
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.
http://www.maayboli.com/node/47815

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी प्लीज , पहिल्या अणी दुसर्‍या लेखाच्या लिंक्स इथेच द्या वरती.. रेफरंस करता ( माझ्या सारख्या लेट कमर्स / जॉइनर्स करता.!!)

अरे वा फार सुंदर काम चालू आहे. मला वेळच नाही मिळालाय अजून. मुलीचे प्रोजेक्ट करतेय जागून हल्ली. ते झाले की इकडे वळेन.

घर फार मोठे वाटते आहे म्हणजे eye level परत वर गेली आहे का?
बाकी पण बर्याच चुका आहेत तुमच्यासारखे रंग पण वाटत नाहीयेत . mixing चा प्रोब्लेम आहेच .
१२ नंबरचा brush पण नाहीये पण आणेन लवकरच मला वाटले कि हा चालेल पण फारच फराटे दिसत आहेत.
बाकी तुम्ही सांगाच.

खूपच छान. नक्की करुन बघणार.इतकं बेसिक आणि सोपं करुन कुणी शिकवलंच नाही लहानपणी.

पाटील, खूप छान आणि सोप्पं करून लिहिलंय तुम्ही.
लवकरच वेळ काढून करून बघणार.

वर तुम्ही लिहिलंय कोणत्यातरी प्रतिसादात की जलरंग वाळल्यावर अजून फिक्के दिसतात.. तर रंग आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यावं वॉशेस देताना? (म्हणजे रंग फ्रेश दिसतील पण जलरंगाचा ट्रांसपरंट इफेक्ट पण येईल.)

अल्पना
चित्र साधारण ३ स्टेप्स / वॉश मधे पुर्ण व्हायला हवे

पहिला वॉश - tea consistency - २५ ते ३० % रंग बाकीचे पाणी म्हणजे बिन दुधाचा चहा सारखे
दुसरा वॉश - cofee consitency 40 -45 % रंग बाकी पाणी
तिसरा वॉश - cream consistency ५० ते ६० % रंग आणि बाकी पाणी - अगदी शेवटचे थोडे डीटेल्स टाकायला याचा वापर
हे % आवश्यकते प्रमाणे कमी अधिक होतात

अजय , प्रत्येकाच्या प्रश्नांना तुम्ही व्यवस्थित उत्तरे देत आहात .खरेच तुम्ही एक चांगले शिक्षक आहात . आता चांगली विद्यार्थिनी होण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. खरी . बघुयात कितपत जमते आहे.

गजानन - मी आज रात्री पासुन सोमवार पर्यंत भारताबाहेर असेन. आल्यानंतर अजुन एक दोन चित्र पोस्ट करेन. त्यानंतर आपण बाकीच्या टेक्नीक्स कडे वळुया.

मस्त आहे हे.. चित्रकलेची भीती मनात असल्याने आजवर ही मालिका उघडुन पाहिली नव्हती. पण आता वाचल्यावर मनात आशेचे कोंब फुटले. मी पण एक प्रयत्न करुन पाहते Happy

लोकहो भारिच चालू आहे कार्यशाळा.... सध्या खूप बिज़ी असल्याने काहिच जमत नाहिये..... तरी काही महिन्यानपूर्वी केलेले चित्र टाकत आहे.... बघा कस वटतय......

landscape copy 2_0.jpg

ह्यान्डमेड पेपर वर केले आहे, चिन्चेची पान टाकून तयार केलेला ह्यान्डमेड पेपर आहे तो... म्हणून ती पान दिसत आहेत मधे मधे.....

वाह!!

जामच त्रेधा उडली आहे पहिल्या प्रयत्नात!!

रंगपाणीकागदब्रश यांनी मनसोक्त गळ्यात गळे घालून घेतलेत Proud

नाही..पण सरावाने नक्की जमणार आहे मला. मीही सफाईने काढू शकेन चित्रे!! Happy

सगळ्यांची चित्र खूप मस्त आहेत. टेन्शन आले आहे की आपल्याला जमेल की नाही. हँड्मेड पेपर पहिल्यांदा वापरते आहे.पेपर ची कोणती साइड वापरतात इथ पासुन सुरवात . मला मॅट पॅड मिळाले . Uhoh . के अंजली म्हणतात तसे खूप गोंधळ उडाला.

गजानन , मस्तच आले आहे . ultaramarine blue ने कदाचित रात्रीचा effect अजून चांगला आला असता .पण हा blue सुद्धा छान वाटतोय आणि चंद्रकोर पण सुरेखच !

टप्याटप्याने चित्रांचे फुलपाखरु आकार घेतांना पाहाण्यास मजा वाटतेय .
आणि मधेच एक काजवा (सौरभ) चमकून गेला .

Pages