पक्षी - रंगीत पेन्सील (लेकीचा पहीला प्रयत्न)

Submitted by विनार्च on 12 February, 2014 - 05:17

रंगीत पेन्सील वापरुन लेकीने काढलेल पहीलच चित्र आहे. काही चूका असल्यास वा सुधारणा जरुर सांगा

2014-02-12 15.13.39.jpg

हे तिने तिच्या मावशीच काढलेल चित्र....

2013-12-18 11.07.26.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख! मस्त काढलय. आम्ही नवशिके. आम्ही काय सुधारणा सान्गणार? यशस्विनी, पाटिल यान्च्या सारखे दर्जेदार कलाकार जरुर पुढचे मार्गदर्शन करतील. बाकी मुलीसाठी पाटिल सरान्चा क्लास जॉइन केला का? मला अतीशय आवडली ती कल्पना.

अग विनार्च..
मस्त काढलय की पक्षाचे चित्र लेकीने...

फक्त त्या पक्ष्याची शेपटी चा पंख जरा सरकलाय उजवी कडे..

बाकी मस्तच... रंग, आकार, प्रपोर्शन वगैरे... सगळे छान आहे..

वीने....भारी ग......चुम्मेश्वरी चित्र आहे:)

रश्मी..,चनस ,अनिश्का , अंतरा, जाई, प्रदिपा प्रतिसादाबद्द्ल खूप धन्यवाद Happy

चनस पहिलाच प्रयत्न आहे हा तिचा , आज जेंव्हा कलर पेन्सील्स तिने बाहेर काढल्या तेंव्हा मी तिला म्हणणार होते की "कशाला त्या पेन्सील्स काढते आहेस ४बी ६बी च्या शेडींग ने कर ... मस्त जमत तुला ते" ...चित्र पाहिल्यावर, नाही बोलले ह्याचच समाधान वाटल Happy

मस्त आलंय. फांदी, पानं, पक्ष्याची पोज छानच. पायांकडे अजून लक्ष दिले तर चांगले. दुसरा पाय दिसत नाही तो दाखवला असता तरी चालला असता. नख्या वगैरे शार्पली काढल्या की अजून छान.
माझ्याइथे रोज सकाळी मॅगपाय रॉबीन हा अत्यंत मंजुळ शीळ घालणारा पक्षी येतो. तो असा रंगीत नाहीये पण तुझ्या या पक्ष्याची शेपटी जशी आहे तश्शीच उभी शेपटी फुलवत तो इकडेतिकडे नाचत असतो. हे चित्र पाहून मला त्याचीच आठवण झाली.

अप्रतिमच काढलंय चित्र. विनार्च माझ्याकडून शाबासकी मुलीला... डोळ्याचे शेडींग मस्तच आणि पखांचे रंग पण छान. स्केचही तसे छान आहे... कुर्त्यावरील डिझाईन मस्त काढलीये. खूप खूप शुभेच्छा. पाटिल सरान्चा क्लास >> यावर खूप आयडियाज आणि मदत मिळेल.

अरे वा.... अगदी अप्रतिम चित्र काढलंय. अर्थात मी मार्गदर्शन अजिबात करु शकणार् नाही पण दोन्ही चित्रे अतिशय सुंदर आहेत. पोर्ट्रेट काढणे जास्त कठिण असे मला वाटते कारण माणसाचा जिवंतपणा त्यात दिसणे आवश्यक आहे. मावशीच्या चेह-यावरील प्रसन्नपणा अगदी उठुन दिसतोय.

लेकीला खुप शाबासकी Happy

सुरेख !