पक्षी - रंगीत पेन्सील

रंगीत पेन्सिल्स - Killdeer

Submitted by वर्षा on 19 October, 2025 - 19:55

किलडिअर हे विचित्र नाव असलेले हे पक्षी मी फ्रीमॉंटच्या लेक एलिजाबेथजवळून जाणार्‍या रेल्वेट्रॅकवर पाहिले होते. त्यांची मान उंचावण्याची लकब, तुरुतुरु चालणं गंमतीशीर वाटलं.

(बहुतेक) हा पक्षी टिटवीसारखा आहे. किलडीअरचे मराठी नाव सापडले नाही.
या पक्ष्याचे स्केच करताना डोळ्यांभोवतीची केशरी रींग धरुन केवळ पाच छटांच्या पेन्सिल्स वापरल्यात. आणि एचबी पेन्सिल आउटलाईन आणि शेडींगसाठी.

Burnt Ochre

रंगीत पेन्सिल्स - Wings of Sapphire (Blue bellied Roller)

Submitted by वर्षा on 25 September, 2025 - 23:14

रोलर प्रकारातले पक्षी एकंदरीत सुरेख असतात असं म्हणायला हरकत नाही.
मी आतापर्यंत दोनच रोलर्स पाहिलेत. एकदा कामशेतला दिसलेला इंडीयन रोलर (मराठीत नीलपंख/नीलकंठ?) आणि अलिकडे बाल्टीमोरच्या झू मध्ये दिसलेला हा Blue bellied Roller. त्याचा आफ्रिकन बंधू.

किती देखणं असावं एखाद्याने? फिकट गुलाबी/पीच रंगाची मान, काळे आणि अगदी इंकब्ल्यू रंगाचे पंख. त्यात मध्येच चमकदार आकाशी रंगाचा पट्टा. उडताना हे पसरलेले पंख दहापट जास्त सुंदर दिसतात.

पक्षी - रंगीत पेन्सील (लेकीचा पहीला प्रयत्न)

Submitted by विनार्च on 12 February, 2014 - 05:17

रंगीत पेन्सील वापरुन लेकीने काढलेल पहीलच चित्र आहे. काही चूका असल्यास वा सुधारणा जरुर सांगा

2014-02-12 15.13.39.jpg

हे तिने तिच्या मावशीच काढलेल चित्र....

2013-12-18 11.07.26.jpg

Subscribe to RSS - पक्षी - रंगीत पेन्सील