लेख तिसरा- बेसिक वॉशेस

Submitted by पाटील on 9 February, 2014 - 06:13

या लेखात आपण काही मुलभूत जलरंगाच्या वॉशेस आणि तंत्राबद्दल चर्चा करुया
जलरंगात शिकवला जाणारा आणि महत्वाचा वॉश म्हणजे फ्लॅट वॉश , नावाप्रमाणेच रंगात काहीही बदल न करता येकसंध येका रंगाचा वॉश.
आपल्याला हवा तो रंग पॅलेट मधे काढुन त्याच्यात पाणी ब्रशने पाणी अ‍ॅड करत जायचे , साधारण पणे पहील्या वॉश साठी २५ ते ३०% रंग आणि बाकीचे पाणी असा रंग तयार करावा. ( रंग , कागद या प्रंमाणे यात फरक पडेल)
आपल्याला जेव्हढा कागद कव्हर करायचाय तेव्ह्ढा किंवा त्याहुन जास्त रंग तयार असावा कारण पॅलेट मधला रंग संपला तर पुन्हा बनवताना तशीच कंसिस्टन्सी राहील असे नाही.
वॉटरकलर करताना आपला पॅड/बोर्ड साधारण १५ ते २० अंशात पकडावा जेणे करुन रंग खालच्या दिशेने वाहिल पण ओघळणार नाही.
मोठा (१२ नं राऊंड्/किंव फ्लॅट ) ब्रश रंगाने पुर्ण लोड करुन आडवा रंगाचा पट्टा कागदावर लावावा
त्याच्या खाली डावी कडून थोडा ओव्हरलॅप करुन दुसरा , तिसरा असे पट्टे मारत हवात्या भागापुरता वॉष पुर्ण करावा. ब्रश मधे कायम रंग असला पाहीजे नाहीतर रंगात वेरीएशन येइल, येका भागत पट्टा पुर्ण झाल तर परत परत तीथे रंग लेपन करु नये
flat.jpgflat1.jpg

ग्रेडेड वॉश- जर रंगात हळू हळु पाणी वाढवीत नेले तर रंग गडद ते फिका असे ग्रेडेशन मीळते. हा झाला ग्रेडेड वॉश. रंगलेपनाची पद्धत फ्लॅट वॉश प्रमाणेच
graded wash.jpg
रिव्हर्स ग्रेडेड वॉश , यात पाण्या ऐवजी रंगाचे प्रमाण वाढवीत न्यायचे
reverse graded wash.jpg

variegated वॉश यात दोन रंगांची सरमीसळ करावी लागते
पहिल्यांदा कागदावर दोन रंगांचे पट्टे मधे थोडी जागा ठेऊन मारायचे (फ्लॅट वॉश प्रंमाणे) आणि नंतर ब्रश धुउन, साफ ओल्या ब्रशने हे पट्टे येक् मेकात मिसळायचे. हे मिसळताना कागद /बोर्ड आण्खी तिरका /वर्ची बाजू खाली/खालची बा़जू वर असा हालवावा, याने दोन्ही पट्टे व्यवस्थीत येक मेकात मिसळतात
verig.jpgverig2.jpg

हे वॉशेस मारताना जर पातळ रंग किंवा पाणी पड्ले तर ते वॉशेस खराब होतात , याला कॉलिप्फ्लॉवर इफेक्ट असे म्हणतात. काही चित्रात टेक्चर तयार करायला याचा वापर होतो , मात्र इतरवेळी हे टाळावयास हवे

cauliflwr.jpg

कलर लिफ्टींग - रंग थोडा ओला असतानाच साफ ब्रश पाण्यात बुडउन स्पंज किंवा कापडाने टीपून घ्यावा. त्या ओल्या ब्रशने आपण हवा तिथला रंग काढू शकतो. रंग खुप ओला असताना कलर लिफ्ट कराय्ला गेल्यास कॉलीप्लॉवर तयार व्हायची शक्यता असते म्हणुन थोडा रंग सुकू द्यावा, मात्र पुर्ण सुकल्यावर रंग लिफ्ट करणे कठीण असते खास करून रंग staining असेल तर.
कलर लिफ्ट करताना कागद खराब हॉनार नाहि इतपतच ब्रशचा भार द्यावाlifting.jpg

सॉफ्ट्नींग - रंग लेपन केल्यावर त्याच्या बाहेरील भागाच्या कडा ओळ्या ब्रशने सॉफ्ट करण्याच्या या तंत्राचा बराच वापर होतो.
soft.jpg

आता मी येक जादू करणार आहे , सगळ्याना त्यांच्या बालपणात ट्रांस्पोर्ट करणार आहे
आपण सगळयांनी लहानपणी घर, आकाश, डोंगर, रस्ता , पक्षी (४ , ४ आकड्यांचे) असे लँड्स्केप काढले असेल.
तेच लँडस्केप आपण या बेसि़क ट्क्नीक्सनी काढणार आहोत.

प्रथम खालील स्केच साधारण क्वार्टर साईझ हँड्मेड पेपर वर काढुन घ्या
s1.jpg
पॅलेट मधे , कोबाल्ट ब्लू, लाल, गँबोज किंवा लेमन यलो, ऑकर यलो असे रंग काढुन घ्या/ हे रंग नसतील तर दुसरे त्याच्याशी मिळते जुळते रंग घ्या

त्यानंतर घर वगळून क्षितिजा पर्यंत कोबाल्ट ब्लू चा फ्लॅट वॉश द्या.( १२ नं ब्रश)
1_3.jpg
तो वॉश ओला असतानाच gamboge yellow ने पुढचा पट्टा मारा.
पुढे ब्लू आणि gamboge yellow येकत्र करुन तयार होणार्‍या हिरव्या रंगाचा वॉश कंटीन्य करा .अशाने चित्राचा बहुतेज भाग रंगउन होईल.
2_3.jpg

आता घराचा भाग (छप्पर सोडुन ) ऑकर यलोने रंगवा , अजुन आपला पहैलाच वॉश असल्याने सगळ्या रंगाची कंसिस्टन्सी ३० टक्के रंग+ ७० % पाणी अशीच ठेवा
3_0.jpg
आता आकाशाचा निळा रंग सउकला असेल. पॅलेट मधे निळा+ थोडा लाल मिक्स करुन जांभळा रंग १२ नंबर ब्रशनेच डोंगराकडे लाउन घ्या.
रत्यावरचा हिरवा रंग थोडा लिफ्ट करुन घ्या
घराचे छ्प्पर यलो+लाल रंगात रंगवा
पॅलेट मधे तयार हिरव्या रंगात थोडा नीळा अ‍ॅड करा, हे थोडे दाट झालेले रंग घेऊन घरा मागे फॉलिएज रंगवा
फॉलिएज / डोंगराचा थोडा खालचा भाग सॉफ्ट करा
हे चित्र सुकु द्या.
त्यानंतर चार नंबर राऊंड ब्रशने लाल,निळा+ हिरवा असे मिश्र्ण करुन लिनिअर ,कॅलिग्राफी स्ट्रोक्स्ने रस्ता , घराचा दरवाजा ,कुंपण इत्यादी काढुन तसेच ४ वाले पक्षि रंगवुन चित्र संपवा. कूठेही चित्रात बारीक काम किंवा कोरत बसु नका.
final.jpg
साधारण तिन टप्प्यत आप्ण हे चित्र केलेय, कुठेही फार डीटेल्स न टाकता वॉटर्कलर्रस च्या प्रॉप्रटीजचा वापर करुन हे चित्र सहज करता येते.
हे चित्र तुमच्या मित्र मैत्रिणीना देऊन त्यानाही त्यांच्या लहानपणात घेउन जायची जादु तुम्ही करु शकता.

या आठवड्यात अशा वॉशेस तसेच सोप्या चित्राचा सराव करा
या आधिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
पुढिल लेख
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.
http://www.maayboli.com/node/47815

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी काढायचो ते चित्र जलरंगात इतके सुरेख दिसते हे आत्ता कळले.
माहिती एकदम मस्त. तुम्ही कॅलीग्राफी स्ट्रोक बद्दल लिहीलय का आधीच्या लेखांत?

धन्यवाद. खूप मस्त सांगितले आहे. क्लास रूम मध्ये बसून शिकल्या सारखे वाटत आहे. पहिल्यांदाच हँड्मेड पेपर वापरणार आहे. त्यामुळे जमेल की नाही याचे थोडे टेन्शन आले आहे.

कधी काळी चित्रकलेच्या वाटेला जात होते. साध्याश्या वाट्णार्‍या वॉशचं ही केवढं तंत्र! मस्त! खूप छान विशद केलंत!

आता हे करायला पेपर भिजवणे सुकवणे करायला लागणार आहे का? हा एक्सरसाईज पुढल्या वीकएंडला चालेल ना?

अश्विनी, मी पेपर न भिजवता फक्त चिकटपट्टी लावून हे करतोय.

अजयनी लिहिलं होतं ना
ज्याना शक्य असेल त्यानी हे करावे मात्र या कार्य्शाळेसाठी पॅड किंवा मास्किंग टेपने चिकटवलेला पेपर वापरु.

रूनी पॉटर - कॅलिग्राफी स्ट्रोक्स बारिक ब्रशने सहजपणे जसे आपण flourishing handwriting करताना पेन वापरतो त्या सहजतेने अचुकतेवर भर न देता केलेले लाइन्स
अश्विनी के- या आठवड्यात मी अजुन काही सोप्पी पेंटिग्ज (हेच वॉशेस वापरुन) करीन , त्यावरुन किंवा आपल्या कल्पनेने असे काम काही दिवस करुया. हि पेंटींग छोट्या सईजची आहेत आणि नुस्ती टेपो लाउन कर्ता येतील.
मी पुढच्या आठवड्यात विकेण्ड्ला काही कामसाठी बाली ला जातोय ,त्यानंतर पुढची टेक्नीक्स बघु म्हणजे आप्लयाकडे या आठवड्याचा अवधी आहे ,आत्ताच्या लेखातली टेक्निक्स /पेंटींग करायला

गजानन- छान झालेय, मु़ख्य म्हणजे कुठेही रंग काळपट झाले नाहीत किंवा ट्रान्स्परन्सीला बाधा पोचली नाही.
यलोचा वॉश जसा क्लीन आहे तसाच स्कायचा आला असता तर अजुन छान. छोट्या पोस्ट्कार्ड सैज पेपरवर नुसत्या वॉशेसचा सराव केलात तर जमेल. ( btw तुमचे आकाश चांगले ढगाळ दिसतेय , सांगीतले नाहित कुणाला तर मुद्दाम तसे रंगवलेय असेच वाटेल Happy )

CalAA-kaar
वॉशेस छान आलेत
दोन गोष्टी- क्षितीज /डोंगर रांग पेपरच्या मध्यावर आहे , चित्र खालुन थोडे कापले तर अधिक बरोबर होईल
झाडाची खोडं घरा पूढे आहेत म्हणजे झाडाचा विस्तार घराच्या छपरावर थोडा ओव्हरलॅप होइल.
बाकी मस्त , सहि करुन टाका Happy

मस्त ...
किति छान शिकवणी... पाटील सर्..आजच तिन्ही लेख वाचलेत..
पण आता घाइ झालिय्....किमान ड्राँईंग पेपर तरी आणायलाच हवा...

नि मला हे फोटो काढुन इथे कसे टाकायचे ते पण कोणीतरी सांगा...

काही महिन्यांपुर्वी काढलेली हि दोन जलरंग चित्रे.... नंतर इतर माध्यमात चित्र काढायचा सराव करत असल्यामुळे जलरंग कपाटात गेले, आता जलरंग टेबलावर आलेत व इतर माध्यमं कपाटात Happy
लवकरच माझी बेसिक वॉशेसवरील चित्रे पोस्ट करते.

NATURE 11.jpgFLOWERSD.jpg

हि काही फसलेली व अर्धवट रंगवलेली चित्रे..... जी जलरंगात काढायचा प्रयत्न केला होता पण drawing मध्ये परफेक्ट नाही वाटली तसेच जलरंगाचा हवा तो ईफेक्ट मिळवता नाही आला. पुन्हा प्रयत्न करेन म्हणुन ठेवली होती ती अजुन तशीच आहेत. आता कधीतरी पुन्हा नव्याने काढेन.

माता महालक्ष्मी कोल्हापुर....

१.

kolhapur3.jpg

२.

kolhapur2.jpg

३.

Kolhapur1.jpg

बेसिक वॉशेस देउन चित्र काढायचा माझा प्रयत्न.... यात मी पेन्सिल लाईन्स न काढता नुसत्या ब्रशने चित्र काढायचा प्रयत्न केला आहे. घर नीट नाही आले... थोडे जास्त उजवीकडे झुकले गेले.

mm1.jpgmm2.jpg

दोन गोष्टी- क्षितीज /डोंगर रांग पेपरच्या मध्यावर आहे , चित्र खालुन थोडे कापले तर अधिक बरोबर होईल
झाडाची खोडं घरा पूढे आहेत म्हणजे झाडाचा विस्तार घराच्या छपरावर थोडा ओव्हरलॅप होइल.
बाकी मस्त , सहि करुन टाका स्मित >> अजय, धन्यवाद. चित्र उभे ठेवुन फोटो काढल्यामुळे तसे दिसत असावे. मी परत एकदा पाहिले तर खालच्या १/३ मधे आहे. पण पॉइंट नोटेड!
झाडाचे लक्षात आले. दुरुस्ती करेन.

अजुन एखादा विषय देता का? असाच सोपा म्हणाजे प्रयत्न करता येतील.

यशस्विनी - वॉशेस खास करुन फोरग्राऊंड चे वॉशेस अजुन क्लिन येउद्यात. रंगाचे प्रमाण थोडे जास्त चालेल. पाणी आणि रंगांचे प्रमाण ब्रँड, कागद याप्रमाणे बदलते. तसेच मारलेला रंग सुकल्यानंतर थोडा फिका दिसतो हे लक्षात घेउन त्याप्रमाणे रंग बनवावा.
खालच्या चित्रात झाडं अधिक सहजतेनी यायला हवीत , म्हणजे मुद्दाम पुर्ण झाड हळूहळु रंगवलेय असे न वाटले पाहीजे. खालच्या चित्रात ते दाखवायचा / एक्स्प्लेन करायचा प्रयत्न करतो.
CalAA-kaar - तुमच्या सुचने नुसार हे अजुन येक सोप्पे चित्र.
छोटा ७.५x10" आसपास पेपर घेउन तो पोर्टेट ओरिएन्टेशनने वापरायचाय या चित्रात.
आपण फक्त १२ नं राऊंड ब्रश वापरुन हे चित्र करतोय.

यात आपले ड्रॉईंग म्हणजे फक्त येक चंद्रकोर. फक्त काढताना कोरीची जागा रुल ऑफ थर्ड प्रमाणे काढलेय आणि चंद्रकोर आतल्या बाजुला वळतेय येव्हधेच पाहिले . जर ती बाहेरच्या बाजुला वळताना दाखवली तर आपली नजर चित्रा बाहेर जाईल.
c1.jpg
त्यानंतर ultramarine blue ने वरचा भाग रंगवला , चंद्रकोरिचा पांढरा भाग व्यवस्थीत काळजिघेउन पेपर न रंगवता सोडला ( आपण पांढरा रंग वापरत नाही आहोत)
त्यानंतर खालचा पट्टा थोडी जागा सोडुन लाल+ थोडासा ultramarine blue अशा रंग मिश्रणाने रंगवला. वरच्या ultramarine blue पट्ट्याला आणि खालच्या पट्ट्याला variegated वॉश पद्धतीने रंगवुन जोडुन घेतले.
c2.jpg
आता हे चित्र पुर्ण सुकु दिले
त्यानंतर ultramarine blue, लाल+ burnt Sienna अ से थोडे दाट आणि डार्क मिश्रण केले.
त्याने चित्राचा खालचा भाग १ - २ ईंच रंगवला, गवताचा इफेक्ट द्यायला ब्रशचे केस चिमटीत धरुन थोडे पसरुन घेतले आणि त्याचे खालुन वर असे स्ट्रोक्स दिले.
c3.jpg
त्यानंतर ब्रश पाण्यात धुऊन मुळ आकारात आणुन त्याचे टोक पुर्ववत करुन बुंध्यापासुन सुरुवात करुन झाड पुर्ण केले. बुंध्यापासुन सुरुवात केल्याने आपसुक खालचा भाग जाड आणि वर निमुळता येतो. इथे मुद्दाम झाडाचे ड्रॉईंङ केले नाही त्यामुळे झाद कोरीत न बसता आपण सहज एकएका स्ट्रोक मधे फांद्या पुर्‍ण करु शकतो.
c4.jpg
चित्र पुर्ण झाल्यावर ते ....... झाडा मागे चंद्र झोपला ग बाई हे गाणं आठवतं का? बघा मी परत सगळ्याना बालपणात घेउन गेलो Happy
c5.jpg

छान स्टेप आहेत.

हा माझा प्रयत्न. मला वाटते आकाशाचे स्ट्रोक नीट जमलले नाहीत. निळा कलर डार्क झाला आहे.

sankul.jpg

सन्कुल- वॉशेस देताना ब्रश रंगाने पुर्ण लोड केलेला असेल आणि येकाच जागेवर परत परत ब्रश फिरला नाही तर वॉश जास्त क्लिन येतील. वॉश देताना सलग ब्रश स्ट्रोक द्या ,तुटक तुटक स्ट्रोक्समुळे वेरिएशन्स दिसतात वॉश सुकल्यावर.

Pages