लेख दुसरा :रेखांकन

Submitted by पाटील on 2 February, 2014 - 04:58

जो पर्यंत सगळे आपले रंगसामान गोळा करतायत तो पर्यंत आपण जलरंगासाठी आवश्यक तेव्हढ्या रेखांकनाचा विचार करुया.
जलरंगात येखादे लँडस्केप करायचे म्हटले तर त्याची साधारण प्रक्रिया खालिल टप्प्यात मांडता येईल
१. पेंटींग चा स्पॉट किंवा रेफरंस फोटो नक्की करणे. जर आपण स्पॉट वर पेंटींग करणार असू तर त्यावेळ्चा प्रकाश, आपली आवड्/निवड, बसायला साऊली /आडोसा या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण स्पॉट निवडतो, फोटोवरुन पेंटींग करताना आपल्या वेगवेगळ्या फोटोंमधुन आपण आपल्याला आवडेल तो फोटो निवडतो
मात्र पेंटींग साठी कोणते पेपरचे कोणते ओरिएन्टेशन योग्य ठरेल ते ठरवणे महत्वाचे
म्हणजे या प्रक्रियेची दुसरी पायरी म्हणजे ओरिएन्टेशन ठरवणे
२.ओरिएन्टेशन - आपला इम्पीरिअल साईझ पेपर असतो २०x३० इंचांचा म्हणजे त्याचा आस्पेक्ट रेशो २:३
या पेपरचे समान भाग करत राहिलो तर १५x20 ( हाफ साईज), 10x१५ (क्वार्टर साईझ ), ७.५ x10 (पोस्टकार्ड साईझ?) अशा वेगवेगळ्या साईझेस मिळतील . या सग्ळ्या साईझेस मधे आस्पेक्ट रेशो साधारण २:३ राहतो.
जर आपण पेपर उभा म्हणजे यातली लांब बाजु उभी आणि छोटि बाजु आडवी पकडली तर आपल्या पेपर चे ओरिएन्टेशन हे पोर्टेट ओरिएन्टेशन आणि त्याउलट जर लांब बाजु आडवी धरली तर ते लँडस्केप ओरिएन्टेशन

आपण सारे जग लँड्स्केप ओरिएन्टेशनमधेच बघतो त्यामुळे टीवी, सिनेमा , रंगमंच, कॉम्प्युटर स्क्रिन या सगळ्या दृष्यमाध्यमांचे ओरिएन्टेशन हे लँडस्केपच असते. आणि बहुतेक लँडस्केपसाठी हे जास्तीत जास्त वापरले जाणारे ओरिएन्टेशन , त्यातुन मोठाले जलायश, मासेस उत्तम दाखवता येतात.
landscape.jpg
लँड्स्केप ओरिएन्टेशनमधले एक पेंटींग

पोर्टेट ओरिएन्टेशन हे बरेचदा क्लोजअप्स किंवा एखाद्या गोष्टीची उंची अधोरेखीत करायची असेल तर वापरतात.
उदा. जर राजाबाई टॉवर चे पेंटींग करायचे असेल , किंवा एखाद्या दरवाजाचे क्लोजप करायचे असेल तर लँडस्केप ओरिएन्टेशन पेक्षा पोर्टेट ओरिएन्टेशन जास्त योग्य ठरेल.
portrait orientation.jpg
लोकमान्य टिळकांचे जेथे निधन खाले ती सरदारगृह ही वास्तू खरे तर आडवी बिल्डींग आहे मात्र त्याचे पेंटीन्ग करतानामी मुद्दामहुन पोर्ट्रेट फॉर्म्याट निवडला आणि त्या वास्तूचा मधला भाग हायलाईट केला

याशिवाय पॅनोरॉमीक , स्क्वेअर असे फॉर्म्याट्स गरजेनुसार वापरले जातात. उदा. मुंबईच्या सिलींक चे पेंटींग करायचे झाले तर पॅनोरामा मधे जास्त खुलुन दिसेल . स्क्वेअर फॉर्म्याट हा थोडा डीझाईन कदे झुकतो म्हणुन अगदी सिमीट्रिकल पेंटींग , किंवा थोडी शॉक व्हॅल्यू म्हणुन याचा वापर करता येतो.

square.jpg
बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान करताना काय ओरिएन्टेशन ठेवावे ते नक्की होत नव्हते , म्हणुन स्क्वेअर फॉर्म्याट वापरून थोडा वेगळा परीणाम साधायचा प्रयत्न केला.

३.ओरिएन्टेशन नक्की केले की चित्र रेखाटुन घ्यावे लागते . त्यात खालिल गोष्टींचा विचार करावा लागतो
अ) क्षितीज रेषा अर्थात eye level / horizon line
समजा मी सहा फुट उंच आहे (आहेच Happy )आणि उभा राहुन सरळ पुढे बगहतोय तर साधारण पावणे सहा फुट उंची वर माझी eye level / horizon line येईल, जर जमीनवर बसलो तर तिन्/चार फूटांवर ही horizon line येईल, उंच बिल्डींग वरुन मी खाली बघीतले तर किंवा जमीनीवरून वर बघीतले तर ही horizon line बदलेल. हि येक कालपनीक रेषा असली तरी चित्र कंपोझ करताना फार म्हत्वाची असते ( प्रत्यक्ष क्षितीज आणि क्षितीज रेषा यात गल्लत करु नका आपण कोणत्या कोनातुन बघतो याप्रमाने क्षितीज रेषा बदलते तर क्षितीज नाही)

आपल्या चित्रात क्षितीज रेषा मध्य भागाच्या वर किंवा , खाली पकडावी , अगदी मध्यभागी पकडली तर चित्र खुप सेंटर होईल जे कंपोजिशन योग्य समजले जात नाही ( अपवाद स्केअए फॉर्मॅट, इथे horizon line मध्यभागी चालुन जाईल ) , इथे मी rule of thirds बद्दल लिहणार नाही मात्र तो येक महत्वाचा कंपोझिशन चा नियम आहे , त्यावर इतरत्र भरपुर माहिती खास करुन फोटोग्राफी साईट्स्वर म्हणुन लिहायचे टाळतोय मात्र सर्च करुन येकदा वाचुन घ्या.
eye level.jpg
ब) चित्रातले घटक : स्केच करताना मुख्यता दोन प्रकारचे घटक लक्षात घ्यावे लागतात
१) रेषीय घटक Linear objects उदा: रस्ता , पर्वत रांग , झाडांची रांग इलेक्ट्रीक पोल ची रांग ई. या घटकांबरोबर आपली नजर चित्रात फिरत राहते. म्हणुन त्यांचा त्या दृष्टीने विचार करावा लागतो
२.मासेस (masses)/आकार , यात घर, बिल्डींग , झाड, फिगर्स इ< मोडतात. जर Linear objects बरोबर आपली नजर फिरत असेल तर मासेस जवळ आपली नजर थांबते , त्यामुळे आपली चित्रातली नजर मधेच कुठे अडखळुन थांबेल अशा ठीकाणी ते घटक न काढता जिथे लाईन्स मिळतात तेथे , किंवा रुल ऑफ थर्ड प्रमाणे जिथे इटरेस्टींग पॉईन्ट येतात त्या ठीकाणी हे घटक काढावेत
क) चित्राचे सुलभी करण (simlification) : आपल्या स्पॉटवर किंवा फोटोत खुप सार्‍या गोष्टी असतात त्यात आपल्या स्बजेक्ट ला पुरक अशा गोष्टी घेऊन बाकिच्या गोष्टी काढुन टाकाव्या लागतात. अन्यथा चित्र सुंदर होण्यापेक्षा गिचमीड होईल. वॉटरकलर च्या पेंसिल स्केच मधे आपण शेडींग करीत नाही त्यामुळे चित्रातले भौमितीक आकार शोधुन त्या आउट्लाइन किंवा हवे तेव्हढेच रेखांकन करुन घ्या वे लागते
simplify 1.JPG
या प्रकाशचित्रात पेंटींग साठी आवश्यक ते सग्ळे घटक आहेत, सुंदर कॉन्ट्रास्ट आहे मात्र खुप अनावश्यक घटक आहेत

simplufy2.jpg
त्याचे सुलभी करण करताना पहील्यांदा eye level निश्चीत केली .घराचे कुंपण आणि झाडाखालचे लाकडाचे ओंडके खुप क्लटरींग वाट्ल्याने रेखाटले नाहित. त्या ऐवजी फक्त उभ्या लाकडी पोलेचे कुंपण काढले. डावीकड्चे झाड कंपोझिशनला मारक वटल्याने ते काढुन टाकले.
उज्वीकडच्या झाडाची जागा रुल ऑफ थर्ड प्रमाणे निश्चीत केली, झाडचे फॉलियेज मुद्दाम घराच्या छपरावर थोडे ओवरलॅप केले त्यामुळे रंगवल्यावर येक खोली (depth) साधली जाईल
मात्र उजवीकडच्या झाडाला बॅलंस करायला घरा मागे थोडी छोटी झाडं काढली. कपड्यांच्या दोर्‍या काढल्या नसल्या तरी त्या काढुन सुंदर लिनिअर ओब्जेक्ट काढता येईल.
या चित्रात कुठलेही डीटेल्स नाहित, फक्त काही रेषा आणि भौमीतीक आकार वापरुन स्केच केलेय
हेच चित्र जर पोर्ट्रेट ओरियेंटेशन मधे काढले तर झाड उंच काढावे लागेल आणि घरापेक्षा झाडाला प्राधान्य देता येईल
nOte: रेखांकन करताना परस्पेक्टीव्ह, रिपीटेशन, चित्र घट्कांचा बॅलंस यांचा विचार करावा लागतो. यातील पर्स्पेक्टिव्ह बद्दल इथे http://www.artyfactory.com/perspective_drawing/perspective_index.html चांगली माहिती आहे. बाकिच्या घट्कांबद्दल थीअरी लिहण्यापेक्षा आपण सरावात त्याचा आढावा घेऊ
या चित्रात रेषा मुद्दाम डार्क केल्यात , प्रत्यक्षात चित्र हलक्या हातने रेखाटावे

४. आपले वॉशेस आणि रंग प्लॅन करणे. वॉटरकलर हे ट्रान्स्परन्ट माध्यम असल्याने खुप जास्त वेळा येकाच भागवर रंग लावले तर चित्र बिघडते, तसेच बाकिच्या ओपेक माध्यमांप्रमाणे यात चुका सुधाराअयला फारसा वाव नसतो. म्हणुन साधारणपणे तीन वॉशेस च्या स्टेजेस मधे चित्र संपायला हवे . म्हणुन हे प्लॅन करणे खुप महत्वाचे आहे. आणि ठरलेल्या प्लॅन प्रमाणे रंगवणे हे तितकेच महत्वाचे हे आपण पुढल्या भागात बघु . तो पर्यंत सगळ्यांच्या सामानाची जुळवाजुळव झाली असेल.

तो पर्यंत प्रत्येकाने कंमित कमी दोन फोटो निवडुन त्याचे सुलभीकरण करुन त्याचे लाईन ड्रॉईंग करुन इथे पोस्ट करावे. त्याच्यावर आपण डिस्कशन करुया.
या मालिकेचे बाकिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445

लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.http://www.maayboli.com/node/47815

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, - बाही काही फिगर्स किंवा सावलीने काढलेल्या गाडी सारखा काही भाग भरुन काढायला वापरु शकतो , काहीच काढले नाहीतर रंगवताना shadows ने रस्त्याचा काहि भाग भरुन काढु शकतो.
नताशा - खरंच काहि निट दिसत नाही, मात्र वॉटरकलर साठीचे स्केच असेच हलक्या रेषांनी करावे, डार्क पेंसिल ने स्मज झाले तर चित्र काळपट होते
अंतरा- चांगले झालेय स्केच

आता ज्याना शक्य आहे त्यानि आपापल्या फोटोंवरुन स्केच करायचा सराव करावा.
तसेच आपल्या आवडत्या लँड्सेक्प आर्टीस्ट्सची पेंटिंग कंपोझिशन च्या दृष्टीने स्ट्डी करावीत

ह्म्म. बघते... किंवा नेटवर प्रताधिकारमुक्त फोटो असतील तर ते शोधते.

त्यांचे पण स्केच काढून इथे डकवायचे आहेत का फोटोसहित? म्हणजे ही पुढची स्टेप आहे का आपल्या कार्यशाळेची?

तसेच आपल्या आवडत्या लँड्सेक्प आर्टीस्ट्सची पेंटिंग कंपोझिशन च्या दृष्टीने स्ट्डी करावीत >>> हे करता येईल हळूहळू.

कुणी इथे स्केचेस्/फोटो टाकले तर आपण चर्चा करु शकतो आणि स्केचिंग ची प्रॅक्टिस ही कायम करावी लागणारी गोष्ट आहे. आपण फक्त लँड्स्केप ला फोटो रेफरंस वापरुन करायच्या मिनिमम स्केच बद्दल इथे चर्चा करतोय.

वरच्या चर्चेत चित्रातला बॅलंस (समतोल) आणि रिपीटेशन ( पुनुरुक्ति ? )बद्दल बोललो होतो
तो मुद्दा थोडा विस्ताराने
चित्रात येका बाजुला जास्त ऑब्जेक्ट आले तर चित्राचा सम्तोल ढळेल मात्र म्हणुन आख्खा पेपर भरुन काढला पाहीजे असे नाही . खालच्या स्केच मधे येका मोठ्या माडाच्या झाडाला काही अंतरावर कमी उंचीचे तिन माड काढुन बॅलंस केलेय
balance.jpg

रिपीटेशन हे बरेचदा चित्र एकसुरी करते , म्हणुन त्यात वेरियेशन आणावे लागतात.
जर येकाच जागी तिन ताड असतील तर त्यांची उंचि किंवा येखादे झाड तिरके करुन ही मोनोटोनी ब्रेक करता येते
repeat.jpg

बाकी कॉन्ट्रास्ट , हार्मेनी ( याबद्दल थोडा उल्लेख वर केलाय, गावच्या चित्रात गाडी का नको कारण हार्मनी ब्रेक होउ शकते) , कलर व्ह्यॅल्यू याबद्दल नंतर.

खुप छान माहिती संकलित होत आहे... फ्युचर रेफरन्ससाठी उत्तम धागा.... लवकरच मी काढलेला फोटो व त्यावरुन केलेले रेखांकन पोस्ट करते.

मी रेखांकनासाठी खालील फोटो रेफरन्स निवडला आहे.... खालील फोटो हा Switzerland मध्ये काढला आहे. आम्ही ज्या हॉटेलमध्ये निवास केला होता तेथील पॅसेजमधुन दिसणारा हा रमणीय देखावा.

Switzerland.jpg

वरील फोटो रेफरन्सवरुन काढलेले रेखांकन, मुख्य आकर्षक वाटणारा भाग काढला आहे. यावेळी चित्र काढण्यासाठी साधी पेन्सिल न वापरता Derwent Graphic 9H वापरली आहे. त्यामुळे रेखांकन खुप फिक्कट दिसत आहे.

Sketch-2.jpg

वाह! क्या बात है!
खूप छान आणि बारीक-सारीक माहिती दिली आहे.
हे वाचून आपल्यालाही रेखाटन जमेल असंच वाटलं क्षणभर... पण मी प्रयत्न करणार नाही. कारण प्रयत्न करण्यासाठीही काही बेसिक मिनिमम कला आणि पर्स्पेक्टिव्हची जाण असावी लागते.

यशस्विनी - चांगले आहे , मुळ फोटोत खुप गोष्टी आहेत आणि तुम्ही त्या योग्य अशा कमी केल्या आहेत.
कंपोझिशन मधे चित्राचे दोन भाग झालेले दिसतात. त्याला जोड्णारा येखादा घटक चित्रात असावा किंवा चित्र उजविकडुन थोडे क्रॉप करावे.
आधि लिहल्याप्रमाणे डोंगर रांगा या linear ओब्जेक्ट्स आहेत त्या चित्रात दिशा आणतात , ती रांग खुप horizontal झालेय त्याऐवजी डायगोनली उजवी कडुन आली तर नजर आपसुक डावीकडच्या स्ट्रकचर कडे येईल.. तसेच तो लँपपोस्ट खुप सुंदर आहे , त्याची उंची थोडी वाढउन छपरा पेक्षा वर नेली तर तो लँप पोस्ट उठुन दिसेल
माझ्या कडे आत्त्ता फोटो शॉप नाहीये म्हणुन हे ms paint मधे दाखवायचा प्रयत्न केलायSketch-2.jpg

बाप्रे! पाटिल, हे असं काही माझ्या डोक्यातच येत नाही.

उद्या रात्रीपर्यंत एखाद दुसरं स्केच काढून इथे देते.

मी वर आपल्या आवडत्या चित्रांच्या कामाचा अभ्यास करण्याबद्दल लिहले होते.
भारतीय चित्रकारात जुन्या चित्रकारात G D Paulraj ,G D Arulraj आणि G D Thyagaraj यानी खुप काम करुन ठेवले आहे. यातील Paulraj यांचे काम खुप जास्त चांगले आहे आणि नेट वर सर्च केले तर सापडेल. नाशिक च्या शिवाजी तुपे सरांनी शेवट पर्यंत जलरंग लँड्स्केप्स केली आणि त्यांनी खुप मोठे काम करुन ठेवले आहे मात्र नेट वर त्यांचे फारसे काम साप्डत नाही.
एम एस जोशी हे येक जरंगातले मोठे नाव , त्यांचे कामही फारसे सापडत नाही नेटवर फक्त येक लिंक मिळाली त्यावरुन अंदाज येईल
http://www.indiaart.com/old-masters/M-S-Joshi/Gallery-of-M-S-Joshi.asp#
प्रल्हाद धोंड - यांची काहि वेट इन वेट प्रकारातली कामं सापडतील
आत्ताच्या चित्रकारात वासुदेव कामथ सर, मिलिंद मुळीक , paresh maity, समिर मंड्ल (यांची लँद्स्केप्स कमी आहेत मात्र जलरंगावराचे प्रभुत्व कमाल आहे) यांचे काम उच्च दर्जाचे आहे.
तरुण कलाकारात प्रफुल्ल सावंत, अनंता मन्डल, प्रशांत प्रभू हे प्रामुख्याने जलरंगात काम करतात.
माझ्या मित्रां पैकि विक्रांत शितोळे, कुडल हिरेमठ, साहेबराव हारे यांची काम उत्तम आहेत.
परदेशी कलाकारात charles reid, robert Wade, alvaro castagnet, Joseph Zbukvic, Ong kim Seng, john pike, john lovett यांची कामं मी फॉलो केलित.

धन्यवाद पाटील... तुम्ही दिलेल्या सुचनेप्रमाने रेखांकनात बदल करते. जलरंग आर्टिस्टची तुम्ही करुन दिलेली ओळख आवडली. भारतीय व काही परदेशी नावे माहित होती. अजुन काही आर्टिस्टची भर पडली. Thomas W.Schaller यांची जलरंग चित्रे देखील खुप सुरेख आहेत.

यशस्विनीसोडता कुणी आणखी स्केचेस पोस्ट केली नाहित. सगळ्यांकडे हवे असलेले साहित्य जमा झाले असेल आणि बेसिक स्केचेस सगळ्याना जमतील असे गृहीत धरुन उद्यापर्यंत काही वॉशेस वर लिहिन.
स्केचेस मधे टाळण्याजोग्या काही आणखी गोष्टी
ekjinsipaNa.jpg
चित्राततले घटक रेफरंस फोटो किंवा स्पॉट वर वेगवेगळे दिसत असले तरी त्याना ओव्हरलॅप करुन एकजिनसिपणा आणता येतो

canopy.jpg
घ्रर किंवा स्ट्र्कचर च्या मागे foliage काढताना बरेचदा त्या घराच्या छपराचा आकार फॉलो होतो आणि त्या घराला कॅनोपी घातल्यासारखी दिसते ते टाळता येईल

shikhar.jpg
घरामागचे झाड अगदी मधुन उगवल्यासरखे काढु नये.
पुढच्या पोस्ट मधे जसे काही मुद्दे लक्षात येतील तसे अ‍ॅड करीन.

पाटील, खूप छान समजावताय. मी आज उद्यापर्यंत अजून स्केच टाकते. गजाननने मला काही फोटो दिले आहेत आणि ललिता_प्रीतिनेही तिच्याकडले फोटो बिनधास्त वापरायला परवानगी दिली आहे. त्यामुळे मी सद्ध्या श्रीमंत आहे Happy

अजय.. खूपच छान सुरु आहे कार्यशाळा.. मलाही साधीसुधी चित्र काढण्याची आवड होती.. पण आता ह्या कार्यशाळेमुळे एकवेळ चित्र काढणे जरी जमले नाही तरी बेसिक्स तरी समजतील..

Yo.Rocks - धन्यवाद , तुझ्या फोटोंचा मी एके दोनदा रेफरंस म्हणुन तुझ्या परवानगीने वापर केला होता . या वर्कशॉपसाठी कधीलागले तर तुझे फोटो पुन्हा वापरीन ,

अजय, खूप छान समजावून सांगितलेत. आज-उद्या रेखाटन करेन तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन.

गजानन - तुमच्या फोटोत इतके सारे सुंदर घटक आहेत की यातुन तिन /चार पेंटीग्ज नक्की करता येतील. उदा. डावीकडचे झाड घेतले तर येक पोर्ट्रेट फ्रेम मीळते , केळींच्या झाडांचे येक पेंटींग होईल किंवा पुर्‍ण फ्रेम सुद्धा सुंदर आहे. हे येव्हढ्या साठी लिहतोय कारण फोटो रेफरंस वपरताना आपण वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करु शकतो.
पुर्ण फोटोचा विचार करता मुळ फोटोत रस्ता आउट ऑफ फ्रेम जाताना दिसतो मात्र तिथल्या गाडीने आणि झाडने तो चांगला ब्लॉक झालाय. चित्रात असा फ्रेम बाहेर जाणारा रस्ता असेल तर तिकडे आपण रस्त्यातुन आत येणारी व्यक्ती , गाडी इ, दाखउ शकतो.
तुमच्या स्केच मधे घर फेम च्या मध्यभागावर आलेय त्यामुळे मागच्या सुंदर टेकड्याना आणि आकाशाला हवी तेव्हढी जागा मिळत नाहिये.
आपण जर मुळ फोटो जर खालुन २ ईंच आणि उजविकडुन १ ईंच क्रॉप करुन पाहीला तर फ्रेम थोडी अधिक आकर्षक होईल. तसेच डावीकडचे झाड चित्रात ठेवले तर पुर्ण चित्राला एक रेफरंस पॉईंट मीळेल , मी याच फोटोवरुन येक छोटे स्केच केलेय. त्यावरुन माझा मुद्दा लक्षात यावा.
रंगवताना आपण बॅगराऊंड्वर खुप कमी काम करेउन घराचा भाग अधिक उठावदार करु शकतो
IMG-20140209-00255.jpg
अर्थात यात चुक बरोबर असे काही नाही तर आपले स्केच चांगले करण्याच्या अनेक शक्यता आहेत इतकेच

मी कोल्हापुरी - चित्रावरुन कॉपी केले असल्याने कंपोझीशनवर कमेंट करणार नाही मात्र बैलजोडीच्या अ‍ॅनॉटॉमीकडे लक्ष द्यायला हवे येव्हढेच म्हणेन. आपण पुढे लँडस्केप पुरते फिगर्सबद्दल बोलणार आहोत.

अजय, धन्यवाद. Happy

रस्ता ब्लॉकींगचा मुद्दा इंटरेस्टींग आहे. नोटेड.

मला असे वाटत होते (उत्साहाच्या भरात) की मोठा कागद आणून त्यावर फोटोतले सगळे रेखाटावे. पण रंगवण्याचा विचार केल्यावर धास्ती वाटली. म्हणून घरावर लक्ष केंद्रीत केले. कदाचित कार्यशाळा संपल्यानंतर तसा प्रयत्न करून बघता येईल. निदान त्यातून अशी कॉम्प्लिकेटेड फ्रेम करताना कोठे कोठे फे फे उडते हे समजेल.

तुम्ही केलेल्या स्केचवरून मला माझ्या पुढील चुका लक्षात आल्या. चूभूद्याघ्या.

फोटोत रस्त्यावरून घराकडे जाणारी जमीन (रस्ता) चढणीची आहे. आणि घराच्या मागेही मागच्या डोंगरापर्यंत ती चढत राहणारी आहे. माझ्या स्केचमध्ये या चढणीचा फील येत नाही. पण तुम्ही काढलेल्या स्केचमध्ये डाव्या बाजूच्या झाडाच्या रेफरन्स मुळे आणि मागचा डोंगर आणि घर यांच्यामध्ये काढलेल्या झाडांमुळे ती चढण आहे हे स्पष्ट जाणवतेय. माझ्या पेपराची आणि फोटोची लांबीरुंदी जुळल्या नाहीत त्यामुळे मला घराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही दाखवायला पुरेशी जागा उरली नाही. त्यामुळे फक्त घरच व्यवस्थित येऊ शकले. त्या घराच्या मागचे दुसरे घरही दाखवायला जागा अपुरी वाटली.

लख्ख ऊन्हातली दृश्यं जलरंगात सुंदर दिसतात ना? या चित्रात ऊन असल्यामुळे मी पुढच्या लेखाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. Happy

अवांतरः या चित्रात मुलं उभी आहेत तो चौक आहे. खालच्या बाजूला पळणारा मुलगा आणि मागे असलेला मुलांचा घोळका यांच्यामध्ये साधारणतः त्या चौकाचे सेंटर आहे असे म्हणता येईल. घराच्या पुढे उजव्या बाजूला पार आहे (ज्यावर एक माणून बसलेला दिसतोय. पण त्या पारावर झाड नाही. तुटले.) योगायोग असा की चित्रात खालच्या बाजूला पळणारा मुलगा आहे त्याने समोर बघितल्यावर त्याला जे दृश्य दिसेल ते म्हणजे हुबेहुब असे दिसते. Happy

गजानन - आप्ण सुरूवात सोप्प्या ड्रीईंग्जनीच करु म्हणजे सगळ्याना फॉलो करता येईल. लँड्स्केप पेंटींग म्हणजे capturing light. अगगी फ्लॅट लाईट पेक्षा कॉन्ट्रास्ट असलेला छाया प्रकाशाचा खेळ दाखवणारी चित्र जास्त सुंदर दिसतात.

मी गजाननच्याच फोटोवरुन स्केच काढलं आहे. काढून झाल्यावर बाकीच्या पोस्ट्स बघितल्यामुळे पाटिलांच्या कमेंट्स स्केच काढताना लक्षात घेतल्याच गेल्या नाहीत Sad

sketch 2.JPG

मी पण गजाननच्या फोटोवरुन करुन ठेवलं रेखाटन.
नेमकं माझ्याकडचे सगळे फोटो पाणी /तळं/समुद्र असलेले आहेत. चित्रामध्ये पाणी रंगवणं /प्रतिबिंब असणं मला सगळ्यात जास्त अवघड वाटतंय. रेखाटन करायला घेतल्यानंतर पुढे रंगवताना फे फे उडेल ही भिती वाटतेय. काय करू? नुसतं रेखाटन करुन बघू का?

अंतरा - चांगले आहे , येक्दोन छोट्या गोष्टी
तो रस्ता चित्रात फार चांगला दिसणार नाही त्या ऐवजी कदाचीत पुर्ण विस्तीर्ण लॉन दाखवली तर ?
दोन्हीकडच्या झाडानी फ्रेमींग चांगले मिळतेय मात्र दोन्ही झाडं येकाच लेव्हल ला आहेत आणि परत येकाच आकराची आहेत. मुळ फोटोत उजविकडे दोन झाडं आहेत तिही डावीकडच्या झाडापेक्षा थोडी मागे ती तशीच काढली तर चांगली दिसतील
त्या घ्ररांसमोरिल झुडपं रिपिट होतायत म्हणुन मोनोटोनस न वाटवीत म्हणुन काहि झुडप एकत्र किंवा किंचीत लहान मोठी करता येतील

किती छान समजावता आहात. आपल्याला जमेल की न जमेल ह्या विचारात सुरवातच होत नाही हे माझी.
चित्र काढायला कितपत जमणार आहे माहित नाही पण यापुढे पाहिलेली चित्र समजायला नक्कीच खूप मदत होणार आहे या कार्यशाळेची.

Pages