लेख दुसरा :रेखांकन

Submitted by पाटील on 2 February, 2014 - 04:58

जो पर्यंत सगळे आपले रंगसामान गोळा करतायत तो पर्यंत आपण जलरंगासाठी आवश्यक तेव्हढ्या रेखांकनाचा विचार करुया.
जलरंगात येखादे लँडस्केप करायचे म्हटले तर त्याची साधारण प्रक्रिया खालिल टप्प्यात मांडता येईल
१. पेंटींग चा स्पॉट किंवा रेफरंस फोटो नक्की करणे. जर आपण स्पॉट वर पेंटींग करणार असू तर त्यावेळ्चा प्रकाश, आपली आवड्/निवड, बसायला साऊली /आडोसा या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण स्पॉट निवडतो, फोटोवरुन पेंटींग करताना आपल्या वेगवेगळ्या फोटोंमधुन आपण आपल्याला आवडेल तो फोटो निवडतो
मात्र पेंटींग साठी कोणते पेपरचे कोणते ओरिएन्टेशन योग्य ठरेल ते ठरवणे महत्वाचे
म्हणजे या प्रक्रियेची दुसरी पायरी म्हणजे ओरिएन्टेशन ठरवणे
२.ओरिएन्टेशन - आपला इम्पीरिअल साईझ पेपर असतो २०x३० इंचांचा म्हणजे त्याचा आस्पेक्ट रेशो २:३
या पेपरचे समान भाग करत राहिलो तर १५x20 ( हाफ साईज), 10x१५ (क्वार्टर साईझ ), ७.५ x10 (पोस्टकार्ड साईझ?) अशा वेगवेगळ्या साईझेस मिळतील . या सग्ळ्या साईझेस मधे आस्पेक्ट रेशो साधारण २:३ राहतो.
जर आपण पेपर उभा म्हणजे यातली लांब बाजु उभी आणि छोटि बाजु आडवी पकडली तर आपल्या पेपर चे ओरिएन्टेशन हे पोर्टेट ओरिएन्टेशन आणि त्याउलट जर लांब बाजु आडवी धरली तर ते लँडस्केप ओरिएन्टेशन

आपण सारे जग लँड्स्केप ओरिएन्टेशनमधेच बघतो त्यामुळे टीवी, सिनेमा , रंगमंच, कॉम्प्युटर स्क्रिन या सगळ्या दृष्यमाध्यमांचे ओरिएन्टेशन हे लँडस्केपच असते. आणि बहुतेक लँडस्केपसाठी हे जास्तीत जास्त वापरले जाणारे ओरिएन्टेशन , त्यातुन मोठाले जलायश, मासेस उत्तम दाखवता येतात.
landscape.jpg
लँड्स्केप ओरिएन्टेशनमधले एक पेंटींग

पोर्टेट ओरिएन्टेशन हे बरेचदा क्लोजअप्स किंवा एखाद्या गोष्टीची उंची अधोरेखीत करायची असेल तर वापरतात.
उदा. जर राजाबाई टॉवर चे पेंटींग करायचे असेल , किंवा एखाद्या दरवाजाचे क्लोजप करायचे असेल तर लँडस्केप ओरिएन्टेशन पेक्षा पोर्टेट ओरिएन्टेशन जास्त योग्य ठरेल.
portrait orientation.jpg
लोकमान्य टिळकांचे जेथे निधन खाले ती सरदारगृह ही वास्तू खरे तर आडवी बिल्डींग आहे मात्र त्याचे पेंटीन्ग करतानामी मुद्दामहुन पोर्ट्रेट फॉर्म्याट निवडला आणि त्या वास्तूचा मधला भाग हायलाईट केला

याशिवाय पॅनोरॉमीक , स्क्वेअर असे फॉर्म्याट्स गरजेनुसार वापरले जातात. उदा. मुंबईच्या सिलींक चे पेंटींग करायचे झाले तर पॅनोरामा मधे जास्त खुलुन दिसेल . स्क्वेअर फॉर्म्याट हा थोडा डीझाईन कदे झुकतो म्हणुन अगदी सिमीट्रिकल पेंटींग , किंवा थोडी शॉक व्हॅल्यू म्हणुन याचा वापर करता येतो.

square.jpg
बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान करताना काय ओरिएन्टेशन ठेवावे ते नक्की होत नव्हते , म्हणुन स्क्वेअर फॉर्म्याट वापरून थोडा वेगळा परीणाम साधायचा प्रयत्न केला.

३.ओरिएन्टेशन नक्की केले की चित्र रेखाटुन घ्यावे लागते . त्यात खालिल गोष्टींचा विचार करावा लागतो
अ) क्षितीज रेषा अर्थात eye level / horizon line
समजा मी सहा फुट उंच आहे (आहेच Happy )आणि उभा राहुन सरळ पुढे बगहतोय तर साधारण पावणे सहा फुट उंची वर माझी eye level / horizon line येईल, जर जमीनवर बसलो तर तिन्/चार फूटांवर ही horizon line येईल, उंच बिल्डींग वरुन मी खाली बघीतले तर किंवा जमीनीवरून वर बघीतले तर ही horizon line बदलेल. हि येक कालपनीक रेषा असली तरी चित्र कंपोझ करताना फार म्हत्वाची असते ( प्रत्यक्ष क्षितीज आणि क्षितीज रेषा यात गल्लत करु नका आपण कोणत्या कोनातुन बघतो याप्रमाने क्षितीज रेषा बदलते तर क्षितीज नाही)

आपल्या चित्रात क्षितीज रेषा मध्य भागाच्या वर किंवा , खाली पकडावी , अगदी मध्यभागी पकडली तर चित्र खुप सेंटर होईल जे कंपोजिशन योग्य समजले जात नाही ( अपवाद स्केअए फॉर्मॅट, इथे horizon line मध्यभागी चालुन जाईल ) , इथे मी rule of thirds बद्दल लिहणार नाही मात्र तो येक महत्वाचा कंपोझिशन चा नियम आहे , त्यावर इतरत्र भरपुर माहिती खास करुन फोटोग्राफी साईट्स्वर म्हणुन लिहायचे टाळतोय मात्र सर्च करुन येकदा वाचुन घ्या.
eye level.jpg
ब) चित्रातले घटक : स्केच करताना मुख्यता दोन प्रकारचे घटक लक्षात घ्यावे लागतात
१) रेषीय घटक Linear objects उदा: रस्ता , पर्वत रांग , झाडांची रांग इलेक्ट्रीक पोल ची रांग ई. या घटकांबरोबर आपली नजर चित्रात फिरत राहते. म्हणुन त्यांचा त्या दृष्टीने विचार करावा लागतो
२.मासेस (masses)/आकार , यात घर, बिल्डींग , झाड, फिगर्स इ< मोडतात. जर Linear objects बरोबर आपली नजर फिरत असेल तर मासेस जवळ आपली नजर थांबते , त्यामुळे आपली चित्रातली नजर मधेच कुठे अडखळुन थांबेल अशा ठीकाणी ते घटक न काढता जिथे लाईन्स मिळतात तेथे , किंवा रुल ऑफ थर्ड प्रमाणे जिथे इटरेस्टींग पॉईन्ट येतात त्या ठीकाणी हे घटक काढावेत
क) चित्राचे सुलभी करण (simlification) : आपल्या स्पॉटवर किंवा फोटोत खुप सार्‍या गोष्टी असतात त्यात आपल्या स्बजेक्ट ला पुरक अशा गोष्टी घेऊन बाकिच्या गोष्टी काढुन टाकाव्या लागतात. अन्यथा चित्र सुंदर होण्यापेक्षा गिचमीड होईल. वॉटरकलर च्या पेंसिल स्केच मधे आपण शेडींग करीत नाही त्यामुळे चित्रातले भौमितीक आकार शोधुन त्या आउट्लाइन किंवा हवे तेव्हढेच रेखांकन करुन घ्या वे लागते
simplify 1.JPG
या प्रकाशचित्रात पेंटींग साठी आवश्यक ते सग्ळे घटक आहेत, सुंदर कॉन्ट्रास्ट आहे मात्र खुप अनावश्यक घटक आहेत

simplufy2.jpg
त्याचे सुलभी करण करताना पहील्यांदा eye level निश्चीत केली .घराचे कुंपण आणि झाडाखालचे लाकडाचे ओंडके खुप क्लटरींग वाट्ल्याने रेखाटले नाहित. त्या ऐवजी फक्त उभ्या लाकडी पोलेचे कुंपण काढले. डावीकड्चे झाड कंपोझिशनला मारक वटल्याने ते काढुन टाकले.
उज्वीकडच्या झाडाची जागा रुल ऑफ थर्ड प्रमाणे निश्चीत केली, झाडचे फॉलियेज मुद्दाम घराच्या छपरावर थोडे ओवरलॅप केले त्यामुळे रंगवल्यावर येक खोली (depth) साधली जाईल
मात्र उजवीकडच्या झाडाला बॅलंस करायला घरा मागे थोडी छोटी झाडं काढली. कपड्यांच्या दोर्‍या काढल्या नसल्या तरी त्या काढुन सुंदर लिनिअर ओब्जेक्ट काढता येईल.
या चित्रात कुठलेही डीटेल्स नाहित, फक्त काही रेषा आणि भौमीतीक आकार वापरुन स्केच केलेय
हेच चित्र जर पोर्ट्रेट ओरियेंटेशन मधे काढले तर झाड उंच काढावे लागेल आणि घरापेक्षा झाडाला प्राधान्य देता येईल
nOte: रेखांकन करताना परस्पेक्टीव्ह, रिपीटेशन, चित्र घट्कांचा बॅलंस यांचा विचार करावा लागतो. यातील पर्स्पेक्टिव्ह बद्दल इथे http://www.artyfactory.com/perspective_drawing/perspective_index.html चांगली माहिती आहे. बाकिच्या घट्कांबद्दल थीअरी लिहण्यापेक्षा आपण सरावात त्याचा आढावा घेऊ
या चित्रात रेषा मुद्दाम डार्क केल्यात , प्रत्यक्षात चित्र हलक्या हातने रेखाटावे

४. आपले वॉशेस आणि रंग प्लॅन करणे. वॉटरकलर हे ट्रान्स्परन्ट माध्यम असल्याने खुप जास्त वेळा येकाच भागवर रंग लावले तर चित्र बिघडते, तसेच बाकिच्या ओपेक माध्यमांप्रमाणे यात चुका सुधाराअयला फारसा वाव नसतो. म्हणुन साधारणपणे तीन वॉशेस च्या स्टेजेस मधे चित्र संपायला हवे . म्हणुन हे प्लॅन करणे खुप महत्वाचे आहे. आणि ठरलेल्या प्लॅन प्रमाणे रंगवणे हे तितकेच महत्वाचे हे आपण पुढल्या भागात बघु . तो पर्यंत सगळ्यांच्या सामानाची जुळवाजुळव झाली असेल.

तो पर्यंत प्रत्येकाने कंमित कमी दोन फोटो निवडुन त्याचे सुलभीकरण करुन त्याचे लाईन ड्रॉईंग करुन इथे पोस्ट करावे. त्याच्यावर आपण डिस्कशन करुया.
या मालिकेचे बाकिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445

लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.http://www.maayboli.com/node/47815

Group content visibility: 
Public - accessible to all site users

263666_10150225453995893_3010019_n-001.jpg
हा फोटो एका मित्राकडून वापरायला मागितलाय.

296-001.jpg

आणि हे गजाननच्या फोटोवरुन केलेलं स्केच.
297-002.jpg

हे तुम्ही दिलेल्या ग्रुहपाठातील रेखांकन. क्रुपया मार्गदर्शन करा.
sketch_1.jpg

अल्पना - स्केच व्यवस्थीत आहे, मुळ फोटोत लाँग शॉट असल्याने आकाश / मागचा डोंगर /पुढचे पाणी सगळे छान कवहर झालेय , ती बिल्डींग /घर पण योग्य जागी आहे. तुम्हाला जर हे सर्व दाखवायचे असेल तर तसे स्केच करावे.
निर्मल - चांगले आहे , घरं थोडी मध्यभागी आली आहेत ती थोडी खाली असती तर जास्त चांगले , वरची आकाशातली फांदी नाही काढली तरी चालेल.

पाटील मार्गदर्शनाबद्द्ल धन्यवाद. तुम्ही केलेल्या सूचना लक्षात ठेवून ते स्केच पुन्हा काढेन.

मामी - काही सुधारणा करता येतील -
१.पर्स्पेक्टीव्ह - तुमच्या चित्रात डावीकडचे घर आणि उ़जविकडचे घर यांच्या लाइन्स वर जातायत त्या आयलेव्हलकडे खाली जायला हव्यात , मुळ फोटो परत पाहिलात तर लक्षात येईल.

२. झुडपांचा आकार थोडा वेडावाकदा केलात तर चांगला वाटेल
३. जलरंगात जास्त बोल्ड काम करायचे असल्याने बाॠक डीटेल्स न काढलेले बरे , इथे खालचा रस्ता बा़ई चित्रात ऑड वाटतो तो नुसता प्लेन ठेवा.
20140210_200837-c.jpg

सुरेख चाललंय सगळं Happy
पण सध्या लेकाची १२ वीची परीक्षा सुरु असल्यामुळे मला काहीच करता येत नाहीये Sad

चित्र काढायला इतक्यात वेळ मिळत नाहीये. मी चारपाच दिवसात करते. तेव्हा इथे आधी चित्र देईन आणि मग पुढच्या भागाकडे जाईन.

Pages