फाईल स्टोरेज वेब्साईटस बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by वेल on 28 January, 2014 - 07:44

माझा क्लाएंट बदलतो आहे. आत्ताच्या क्लाएंटकडे पूर्वी इथे जीमेल अक्सेस होता आता नाही. google +, wetransferसारख्या वेब्साईटस सुद्धा बॅन आहेत. माझ्याकडे काही मोठ्या फाईल्स आहेत cisa manual, cissp books अशा त्या मला घरी हव्या आहेत. कुठून download केल्यात आठवत नाही.

फाईल स्टोरेज वेबसाईटस सांगाल का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dropbox free space 5gb.
Google drive free space 15gb.
मी दोन्ही वापरतो, कोणत्याही काँप्युटर मोबाइल वरून वापरता येते

तुमच्या ऑफिसच्या पॉलिसिज मधे कोणत्याही क्लाऊड स्टोरेजचा अ‍ॅक्सेस मिळेल असे वाटत नाही. ऑफिसमधून पेन ड्राईव्ह/सीडी/फ्लॉपी इ. माध्यमातून क्रिटिकल माहिती कुणी चोरून नेईल असा पॅरानॉइया/भीती असेल, तर सर्व प्रकारचे क्लाऊड अ‍ॅक्सेस विल बी ब्लॉक्ड.

तेव्हा कंपनीच्या सिसॉप / अ‍ॅडमिन यांनाच विचारून कोणती फाईल स्टोरेज अ‍ॅव्हेलेबल आहे ते विचारून घ्या.

इब्लिस - तुम्ही म्हणता ते खरे आहे जवळजवळ सगळ्या well known sites blocked आहेत आणि असणारच. पण security admin इत्यादींना विचारत नाही आहे कारण त्याचा फार मोठा गोंधळ असतो. एखादी नवी site जी फारशी माहितीतली नसेल किंवा tor सारखी माहित नसलेली site वापरून वरपैकी एखादी site access करता येते का पाहायचं आहे.

तर असे काही कोणी सुचवू शकेल का?(proxy sites चा माझा अभ्यास बंद आहे.)

वेल,

तुम्ही हा प्रश्न विचारला आहे so I am assuming
a) These files are not on your personal computer/You cannot download them on your personal computer
b) You cannot copy them on to your pen drive or burn a DVD or personal storage and bring them home.

फाईल्सच्या नावावरुन CISA Certification संबंधित फाईल्स ( पर्सनल युझ च्या) वाटत आहेत. तुम्ही म्हणताय की क्लायंट बदलत आहात. अशा परिस्थितीत तुम्ही एखादी अननोन साईट वापरलीत आणि/किंवा प्रॉक्सी इ. बदलायचा प्रयत्न केलात तर ते सिक्युरिटी अ‍ॅडमिनच्या लक्षात येइल. जर ते तुमच्या क्लायंटच्या सिक्युरिटी पॉलिसी च्या विरुद्ध असेल तर तुम्ही या हार्मलेस फाईल्स डाउनलोड करत असाल तरी तो Breach समजला जाण्याची शक्यता आहे. कृपया सावधानता बाळगा.

मी गुगल वर सर्च करुन पाहिले, तुम्ही जी नावे लिहिली आहेत त्या फाईल्स काही साईट्स वर डाउनलोड करता येउ शकते असे दिसतेय.

वेल,
तुम्ही प्रॉक्सीज चा अभ्यास नाही म्हणताहात, तर या फंदात न पडलेले बरे राहील. मनस्मी म्हणतात तसे लॉग्ज मधे सापडणारच. व प्रॉब्लेम येईल. टॉर ब्लॉक करणारा/करू शकणारा सिक्युरिटी अ‍ॅडमिन हुशारच आहे, त्यालाच विचारून फाईल्स डालो करून घ्या. थोडं गोड बोलून काम होऊन जातं. Happy
आपलीच फाईल कॉम्प्युटरमधून काढायची असेल तर अडचण यायला नको.

विन सिक्युरिटी लॉग्स मध्ये सगळाच डेटा येतो... अन जर वेब्सेन्स (वा तत्सम काही असेल) तर स्वतःच्या वर्क्स्टेशन वरून नकोच, अगदी एका एका साईट चे डिटेल्स मिळतात.
उपाय - तुम्हाला ज्या फाईल्स लागतात, त्या घरी पीडी वर घ्या, नंतर अ‍ॅडमिन शी बोलून त्यांच्या सिक्युरिटी सॉफ्ट ने स्कॅन करून मग तुमच्या ड्राईव वर घ्या. याकरता एखादवेळेस हायर मॅनेजर ची परवानगी लागेल... Happy

वेब्सेन्स आणि तत्सम सगळं असणार. सेक्युरिटि पॉलिसीज खूप स्ट्रिंजंट आहेत. इथले रुल्स आणि मी इथे कन्सल्टण्ट आहे हे पाहाता ऑफिशियल परवानगी नाही मिळणार.

झालय असं की ऑफिसात डालो केलेल्या काही टेक्निकल फाईल्स घरी हव्या आहेत. माझ्याच फाईल आहेत, (पैसे भरून डालो केल्या). टेक्निकल सर्टिफिकेशनसाठी आणि इसाकाच्या वेब्साईटवरून डाऊन्लोड केलेल्या, तेव्हा माझी इसाकाची मेम्बरशिप होती. आता त्या फाईल्स खरं तर १५० एमबी ची पुस्तकं आता वेबसाईटस् वर आता नाहीयेत आणि मी वेड्यासारखं ते घरी डालो नाही करून ठेवलं.

त्यामुळे फार वेलनोन नसलेल्या फाईल स्टोरेजच्या वेबसाईटस किंवा ज्या वेब्साईटस फाईल स्टोरेज नावाखाली लिस्टेड नाहीत पण तरी फा.स्टो करतात अशा शोधते आहे. की ज्या वेबसेन्समध्ये वेगळ्या डिटेक्ट होणार नाहीत. किंवा त्याचा अलर्ट येणार नाही.

अगदी शेवटचा पर्याय बॉसला मस्का मारून अ‍ॅप्रूवल घेऊन सगळं करणं आहेच. पण ते नाही मिळालं तर म्हणून इतर पर्यायही शोधते आहे,

360.autodesk.com

छोट्या छोट्या फाईल्स २-८ एमबी अपलोड केल्याने काही प्रॉब्लेम येणार नाही. क्लाऊड स्टोरेजमध्ये भरपूर जागा आहे. मी एक प्रीकॉशन घेते आहे १०-१५ एमबी किंवा त्याहून मोठ्या फाईल्स नाही टाकत आहे.

.

isc2 चे ऑफिशियल पुस्तक नाही आहे. sybex चे आहे. isc2 चे official पुस्तक मिळत सुद्धा नाही. आणि ती सगळी पुस्तकं खूप मोठी आहेत. ती नाही copy करत आहे. hard copy आहेत त्याच्या माझ्याकडे. त्यामुळे त्यावर पाणी सोडले.

isaca च्या फाईल्स विकत घेतलेल्या आहेत. आणि त्या खूपच महत्वाच्या आहेत.

मनस्मी तुम्ही लिहिलेले काढून का टाकलेत?

वेल,
WinRAR वापरून छोटे छोटे तुकडे करता येतात. हवे तितके.
ते सगळे तुकडे एकत्र जोडून नंतर पुन्हा मोठी फाईल बनेल.

फाइल्सची साइज रीड्युस करण्याचा आॅप्शन (< २एमबी किंवा झिप) असेल तर या फाइल्सच्या बॅचेस करुन पर्सनल इमेलला पाठवा; हाकानाका. बरेचसे इमेल सर्वर अपटु ५एमबी सपोर्ट करतात.

माझ्या मते हे सर्व करण्या पेक्षा सोशल इन्जिनियरिंग वापर आणि परवानगी घेउन तुझ्या CISA audit साठी usb ebable करुन घे आणि फाइल्स कॉपी कर.

पेन ड्राइव्ह वर कॉपी केलेलेपण लॉग मधे येते का? >> हो.
वेबसेन्स ला कॅटॅगरी ब्लॉक केलेली असते बहुधा. म्हण्जे जर ऑनलाईन स्टोरेज ही कॅटॅगरी जर ब्लॉक केली असेल तर याखाली येणार्या सगळ्या साईट्स बंद. वर जर अ‍ॅक्सेस करायचा प्रयत्न केलाच तर ती साईट एकदा उघडते अन पुढच्या वेळेस कॅटेगरीत काऊंट झल्याने बंद होते, मॅन्युअली करतातही...