पद्मदुर्ग श्रमदान व् दुर्गदर्शन मोहिम १२-१-१४

Submitted by मी दुर्गवीर on 23 January, 2014 - 12:02

जय शिवराय ,
१२-१-१४ रोजी दुर्गवीर आयोजित पद्मदुर्ग दुर्गदर्शन व श्रमदान मोहीम नेहमी प्रमाणेच हि मोहीम यशस्वी ठरली ……
पद्मदुर्ग किल्ल्याची लोकान मध्ये असणारा गैरसमज दूर व्हावा व स्थानिकांना एक रोजगार मिळावा या हेतूने दुर्गवीर प्रतिष्ठान दर वर्षी पद्मदुर्ग वर मोहिमा राबवत आहे .

या मोहिमेत मुबई -पुणे मिळून ६० च्या वर दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला . या मध्ये १३ महिला , शाळकरी लहान मुले यांनीही आवर्जून सहभाग घेतला .

रात्री मुंबई पासून जो प्रवास सुरुझाल तो मुरुड कोळीवाडा येथे थांबला . थोडा फार आराम करून पहटे ७. ४५ ला मुरुड कोळीवाडा ते पद्मदुर्ग असा २५ मीनिटचा बोटीने प्रवास करत दुर्गाचा आत प्रवेश केला.

गडावर पोचल्यावर प्रथम सर्वांची ओळख परेड झाली. दुर्गवीर प्रमुख संतोष हासुरकर यांनी मोहीम कशी पार पाडली जाईल व घ्यावयाची काळजीचे याची माहिती दिली व ओळख झाल्यावर सारे नवीन व प्रथम आलेले दुर्गवीर गड दर्शनासाठी गेले. कर्तव्याचे पालन म्हणून गडावर असलेलेया कचरा जमा करण्यास सुरवात केली . काही मोजकेजण प्लास्टिक पिशव्या घेऊन गडावर इतरत्र टाकलेला प्लास्टिक कचरा गोळा केला. आम्हाला कचरा गोळा करतांना पाहून नव्याने सहभाग घेतलेल्या महिला , शाळकरी मुल , व बाकीच्या दुर्ग प्रेमींनी हि या हातभार लावला ''हे कार्य पूर्ण करू मग किल्ला पाहू'' … असे बोलून आमचा आत्मविश्वास अजून वाढविला ….साधारण ७ पिशवी कचरा किल्ल्यावरून जमाकरण्यात आला यात बिअरच्या बॉटल , प्लास्टिक बॉटल,प्लेट्स व पिशव्या आणी इतर अन्य कचरा काढण्यात आल्या.

गडावर बर्याच पिकनिक साठी आलेल्या परिवारास संतोष हसुरकर व अजित राणे यांनी किल्ल्याचे महत्व समजून सांगत होते .

पद्मदुर्ग किल्ल्यावर गेले एक दीड वर्षांपासून पुरातत्व खात्याचे काम चालू आहे … बर्या पैकी किल्ल्या स्वच्छ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे . पण या पेताडांना रोखणे मुश्कील …। काही समाजकंटकांनी तर गडावर वसवलेली देवीची मूर्ती (एक चिरेवरिल चित्र )समुद्रात फेकली होती … ती अखंड चिरा पुनः त्याजागी वसवून प्रणाम करून आम्ही सर्वे महाद्वाराजवळ पोहचलो.

स्वच्छता करून व दुर्गदर्शन करून सगळे महाद्वार जवळ पोहचले १२ जानेवारी म्हणजे स्वराज्य प्रेरक आई जिजाऊची जयंती यानिमित्त त्यांच्या प्रतिमेला वंदन करून अल्काब पुकारून या मोहिमेची सांगता केली …

पुन्हा पद्मदुर्ग ते मुरुड असा प्रवास करत आम्ही सर्व एकत्र जमलो. सर्व नवीन दुर्गवीरांनी आपले या मोहिमेबद्दल व दुर्गवीर च्या कार्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले. प्रत्येकजण दुर्गवीर च्या कार्याचे परिणामी आम्हा सर्व "दुर्गवीर शिलेदारांचे" कौतुक करीत होता ते ऐकून कान सुखावत होते पण आपल्यावरील लोकांच्या विश्वासाची आणि विश्वासातून आलेल्या जबाबदारीची जाणीव आम्हाला होत होती. प्रत्येक जण आपापल्या परीने दुर्गवीरच्या कार्यात सहभागी होण्याचे वचन देत होता. त्यानां सर्वांना एक आवाहन आहे कि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्यातून तुम्हाला हे शिवकार्य पुढे कसे नेता येईन याचा प्रयत्न करावा. या दुर्गवीरां मध्ये काही शिक्षक होते त्यांनी त्यांच्या शाळामध्ये य कार्याचा प्रसार करावा व मुलांना या दुर्गदर्शन, श्रमदान मोहिमेत सहभागी करून घ्यावे, शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे. काही Animation, Editing या क्षेत्रातील होते त्या दृष्टीने काही माहितीपट (Video Clip) असे आणि इतर प्रकारे आपला सहभाग या शिवकार्यात ठेवावा.…

या अश्या बोटीने प्रवास करून पद्मदुर्ग कडे प्रवास सुरु झाला
DSCN9341_0.JPG
दोन मोठ्या बोटी आणि एक छोटी नाव घेवूनी हर हर महादेवच्या गजरात पद्मदुर्ग कडे निघालो .
padmadurg (290).JPGee.jpg
जंजीर्याच्या छाताडावर टीचून उभारलेला अभेद्य पद्मदुर्ग

13-001.JPG
दुर्गवीर प्रमुख संतोष हासुरकर यांनी मोहीम कशी पार पाडली जाईल व घ्यावयाची काळजीचे याची माहिती दिली व ओळख झाल्यावर सारे नवीन व प्रथम आलेले दुर्गवीर गड दर्शनासाठी गेले.

14-001.JPG14-001.JPG
गड दर्शन सोबत स्वच्छता हि सुरु

23-001.JPG
यात बिअरच्या बॉटल , प्लास्टिक बॉटल,प्लेट्स व पिशव्या आणी इतर अन्य कचरा काढण्यात आल्या.

234.JPG
काही विशिष्ठ दिवशी या दुर्गावर पेताडांची संख्या फार असते … आणि त्यांना या किल्ल्यावर घेवून येण्याची सोय … सिद्धीचे वंशज करतात … या किल्ल्या जवळील नावाड्यांना जंजिरा किल्ल्यावर जाण्यास सक्त मनाई आहे … तिथे फक्त त्याचं समाजाची लोक नेवू शकतात ….

143-001.JPG
एका बाजूला एक मावळा गडावरील कचरा उचलत आहे तर दुसर्या बाजूला सचिन पांडुरंग जगताप बंधू आपल्या येणाऱ्या पिढीला गडाचे महत्व पटवून सांगतांना

rt-001.JPG
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय

123-001.JPG
जंजीर्याच्या कित्येक तोफाना तोंड देत आपल्या 'छातीचा कणा '' फुगवून आणि इथे घडलेल्या पराक्रमाची साक्ष देत अभिमानेने उभे असलेले पद्मदुर्ग वरील अभेद्य बुरुज

j-001.JPG
काही मूळ किल्ल्याच्या रक्षणा साठी बांधला गेलेला बुरुज …… ??

v-001.JPG
प्रतिमेची पुजनाची तयारी

w-001.JPG43-001.JPGl-001.JPGn.JPG4.JPG
तोंडाकडील बाजूने फुटलेल्या पद्मदुर्गा वरील ओतीव तोफ.

DSCN9498.JPGDSCN9508.JPG
आतील परिसर

padmadurg (208).JPG
या किल्ल्यावर आवर्जून पाहावे अस अदभूत दुर्गबांधणीत केलेले प्रयोग पाहावयास मिळते । इतर किल्ल्याप्रमाणेच एका वर एक चिरा ठेवून हाही किल्ला बांधला आहे . पण दगडांमधील चुना इतका भक्कम आहे कि, गेल्या तीनचे साडे तीनशे वर्षात रोज भारती - ओहोटीच्या लाटा आपटून इथल्या तटबंदीतील दगड झिजून गेले . पण तिथला चुना मात्र शाबूत आहे . हा चुना चांगला ५-६ से.मी आपन बाहेर डोकावातांना छायाचीत्रात स्पष्ट दिसत आहे …
as-001.JPG
दुर्गवीर चमू

padmadurg (401).JPG
या मोहिमेत जवळपास 60 जणांनी यात भाग
घेतला आणि 8 पिशव्या भरून प्लॅस्टिक बोटल्स आणि तत्सम
कचरा गोळा करून शहरातील कचरा पेटीत टाकला.

धन्यवाद
'दुर्गवीर' नितीन पाटोळे
08655823748

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दुर्गवेडा,

नमस्कार! दुर्गावीरांच्या स्वच्छता अभियानाचे मला नेहमी कौतुक वाटत आले आहे. स्वत:हून प्रेरित होऊन किल्ल्यांची साफसफाई कोण करतो! हल्ली सगळेजण आपल्याच विश्वात दंग असतात.

अशा परिस्थितीत तुम्ही चिकाटीने जे कार्य हाती घेतले आहे त्यावरून एक खात्री पटते. ती म्हणजे शिवरायांचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीस मिळणार आणि च.

सर्व दुर्गवीरांच्या चिकाटीस आणि स्वयंप्रेरणेस पुनश्च विनम्र अभिवादन! Happy

आ.न.,
-गा.पै.

waachun doLyat paaNee aale. petaaDaaMnaa gharaat baar madhye pitaa yet naahee kaay ashaa thiKaaNee jaaaUn pitaat. hyaa sagaLyaa thiKaaNee jaayalaa entry fee laavalai paahije aaNi samanachi kasoon tapasani keli paahije.