ज्योतिषी

Submitted by विजय देशमुख on 23 January, 2014 - 21:08

खरं तर श्री मामासोबत जायला नाखुश होता. एकतर जोतिष्याची प्रचंड चीड अन मामाच्या अखंड बोलण्याचीही. त्याचा मामाही एक छोटासा जोतिषी. पण त्याच्यावर विश्वास नाही, म्हणुन आज खास मामाने प्रख्यात जोतिषी महादेव शास्त्रींची भेट घ्यायची ठरवले होते. महादेव शास्त्री, थोडेसे तापट स्वभावाचे होते, त्यामुळे लोकं त्यांच्यापुढे जरा बिचकुन असायचे. त्यामुळे त्यांच्या घरी श्री काही बोलणार नाही हे पढवुनच मामा त्याला घेउन आला होता.
मामा-भाचे पोहचले, तेंव्हा सकाळचे १० वाजले होते, पण अंगातुन घामाच्या धारा वाहत होत्या. शास्त्रींच्या बंगल्यात शिरले, तर थंडगार एसीने त्यांना बरं वाटलं. हॉलमध्ये महादेव शास्त्रींचा एक सहाफुटी फोटो होता. त्याला मामाने वाकुन नमस्कार केला. श्रीलाही नमस्कार कर म्हटले, तर श्री चिडला.
"इथे आलो तेच खूप समज... नाहीतर तुमच्यासारखे भोंदू..."
"ए... चुप बस आता... "
मामा पुढे काही बोलणार, इतक्यात शास्त्रीजी येण्याची त्याला चाहुल लागली.
"हरी ओम... हरी ओम..."
"गुरुजी नमस्कार करतो."
"आयुष्यमान भव..."
"गुरुजी, हा माझा.........."
"फक्त जन्मवेळ, स्थळ आणि तारिख"
मामाने चुपचाप माहिती दिली.
महादेव शास्त्रींनी लगेच टॅबवर आकडेमोड केली आणि पत्रिका बनवली. ते बघुन श्रीला थोडेसे हसु आले. पण बराच वेळ ते पत्रिकाच बघत बसले. ते काही बोलत नाही, असं बघुन मामाने थोडीशी चुळबुळ केली, पण शास्त्रींनी त्यांना काही बोलू नका, असे खुणावले.
श्रीला त्यांचे पत्रिका अध्ययन म्हणजे एक बकध्यान वाटले. शास्त्रींऐवजी एक बगळा आपली पत्रिका बघतोय, असं चित्र डोक्यात येउन त्याला पुन्हा हसू येऊ लागले.
"हम्म..... अशी पत्रिका बघणे, फार कमी लोकांच्या नशिबात असते..."
"म्हणजे गुरुजी.........." मामाला जरा आनंद झाला.
"म्हणजे तू जोतिष्याचा अभ्यासक अन हा.... निंदक..."
"पण............."
"पण नाही अन बिण नाही........ इथुन तडक निघायचं.... हा विश्वास ठेवणार नाही, पण याची पत्रिकाच दाखवते की हा जन्मभर जोतिष्याच्या विरोधातच बोलणार आणि तसं कार्यही करणार.........."
"गुरुजी, ............"
"निघा.........." शास्त्रींनी कडक शब्दात म्हटले.
श्री लगेच उभा राहिला, पण मामा मात्र अस्वस्थपणे बसुन राहिले.
"निघा म्हटलं मी............ काय?" पुन्हा एकदा शास्त्रींनी आवाज चढवला.
मामांनी पुन्हा एकदा नमस्कार केला, अन पडलेल्या चेहर्‍याने बाहेर निघाले. श्रीला बाहेर येताच मामाचा चेहरा बघुन हसू आवरेनासे झाले. त्याला हसताना बघुन मामा अधिकच चिडला.
बराच वेळ गेला, एस्टीत थंड हवा लागली तसं मामाचं डोकं शांत झालं. तो जरा विचार करु लागला. गाव आलं, तशी दोघही उतरली. अन अचानक मामा म्हणाला,
"तुझा खरच जोतिष्यावर विश्वास नाही ना?"
"अर्थातच !"
"मग ह्या पत्रिकेवरुन शास्त्रीजींनी सांगीतलेले भविष्य खोटे ठरवुन दाखव.........."
नेहमी तर्काने विचार करणारा श्री मात्र त्यातील मेख समजुन निरुत्तर झाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान थोडक्यात पण आशयपूर्ण लिहीलय. उत्सुकता ताणली जाते. Happy
गोष्टीतले "श्री" मेख वगैरे समजुन निरुत्तर होतात, व्यावहारीक जगातले तमाम "श्री" हेकटपणे अभ्यास न करता आपले तेच खरे म्हणत रहातात.

तुमच्या ' ज्योतिषी ' ह्या title मुळे बरेच जण हा लेख वाचणार हे मात्र नक्की !

//गोष्टीतले "श्री" मेख वगैरे समजुन निरुत्तर होतात, व्यावहारीक जगातले तमाम "श्री" हेकटपणे अभ्यास न करता आपले तेच खरे म्हणत रहाता//// त्यांचा ज्योतिष विरोधी अभ्यासच जोरात चालू असतो ना Happy

>>श्रीला त्यांचे पत्रिका अध्ययन म्हणजे एक बकध्यान वाटले. शास्त्रींऐवजी एक बगळा आपली पत्रिका बघतोय, असं चित्र डोक्यात येउन त्याला पुन्हा हसू येऊ लागले.<<
Biggrin
अशा बकध्यानात डोळ्यात किंचित तिरळेपणा येतो असे आमचे निरिक्षण आहे. असो कथा जाम आवडली. कथेतील मामांना आमच्या कडे गप्पा मारायला पाठवून द्या!

muLaat shree mama sobat kaa jaato.

aataa to asaM mhaNel thik aahe tumhi mahan mee lahaan. aataa bas karaa.

जनरली मकर आणी कुम्भ राशीचे लोक ज्योतिष्य वगैरेवर विश्वास ठेवत नाहीत. एकतर या शनीच्या राशी. मकर स्वरास आणी कुम्भ मूलत्रिकोण रास. हे लोक कर्मकान्डावरही विश्वास ठेवत नाहीत.

गम्मत नाही, सिरीयसली बोलतेय. मकर ही अती कष्टाळु रास तर कुम्भ बौद्धीक रास त्यामुळे असेल कदाचीत.

अहो एस आर डी ते मामा शास्त्रीन्चे मित्र होते ना, म्हणून डायरेक्ट अपोईनमेन्ट न घेता गेले असतील. आणी फोनवर घेतली असेल तर? जाऊ द्या. ही गोष्ट आहे, घटना नाही.:स्मित:

लिन्बुभाऊ मला जास्त माहीत नाही. पण वर लिहील्याप्रमाणे जर पत्रिकेत शनी पन्चमात असेल किन्वा निचीचा किन्वा स्वगृही असेल तर हे लोक जास्त धार्मिक बनत नाहीत. पन्चम स्थान हे उपासनेचे हे तुम्हाला माहीत आहेच. तुम्ही पुण्यात एकदा जाऊन या जोगेश्वरीजवळच्या ग्रहान्कीतच्या कार्यालयात. तिथे तुम्हाला जुने ग्रन्थ पण मिळतील.

पण लान्ब कशाला, इथेच कुठेतरी दाभोळकरान्ची पत्रिका श्री प्रकाश घाटपान्डे यानी दिली होती की. ती एकदा तपासुन बघा. त्यात शनी मन्गळ युती आहे. काही वेळेस राहु सारखा ग्रह सुद्धा मोकळा स्वभाव देतो.

लिंबूजी मी तुम्हाला माझ्या नवर्‍याची पत्रिका पाठवून देते. देऊ का? तो पूर्ण नास्तिक नाही. त्याची श्रद्धा आहे आई वडिल आणी शिक्षकांवर..

भाडगळ.:हाहा: म्हणजे काय? नावावरुन रास ओळखणे कठिण आहे. कारण म्हणल्यावर वृषभ रास येते. पण तो/ ती त्या वृषभेचेच असतील असे नाही ते कर्केचे / मीनेचे पण असु शकतात. पण साधारणपणे हरीश/ हर्षदा अशी नावे कर्क राशीची असतात. तर शीतल, समृद्धी, सचीन ही कुम्भ राशीची पण नावे असतात. पण त्यावरुन लगेच निष्कर्ष काढु नका.:स्मित:

बाकी नन्तर लिहीन.

श्यामसुंदर आपल्या प्रश्नाचे उत्तर कॊपी पेस्ट

५) नावावरून जन्मरास व जन्मनक्षत्र कसे ओळखतात ?
खेडेगावात मूल जन्माला आल्यावर गावच्या जोशाकडून त्याचे जन्म-नांव काढून घेतात. पूर्वी गावात भिक्षुकी करणाराच ज्योतिषीही असायचा. तो पंचांगातून त्या दिवशीचे नक्षत्र पाहून अवकहडा चक्रावरून नावाचे आद्याक्षर सांगायचा. चू, चे, चो, ला, ली, लू, डा, डी अशा अक्षरातून तो एखादे अक्षर सुचवायचा. मग त्या अक्षरावरून डामदेव, चोमदेव अशी निरर्थक नांवे किंवा साधी नावे सुद्धा जन्मनांव म्हणून ठेवली जायची. या पद्धतीमुळे जन्मतारीख किंवा जन्मवेळ कुठेही नोंदलेली नसली तरी जन्मनांव पक्के लक्षात रहात असल्यामुळे त्या नावावरून अवकहडा चक्रातून जन्मनक्षत्र व जन्मरास कोणती ते कळते.

संदर्भ- ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रस्नोत्तरातून सुसंवाद