चला, ओळखा...

Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2014 - 22:08

चला, ओळखा...

चला चला चला
लौकर ओळखा
खेळ गमतीचा
किती अनोखा

चला चला चला
डोळे मिटा जरा
आणि आता असे
हात पुढे करा

डोळे किलकिले
करायचे नाही
फटीतून त्यांच्या
मुळी पहायचे नाही

हातावर आहे
खाऊ मऊ मऊ ?
का कडक आहे जरा
ओळखा ओळखा भाऊ ?

ओळखा ओळखा पाहू
कसा आहे खाऊ
नाकाला विचारा
सांग जरा भाऊ

गोड का खमंग
सांग की रे वेड्या
नाकपुड्या कशा
मारतात उड्या

डोळे मिटून अशी
गंमत तरी करु
दम्ला नाकदादा
विचार कर करु

जाऊ द्या त्याला
जीभेलाच धरु
येईल का सांगता
तिला विचारु

आंबट नि चिंबट
येता जीभेवर
अंग थरथरे
पार आतवर

जीभ मारी मिटक्या
चुटुक चुटुक
हे तर आपले
चिंचेचं बुटुक ......

फटक्यात जीभेने
गुपित की फोडले
बाळ मजेने
खुदकन हसले .. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users