अमिताभ ची गाणी...१

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

"ये दोस्ती हम नही छोडेंगे" हे गाणे अमिताभ आणि धर्मेन्द्र नी गायलेलं नाहीये, ते महमंद रफ़ी ने गायलेय" असे माझा मित्र म्हणाला आणि मी
उडालोच.
आता याच्या तपशीलात चूक असली तरी 'तेव्हा' ते माहीत नव्हते.
ही गोष्ट आम्ही ८-१० वर्षाचे होतो तेव्हाची आहे. त्यावेळी अमिताभ त्याची गाणी स्वत: गात नाही हे आमच्या दृष्टीने नवीन होते. नशीब! तेव्हा तो मारामारीही स्वत: करत नाही हे आम्हाला अजून कळले नव्हते. अभिनय वगैरे तेव्हा फारसे कळतही नव्हते. पण अमिताभ ची जादूच अशी होती की आम्ही तरीपण त्याचे चित्रपट बघायला गेलोच असतो.
आणि तो गात नाही हे आम्हाला कळेपर्यंत तो खरोखरच गायला(ही) लागला होता.

खरंतर सुरुवातीला जेव्हा अमिताभ गाजू लागला तेव्हा त्याला फारशी गाणी नसायची. हे म्हणजे त्याचे जेव्हा खास 'अमिताभ' स्टाईल चे चित्रपट गाजू लागले तेव्हा एखादे तुरळक 'कभी कभी' मधले गाणे सोडले तर 'ज़ंजीर', 'दीवार', 'शोले', 'नमक हराम', वगैरे चित्रपटांत त्याला अगदी अपवादानेच गाणी असत.
त्यामुळे अमिताभसाठी कोणत्या पार्श्वगायकाचा आवाज आहे? असा प्रश्नच नव्हता.
त्याआधीच्या काही चित्रपटांत त्याला गाणी होती, पण ते जुन्या वळणाचे चित्रपट होते: 'एक नज़र', 'अभिमान' इत्यादी.
यश चोप्राच्या 'त्रिशूल', 'काला पत्थर' मधे सुद्धा त्याच्या वाट्याला एखादेच एखादेच कडवे आले.

पण नंतर किशोरची गाणी 'अमर अकबर अंॅथनी', 'परवरीश', 'डॉन' पासून येऊ लागली आणि मग अमिताभ-किशोर हे एक पक्के समीकरण झाले. किशोरचा आवाज अमिताभच्या व्यक्तिमत्वाला अगदी फिट्ट बसायचा (आणि मला वाटते यात किशोरचे कौशल्य जास्त आहे. याचे आणखी चांगले वर्णन 'योग' च्या बीबीवर ऑगस्ट ४, २००५ च्या लेखात आहे.) आणि त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची अमिताभची गाणी फेमस झाली. कोणतीही हीरॉईन बरोबर नसताना, कसलाही रोमंॅटिक पणाचा लवलेश नसताना ही अमिताभची एकट्याची किंवा दुसर्‍या एखाद्या हीरोबरोबरची गाणी जितकी गाजली तितकी त्याआधी किंवा नंतर कोणाचीही गाजली नसतील. 'अरे दीवानो मुझे पहचानो','खैके पान बनारसवाला','रोते हुए आते है सब','हम प्रेमी प्रेम करना जाने','बने चाहे दुश्मन जमाना हमारा','अपनी तो जैसे तैसे','तेर जैसा यार कहॉ','पग घुंगरू' ही अशी काही गाणी.

तेव्हा किशोरची ही दुसरी इनिंग्ज चालू होती आणि अमिताभच्या बहूतेक चित्रपटांतल्या 'मैत्री' वगैरेच्या गाण्यात किशोरचा आवाज अमिताभला असायचा आणि बिचारे विनोद खन्ना, शशी कपूर, शत्रूघ्न वगैरेंना थोडा दुय्यम रोल त्या गाण्यात मिळायचा. याला अपवाद म्हणजे 'ये दोस्ती' आणि 'मोहब्बत बडे काम की चीज है'. 'कस्मे वादे' मधे सुद्धा 'मिले जो कडी कडी' मधे असेच होते, पण तो 'दुसरा' अमिताभ असल्याने आर्डीने मुद्दाम तसे केले असेल (रणधीर ला किशोर).
यात रफ़ी वगैरेंना दुय्यम लेखायचा उद्देश नाही, पण ती गाणी जरा 'action' टाईपची असल्याने किशोरचा जोर स्वाभाविकच जास्त असायचा.

हे सगळे 'शराबी' पर्यंत चालले. पण मधेच मनमोहन देसाईने 'रफ़ीसारखा गातो' म्हणून शब्बीर कुमारचा आवाज अमिताभसाठी 'कूली' मधे वापरला आणि मग मनमोहन देसाईच्या पुढच्या चित्रपटांतील अमिताभची गाणी क्वचितच किशोरची होती. ते चित्रपटही पुढे पांचट झाले आणि गाण्यांतलीही मजा गेली.
माझ्या दृष्टीने किशोरचा प्लेबॅक बंद झाल्यावर अमिताभची गाणी पूर्वीसारखी राहिली नाहीत. या दोघांचे शेवटचे लोकप्रिय गाणे म्हणजे 'अंधेरी रातोंमे'. अमिताभची ती खास इमेज जाण्याचे कारण त्याच्या चित्रपटांचा दर्जा घसरला हे खरे होते, पण किशोरच्या आवाजातली गाणी नसणे हे ही असावे.

अमिताभच्या पार्श्वगायकांपैकी किशोर सर्वांत मुख्य. बाकी एकूण १९ इतर गायक आत्तापर्यंत अमिताभसाठी गायले आहेत
त्यांच्याबद्दल पुढच्या लेखात...

प्रकार: 

अरे वा .. हा बघितलाच नव्हता .. मस्त, सगळं आहे तसंच्या तसं पटलं म्हणून एकदम खुमासदार .. Happy

"जहाँ तेरी ये नजर है" चा उल्लेख चालला असता .. Happy

रिमझिम गिरे सावन.

किशोरच्या आवाजात. जबरदस्त गाणे आहे. किशोर रोमँटिक होतो तेव्हा त्याला तोड नाही.

पग घुंगरू नमक हलाल.
अजूनही तितकेच आव्डते. पाठही आहे. स्मिता जबरी दिसते ह्यात. ती पांढरीचमकी साडी, तेव्हा स्कँडलस वाट्णारा बिलोज ते आलाप, ते भयानक मेकप केलेले नर्तक आणि आधीचा चप्पल पाण्यात जाण्याचा प्रसंग. सर्वच प्युअर अमिताभ.

माय नेम इज अँथनी गोन्सालवीस. क्या लिखे.

हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे. आमची रोमान्सची कल्पना तस्सला ड्रेस आणि तस्सले केस सोडून.
एव्ढीच होती. परवा मुरूड किनार्‍यावर तस्सलीच बग्गी पण दिसली. ! काश अमित भाई भी होते. तो बग्गीला चक्क लोंबकाळला आहे!

अमितच्या मानाने सारे खान्स जरा धुवट वाटतात बाई.

नशा शराब में हो ता तो नाचती बोतल. सर्व गाणे सुरेख आहे. जयाप्रदाचे नाजूक हावभाव आणि अमिताभचा मर्द पणा परफेक्ट मॅच होतात. जहां चार यार! अब इसके बारे में क्या लिखें

त्यातलेच इंतहा हो गयी. ह्यातला प्रेयसी आल्यवरचा ड्रम्सचा पीस जबरी आहे. भाप्पीदा रॉक्स.

बडी सूनी सूनी है. मिली दु:खी अंतरंगाचे गाणे.

छू कर मेरे मनको. त्याच्यावर आहे का ते लक्षात नाही.

तेरे जैसा यार कहां. याराना का दोस्ताना ते लक्षात नाही.

बट द वरस्ट ( हैद्राबादी उच्चार!) इज यूजिन्ग शब्बिर कुमार. इन मर्द टांगेवाला. अगदी सॅक्रिलेज वाटले होते आपला अमित आता पैश्या च्या मागे लागून काहीही करायला लागला आहे हे समजायला लागले होते.

खरोखर ' मनाला स्पर्श ' केला या धाग्याने !

अमिताभ एक अष्टपैलू कलाकारआहे. एक पराकोटीचा अभिनेता आणि त्याचा गहिरा बरीस्टा आवाज हे त्याचे केवळ काही पैलू !
हाल-ए-दिल तुमसे कैसे कहू …. ( बूढ्ढा होगा तेरा बाप २०११) कितीदा जरी ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते…
मागील पिढीतील महान गायक कुंदनलाल सैगल यांची परंपरा अमिताभने पुढे चालू ठेवलेली !
असा कलाकार पुन्हा होणे नाही …
ब्रेव्हो अमिताभ …. जीवेत शरद: शतमं !

<जेव्हा अमिताभ गाजू लागला तेव्हा त्याला फारशी गाणी नसायची>

असं काही नाही. लिहिताना तुम्हाला ती गाणी आठवली नसतील. अनेक गाणी आहेत. किशोरचीच आहेत. अजूनही वाजतात. (त्या काळात त्या गाण्यांना 'गाजलेली' [खई के पान टाइप - लेबल लागले होते का ते माहीत नाही]

मुन्शीजी अगर ये मोमबत्ती बुझनेसे पहले वो नही आई....तो हमें हमेशा के लिए मोमबत्तीयोंसे नफरत हो जाएगी-पुढचा गिटारचा पीस आणि मग 'इंतेहा हो गई'- किशोरचा आवाज आणि याचा अभिनय; जणू एकमेकाचे अल्टरइगोच!

फारएन्ड, लेख चांगलाच झाला आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे 'ये दोस्ती हम नही.....' हे गाणं किशोर व मन्नाडे यांनी गायले आहे.

हो किशोर आणी मन्नाडेन्चे आहे ते. माझ्याकडुन काही भर.

किसी बात पर मै किसीसे खफा हु :- बेमिसाल

जहा तेरी ये नजर है:- कालिया

जिधर देखु तेरी तसवीर :- महान

मस्त लेख माझ्या आवडीच्या कलाकारावर.

रोते हुए आते है सब- हे पण खूप आवडतं. माझा पण अमिताभ आवडता हिरो. आता तुम्ही हा सुंदर लेख लिहिल्यावर एकेक गाणे आठवायला लागले. आलाप चित्रपटातपण एक सुंदर गाणे आहे आत्ता नेमके आठवत नाहीये, तशी बरीच छान आहेत गाणी.

मस्त लेख!
किशोरची अमिताभसाठीची गाणी एकसे एक आहेत, लेखात आणी वरती अनेकांनी अनेक गाण्यांची आठवण काढली आहेच. माझ्यातर्फे एकः

'सत्ते पे सत्ता' मधलं 'दिलबर मेरे' हे पण एक आवडतं गाणं! दाढी-मिशा आणी अजागळ अवतार बदलून बच्चन काय स्टाईलमधे येतो, आणी हेमा मालिनीच्या डोळ्यात रोखून बघत गाणं सुरु करतो Happy

नुसतं एक गाणं गाउन हिरोनी हिर्वीणीला पटवणं या गाण्यात पटून जातं Happy