मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक :
headphone वर गाणे ऐकत बसलो होतो .
बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? "
"आतिफ अस्लम ."
त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही .
"तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत . आमची पिढी त्याबाबतीत खूप नशीबवान . काय ते दिग्गज एकेक संगीत दिग्दर्शक होते त्याकाळी . ओपी , बर्मन साहेब , सलिल चौधरी . वा वा ! देवाघरची माणस सगळी . त्यांनी या मातीतल संगीत दील . काय त्या रसाळ चाली . काय ती melody !आणि हे सगळ original बर का. तुमच्या अनु मलिक आणि प्रीतम सारख्या चोऱ्या नाही केल्या त्यांनी. "
असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते . भारतीय चित्रपटा च्या इतिहासात मला रस असल्याने मी त्यावर थोड फार वाचन केल होत . त्यामुळे मला हे माहित होत की भारतीय चित्रपट हा plagiarism चा इतिहास अंगावर भरजरी दागिना बाळगावा त्याप्रमाणे वागवतात . अगदी सुरुवातीपासून . मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .
म्हणजे अस बघा . आजा सनम मधुर चांदनी मे हम हे राज कपूर च्या चोरी चोरी मधल शंकर -जयकिशन च मधुर गाण एका गाण्यावरून (http://www.youtube.com/watch?v=U-xsosv6uM0) सरळ सरळ ढापल आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार ? दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा हे सलिल चौधरी च रसाळ गाण सही सही नक्कल (http://www.youtube.com/watch?v=jLijXZBsdbo) आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार . आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? आमच्या पिढीच एक ठीक आहे हो पण 'सुवर्ण काळाच्या ' आठवणी काढून उसासे टाकणाऱ्या व आजकालच्या संगीताला उठसुठ नाव ठेवणार्या बाजूच्या डेस्क वरच्या काकासार्ख्या लोकाना काय वाटेल ? ज्या nostalgia च्या आपण दिवसरात्र ढेकरा देतो तोच अनैतिक पायावर उभा आहे हे कळल तर पायाखालच जाजम काढून घेतल्यासारख feeling नाही येणार त्यांना ?
वस्तुस्थिती हि आहे की या तथाकथित 'सुवर्ण कालामधली ' अनेक गाणी ही त्याकाळच्या हिट इंग्रजी गाण्यावरून चोरलेली होती . त्यासाठी आपल्या गुणवान संगीत दिग्दर्शकांनी मुळ गाण्याची मालकी ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे परवानगी घेण्याची तोशीस पण घेतली नाही हे तर उघडच आहे . दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हि शुध्द चोरी होती . या चोरी चे अनेक तपशील तुम्हाला इथे सापडतील .
http://mrandmrs55.com/2012/08/24/plagiarism-in-hindi-film-music-is-imita...
http://www.itwofs.com/hindi-opn.html
nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर याना याबाबत कुणीतरी भर कार्यक्रमात प्रश्न विचारला . कणेकर काही क्षण नक्कीच गडबडले असतील पण त्यांनी जी मखलाशी केली ती मुळातून वाचण्यासारखी आहे . कणेकर म्हणतात ," त्यांनी गाणी चोरली हे अमान्य करण्यात अर्थ नाही पण त्यांनी या गाण्याचं 'भारतीयकरण ' केल आणि त्यात जी melody आणली त्याच श्रेय या संगीत दिग्दर्शकाना द्यायला हव ." म्हणजे चोरी ते चोरी वर सिनाजोरी ?
या निमित्तान काही प्रश्न उपस्थित होतात .
१) अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?
२) आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?
३) ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?
मी जमा केलेला संगीत चोरीचा डाटा बाजूच्या डेस्क वर च्या काकाना मेल करणार होतो . पण नाही केला . ज्याचा त्याचा nostalgia . हल्ली मी माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो .
"बालक, वेडा आणि अज्ञानी
"बालक, वेडा आणि अज्ञानी ह्यांना नेहमी उदार अंतःकरणाने माफ करावे"
आता सगळाच मामला चोरीचा आहे हे
आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?<<< हे विधान वाचलेच नव्हते.
नॉस्टॅल्जिया ती गाणी "ओरिजिनल" आहेत या भ्रमामधे नाही, नॉस्टॅल्जिया नक्की काय असतो हेच तुम्हाला माहित नाही यावरून!!!
नंदिनीच्या सगळ्याच पोस्टला
नंदिनीच्या सगळ्याच पोस्टला अनुमोदन.
नौशाद बद्दल काय म्हणण आहे हो
नौशाद बद्दल काय म्हणण आहे हो तुमच ? (लेखकाच) ?
तशा तर माझ्याही कैक चाली
तशा तर माझ्याही कैक चाली परदेशी लोकांनी चोरलेत...मी कधी काही म्हटलंय?
गंमतीचा भाग जाऊ द्या...
राग,ताल वगैरे तेच तेच आहेत...तरीही चालींमध्ये आपल्याला वैविध्य आढळतं..हे ज्याच्या त्याच्या प्रतिभेचं लक्षण आहे...पण कधी कधी एखादी चाल खूप आवडून जाते आणि त्याची नक्कल(अगदी तंतोतंत नसेलही तरी)कराविशी वाटते...त्यात फारसे कुठे बिघडलेय किंवा बिघडावे असे मला तरी वाटत नाही...
अहो शेवटी काय आहे माहीत आहे का? आपण सगळे माकडाचे वंशज आहोत त्यामुळे एकाची नक्कल दुसर्याने करणे हा सहज स्वभाव आहे...आपला इथला मुद्दा आहे तो इथल्या मोठमोठ्या संगीतकारांनी केलेली परदेशी संगीताची(चालींची)नक्कल...ज्याला आपण चोरी म्हणताहात....वादासाठी कॉपीराईटनुसार कदाचित चोरी असेलही असं मान्य करूया...पण ती नक्कलच आहे हे कायदेशीर रित्या सिद्ध तर करायला हवं ना..तसे खटले संबंधितांवर भरायला तर हवेत ना? पण तो झाला व्यावसायिकतेचा भाग...त्यात श्रोता म्हणून तुम्हा आम्हाला काही स्वारस्य असण्याची गरज नाहीये असं मला वाटतं....आपला मतलब फक्त सुश्राव्यतेशी आहे बस्स! हं आता सुश्राव्यता ही गोष्ट देखील इतर अनेक गोष्टींसारखी सापेक्ष असल्यामुळे सगळ्यांचंच एखाद्या गाण्याबाबत,गायकाबाबत, संगीतकाराबाबत एकमत होईलच आणि ते व्हायलाच हवं असा तरी कुठे नियम आहे...तेव्हा संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे तर... जो जे वांछिल तो ते लाहो...इथे ऐको असे म्हणूया. हाकानाका.
जाताजाता: भारतीय संगीतकारांच्या रचनाही परदेशी लोकांनी चोरल्या(नक्कल केल्या) असण्याची शक्यता असू शकते असे नाही का तुम्हाला वाटत? त्या दृष्टीने काही संशोधन केलेत/केले असेल तर ते तेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
जुन्या गाण्यांचा खुप मोठा फॅन
जुन्या गाण्यांचा खुप मोठा फॅन असून आणि itwofs.com चा संदर्भ काही काळापासून माहीत असूनही (मागे एक लेखावर प्रतिक्रिया देताना मे हि लिंक दिली होती मा.बो. वर) ह्या गोष्टीकडे कानाडोळा करता येणार नाही कि हे plagiarism झालं आहे. चोरी (क्रेडिट न देता केलेली उचलेगिरी) एका गाण्याची आहे की १०० गाण्यांची हा मुद्दा गैरलागू आहे. statistics (किती टक्के / कितीपैकी किती गाणी) हे वादासाठी ठीक आहे, पण म्हणून जुन्या - नव्या संगीतकारांनी plagiarism केलंच नाही, केलं तरी फारसं नाही वगैरे वाद कशासाठी?
ह्यात कुठेही गाणी निकृष्ट दर्जाची आहेत, किंवा त्या संगितकारांना संगीताचं मुळातच ज्ञान कसं नव्हतं असं काहिही म्हणायचं नाही. कदाचित त्यांची व्यावसायिक तडजोड असेल आणि त्यांचा दोष (सर्वस्वी) नसेलही, पण म्हणून जे घडलय / घडतय ते उगाच अवांतर मुद्द्यांचा भडिमार करून, लेखकावर टीका (उपहासात्मक किंवा सरळ) करून, नाकारण्यात काय अर्थ आहे?
>> statistics (किती टक्के /
>> statistics (किती टक्के / कितीपैकी किती गाणी) हे वादासाठी ठीक आहे

अहो तुम्ही काय म्हणताय कळतय का ? statistics महत्वाच का नाहीये ?
पुर्वी जे प्रमाण अत्यल्प होते, तेच आता खुप खुप वाढले आहे.
जुन्या जमान्यातल्या अनेकानेक गीतांना पुर्णपणे अस्सल देशी बाजाचे संगित (अगदी रागदारीवर आधारित) दिले गेले आहे त्याचे महत्व काहीच नाही ?
पुर्वी नाविन्याचे प्रयोग करणारी (अगदी या लेखाच्या भाषेत म्हणायच तर चोरणारी, पण सगळी कारकीर्द नाही) लोक फार नव्हती.
अगदी आरडीला त्याच्या काळात टीकेला सामोरे जावे लागलेच होते. पण तरी सुद्धा या जुन्या लोकांनी बनविलेल्या मेलडीज एवढ्या मधुर आहेत की .... .... ....
नाही हो नाही ऐकवत त्या बिट्स, इ. अगदी ठोके पडतात डोक्यात. असंख्य गाण्यांमधे एकच एक तो ठोका का असतो देव जाणे ?
महेश, मी जुन्या-नव्या ची
महेश, मी जुन्या-नव्या ची तुलना नाही केली आणि वादही घालू ईच्छित नाही. माझा मुद्दा फक्त plagiarism मान्य करण्यापुरताच आहे.
"पुर्वी नाविन्याचे प्रयोग करणारी ... लोक फार नव्हती.
अगदी आरडीला त्याच्या काळात टीकेला सामोरे जावे लागलेच होते. पण तरी सुद्धा या जुन्या लोकांनी बनविलेल्या मेलडीज एवढ्या मधुर आहेत की"
ह्यावर मी पुन्हा उद्धृत करतो: "जुन्या गाण्यांचा खुप मोठा फॅन असून .... ह्यात कुठेही गाणी निकृष्ट दर्जाची आहेत, किंवा त्या संगितकारांना संगीताचं मुळातच ज्ञान कसं नव्हतं असं काहिही म्हणायचं नाही. कदाचित त्यांची व्यावसायिक तडजोड असेल आणि त्यांचा दोष (सर्वस्वी) नसेलही, पण म्हणून जे घडलय / घडतय ते उगाच अवांतर मुद्द्यांचा भडिमार करून, लेखकावर टीका (उपहासात्मक किंवा सरळ) करून, नाकारण्यात काय अर्थ आहे?"
फेरफटका. संगीतचौर्य इथे कोणी
फेरफटका. संगीतचौर्य इथे कोणी अमान्य केल्याचे दिसत नाही. पण त्या संगीतकारांच्या कामगिरीचा आणि पर्यायाने त्या सुवर्णयुगाचा पायाच संगीतचौर्य होता असा मूळ लेखातला सूर आहे. त्याला आक्षेप आहे.
तसेच जिथे कॉपी केली असेल तिथे कॉपी म्हणजे मूळ धून तशीच्या तशी उचललीय की तिला भारतीय पेहराव दिलाय? त्यातही काही कौशल्य लागत असेलच ना.
पण म्हणून जे घडलय / घडतय ते
पण म्हणून जे घडलय / घडतय ते उगाच अवांतर मुद्द्यांचा भडिमार करून, लेखकावर टीका (उपहासात्मक किंवा सरळ) करून, नाकारण्यात काय अर्थ आहे?" >>
अहो चाली कधीच अजिबात उचलल्या नाहीत अस कोणीच म्हणत नाहीये. पण मुद्दा तो नाहीये हे तुम्हाला कळलेल नसाव किंवा तुम्ही तस दाखवताय .
या खाली दिलेल्या वाक्यांच काय ?
"आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का"
"माझ्या मते बहुतेक गाजलेल्या फिल्मी गीतांपैकी ९०% (याहून जास्त, बहुदा जवळजवळ सर्व!) गाणी ही आयदर अभारतीय संगीतातून कुठून ना कुठून ढापलेली, किंवा भारतातल्याच कुठल्यातरी प्रांतातील फोक ट्युनवर आधारीत, किंवा भारतीय शास्त्रीय संगीतातल्या एखाद्या जुन्या चीजेवर बेस्ड असतात. (दुसर्या आणि तिसर्या कॅटेगरीवर आक्षेप नाही). बरं या लोकांचं केवळ पाश्चात्य संगीतावर भागत नसे. जगाच्या कानाकोपर्यातून हे लोक बिनदिक्कत चाली उचलत, (आणि आजचेही उचलतात) मी वाचलं आहे"
"आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ? "
केदार, भरत : अगदी अगदी
केदार, भरत : अगदी अगदी नेमक्या शब्दात लिहिलंत !
ते लेखात जे म्हणलं आहे की आक्खी कारकीर्द चौर्यावर वगैरे आधारित आहे ते कैच्याकै आहे.
आत्ता सुद्धा हे लिहित असताना "रोशन" ने संगितबद्ध केलेले "ना तो कारवाँ की तलाश है" ऐकत आहे.
भरत, केदार, तुमचा मुद्दा
भरत, केदार, तुमचा मुद्दा समजला. मान्य आहे.
मला आवडला हा लेख. मला अशी
मला आवडला हा लेख. मला अशी कम्पॅरिझन करायला आवडते.. मी पूर्वी ब्लॉगवर पोस्ट लिहिली होती त्यात काही उदाहरणं दिली आहेत..
http://bhagyashreee.blogspot.com/2012/03/sza-dzieweczka.html?m=1
बंगाली संगितकार जे हिंदीत
बंगाली संगितकार जे हिंदीत प्रसिद्ध झाले आहेत (बर्मन, सलिलदा, हेमंतकुमार, इ.) यांनी तर अनेक गीते आधी बंगालीत तयार केली आणि मग ती हिंदीत आणली. म्हणजे चाल तीच ठेवली पण शब्द बदलले.
उदा.
http://www.youtube.com/watch?v=cbfTaMTTdHA
http://www.youtube.com/watch?v=dx62yviCAbs
http://www.youtube.com/watch?v=p_UzxlHNq28
http://www.youtube.com/watch?v=RQIfpDiS_Cw
आणि काही तर चक्क मराठीतुन बंगालीत, हे पहा
http://www.youtube.com/watch?v=NoTUUS2wEsA
या प्रकाराला काय म्हणाल ?
या प्रकाराला काय म्हणाल
या प्रकाराला काय म्हणाल ?>>>>> त्यांच्या लेखावरुन तरी त्यांचा आक्षेप फ़क्त परदेशी गाण्याच्या ऊचललेल्या चालींना (?) आहे अस वाटते
निसर्गातील अनेक नाद ऐकून
निसर्गातील अनेक नाद ऐकून मान वाने संगीत निर्मिती केली. मोझ्झार्ट ची सिंफनी ऐकून ' इतना ना मुझसे तो प्या र बढा " बनले. उत्तमातील उत्तम ऐकून त्याचा वापर आपल्यासृक्स्रूजनशीलतेने त्याच स्वरांचा लयीचा वापर क र णे ही सुध्दा त्या संगीतकाराच्या प्रग्ल्भतेची पावतीच आहे. जे सुंदर आहे ते पाहून लोकांपर्ञंत पोहोचवले त्याअ महान लोकांनी- अन म्हणूनच एवढी चिखलफेक गर आहे
महेश यांनी दिलेल ना जिया लागे
महेश यांनी दिलेल ना जिया लागे ना हे गाण हिंदीइतकच बंगालीमध्ये ऐकायला गोड वाटत
स्टॅटिस्टिक्स माहीत नाही पण
स्टॅटिस्टिक्स माहीत नाही पण खूप जुनी गाणीही अशा प्रकारे उचललेली आहेत हे खरे.कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना पहिल्यांदा अॅबा ह्या ग्रूपचं 'मामा मिया' ऐकलं तेव्हा आर.डींनी 'मिल गया हमको साथी मिल गया' त्यावरुन सहीसही उचलल्याचं लक्षात येऊन धक्का बसला होता. त्याआधी अशा चाली चोरल्या जात असतील वगैरे मनात आल्याचं आठवत नाही. बंदिशींवरुन गाणी बेतता येतात हे माहीत होतं मुख्यत्वे हृदयनाथांच्या गाण्यांमुळे. लाईव्ह कार्यक्रमात बरेचदा अशी बंदिश गाऊन मग ते गाणं सुरु करताना पाहिले आहे.शिवाय त्या बंदिशी पारंपारिक असल्याने चोरी ह्या दृष्टीने कधी पाहिलं गेलं नाही. इंटरनेट क्रांतीनंतर मात्र कित्येक गाणी अशी इंग्लिश गाण्यांवरुन उचललेली सापडतात, सहज शोधता येतात.
अशी चोरी पकडली गेली की वाईट तर वाटतंच पण तरी आपल्या जुन्या गाण्यांची भुरळ कमी होत नाही. चाल कितीही हुबेहुब असली तरी हिंदीत येताना गाण्याचे शब्द, गायकांचे स्वर्गीय आवाज, उत्कृष्ट वाद्यमेळ ...एकंदरीतच त्या गाण्यांतली अवीट गोडी, साधेपणा आणि ( सुरांमधला ) सच्चेपणा स्पर्शून जातो.
कुणीतरी शोधलेली हटके पाककृती आपली आई अगदी जशीच्या तशी, एका शब्दाचाही बदल न करता आपल्याला रांधून वाढते, ती पाककृती तिने शोधलेली नाही हे माहीत असलं तरी तिच्या हाताची चव म्हणून एक असतेच ना तसंच काहीसं
( * हे चोरीचं समर्थन अजिबात नाही. कुठल्याही संगीतकाराने असं का करावं असं नक्कीच वाटतं पण ह्या गाण्यांनी जो आनंद दिलाय तो आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर मूळ इंग्लिश गाणी ऐकून मिळाला असता का हेही आहेच. )
ह्याशिवाय अजून एक कॅटेगरी असते. एखादं गाणं ऐकताना त्यातला एखादा तुकडा दुसर्याच एखाद्या गाण्याची आठवण करुन देतो, एखादी सुरावट दुसर्या गाण्याशी जुळते किंवा एका रागातली गाणी ऐकताना 'हे गाणं कुठेतरी ऐकलंय' असं वाटतं. ही मात्र नि:संशय चोरी नव्हे !
@ फेरफटका, चोर्या झाल्यात
@ फेरफटका,
चोर्या झाल्यात असे म्हणत आहात ना तुम्ही?
बरे.
आता हे लेखाच्या कॉपीपेस्ट प्रतिसादातून केलेले कॉपीपेस्ट.
>>
याउलट पाश्चात्य साँग-रायटर्सनी भारतीय गाण्यातलं एखादं टुंयटुंय जरी उचललं, (सँपलिंग केलं) तर आधी परवानगी घेतली जाते, गाण्याचे हक्क ज्याकडे असतील त्याला त्याचा मोबदला मिळतो, आणि क्रेडिट दिलं जातं.
<<
हे इतके काटेकोरपणे पाळण्याचे कारण म्हणजे त्यांच्यात चोरी केल्याचा खटला लावला, तर लै मोठ्ठा बांबू लागतो.
ही लोकं एकमेकांनाच नव्हे, तर कुणालाही बांबू लावण्यात भल्ती पटाईत.
उदा. अॅपल वाले सॅम्संगवाल्यांना लावतात.
तसेच,
या एकाही महान 'रुब्रिफाईड' महानतम पाश्चात्य संगितकारांनी आपल्याकडच्या भिक्कारचोट चोरट्यां तथाकथित गान-कावळ्यांना कोर्टात का खेचले नाही?
अशा काही केशी घडल्यात का हो? असल्यात तर सांगा. अजून एक रोचक 'जिलबी पडेल' (मिपाच्या भाषेत)
लोक्स, लेख लिहिल्यानंतर
लोक्स, लेख लिहिल्यानंतर लेखकाने एकही प्रतिसाद लिहिलेला नाही येथे.
इसका मतबल क्या हो सकता हैं ?
इब्लिस, तुम्ही बरेच वेगवेगळे
इब्लिस, तुम्ही बरेच वेगवेगळे प्रतिसाद एकत्र करून मला संबोधताय. मी जे लिहिलं त्यावरचा भरत, केदार आणि महेश ह्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यांचा मुद्दा मी मान्य केला.
माझा मुद्दा ईतकाच होता की हे plagiarism झालय, होतं. ह्यात कुठेही गाणी निकृष्ट दर्जाची आहेत, किंवा त्या संगितकारांना संगीताचं मुळातच ज्ञान कसं नव्हतं असं काहिही म्हणायचं नाही. कदाचित त्यांची व्यावसायिक तडजोड असेल आणि त्यांचा दोष (सर्वस्वी) नसेलही, पण म्हणून जे घडलय / घडतय ते उगाच अवांतर मुद्द्यांचा भडिमार करून, लेखकावर टीका (उपहासात्मक किंवा सरळ) करून, नाकारण्यात काय अर्थ आहे?
आता बाकी तुम्ही जे लिहिलय, ते मी मुळातच म्ह्टलेलो नसल्यामुळे, त्यावर प्रतिक्रिया नाही देता येणार.
सरमिसळ झालिये हे बरोबर
सरमिसळ झालिये हे बरोबर आहे.
म्हणुन नेक्ष्ट जिलबिची आयडिया त्यांना सुचवली.
सुरुवात तुम्हाला उद्देशून केली
दरम्यान लेखक महोदय पुन्हा एकदा डोक्यात गेले
अच्छा, मग ठीक आहे, by the
अच्छा, मग ठीक आहे,
by the way, हे जिलबी प्रकरण काय आहे?
मी अकरावीत असते आणि मला या
मी अकरावीत असते आणि मला या साईट्सचा पत्ता लागला असता तर मी जो लेख लिहिला असता हुबेहूब तसा हा लेख आहे
पण आता मी अकरावीत नाही. I have literally and metaphorically "grown up" (Thank god!)! आणि ह्या गोष्टीचा मला अत्यंत आनंद आहे! कोणी काहीही म्हणो जुन्या चित्रपट संगीताची गोडी अवीट आहे! आणि चांगल्या गाण्यांना कधीच लेबल्स लावू नयेत हे मी आता शिकले आहे! चोरीचं म्हणाल तर इथे बऱ्याच जणांनी त्याचा योग्य शब्दात आणि मुद्द्यांनी प्रतिवाद केला आहे! नंदिनी आणि अमा यांच्या पोस्ट्स विशेष आवडल्या!
लेखात चोरी आणि स्मरणरंजन या
लेखात चोरी आणि स्मरणरंजन या दोन मुद्द्यांची सरमिसळ झाली आहे, असं वाटतं. चोरीबद्दल काही बोलण्यासारखं नाही. चोरी अनेकांनी केली आणि याच अनेकांनी चोरी न करताही उत्तम गाणी तयार केली.
मात्र भारतीय समाजाचं स्मरणरंजनात रमणं वैतागवाणं आहे. हे स्मरणरंजन केवळ संगीतकार, गायक, अभिनेते यांच्यापुरतंच मर्यादित नाही. सदोदित शिवाजी महाराज,सावरकर, आंबेडकर, फुले यांचं नाव घेत राहणंही याचाच भाग आहे. काल ज्या The Great Beauty या इटालियन चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला, त्यात एका पात्राच्या तोंडी सुरेख वाक्य आहे - People who embrace nostalgia do not really have the strength to believe in future. भारतीय समाजाकडे बघितल्यावर या वाक्याची यथार्थता पटते.
या स्मरणरंजनाचा सर्वांत मोठा तोटा म्हणजे सतत भक्त बनून राहण्याची गरज निर्माण होणे. या गरजेमुळे आपल्याकडे एखाद्या कलाकाराचं, राजकारण्याचं, कलाकृतीचं योग्य मूल्यमापन करताच येत नाही. सर्वत्र भक्तांची मांदियाळी असल्यानं 'आमच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलण्याची हिंमतच कशी झाली?', 'तुम्हांला अमिताभ / आरडी / सचिन आवडत नाही, हे अक्षम्य आहे, हे तिघं आवडलेच पाहिजेत', अशा गर्जना कायम ऐकू येतात. शिवाजी महाराज, टिळक, आंबेडकर, हेडगेवार, गांधीजी, सावरकर आरडी, रहमान, सचिन (तेंडुलकर), अमिताभ यांचे भक्त कायम हातात तलवारी घेऊनच हिंडत असतात. त्यामुळे रॅशनल मूल्यमापन, संशोधन असं काहीही न घडता सतत कणेकरी शैलीत भक्तिगीतच रचली जातात.
चिनूक्ष +१, माबोवरचे असे
चिनूक्ष +१, माबोवरचे असे नमुने कमी नाहित.
चिनुक्स, +१००० सतत इतिहासाचे
चिनुक्स, +१००० सतत इतिहासाचे अनावश्यक baggage घेऊन जगावे लागते हा हजारो वर्षांची परंपरा, संस्कृती इ. असलेल्या देशात/समाजात जगण्याचा एक मोठ्ठा तोटा आहे!
पु.लं.नी काय सुरेख टिपलं आहे हे! कसला तरी जाज्वल्य अभिमान हवा! म्हणजे टिळक पुण्यतिथीला आगरकरांविषयी जाज्वल्य अभिमान अशी त्या त्या अभिमानांची वाटणी करता येते
पुलंइतका स्मरणरंजनात रमणारा
पुलंइतका स्मरणरंजनात रमणारा दुसरा लेखक मराठीत नाही.
पुलंइतका स्मरणरंजनात रमणारा
पुलंइतका स्मरणरंजनात रमणारा दुसरा लेखक मराठीत नाही. स्मित>> limited प्रमाणात मान्य! पण मराठी माणसाच्या जगण्यातली/विचारातली विसंगती त्यांनी छान टिपली आहे! त्यांना विनोदी लेखक म्हणून typecast केलं म्हणून पण त्यांनी अजून अधिक serious लिखाण करायला हवे होते असे मला सतत वाटते (तुझे आहे तुजपाशी, रविंद्रनाथ: ३ व्याख्याने)! एक व्यक्ती म्हणून खूप conventional (संदर्भ: आहे मनोहर तरी) पण एक लेखक म्हणून अतिशय संवेदनशील असं पुलं बद्दल म्हणता येईल! हे या धाग्यावर फार अवांतर होतंय!
>> हे या धाग्यावर फार
>> हे या धाग्यावर फार अवांतर
असं काही नसतं हो.
Pages