नववर्षाच्या सुग्रास शुभेच्छा !

Submitted by दिनेश. on 31 December, 2013 - 12:44

सर्व मायबोलीकराना नववर्ष सुखासमाधानाचे आणि पोटभरीचे जावो Happy

पनीर मस्सलम

आमच्याकडच्या खास शेंगा

आणि त्याची भाजी

भाजणीचे थालिपीठ ( भाजणी सौजन्य : शांकली )

स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स आणि वाइल्ड राईस

पास्ता विथ चीज सॉस

तिरामिसू

कॉर्न बॉल्स

साबुदाण्याचे थालिपीठ

मश्रुम आणि सॅफ्रॉन राइस

किन्वा पुलाव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच फोटो मस्त. पुढच्या जन्मी दिनेश यांचा शेजार लाभो आणी फोटो काढल्यानंतर तिखट मीठ बरोबर आहे का हे पहाण्यासाठी एकेक प्लेट फस्त करावयास मिळो.

दोन्ही थालिपिठ ऑसमेस्ट दिसतायेत.
पोट तुडुंब भरल असतानाही एखादा तुकडा मोडुन तोंडात टाकायचा मोह आवरू नये अशी!

दिनेशदा.. .मस्त Happy
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.. Happy

थाली पीठाच्या रेसिप्री टाका.

दिनेशदा नविन वर्षाच्या खूप सार्‍या शुभेच्छा. Happy
फोटो तर नेहमीसारखेच पटकन उचलून खावेसे वाटतात..... Uhoh
साबुदाणा थालीपीठची रेसिपी नक्की लिहा.

आता सांगायला हरकत नाही, खिचडीसाठी भिजवलेल्या साबुदाण्यात जरा पाणी राहिले होते म्हणून त्याचे थालिपीठ केले. ( हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली आणि त्याचा मालपुवा केला.. तसेच, )
त्यात तिखट, मीठ, जाडसर कूट घालून हलक्या हाताने मिसळले आणि तव्यावर अलगद पसरले ( थापले नाही )
दोन्ही बाजूने थोडेसे तूप सोडून सोनेरी रंगावर भाजल्रे.

सगळेच फोटो तोंपासु ....स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्र्प

नेत्रसुखद मेजवानीबद्दल दिनेश आणि इब्लिसना धन्यवाद.
ते साबुदाण्याचं वॉलपीस Wink मस्तच दिसतंय आणि भातही अप्रतिम दिसतोय.

चित्ताकर्षक प्रकाशचित्रण आणि नजाकतदार पाककृती! विशेषतः पनीर मस्सलम,तिरामिसू,किन्वा पुलाव यांच्या कृतीबद्दल उत्सुकता आहे.मस्तच.

Pages