अष्टविनायक कसे करायचे?

Submitted by हर्ट on 30 December, 2013 - 22:07

मला माझ्या वृद्ध आईला सोबत घेऊन अष्टविनायक करायचे आहेत. दोन दिवसांची बस असते ती घ्यायची की स्वतःहून केलेले जास्त बरे? कुठला ऋतु जास्त बरा पडेल. मला देवळातले कार्यक्रम फार आवडत. आईलाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, मी अनवाणी पायाने केले होते. ट्रॅव्हल कंपनीतर्फेच. आळंदीला मुक्काम होता.
अनवाणी म्हणजे घरातूनच चप्पल न घालता निघायचे. आईंना नाही पण तूला सहज शक्य होईल.
लेण्याद्रीचा संपूर्ण चढ डोंगराच्या एकाच बाजूला आहे त्यामूळे उन्हाची दिशा व वेळ बघून जा. आईसाठी डोली कर.
बा़कीच्या ठिकाणी थोडेफार चालावे लागते पण चढण नाही.
घरातल्या किंवा घराजवळच्या देवळातल्या देवाला नमस्कार करून सुरवात करायची आणि तिथेच सांगता करायची.

बी, मी अनवाणी पायाने केले होते. ट्रॅव्हल कंपनीतर्फेच. आळंदीला मुक्काम होता.
अनवाणी म्हणजे घरातूनच चप्पल न घालता निघायचे.

चप्पल घालून फिरले तर काय अडचण आहे? Happy

मी सात आठ वर्षांपुर्वी मुंबईहुन ड्राईव्ह करुन तिन किंवा चार दिवसात हा प्रवास केला होता. आता लक्षात राहिलेल्या गोष्टी दोनच. बहुतेक मंदिरं साधी आहेत त्यांचा जिर्णोद्धार न केल्याने सुंदर जपुन होती
आणि एक गणपती जिथे जायला नदीपार करावी लागते (गाडी अलिकडे पार्क करुन फेरी घ्यायला लागली होती), त्या नदि च्या अलिकडे बाजरी ची भाकरी, मिरचिचा ठेचा आणि वांग्याचे भरीत असे उत्तम जेवण मिळाले होते. त्या जेवणा साठी परत येकदा अष्ट्विनायक करायला हरकत नाही.

>>>>> चप्पल घालून फिरले तर काय अडचण आहे? <<<< ह्हा ह्हा ह्हा ह्हा
काहीच अडचण नाही, मात्र चप्पलबुट न घालता फिरून बघा, मग कळेल नक्की अडचण कशात आहे, अन कशाने सहनशक्ति वाढते ते! असो.
बी, गाडी भाड्याने घेतली तर ड्रायव्हर फुकट मिळतो रे! वर सांगितल्याप्रमाणे दर आधीच ठरवून घे नीटपणे.
लिम्बीचा चौधरी ट्रॅव्हल्सचा अनुभव छान आहे. त्यान्चेबरोबर तिने अष्टविनायक केलेच पण काशी यात्राही केली. अर्थात फाईवस्टार सुखसोईंची अपेक्षा करणार्‍यान्नी अन मोजलेला प्रत्येक पै-रुपया वसुल होण्याचा हिशेब घालत बसणार्‍यांनी ट्रेव्हल्सच्या भानगडीत पडू नये हे उत्तम.

ज्ञानेश, मी तसा धार्मिक नाही. पण माझ्यासाठी नवस म्हणून वहीनी तसे करत होती म्हणून मी केले.
मला मुद्दाम इथे लिहावेसे वाटतेय. कोल्हापूरला मी माझ्यासाठी चप्पल घेत होतो तेवढ्यात एक वारकरी आजी
तिथे आल्या. पायात चपला नव्हत्या. मी घेऊन देऊ का असे विचारल्यावर म्हणाल्या, लेकरा, माऊली माज्या पायाला काटा न्हाई लागू देणार... चप्पल काहून लागती ?
एकदा अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे ही... श्रद्धा नसली तरी श्रद्धेतून मिळणार्‍या मानसिक बळासाठी.

जीथे जायला नदीपार करावी लागते तो गणपती कोणता ते कुणी कृपयासंगेला का ?

सिद्धटेक.
आधी बोटीने जावे लागत असे, आता पूल झाला आहे बहुधा.
चप्पल वगैरे मुद्दा श्रद्धा आणि कर्मकांडे यात गल्लत करण्याचा आहे, ज्यावर चर्चा केली तर धागा कुठल्याकुठे भरकटेल. असे व्हावे अशी माझी इच्छा नाही, म्हणून थांबतो.

कारण काही महिन्यांपुर्वी सचिन जकातदार बॅंक्रप्ट होते आणि खूप लोकांचे पैसे वैगरे दिले नाहीत, माझ्या ओळखीच्या दोघांचे चेक बाऊन्स झाले. सध्या माहीत नाही, त्यांची जाहिरात पण हल्ली दिसत नाही.>>>>>>>>>>

thanks sangitalat te mala mahit navate, mee suddha hya kiva pudhchya mahinyat sachin travelsne ashthvinayak karanar hote. ata kesari try karayala have.

गिरीकंद ट्रॅव्हल्सची अष्टविनायक यात्रा खूप छान आहे.

http://www.girikand.com/tour-details.aspx?Tourid=46

माझ्या पुणेस्थित मैत्रिणीने तिच्या सासूबाई आणि मैत्रिणी यांच्यासाठी ही यात्रा बूक केली होती. खूप मस्त पार पडली. पुण्यात घर असूनही त्या दोन दिवसांसाठी त्या सर्व बायका त्यांनी नेमून दिलेल्या पुण्याच्या हॉटेलात राहिल्या होत्या, यात्रा सोईस्कर व्हावी म्हणून.

मूषकाच्या कानात काहीतरी सांगाव लागत तो विनायक कुठला?
>>

असे आता बहुतेक गणपती मंदिरात असते. दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात असे दोन मोठे उंदीर ठेवले होते. लोक गणपतीचे दर्शन झाल्यावर या उंदरांजवळ रांग लावतात. तिथे गर्दीत अजुन भर पडते.

सिद्धटेक.
आधी बोटीने जावे लागत असे, आता पूल झाला आहे बहुधा.
दौंड वरुन सिद्धटेकला जाताना मधे नदीलागते. आता पुल झालाय. नदिच्या अलिकडे अजुनहि जेवण मिळते.

सिद्धटेक ला आत्ता पूल झालाय. आम्ही रांजणगाव यात्रीनिवासात मुक्काम केला होता (एकून १२ लोक)
बेसिक सुविधा आहेत आणि प्रसाद पण चांगला होता. स्वःताची गाडी केली होती.
माझ्या भावाने बाइकवरून केलेत अष्टविनायक.

दोघच असाल तर ट्रॅवल कंपनी अथवा भाड्याने गाडी घेऊन गेलेले उत्तमच. हा मौसम अतिशय उत्तम, १५ जानेवारी नंतर थंडी कमी होईल, तेव्हा पण करू शकतोस यात्रा.

दिनेशदा, ज्ञानेशजी,
चप्पल, यात्रा इत्यादीबद्दल.

हा लेटेस्ट आला व्हॉट्सॅपवरः
"
खरा श्रद्धाळू कोण?
.
.
.
.
.
.
.
जो 'Temple Run' चपला काढून खेळतो!

Wink Light 1

Pages