चालीत हरवला अर्थ.....

Submitted by विजय दिनकर पाटील on 25 December, 2013 - 04:40

कोई जब राह न पाये, मेरे संग आये
कि पग पग दीप जलाये, मेरी दोस्ती मेरा प्यार|

'दोस्ती' सिनेमातील मजरूह सुल्तानपुरींनी लिहिलेले आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे अवीट गोडीचे गीत!

ऐकताक्षणीच न आवडते तर नवलच!

अनेकदा हे गाणे ऐकले, प्रत्येकदा आवडले पण दोनतीन दिवसांपूर्वी मुखड्याच्या अर्थावर विचार करू लागलो नि वाटले किती सुंदर अर्थ आहे ह्या गाण्याचा.

शब्दांना खूप महत्व देण्याचा स्वभाव असतानाही गेली अनेक वर्षे अनेक गाण्यांच्या बाबतीत असे झालेले आहे की ऐकलेली चाल आवडली म्हणून ते गीत आवडले आणि अर्थावर फारसा विचार प्रथमदर्शनी केला गेला नाही. परंतू नंतर कधीतरी ट्यूब पेटली Biggrin आणि अशा चालींमधे हरवलेल्या कवितांचा साक्षात्कार झाला.

तर मित्रहो, आपणां सर्वांच्या बाबतीतही असे कधी ना कधी झाले असणारच किंवा आताही होत असणार. तर ह्या धाग्याच्या निमित्ताने अशा गाण्यांचा उल्लेख करायचा का?

नोंदवलेल्या गाण्याच्या काव्यातला आशय प्रभावी असावा असे पाहिल्यास उत्तम.

चला तर मग.............

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यातल्या 'सागर' ह्या शब्दाविषयीची गंमत मला उर्दूचा गंध यायला लागल्यांनंतर लक्षात आली. आधी सारखे वाटायचे की समुद्राकडून मन रीझविण्याची अपेक्षा का केली जात आहे.

नंतर ते सागर म्हणजे 'प्याला' आहे हे समजले.

नोंदवलेल्या गाण्याच्या काव्यातला आशय प्रभावी असावा असे पाहिल्यास उत्तम.

ही अपेक्षा आहे म्हणून लिहित नाही, नाहीतर मला नव्वदच्या दशकातली असंख्य गाणी सुचत आहेत.. Biggrin
असो.

मी गाणे ऐकतो तेव्हा मुख्यतः शब्दच ऐकतो, चालीकडे, गायकीकडे किंवा संगीताकडे फारसे लक्ष जात नाही. हे ठरवून होत नाही, आपोआप होते. त्यामुळेच गझल ऐकायला आवडते, तितके शास्त्रीय संगीत ऐकायला आवडत नाही.

गझलेच्या बाबतीत आजकाल असे झाले आहे कि गझल (किंवा गीत) गायकांच्या नावानेच ओळखली जाते. अगदी नावाजलेल्या गझलांचे (रंजिश्,हंगामा,धुआँ) शाय्ररही ८० % ऐकणार्‍यांना माहित नसतात्.अनेक गझल/गीत गायनांच्या कार्यक्रमात कवीचे नाव सांगतच नाहीत. मी स्वतः अनेक वेळा उभा राहून मोठयाने कवीचे नाव सांगण्याची मागणी करतो.

जयन्ता५२

>> मी स्वतः अनेक वेळा उभा राहून मोठयाने कवीचे नाव सांगण्याची मागणी करतो.
जयन्ता ५२.... हे खूपच छान. ज्याला त्याला त्याचे क्रेडिट मिळायला हवे.

विदिपा,
फार छान धागा..व्यक्तिपरत्वे गाणं ऐकण्याची पद्धत वेगळी असते.
मला शास्त्रीय संगीत ऐकतानाही आधी शब्द दिसतात (सूर दिसण्याइतपत पोहोच नाहिये म्हणून असेल :फिदी:)
आणि मग शब्द आणि चाल अशा संयुक्त स्वरूपात ते गाणं डोक्यात रजिस्टर होतं.
काहींना गाण्याचा ताल/ ठेका आधी उमगतो/ भावतो..
काहींना इंटरल्यूडमधले संगीताचे तुकडे भावतात... एक ना अनेक...

असो,
चाल आधी आणि मग अर्थ असे कुठले गाणे लक्षात आले तर देईनच इथे.
बाकीच्यांच्या प्रतिसादाचीही उत्सुकता आहे.

शब्दार्थ कळण्याचं वय नव्हतं तेव्हापासून गाणं ऐकतोय त्यामुळे सर्वप्रथम चाल, गायक-गायिकेचा आवाज, सोबतचा वाद्यवृंद इत्यादि गोष्टीच जास्त लक्षात राहात/राहातात...आता हल्ली हल्ली कुठे कवितांना चाली लावायला लागल्यावर शब्दांकडे व्यवस्थित लक्ष जायला लागलंय...तरीही शब्दांना अनुकूल/प्रतिकूल चाल वगैरेंबद्दल सांगणं हे जरा कठीणच आहे...खरंच, इतका विचार क्वचितच केला असेल/करतो.

दिलचस्प धागा आहे. असे अनेकदा मनात आले होते खरे, की चालीमुळे गीत आवडले आणि मग कविता समजली.

ओ राही ओ राही - ह्या गीतात मला आधी ओराही हा असा एक शब्द वाटत असे. चाल आवडल्याने मी फक्त ओराही ओराही एवढेच चालीत म्हणत असे. नंतर खूप काळाने गीत समजले.

छैया छैया हे गीत मला अजुनही समजलेले नाही आणि मी ते नीट ऐकलेलेही नाही. पण डान्सिकल ट्यून आहे इतकेच समजत आहे.

लहानपणी अमर अकबर अँथनी प्रदर्शीत झाला त्या काळात 'अनहोनी को होनी करदे, होनी को अनहोनी' ह्या गाण्यातील अनहोनी आणि होनी म्हणजे काय तेच माहीत नव्हते तरी अखंड ते गीत तोंडात होते. नंतर कोणी नातेवाईकाने दोन्ही शब्दांचा अर्थ सांगितला.

मुकद्दर का सिकंदरचेही तसेच झाले होते. मला तर चित्रपट पाहण्याआधी असे वाटले होते की मुकद्दर हे विनोद खन्नाचे आणि सिकंदर हे अमिताभचे नांव असेल आणि मधल्या 'का' चा अर्थ मी मराठी का प्रमाणे घेतला होता. म्हणजे हा की तो असे काहीतरी!

अशी बरीच उदाहरणे आहेत.

आठवतील तशी देत राहीन.

धागा मस्तच!

आधी आंड की आधी कोंबडी असा हा प्रश्न असावा. सूर की शब्द भावतात गाण्यातले?
मला वाटत प्रत्येकाच्या बाबतीत आलटून पालटून घडणारी घटना असावी ही कधी सूर आवडतात म्हणून शब्द समजावून घेतले जातात किंवा उलटही.

कळत्या वयापासून मात्र शब्दांची जादू रेंगाळत रहातेय मनावर अस वाटतय खर !

पण उडत्या चालींची गाणीही तेव्हढाच ताबा घेतात मनाचा,

सोनू निगमच असच एक गाण कानावर पडल नि त्याच्या आवाजामुळ आवडत गेल...

मस्त धागा.

सूर की शब्द भावतात गाण्यातले?<<< दिलचस्प मुद्दा आहे. अजुन लिहावेत.

मराठीतली अनेक नाट्यगीते ह्या कॅटेगरीत मोडतील बहुतेक माझ्यासाठी.
उदा.
शूरा मी वंदिले
युवति मना दारुण

पण मराठीपेक्षा हिंदी गाण्यांच्याबाबतीत असे जास्त होते का?
म्हणजे, मराठी गाणे ऐकता ऐकताच शब्द आपल्यापर्यंत नीट पोहोचलेले असतात त्यांच्या अर्थासह...
आणि नकळत अर्थांचे अनेक पदरही उलगडत असावेत मनातल्या मनात.
हिंदी शब्दांच्याबाबत तितका विचार 'नकळत' होत नसावा...
हे आपलं असंच आत्ता डोक्यात आलं म्हणून लिहिलंय.
सगळ्यांच्याबाबतीत असेच असेल असे नाहीच अर्थात्.

ह्म इंतजार करेंगे तेरा कयामत तक
खुदा करे के कयामत हो, और तु आये

किती वर्ष न कळलेला ह्या गाण्याचा अर्थ अचानक कधी तरी लागला होता.

विदिपा खरंच सुरेख धागा. बरंच काही सुचतंय Happy

मला पहिल्यांदा चाल आणि आवाज भावतो मग शब्दांकडे लक्ष जातं.... ते भावले की पावलंच की सगळं. मग शब्दांवरच जास्ती भर दिला जातो.... काय एकेक मुखडे आणि आंतरे असतात आहाहा.
भावनांचा सागर ही लेखक मंडळी अगदी मोजक्या दोन वाक्यात सुद्धा सहज मांडून जातात. Happy

सावर रे.
(चाल आणि शब्द अजुन झेपलेले नाहीत तरी ऐकत रहावेसे वाटते).

काळ देहासी आला खाउ..
(यातील दक्षिण आणि पश्चिम शब्दांचा अर्थ पं. हृदयनाथ यांनी सांगण्याआधी कळला नव्हता).

समईच्या शुभ्र कळ्या..
येरे घना येरे घना
गेले द्यायचे राहुन
(आरती प्रभू/पं. हृदयनाथ मंगेशकर काँबो. अर्थ कळल्यावर ऐकताना आणखी छान वाटते).

मस्तं धागा.

मला गाणं हे त्याच्या शब्दांमु़ळे फार आवडतं. चाल, ताल, लय वगैरे ठिक आहे. पण गाण्यामधे शब्द जर अर्थपूर्ण असतील तर ते गाणं आवडतंच आणि त्यातही गायकाने जर गाणं समजून उमजून प्रसंग समजून गायलं असेल तर क्या कहना...

मी आता ऐकतेय "मै शायर बदनाम"
मेरे घरसे तुमको कुछ सामान मिलेगा
दिवाने शायर का एक दिवान मिलेगा
और एक चीज मिलेगी टूटा खाली जाम... या गाण्यातल्या ओळी माझ्या फार आवडत्या आहेत. याओळींनंतर पुढचं गाणं असायची गरजच नव्हती खरं तर (तसंही पडद्यावर हे गानं अचाट पद्धतीने चित्रित झालंय)

छैया छैया हे गीत मला अजुनही समजलेले नाही आणि मी ते नीट ऐकलेलेही नाही. पण डान्सिकल ट्यून आहे इतकेच समजत आहे.<>>>

वो यार है जो खुशबू कि तरहा
जिसकी जुबान उर्दू की तरहा
मेरी शामरात मेरी कायनात वो यार मेरा सैंया सैंया

या ओळी अतिप्रचंड आवडलेल्या.

मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता...

गझल गायकीच्या प्रेमात असल्याने,
चाल म्हणजे अर्थ खुलवून सांगणारे स्वर, अशी समजूत मनापासून आहे
ही समजूत मजबूत करणारे अनुभवही आहेत
उदा.
फारा वर्षांपूर्वी एका कॅनेडियन चॅटफ्रेंडला झूठे नैना बोले ऐकवलं. याहूवर नुकती नेट मिळत असताना कसंबसं पोहोचलं तिच्या पर्यंत. त्या बाईने मला भावार्थ सांगितला. is it a song about a lover scorned, and yet accepting it?
तिला एकही शब्द समजत नव्हता. मी सांगितला नव्हता, अन त्या काळच्या गुगलवरही इतका अ‍ॅवेलेबल नव्हता, की ऐकताच तिने अर्थ मला सांगावा. ती स्वतः क्लासिक सिंगर होती हा वेगळा भाग असावा कदाचित

मुद्दा: चालीने खुलवला अर्थ, असाच अनुभव आहे.

नुसत्याच चालीत बांधलेली गाणी चालीपेक्षा बीटसवर जास्त भर देतात असे वैम.

चल छैंया छैंया हे गाणं खुप आवडायचं. पण या ओळी काहि कळायच्या नाहित
ताविज बनाके पेहेनू उसे
आयत कि तरह मिल जाये कहीं
आयत चा फक्त मराठी अर्थ माहित होता. मित्राने नीट समजाउन सांगितला. नंतर पुर्ण गाण्याचा अर्थ सांगितला. तेंव्हापासुन हे गाणं अधिक आवडायला लागलं.

मस्त धागा.
मला स्वतःला खूप लहानपणापासून गाणी ऐकताना प्रथम शब्द समजावून घेण्याची सवय आहे. कदाचित मराठी भाषेचा ओढा हे कारण असू शकेल. पण अनेक गाणी चालीमुळे/गायक/गायिकेच्या आवाजामुळे जास्त जवळची वाटली. शास्त्रीय संगीत मनापासून आवडतं ( समजतं की नाही माहित नाही Wink ) पण नाट्यसंगीत हे त्याच्या चालींमुळे + गायक/गायिकेमुळे आधी आवडलं आणि जसं वय वाढलं तसं शब्द समजून घेण्याची सवय झाली असं म्हणेन.

अजुनही हृदयनाथांची अनेक गाणी विशेषतः ग्रेस/आरती प्रभु यांची कळली नाहीयेत. चालीमुळे गुणगुणली जातात इतकंच. त्याविरुद्ध नाट्यसंगीत शब्द कमी आणि अवघड असले तरीही नाटकातील प्रसंगानुरूप कळतात.

ज्ञानेश्वरांच्या 'अवचिता परिमळु' आणि आरती प्रभूंच्या 'ये रे घना' मधील "अळुमाळू" ह्या शब्दाचा नेमका अर्थ अजूनही लक्षात येत नाहीये. ऐकताना कुठल्यातरी संयोगाशी संबंधित असावे असा एक फील येत असतो पण काहीतरी निसटल्यासारखेच वाटत राहते.

आरती प्रभू - हृदयनाथ - महेंद्र कपूर : ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते.

दोन कारणांनी अर्थ खूप उशिरा कळला. एकतर गाणे लहानपणापासून ऐकत आलो.
यातली 'ती' म्हणजे काव्यप्रतिभा/प्रेरणा : हृदयनाथांनी सांगेपर्यंत 'ती' कोण हा प्रश्नच पडला नव्हता.

अळुमाळू चा अर्थ थोडं, कमी..

अचानक हा हलकासा पसरलेला गंध मला कृष्ण आल्याची चाहूल देतो आहे.

बाकी अशी बरीच गाणी आहेत जी शब्दांसाठी आवडतात तर बरीचशी चालींसाठी Happy

धागा मस्त आहेच ! तरुण भारताने ही केव्हातरी असे पान सुरु केले होते. त्यात निवडक गाणी आणि त्यांचे उमगलेले अर्थ सांगितले होते. वाचताना आपण त्या गाण्यातुन्/काव्यातुन जे काही अनुभवत होतो त्यामुळे स्वतःचेच स्वतःला हसू येत होते.

मेरे घरसे तुमको कुछ सामान मिलेगा
दिवाने शायर का एक दिवान मिलेगा
और एक चीज मिलेगी टूटा खाली जाम... >>>>खरच नंदिनी ताई
माझ्याही आवड्त्या ओळी

सुरुवातीपासून गाण्याचे शब्द ऐकण्याकडे कल त्यामुळे गाणी पाठ होतात पण गुणगुणताना सुरावट चुकते असं माझं गाण्यातलं घराणं (?) त्यामुळे अर्थ हरवण्याचा प्रश्नच येत नाही पण एकूण गीताच्या शब्दांना क:पदार्थ मानण्याच्या वृत्तीची खंत वाटते. अरे तिथूनच गाणं सुरू होतं ना ?

आणि यापुढची गंमत अशी की सुंदर चालीच्या परिवेषात गाण्याचा आत्मा सोपा होतो, त्यातल्या कवितेला एकारलेला अर्थ येतो असंही खूपदा वाटतं मला..सुरांची ताकद मोठी असते , शब्दांवर मात करते ती.

सुरुवातीपासून गाण्याचे शब्द ऐकण्याकडे कल त्यामुळे गाणी पाठ होतात पण गुणगुणताना सुरावट चुकते असं माझं गाण्यातलं घराणं (?) >>सेम पिंच. मी ही तुमच्याच घराण्यातली की मग भारती ताई

कोणत्याही गाण्याची चाल, अर्थ(शब्द), गायकी सगळं जुळून येणं म्हणजे दुग्धशर्करा योगच, आणि माझ्या मते अशी गाणी अस्तित्वात आहेत हे नक्कीच Happy खास जुनी. रफि/लता इ. लोकांनी गायलेली.
हृद्यनाथ मंगेशकरांनी संगितबद्ध केलेल्या गालिबच्या गझला सर्वार्थाने जमून गेलेल्या आहेत. गालिबचे शब्द,हृद्यनाथ यांचं संगित आणि लता मंगेशकरांचा आवाज. अजून काय हवं? त्यातल्या त्यात माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हृद्यनाथ मंगेशकरांनी आपल्या खास कलाकृती या फक्त लताजींकडूनच गाऊन घेतल्या. त्याच पुर्ण न्याय देऊ शकल्या त्यांच्या गाण्याला. मग त्या गझल्स असूदेत नाहीतर भजनं.

मैने मजनू पे लडकपन में असद
संग उठाया थ के सर याद आया...
फिर मुझे दिद-ए-तर याद आया.......

रगों में दौडते फिरने के हम नही कायल
जब आँख से ही ना टपका तो फिर लहू क्या है......

जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा..
कुरेदते हो जो, अब राख-ए-जुस्तजु क्या है...
हरेक बात पे केहते हो तुम के तु क्या है...

मला ही प्रथम चालच भावते आणि मग शब्दांची दखल घेते मी...

मुझे दर्द-ए-दिल का पता न था मुझे आप किसलिये मिलगये
हे गाणं मी ऐकलं आणि मला रफिचा आवाज प्रचंड टच झाला..
नंतर नीट ऐकलं आणि अर्थ ही सुंदर असल्याचं जाणवलं.....

युं ही अपने अपने सफर में गुम कही दूर मै, कही दूर तुम
चले जा रहे थे जुदा जुदा, मुझे आप किसलिये मिलगये..:)

Pages