मॅटर्निटी सुट्टीचा कालावधी

Submitted by जाईजुई on 19 December, 2013 - 02:20

मध्यंतरी कोणाकडून तरी मॅटर्निटी लिव्ह १८० दिवस झाल्याचे वाचले. बेस्टमधील कोणा कर्मचार्‍याला (स्त्री) सुट्टी मिळाल्याचेही कळले.

परंतु, आयटी क्षेत्रात अजुनही ९० दिवस भरपगारी सुट्टी दिली जाते. आमच्या कंपनीत त्यापुढे स्वर्जित सुट्टी व त्यानंतर जास्तीत जास्त १ महिना बिनपगारी सुट्टी (ती ही मॅनेजमेंटच्या निर्णयानुसार) दिली जाते.

नेटवर शोधल्यावर १९६१चा कायदा मिळाला परंतु मला त्यातले काही नीट कळले नाही.

कोणी सध्याचा कायदा नक्की काय आहे ते सांगू शकेल काय?
केंद्र प्रशासन आणि राज्य प्रशासन ह्यांचे कायदे वेगळे आहेत काय?
खाजगी क्षेत्रासाठी, जास्त पगारानुसार काही वेगळे कायदे आहेत काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केंद्रातील कर्मचार्‍यांसाठी प्रसूति रजा १८० दिवस आहे.
सन २००९ पासुन राज्य शासकीय कर्मचार्‍यांनाही ही रजा लागू झाली आहे.
खाजगी कंपन्यांबद्दल काही विशेष माहित नाहि.

सरकारी सेवांमध्ये त्यांचे स्वतःचे लीव्ह रुल्स असतात. त्यागोष्ती नमूद असतात. साधार णतः केंद्राच्या निअयामप्रमाने राज्य सरकारे, नगरपालिका स्वतःचे रुल बनवतात. संघटना तशी मगणी करत असत्तत. तुमच्या ऑफर लेटर मध्ये तुम्हाला लागू असलेले रजा नियम दिलेले असावेत असे वाटते. मात्र निदान सरकारी निमसरकारी संस्थात 'रजा हा हक्क नाही' हे स्पष्ट केलेले असते त्यामुळे रजामंजूर न झाल्यास दाद मागता येत नाही . आस्थापनेच्या कामाची निकड पाहून रजा मंजूर नामंन्जूर केली जाते. प्रसंगी रिकॉलही केले जाते. आर्मीच्या, पोलीसांची रजा एकतर्फीच कॅन्सल केल्या जातात...
याला अपवाद म्हणजे प्रसूती उर्फ मॅटिनिटी रजा, ही हक्क म्हणूनच द्यावी लागते. पूर्वी ही ९० दिवस होती पण जननी व बाल सुरक्षा लक्शात घेऊन व बालकाची सुरुवातीच्या दिवसात योग्य काळजी घेता यावी (व बालमृत्युचे प्रमाण कमी व्हावे ) म्हणून १८० दिवस करण्यात आलेली आहे. खाजगी आस्थापनाबद्दल माहीत नाही.

सरकारी सुट्टी वर लिहिल्याप्रमाणे फिक्स आहे.. पण खासगी कंपनीत प्रत्येक कंपनीच्या रुल नुसार बदलते,,,
मी खासगी कंपनीत.. रजा :- ८४ दिवस, डिलिवरी आधी आणि नंतर बॉस च्या परवानगी ने थोडी थोडी घेता येते...

धन्स सगळ्यांना! आमच्या आस्थापनात ९० दिवस भरपगारी सुट्टी आहे + स्वार्जित रजा + बिनपगारी (मॅनेज मेंटच्या मर्जीनुसार) !

उगाच आपले डॉक्टर ग्यान देत बसतात की बाळाला ६ महिने स्तनपानावरच ठेवा, वै.

उगाच आपले डॉक्टर ग्यान देत बसतात की बाळाला ६ महिने स्तनपानावरच ठेवा, वै.>> ते बरोबरच आहे. निसर्ग काही आपल्या रजेनुसार वागत नाही. आपण निसर्गा अनुसार मॅनेज करावे लागते. स्तनपानाचे फायदे ही भरपूर आहेत. पूर्ण माहिती करून घ्या. बाळाची आबाळ करू नये.

उगाच आपले डॉक्टर ग्यान देत बसतात की बाळाला ६ महिने स्तनपानावरच ठेवा, वै.
>>>
ते उगीच नसतं.
सुट्टी असेल तरच बाळाला स्तनपान देता येतं हा मोठ्ठा गैरसमज आहे.
नोकरीवर जाऊनही बाळाला आवश्यक त्या कालावधीसाठी व्यवस्थित स्तनपान देता येऊ शकतं.

उगाच आपले डॉक्टर ग्यान देत बसतात की बाळाला ६ महिने स्तनपानावरच ठेवा, वै.
....-
ते उगीच नसतं.
सुट्टी असेल तरच बाळाला स्तनपान देता येतं हा मोठ्ठा गैरसमज आहे.
नोकरीवर जाऊनही बाळाला आवश्यक त्या कालावधीसाठी व्यवस्थित स्तनपान देता येऊ शकतं.
>>>>>>>>>>
हो अगदी बरोबर .. ६ महिने खरच गरजेचच आहे ..
मला सुट्टी कमी असल्याने लवकर जॉईन करयला लागल तरी मी ऑफिसच्या जवळ २-३ महिने शिफ्ट झाले होते .. तिला सकाळी जस्तित जास्त फीड करुन ऑफिसला जायचे ..पुन्हा दुपारी घरी यायचे जेवणाच्या सुट्टीत .. आणि संध्याकाळी अक्षरः पळत घरी यायचे...
गरजेच आहेच हो..

अगागा, बायांनो, मी वैतागून बोलले ग! नुसते शाररिक नव्हे तर बाळाच्या मानसिक स्वा स्थ्यासाठी देखिल आईची जवळीक आणि फिडींग उपयोगी असतं, अस आम्हा दोघांना वाटतं.

निर्मयीच्या वेळी माझा बॉस खूप्पच चांगला होता, त्यामुळे त्याने ३ महिने पूर्ण सुट्टी नंतर ६ महिने हाफ डे, हाफ पे वर काम करू दिले. त्यामुळे एक्स्ट्रॅक्ट करून, स्टोअर आणि फीड ने तिचे ९ महिनेपर्यंत काम झाले होते. (मंजू, पण ही सोय इतर बर्‍याच जणींना उपलब्ध नव्हती.)

आता माझे पुण्य आटले आहे आणि बॉस बदलला आहे. त्यामुळे सरकारी नियमाच्या बदलाच्या आशेवर होते. Uhoh