क्विक रवा डोसा/दोसा(फोटो सहित)

Submitted by सीमा on 16 December, 2013 - 14:33
rava dosa
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदळाचे पीठ
१ कप रवा
१/२ कप मैदा
कोथिंबीर
मीठ
तेल
हिरवी मिरची बारीक चिरून
जीरे
आल (बारीक चिरुन. optional)

क्रमवार पाककृती: 

रवा+मैदा+तांदळाचे पीठ एकत्र करुन त्यात पाणि घालून घ्यावे. कन्सिस्टन्सी अगदी मठ्ठ्या प्रमाणे पातळ असायला पाहिजे. त्यात आता हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जीरे आणि इतर जे हवे असतील ते घटक घालून घ्यावेत.
नॉनस्टीक तव्यावर थोड जास्त तेल घालून , नेहमी घालतो त्यापेक्षा थोड उंचावरून डोसे घालावेत. वरून तेल घालावे.
मोठा गॅस करून क्रिस्पी होईपर्यंत ठेवावे. उलटु नये. डोसा बाजूने सुटु लागला कि लाक्डी उलथण्याने काढून गरम गरम सर्व्ह (चटणी किंवा मेतकुट सोबत )करावा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

जस जसे डोसे घालू तस तस मिश्रन घट्ट होत जाते. पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी पातळच असण गरजेच आहे.
ओनिअन रवा डोसा करताना कांदा बारीक कापून डोसा घालून झाल्यावर पसरायचा. अगदी रेस्टॉरंट प्रमाणे डोसा तयार होतो. रवा डोसा क्रिस्पीच पाहिजे. त्यामूळ गॅस मोठाच असावा.
ही रेसीपी खूप versatile आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या चविप्रमाणे बदल करु शकता.

बरेचजणींनी लिहिलय वेडावेकडा डोसा होतो, त्यांच्यासाठी . डोसा पुर्ण तवा भरून घालायचा. वरती मी पुर्ण चौकोनी तवा भरून घातलाय तसा.

माहितीचा स्रोत: 
असंख्य साउथ इंडिअन मैत्रिणी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगो +१. बाइंडिंगसाठी असावं, कारण यात उडीदडाळ नाही आणि रवाही भिजत घातलेला नाही. मग बाइंडिंग एजन्ट नसेल तर धिरडी होतील - डोसा होणार नाही.

म्हणजे मी धिरडी करते, डोसे नाहीत कारण मी मैदा घालत नाही.
सीमा, शिर्षकात वाटणं- आंबवणं नाहीत म्हणून क्वीक असं लिही म्हणजे कुणाचा गोंधळ उडायला नको.

>> कारण मी मैदा घालत नाही
तुझे डोसे पातळ आणि कुरकुरीत होतात का? असतील तर माझा गेस चूक. Happy

प्राची , मैदा वरती सगळ्यांनी लिहिलेय तस बाईंडींग एजंट असावा. नाही घातला तर चविला छान लागेल पण जाळी जितकी सुंदर पडते तितकी पडणार नाही. तुटेल अधून मधून अस वाटत.
अगं , वरच्या क्वांटिटी मध्ये खूप होतात डोसे. हिशोब करायचाच झालातर अगदी ५/६ खाल्ले तरी चमचा भर मैदा जातो पोटात. (इति हेल्थ्/कॅलरी फ्रॅनॅटीक घरातील इतर सदस्य. Happy )
मी पण मैदा,सेल्फ रायझिंग फ्लॉर, चकलीची भाजणी वगैरे ठेवते बरेचदा फ्रीजरमध्ये.

आज केले हे दोसे. मैदा नव्हता म्हणून फक्त रवा-तांदळाचे केले. बात कुछ जमी नही Sad नीट जाळी पडली नाही. आता पुन्हा करेन मैदा घालून.

नेहमी घालतो त्यापेक्षा थोड उंचावरून डोसे घालावेत. >>>>>> हे म्हणजे नक्की कसं कोणी समजावुन सांगेल का???? नेहमी मी घालत नाही डोसे कधीच, त्यामुळे कश्यापेक्षा उंचावरुन ते कळत नाहिये

हे म्हणजे नक्की कसं कोणी समजावुन सांगेल का???? नेहमी मी घालत नाही डोसे कधीच, त्यामुळे कश्यापेक्षा उंचावरुन ते कळत नाहिये >> ओट्यापुढे स्टुल ठेवायचा. स्टुलवर उभे राहिले की नेहमीपेक्षा उंचावरुन होइल Wink

ओट्यापुढे स्टुल ठेवायचा. स्टुलवर उभे राहिले की नेहमीपेक्षा उंचावरुन होइल डोळा मारा>>> Lol अगं खरंच कोणी करून बघेल असं. दिवा तरी दे!

काल स्प्राउट्समध्ये गेले होते. कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की माझ्याकड्चं पीठ मैदा नसून होल व्हीट फ्लार होतं Happy
हे डोसे आता मला जास्तच आवडलेत.

shhompe, yogya veli post takali ahes. mi ata ardhya tasat karanar ahe he dose...

काल करुन बघितले.. जमले असं वाटतय.. मस्त कुरकुरीत झालेले, पण भयानक जाळी पडलेली, जाड पण नव्हते झाले. चवीला बेस्ट होते

मंजू, भारी दिसतोय डोसा... एकदम हॉटेलातल्यासारखा Happy (आता माझा हुरूप अजून वाढला. या विकेण्डाला पायलट-प्लाण्ट टाकणार.)

मी प्राचीने टाकलेल्या लिंकमधल्यासारखा घालून पाहिला डोसा, पण निस्तरपट्टी जास्त झाली. तवा, शेगडी, भिंत आणि ओटा सगळीकडे रांगोळी घातली गेली Proud

अर्धा कप तां.पी. अर्धा कप रवा आणि पाव कप कणीक या मेजरींग कप प्रमाणात वरच्या आकाराचे ५ डोसे झाले. साधारण पाऊण लिटरची पातेली भरून पीठ तयार झालं होतं. (पाण्याच्या प्रमाणासाठी हे वाक्य. मी थोडं आंबट ताकही घातलं होतं आणि बाकी पाणी.)

मस्त फोटो मंजुडी. गव्हाचे पीठ घालून केलास ना, मी ही करुन पहाते.
शुम्पी वरती गव्हाच्या पीठाची टिप अ‍ॅड करते.
प्राची , अरे देवा. नाव पण क्वीक रवा दोसा आहे. Proud पण खर सांगू का तसं करायची गरज नाहीये. नॉर्मल डावाने घाल पीठ. Happy (आणि त्यान केलेल्या पेक्षा या पद्धतीने खूप देखणा आणि लेसी होतो डोसा. :))
चिमुरी क्रिस्पी नको असेल एवढा तर पीठाची कन्सिस्टंसी थोडी घट्ट कर वाटल्यास. थिक आणि कमी क्रिस्पी डोसा होईल.

वरती लिहायला विसरले यात मी बारीक कापून कडीपत्ता घालते.

मी आज केले होते ... मस्त झाले आहेत ... पण थोडे क्रिस्पी कमी वाटले ... पण मी डोसा खाल्ला तेव्हा गार झाला होता म्हणून असेल कदाचित

kaal kele dose. gavhache peeth ghatale mipan.
mast jalidar dose jhale hote. thanx seema. Happy

Pages