छद्मयुद्ध-२

Submitted by सोन्याबापू on 12 December, 2013 - 08:36

छद्मयुद्ध-१ इथे वाचा

http://www.maayboli.com/node/46780

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
छद्मयुद्ध-२

एपीसोड १ - खुलासा
स्थळ - रॉ हेड क्वार्टर्स, दिल्ली

आज तिने जवळपास १ वर्षाने साधी ब्लू डेनिम अन एक फ़ॉर्मल पांढरा शर्ट घातला होता, केस मोकळे सोडले होते, मेबलिन ची हल्कीशी आय लायनर पुरेशी होती निलोफ़र उर्फ़ गौरी साठी, लावण्यखनी म्हणावी अशी २६ वर्षांची टीपिकल "दिल्ली दी कुडी" वाटणारी गौरी, अनार्म्ड कॉंबॅट अन बेटन फ़ायटींग मधे सगळ्यांची आई असल्याचे फ़क्त शहादरा स्टेशन वरच्या २ "मनचल्यांना" पुरे कळले होते!.

तिकडे दिलशाद गार्डन मधे करण उर्फ़ अश्फ़ाक आपली रॉयल एन्फ़िल्ड धुतल्यावर सुरु करत होता, एक वर्ष दुर होता तो तिच्या पासुन !!!, आर्मी बॅकग्राऊंड चा पोरगा, वय वर्षे २७, वडील ब्रिगेडीयर, स्वतः करण आधी बीएसएफ़ ला असिस्टंट कमांडंट डेप्युटेशन वर रॉ ला आलेला. वेपन्स अन ट्रान्स्पोर्ट एक्स्पर्ट.

तिसरा अन टीम चा सगळ्यात जुना मेंबर, राजेश देशकर, कुठुनही डेप्युटेशन वर न आलेला, जातकुळी अन ट्रेनिंग ने अस्सल स्पाय..... गुप्तहेर.... युनिवर्सिटी ला मेकॅनिकल च्या थर्ड ला असताना कॅंपस इंटरव्यु ला तो एका "कंपनी" ला बसलेला, कंपनी ने " ओके राजेश, वी विल लेट यु नो अबाऊट इट सुन" म्हणले अन नंतर २० दिवस राजेश २४/७ निगराणीत होता, २१ व्या दिवशी कॉल , राजेश उद्या तु नागपुर ला येऊ शकशील का इंटरव्यु ला ? नागपुर ला "क्ष" हॉटेल ला आलेली ती सुखद ऑफ़र, "विल यु जॉईन वर्ल्ड्स वन ऑफ़ द बेस्ट इंटेल एजन्सी राजेश ? " झटक्यात दिलेला होकार, वर्षभर आधीच लग्न झालेला, बायको मुंबईला सी.ए, "वर्षभर मला सुट्टी नाही" हे तिला पटवुन घराबाहेर पडलेला , घरी परतायची आस लागलेला राजेश देशकर, वय वर्षे २९.

सकाळी, ०११० ते ०११५ च्या मधे ५ -५ मिनिट्स च्या अंतराने सगळे एच क्यु ला पोचलेले, लाऊंज मधे दोघे पुल खेळत बसलेले तर गौरी कॉफ़ी पित बसलेली, इतक्यात एक चलाख असिस्टंट धावत आली, तिघांना त्यांचे आर एफ़ आय डी कार्ड देत बोलली, " मॅम, सर्स, प्लीज टेक द एलेव्हेटर टू लेवल १२"

"इतकं पण एच क्यु नाही विसरलेलो आम्ही मॅम" करण हसत म्हणाला

" तु हरयाणवी ,जिधर कुडी दिखी नही लाईन लगाना शुरु" गौरी ने हसत टोमणा मारला , त्यावर

"जे बात तो तेरी सही से छोरी पर में बस खुबसुरत कुडीयों के पास ही जाता हूं" म्हणत त्याने परत फ़ेड केली!!.
लेवल १२ ला लिफ़्ट चे दार उघडले तर समोर " वेल्कम चितों" लिहिलेला बॅनर, सजवलेला हॉल, अन स्वागताला स्वतः स्पेशल डायरेक्टर जसजीतसिंह भुल्लर!!!.

" ओये , जल्दी चलो समोसे बियर बाद में" पहले ब्रिफ़िंग है खुद एक बडे व्यक्ति आये है " असं म्हणत त्यांनी वरात चालवली, त्या साऊंड प्रुफ़ अन सिग्नल प्रुफ़ रूम मधे घुसायच्या आधी शेवटचे इस्ट्र्क्शन आले

"राजेश , ब्रिफ़िंग तेरी होगी, जहां रेफ़रंस होगा, वहां जट्ट या कुडी बोलेगी, क्लियर ?? "

राजेशने मान डोलवली तसे दार उघडुन सगळे आत गेले, अन सर्दच झाले, हीज एक्सलंसी , सुप्रीम कमांडर , महामहीम राष्ट्रपती महोदय, सुहास्य वदने स्वागत करत होते

" सर, ही आमची डेल्टा टीम, अग्रेसीव एस्पीयोनेज मधे हिच्या सारखी फ़क्त सी.आय.ए ची स्पेशल ऍक्टीव्हिटीज डिविजन आहे, दिज आर द फ़ायनेस्ट मेन ऍंड विमेन , ब्रिफ़िंग विथ यौर पर्मिशन , सर ? "

"गो अहेड"

राजेश ने सावधान मधे उभं राहुन पहीले "जय हिंद" केला, "सर, सिनियर टीम मेंबर राजेश देशकर .... सर"

"ऍट इज ऑफ़िसर, आय एम हियर टु अप्लॉज यु, गो ऑन" सगळे स्थानापन्न झाल्यावर राजेश सुरु झाला

" सर, जवळपास एक वर्ष आधी, रॉ स्टेशन विएन्ना, ला तिथे एक सर्वेवलंस दरम्यान हे आढळले की एक पाकीस्तानी वेपन्स दलाल, शम्सी कफ़िल हा आय ए ई ए अर्थात International Atomic energy Agency च्या काही अधिका-यांच्या मागावर आहे, त्याच्या हालचाली आम्हाला इंटरेस्टींग वाटल्या, कारण तो ज्या अधिका-या पर्यंत पोचायचा प्रयत्न करत होता, तो एक जर्मन कंपनी न्यु लुक्स जी एम बी एच (Nu luks Gmbh) चा टेक्निकल व्ही.पी लुथर बाह्न्मन होता, फ़ॉय युवर इन्फ़ो सर, IAEA ला जसे परमाणु शक्ती धारक देश सदस्य असतात, तसे ह्या तंत्रात काम करणा-या कंपन्यांचे अधिकारी पण असतात, काही युनो च्या लग्याने तर काही त्या त्या देशाच्या सरकारचे वेस्टेड इंटरेस्ट जपायसाठी अंडर कवर त्या त्या सरकार ने घुसवलेले, जसे की अमेरीका वेस्टींग हाऊस चे अधिकारी घुसवते, जर्मनी ने नु लुक्स चा घुसवला, अगदी आपला एन पी सी आय एल चा माणुस पण आम्हीच तिथे प्लांट केलाय."
"आमच्या एन पी सी आय एल च्या तिथल्या हस्तका नुसार शम्सी काही जुनी गॅस सेंट्रीफ़्युज ची डिझाईन्स मिळवायसाठी बाह्न्मन च्या मागे होता, बाह्न्मन हा पक्का रंगेल अन अय्याश असल्याचे पण आम्ही पता लावले, ह्याचा अर्थ सरळ होता की पाकीस्तान ला वेपन्स ग्रेड युरेनियम एन्रिचमेंट करायची आस आहे, अश्यातच आम्ही आमच्या रॉ स्टेशन इस्लामाबाद ला अलर्ट केले, तिथले स्टेशन हेड श्री जीवन बार्दोलाई ह्यांनी अथक परीश्रम करुन, असे डिझाईन्स हॅंडल करायची क्षमता फ़क्त डॉ.प्रो. रहीम खुर्रम ह्यांच्यात अन ते सद्ध्या खान लॅब्स चे डायरेक्टर असल्याचा पत्ता लावला,खुर्रम साहेबांची डीटेल हिस्ट्री काढल्यावर हे समजले की त्यांना एक अधु पत्नी आहे मुले परदेशात आहेत अन मायेला हपापलेला हा उमदा माणुस एकाकी आहे, त्याचवेळी ’ऑपरेशन छद्मयुद्द" हे साकारले गेले, अन डेल्टा टीम म्हणजेच माझी टींम इन्वोल्व झाली, पहीले इन्फ़िल्ट्रेट झालो तो मी, कहुटा ला प्रोफ़ेसर कॉलनीतले प्रोफ़ेसर्स कुठे हेयर कटींग ला जातात हे पहीले मी ट्रेस केले..... "

"पण हेयर कटिंगच का ??" इति मिस्टर प्रेसिडेंट

" मी तिथेच येतोय सर, मुळात न्युक्लियर लॅब्ज किती ही सेफ़ असल्या तरी ह्या वैज्ञानिक लोकांना मायन्युट रेडीयेशन एक्पोजर होतेच होते, मी हजामाच्या दुकानात काम मिळवुन तिथे रोज कटींग चे काम करायचो, तिथे आम्ही हेयर सॅंपल्स जमा करायचॊ अन सेफ़ चॅनल थ्रु ते इंडीयन एंबसी ला पाठवायचो, तिथुन ते दर महीन्याना, एन सी एल , पुणे ला पाठवले जायचे जिथे गॅस क्रोमॅटोग्राफ़ी सारखी आधुनिक तंत्रे वापरुन त्या केसांचं एक्स्पोजर कुठल्या किरणोत्सारी पदार्थासमोर झालंय हे पता लागायचं, अश्या रितीने , खान लॅब्ज ला कोण माणुस कुठल्या सेक्शन ला काम करतो हे आम्ही ट्रायंगुलेट करु शकलो, हे ट्रायांगुलेशन झाल्यावर आम्ही, युरेनियम वर काम करणा-या लोकांना टार्गेट केलं, त्यातही सर्वाधिक एक्स्पोजर नेमके खुर्रम साहेबांचेच होते, आम्ही खुर्रम साहेबांचा बळावलेला आर्थ्रायटीस पाहुन तोच कयास बांधला होता, तो लॅब रिपोर्ट्स ने कन्फ़र्म केला." अजुन काही प्रश्न असावेत म्हणुन राजेश ने पॉज घेतला

"तुला केश कर्तनालयात नोकरी कशी मिळाली राजेश ?? "

" आय एम सॉरी सर पण मी ब्रह्मदेवालाही माईक्रो ऑपरेशनल डिटेल्स सांगु शकत नाही, फ़क्त इतकेच सांगेन माझे, कबाईली भाषांचे ज्ञान मला कामी आले ".

" ह्म्म्म, परहॅप्स थिस इज व्हाय यु गाईस आर फ़ियर्ड इन वर्ल्ड आय गेस!!!, गुड, कंटीन्यु ऑफ़िसर"

"आभारी आहे सर. तर असे २ महीने काढल्यावर मला खुर्रम साहेबांच्या जवळ जाता आले, एक दिवस थंडी मुळे जेव्हा त्यांची सांधे दुखी बळावली तेव्हा त्यांनी घरीच कोणाला तरी कटींग ला पाठवायची विनंती केली, मी लगेच उमेदवारी करुन पुढे झालो, पहील्याच मिटींग मधे ह्या साहेबांस बोलायला कोणीतरी लागते हे मी ताड्ले, तेव्हाच मी " मै आपकी रोज दाढी बनाकर खिदमत करुंगा जनाब" चे अस्त्र मी चालवले, त्यांच्या रोजच्या बोलण्यातुन मला त्यांना असलेला त्रास कळत होता, पण राष्ट्रहीतापुढे विधिनिषेध नसतात सर, ज्या दिवशी मॅडम खुश असल्याचे ते मला बोलले त्याच दिवशी माझी बहीण म्हणुन डोमेस्टीक हेल्प, म्हणुन मी गौरी ला घरात घुसवले, त्याच वेळी आमचा तिसरा एक्स्पर्ट करण पण अवतरला, अश्फ़ाक मुळात वेगळा माणुस होता त्याची अन करण ची चेहरेपट्टी जुळत असल्याने आम्ही त्याला निवडले, तो नेमका काही दिवस रजेवर होता, पण ते आमच्या पथ्यावर पडले, त्याला तो जॉईन व्हायच्या २ दिवस आधी आम्ही खतम केले व त्याचे आयडी कार्ड फ़ोर्ज करुन करण ला "अश्फ़ाक" बनवले, आता एक महीना लॅब्ज च्या आत करण अन घरी गौरी दोघांनी प्रोफ़ेसरांचा विश्वास जिंकला होता तेव्हा मी माझे डेली कटींग दाढींचं काम करतंच होतो, करण रोज प्रोफ़ेसरांना त्यांना ज्या युनिट ला जायचे आहे तिथे पर्यंत पोचवायचा त्यांची वॉटरबॉटल ब्रिफ़ सांभाळायचा, ज्या दिवशी ते सेंट्री फ़्युज ला जाणार होते त्या दिवशी करण ने त्यांच्या पाण्यात अगदी माईल्ड सिडेटीव टाकले होते, इतके माईल्ड की ते झोपले नाहीत पण दिवस भर थकल्या थकल्या सारखे फ़िल करत होते,
शिवाय त्या दिवशी सकाळी अश्फ़ाक ने गौरी उर्फ़ निलोफ़र ला फ़ोन करुन खोकुन सिग्नल दिला तो " टु नाईट इज द नाईट" हा होता. दोघांना शंका न बळावुन घेता गायब व्हायची शंका मिळावी म्हणुन त्यांनी तो "प्रेमप्रसंगाचा" बनाव केला होता सर, त्या दिवशी संध्याकाळी ऑफ़ीस मधुन निघताना , करण ने प्रोफ़ेसरांना कुठलंसं डिझाईन ब्रिफ़ मधे ठेवताना पाहीलं अन तो आश्वस्त झाला, घरी जे झाले ते आपण जाणताच, गौरी ने प्रोफ़ेसर शॉवर मधे असे पर्यंत डिझाईन्स चे फ़ोटो घेऊन ठेवले, अन त्याच रात्री दोघं लाहोर ला इलोपले, मी तर कहुटाला होतोच होतो अन मी त्या गावचाच नाही हे भासवत सकाळी मी कामावर गेलो, ते प्रोफ़ेसरांनी मला निलोफ़र ची चिठ्ठी दाखवली , मी उध्वस्त झाल्याचं भासवुन मला कबाईली शिक्षा होईल अशी बतावणी करत तिथुन सटकलो, अन ते चॅप्टर क्लोज करुन सरळ लाहोर ला आलो, लाहोर ला तिघं भेटल्यावर मी सिक्युर लाईन वर एंबसी ला फ़ोन केला, तिथे कल्चरल सेक्रेटरी पारधी साहेब हे आमचे लोकल लॉजिस्टिक्स पॉईंटमन आहेत, त्यांनी त्यांच्या एका स्टाफ़ ला जो की एक एथिकल हॅकर आहे हाती धरुन आमच्या एस्केप ला पाकीस्तान साईडने काही प्रोब्लेम न होता आम्हाला काढले, अन काल संध्याकाळी सात ला आम्ही अटारी क्रॉस झालो, डिझाईन्स सहीत"

"ग्रेट जॉब टींम, तुम्हाला आर्मी पोलिस सारखे कव्हरेज नसेल पण तुम्ही खुप मोठी कामं करता, येट माझा एक प्रश्न उरतो, भुल्लर अन होम मिनिस्ट्री ला कसं कळलं की तुम्ही सात ला तिघं अटारी ला पोचाल ?? "

"सर, जेव्हा आम्ही पारधी साहेबांना फ़ोन केला तेव्हा त्यांनी विचारले ५,३,२ की तीन पत्ती , तीन पत्ती म्हणजे आम्ही तिघं सेफ़ आहोत अन डिझाईन मिळालंय , संध्याकाळी जेव्हा ते झा सरांसोबत बोलत होते तेव्हा त्यांनी "तीन वेळा" घाम पुसल्याचे" सांगितले , तेव्हा ते त्यांना कळले, त्यांनी भुल्लर सरांना फ़ोन करुन बोलले की "मी तुला ३ वेळा फ़ोन केला पण तु उचललाच नाहीस" तेव्हा ते समजले, शिवाय पारधी सरांनी आम्हाला इन्स्ट्र्क्ट केले होतेच की एक्स्फ़िल्ट्रेशन १९०० ला म्हणजे संध्याकाळी ७ ला होईल, तोच मेसेज त्यांनी बाकी ठीकाणी पण फ़्लेश केला असेलच हे धरुन आम्ही निघालो, वास्तविक पाहता हे मला माझ्या सॅट युनिट वरुन फ़ोन करुन डायरेक्ट भुल्लर सरां सोबत ठरवता आले असते पण अश्या हाय रिस्क मिशन्स मधे आम्ही सॅट फ़ोन्स अगदी प्रोप्रायटरी असले तरी कमीत कमी वापरतो, कारण जरी सिग्नेचर बाकी कोणाशी मॅच होत नसेल ही पण अननोन सिग्नेचर पाहुन पाक इंटेल तल्लख होऊ शकत होता"

" ओके नाऊ, तुमच्या कडे डीझाईन्स आली.... ठीक, पण मला नाही वाटत भारताचे चोरीच्या डीझाईनचे सेंट्रीफ़्युजेस वापरायचे खराब दिवस आलेत, सो हा आटापिटा आपण वर्षभर का केला आहे ??, ह्यात आपला फ़ायदा ?? पाकचे नुकसान ?? अन काय फ़ायदा ?? "

राजेश भुल्लर सरांकडे पाहुन हसला , सरांनी मान डोलावली तसं तो पुढे बोलु लागला " सर ह्यात भारताचे फ़ायदेच फ़ायदे आहेत, पहीला लुथर बाह्नमन हा पाक धार्जिणा अधिकारी नु लुक्स मधुन उचल बांगडी होईल, त्याच्या जागी श्च्मिड हा अधिकारी येईल, श्च्मिड हा भारतासोबत "तांत्रिक सहकार्य " करायच्या पक्षातला आहे सो तो फ़क्त खरेदी विक्री चा व्यहार नसेल, विन विन असेल. नंबर दोन इराण ला हेच डीझाईन हवे आहे फ़क्त इराण ला ते आपण द्यायचे, बदल्यात आपले क्रुड ऑईल पेमेंट इराण भारतीय चलनात पंजाब नॅशनल बॅंक तुर्की शाखा कडुन घ्यायला राजी होईल, ह्यात कोणाला नाव कळले तर ते बाह्नमन चे कळेल त्याची नाचक्की झाली आपल्याला फ़रक पडत नाही कारण इराण वर आपण दुप्पट उपकार करतोय, पहीला पेट्रोल खरेदी अविरत ठेवणे अन २ डिझाईन देणे"

" तिसरा फ़ायदा, सर आम्ही अटारी ला बॉर्डर क्रॉस केली तेव्हा आम्ही त्या मेजर चे आय डी कार्ड फ़ोटो काढुन आणले आहे, पाक रेंजर्स चे ९०% अधिकारी ऑफ़िशियल आय एस आय पेरोल ला असतात, सो ते ऑथेंटीक आहे, त्याचे एक फ़ोर्ज कार्ड आत्ता पर्यंत बनले असेल, तो अधिकारी पंजाबी मुळाचा होता, आपल्याकडे चायना सेक्शन ला काम करणारा अजित बंसल हा तश्याच चेह्ररेपट्टीचा आहे, त्याला पाकी मेजर बनवुन आपण ते डिझाईन दिल्लीत नॉर्थ कोरीयन एंबसी ला विकायचे, कांगावा हा की पैश्यासाठी पाक चा एक अधिकारी अनधिकृत पद्धतीने डिझाईन्स विकतोय, त्याचे सी सी टि वी फ़ुटेजेस मुद्दम ब्लर करणेत येतील, हा व्यवहार पुर्ण झाला की आपणच ही न्युज सी आय ए ला फ़्लॅश करुन सांगायची "पाकीस्तान ने नॉर्थ कोरीया ला अनधिकृत रित्या डिझाईन विकले", अन आमचे वॉशिंग्टन चे लोक पक्की खबर देतायत, सी आय ए ला ह्या डिझाईन्स अन बाह्नमन चा सुगावा होता पण ह्या वेळी बाजी रॉ ने मारली आहे सर, न्युज तर ही पण आहे की जर आपण सिद्ध केले की ही डिझाईन्स पाक ने विकली आहेत, तर, अमेरीका पाक ला जी २५ अब्ज डॉलर्स ची मदत देणार होता ती तत्काळ थांबवणे करेल, प्लस एफ़-१६ सुपर हॉर्नेट विमाने पण विकायचे कॅन्सल करेल.......... हे आपले फ़ायदे आहेत सर, उम्म्म्म डीझाईनच्या ओरिजिनल वाटाव्या अश्या कॉपीज बनवायचे काम सुरु झाले आहे सर "

राजेश आता पाणी पित होता अन राष्ट्रपती आ वासुन बघत होते, शेवटी ते बोललेच " अरे तुम्ही असताना कश्याला रे आम्हाला टेन्शन आहे!!!!, काय करायचे ते करा, तुम्हाला मेडल्स द्यावी वाटतात पण सगळेच पडद्या आड, भुल्लर पोरांना प्रेसिडेंट्स स्पेशल गॅलेंट्री फ़ंड मधुन ५-५ लाख प्रत्येकी द्या चॉकलेटला!!!, काय रे पुरेत का ?? "

एव्हाना दोघे बाहेर पडले होते, कारण आज करण गौरी ला प्रपोज करणार होता, राजेश ची संध्याकाळची फ़्लाईट होती तो घरी पोचुन अस्मिते ला मिठीत घ्यायच्या स्वपनात तरंगत होता, अर्धवट उघडलेले दार तसेच धरुन तो बोलला " सर, आभार, इतके नक्कीच पुरेत !!, एकच सांगेन सर आम्ही जन्माने हिंदु, मुस्लिम, मराठी, उत्तरप्रदेशी, तामिळ असु पण आमच्या ट्रेनिंग ने आम्हाला संविधानाचा बाप्तिस्मा दिलाय अन ते जपायला आम्ही कुठल्या ही देशात कुठल्याही थरा ला जाऊ फ़ॉर, द नेशन मस्ट पर्सिस्ट, जय हिंद सर" राजेश निघुन गेला तरी राष्ट्रपती महोदय दारकडेच पाहत होते.........

संदर्भ :-
१. विकिपिडीया
२. गूगल
३. अश्विन संघी
४. रॉबर्ट लड्लम
५. भारत रक्षक
६. स्ट्राटफोर
७. वृत्तपत्रे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा चांगली आहे......

फक्त अवघड वाटली...हवे तर ३-४ भागात खेचा...... पण ओघवती राहुद्या......आताच चालु केली म्हणु पर्यंत संपली सुध्दा......

एक दोन ठिकाणी संदर्भ लागत नाहीत ... मिसमॅच होत आहेत...

जिथे रेफ्रन्स होता तिथे कुडी या जाट बोललाच नाही ... खरतर ब्रिफिंग करताना तिघांना बोलते केले असते आणि संवाद दिले असते तर अधिक वास्तववादी आणि जास्त कॉम्प्लिकेटेड झाले नसते ..

सोन्याबापू मस्तं प्लॉट आहे. मला स्वतःला अशाकथा लिहिता येत नाहीत त्यामुळे सुचना-बिचना देणार नाही. तरीही, ही पात्रं आणि घटना खुलवायला खूप वाव आहे असं वाटतय.
बर्‍याच ठिकाणी खूपच संदिग्धं झालीये कथा.
मस्तच.... अजून येऊदेत

गा पै, असामी, दाद, झकासराव आभार !!!

हो गा पै संपली आता अजुन मोठ्या लिहेन हे प्रायोग म्हणुन होते, अश्या साहीत्याला मराठीत चांगली इमेज नाही आहे (बंगाली साहीत्य त्या बाबतीत व्योमकेश अन फेलुदा समवेत बरेच उदारवादी आहे असं एक आमचं प्रांजल मत)

असामी पॉईंट ड्युली नोटेड!!!

दाद., कुठे संदिग्ध आहे जरा स्पेसिफिक फीड्बॅक द्या ना, म्हणजे पुढिल वेळी सुधार नेमका करेन

झकासराव वैयक्तिक आभार तुमचे

गडबडीत आहे... ऒफिसमधून लिहितेय. अगदी एकच उदाहरण देते.
... २६ वर्षांची टीपिकल "दिल्ली दी कुडी" वाटणारी गौरी, अनार्म्ड कॉंबॅट अन बेटन फ़ायटींग मधे सगळ्यांची आई असल्याचे फ़क्त शहादरा स्टेशन वरच्या २ "मनचल्यांना" पुरे कळले होते!.>>>

गौरी एक सुस्वरुप मुलगी आहे. ती एक स्त्री म्हणून, एका कुटुंबातली व्यक्ती म्हणून काय बरोबर घेऊन फिरतेय? (लगेज नाही,... मानसिकता). ती कदाचित एक आई असेल, बहीण असेल, प्रेयसी असेल किंवा म्हातार्‍या आई-वडिलांची मुलगी असेल. ह्या सगळ्याची वेळोवेळी वजाबाकी किंवा बेरीज करीत हे सर्वस्वी वेगळं आयुष्यं कसं काय जगतात ही माणसं?
शहादरा स्टेशनवरच्या मनचल्यांनी काय केलं? गौरी तिथे काय करीत होती? दोन रोडसाईड रोमियोंना धडा शिकवताना गौरीची मानसिकता काय होती? स्त्रीत्वाला आव्हान देणार्‍यांना त्वेषानं धडा शिकवणं होती की... जवळ जवळ रिफ़्लेक्स ऍक्शन म्हणून स्वसंरक्षणार्थ तिने केलेले उपाय त्यांना भारी पडले? तिचं वैयक्तिक आयुष्यं कुठे तिच्या व्यावसायिक आयुष्याल स्पर्श करतं? अन व्हाईस व्हर्सा...

कदाचित हे सगळं ह्या कथेच्या फ़ोकसच्या अगदिच बाहेर असेल... पण माझ्यामते ही माणसं जी नुस्तीच आम लोकांसारखी आठ तास त्यांच्या प्रोफ़ेशनल रोलमधे नाहीत. वैयक्तिक आयुष्यं आणि व्यावसायिक आयुष्यं कुठेतरी एकपेडी होत जातं... त्यांच्या कथा फक्तं शौर्याचा आढावा इतपत राहू नयेत. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातला हा शौर्य, देशाभिमान, त्याग ह्याला अर्थं देणारं त्यांचं वैयक्तिक आयुष्यं, मानसिकता, जडणघडण ह्याचं चित्रण आलं असतं तर...
असं वाटत राहिलं... मला तरी.
माफ करा, सोन्याबापू... मला कोणत्याही अंगाने ही कथा कमी राहिलीये असं म्हणायचं नाहीये... पण तुमच्या ह्या सुंदर कथा बीजाचा ह्याअधिक, ह्यावेगळा फुलोरा "मला" अधिक भावला असता ... इतकच म्हणायचय.

मला स्वत:ला हे कथा बीज भ्ल्तं म्हणजे भल्तच आवडलय म्हणून हा आगाऊपणा करतेय. अजून लिहा सोन्याबापू... मला वाचायला खूप आवडेल.

आवडली कथा. जबरदस्त आहे.

सोन्याबापू, अजून याच जॉनरमधे ट्राय करा. हेरकथा मला तरी वाचायला फार आवडतात. खास्करून अशा वेगवान कथा. लिखते रहो.

'बापू' ( Wink ) मस्तच जमलीये..
असामीच्या मताशी सहमत .

शॉर्ट आणि स्वीट... इतक्याच छोट्या कथा लिहा हो.. उगाच कादंबरी नकोच... आणि फक्त कट टू कट पाहिजे असलेले डिटेल्स..

जर तुम्हाला हीच पात्र घेऊन पुढची कथा लिहायची असेल तर मात्र त्यांची काही वैशिष्ट्ये यायला पाहिजेत...

मराठीत आहेत की हेर कथा.. फक्त त्यांच्यावर एखादी सिरियल आलेली नाही येवढेच...

दाद, तुमचं म्हणणे अगदी दुरुस्त आहे !!! पण अश्याने कथा जास्तच लांबत जाईल न हो, शिवाय तो कथेच्या फोकस चा मुद्दा वेगळाच आहे, ह्या उप्पर खरं बोलायचं झालं तर पहील्या दुसर्या प्रयत्नातच कश्याला रॉबर्ट लड्लम व्हा!!! असा पण एक विचार आहेच म्हणुन आस्ते कदम चाललोय.
राहता राहीला गौरी चा प्रश्न तर गौरीच नाही इतरही सगळे हेर लोकं हे द्वी स्वभावी असतात!! त्यांना त्यांच्या ट्रेनिंग मधेच मल्टीपल पर्सनॅलिटीज जगल करण्यात ट्रेन केलेले असतात, सुदैवाने अशी काही उदाहरणे पण प्रतितयश हेर किंवा चर साहित्यात सापडतात उदा. अगदी स्कायफॉल पर्यंत आपल्याला कुठे बाँड चे स्कॉटीश लढाऊ पुर्वायुष्य कळते ?? आपण कोण ह्या शोधावरच बेस्ड जेसन बॉर्न पण तसाच, हिटमॅन पण तेच, डे ऑफ द जॅकल मधे पण तेच .... म्हणुन मी सुद्धा जास्त खोलात नाही शिरलो, किती ही फिक्शनल लिहिले तरी काही गोष्टी अनुभव नसल्या तर चितारणे जरा अवघडच जाते, तरीही पुढे मागे ह्याची जर एखादी सिरिज केलीच तर हा मोलाचा सल्ला नक्कीच ध्यानी ठेवेन, तुमच्या परिक्षणा साठी मन:पुर्वक आभार

माधवजी, विजयजी, नंदिनी जी अन सुखदा जी आपले आभार हुरुप वाढवलात

विशाल भो , लॉल्झ !!! आपले पण आभार Wink

हिम्सकुल . येप्प!! माझा पण भर शॉर्ट बट स्वीट वरच आहे सद्ध्या तरी, अन नाही सुपर स्पाईज फक्त सिनेमात असतात वास्तविक ह्या पेशात प्रत्येक फिल्ड चा एक्स्पर्ट व्हायला अर्धी सर्विस जावी लागते!!, सो गौरी करण हे तरी रिपिट होणार नाहीच राजेश ला मुख्य नायक करायचं म्हणतो आहे!! त्याचे वैयक्तिक आयुष्य अलबत हळु हळु उलगडत जाईन

दादने लिहिलेले एका परीने बरोबर आहे. हल्ली अमेरिकन thrillers मधे हा जॉनर खूप वापरला जातो. पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटना नि त्यांचा त्यांच्या कामातील निर्णयांवर होणारा परीणाम हे वापरले जाते. हे अतिशय interesting असले तरी त्याचा अतिरेक झाला कि fast paced thriller चे साचलेले पाणी होते. लेखकाकडे २ पर्याय आहेत - १. fast paced thriller which is more like fantasy fiction. अर्थात ह्यात बर्‍याच अचात नि अतर्क्य गोष्टी आल्या तरी जर कथा पुरेशी ओघवती असेल नि वाचकाला "हे कसे शक्य आहे" पेक्षा "आत्ता पुढे काय ?" ह्यावर लक्ष द्यायला लावत असेल तर, त्या,अशक्यप्राय गोष्टी सहज खपून जातात. दाद, तू कदाचित Matthew Reilly वाचला असशील. (aus connection). त्याच्या thriller ह्या प्रकाराचे आदर्श उदाहरण.
२. human emotional element आणून कथेला दुहेरी पदर द्यायचा जी केवळ मग spy thriller न राहता थोडीफार psycological thriller मधे जाईल. पण ह्यात सुवर्णमध्य साधणे मह्त्वाचे ठरते. Stan Lee च्या नव्या सिनेमांमधे हे बरेचदा दिसते.

हेम्सकूलचं बरोबरय. हे शॉर्ट अन स्वीट... कट टू कट... आहे. हा सुद्धा एक लिहिण्याचा प्रकारच. विस्तारायला गेलं तर कादंबरी होऊ शकेल.
अजून येऊद्या, सोन्याबापू.

पुन्हा एकदा वाचली. मस्त आहे. फार पुर्वी अश्याच कथा (संग्रह) वाचला होता. बहुदा लेखिकेचं नाव गौरी होतं. (विसरलो बुआ)...

येउ द्या अजुन...

असामी हल्लीच्या अमेरीकन सिरिज जसे की २४, होमलँड ,डेक्स्टर इत्यादी मधे हे कॉमनली आढळतं. तोच सुवर्णमध्य सांभाळायचा म्हणजे पुर्णवेळ लेखकु काम करणे आले!! Wink

बाकी सगळ्यांनो लै लै हुरुप वाढवलात आमचा!! बघतो अजुन किती कितपत येईल जमेल तसे लिहितोच , मुळात इंटेलीजन्स म्हणजे फक्त शस्त्र अन सामरीक मुद्दे इतकेच सिमीत नसते, ह्यात आर्थिक सुरक्षा, फेवरेबल ट्रेड डिल्स घडवुनआणणेव, शत्रुस त्याच्या फॉल्टलाईन्स वर खिंडीत गाठणे असले पण प्रकार असतात. नेक्स्ट कथेत, असंच काही तरी आपल्या अंतर्गत सुरक्षेचा खेळ करणारी विदेशी एजंसी विरुद्ध आपल्या एजन्सीज टाईप

कथेचा वेग आणि विस्तार आवडला.

नेक्स्ट कथेत, असंच काही तरी आपल्या अंतर्गत सुरक्षेचा खेळ करणारी विदेशी एजंसी विरुद्ध आपल्या एजन्सीज टाईप>> होउन जाऊ दे Happy मी पण वाट बघतोय...

मला स्वत:ला हे कथा बीज भ्ल्तं म्हणजे भल्तच आवडलय म्हणून हा आगाऊपणा करतेय. इति दाद,

तर सोन्याबापू - त्याहून भलता आगाऊपणा करून विनंती करतो की आपल्या कथा-बीजाचा हवातसा विस्तार करायची परवानगी दाद ना द्याल का?

दाद - अशी परवानगी तस्तुरखुद्द लेखकाकडून मिळाल्यास तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वेगळ्या तर्‍हेने फुलवलेली कथा लिहाल का?

(अतीच भलत्या आगावूपणा बद्दल आगाऊ (इन अ‍ॅडव्हान्स) हार्दीक(तहेदिल) माफी)
केवळ आणि केवळ वाचन-स्वार्थाच्या हेतूने प्रेरित

अहो हर्पेन, सोन्याबापू लाख देतिल परवानगी... मला जमायला नको?
मला अशा कथा (हेरकथा) ज्यात तांत्रिक बाबींवर फार फार लक्षं ठेवावं लागतं वगैरे... बिल्कुल जमत नाहीत. जबरी तंतरते माझी.
मी अत्यंत फापटपसारा घालून लिहिते... असं नेमकं लिहिणं ह्यांनाच जमो.

मी प्रयत्नं केलाय असलं एक लिहायचा (एकांतात... जाहीर नव्हे)... प प पडले. कानाला खडा... नको त्या फंदात पडायचच नाही. जेणु काम तेणू थाय...
सोन्याबापू मुळीच परवानगी देण्याच्या विचारातही पडू नका.

आता तुम्हीच काय ते ठरवा!!! कॉपीराईट्स सर्जनशीलतेला मारायसाठी कम्युनिस्ट अन कॅपिटलिस्टांच्या मधुचंद्रातुन निपजलेले रोगट कार्टे समजतो मी!!! (अर्थात मॉनिटरी जगात कॉपीराईट्स ना किंमत आहेच!!!) बघा काही सजेशन मला व्य नि करा मी नक्की इन्कॉर्पोरेट करेन Happy

(ते कम्युनिस्ट अन कॅपिटलिस्ट मधुचंद्र हे श्री श्री श्री १२००१ जॉर्ज बाबा ऑर्वेल ह्यांच्या मुळे!! ) Wink

कविन अन हर्पेन तुमचे आभार! !!!

हर्पेन अन दाद, अहो मी जन्माने वैदर्भीय आहे हो!!!, आगाऊ पणाला कोकणी रोठ्यां सोबतच वैदर्भीय तर्री चाच नंबर लागतो!!! अन आगाऊपणावरच ही ७० किलो ची मुर्ती पोसलेली आहे :ड

दोन्ही भाग वाचुन काढलेत मस्त जमलिये कथा. तुम्हि आवर्जुन फीडबॅक मागितलात म्हणुन, कथेच्या शेवटी जे राष्ट्रपतींना डीबीफ्रींग दिलय तिघांनी मिळुन त्याऐवजी खुलासा जरा वेगळ्या पध्धतीने आला असता म्हणजे इतका स्ट्रेटफॉर्वर्ड नाहि पण इम्प्लाइड स्वरुपात तर चारचांद लागले असते अस मला वाटल. पण कथा एकदम छान झालिये. खुप आवडलि.

Pages