अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अँड्रॉईडवर अ‍ॅप्लिकेशन्स + फाईल्स (फोटो, म्युझीक ई.) + फोल्डर हाईड करण्यासाठी व PASSWORD PROTECTION करण्यासाठी एखादे फोनला रूट न करता वापरता येईल असे अ‍ॅप आहे का?

इब्लिस, धन्यवाद! Happy

जर सिग्नल विक असला किंवा सतत गायब होत असला तर मोबाईल कनेक्टीव्हिटीसाठी नेटवर्क स्कॅन करत राहतो त्यामुळे बॅटरी लवकर डीसी होत असेल. >> हेच म्हणतो!!

वॉअ‍ॅ >> हे पण नाही कळलं. जर स्ट्रीमींग करणारी कुठली अ‍ॅप्स किंवा सतत इमेल्/वेदर्/स्टॉक्स/जिपीएस इत्यादी चेक्स चालू असतील तरीही बॅटरी बघता बघता संपेल. ते बदलुन बघा.

सफरचंद ते सफरचंद तुलना करावी लागेल Happy भारतात ज्या मोडमध्ये चालवलात त्या मोडातच तिकडे चालवून बघावा लागेल.

धन्यवाद मंडळी...

@इब्लिस...बरोबर 'इथे' म्हणजे गल्फात.. मस्कत मधे..टू बी वेरी स्पेसिफिक..

रच्याकने.. वॉअ‍ॅ >> हे पण नाही कळलं>> वॉट्स अ‍ॅप Happy

व्हॉट्स अ‍ॅप ईन्स्टॉल केल्यावर "फोनची तारीख चुकीची आहे" असा मेसेज येतोय. पण तारीख्/वेळ्/वार सगळे बिनचुक आहे. मग काय गडबड होत असेल?

मी फोनचा रिंगर ठराविक वेळासाठी व्हायब्रेटवरती ठेवून मग पूर्ववत करायचे अ‍ॅप शोधत होतो. तेव्हा shush! सापडले. चांगले आहे. रिंगर व्हायब्रेटवरती आणला की हे अ‍ॅप काम सुरू करते.

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

आता बॅटरी लाईफ वाढवायला काय करता येईल असे अ‍ॅप हुडकतो आहे. खूप अ‍ॅप्स आहेत, त्यामुळे अजूनही शोधतो आहे.

माझ्या माहितीप्रमाणे,
अ‍ॅडब्लॉक+ हे नोट 2 चे अ‍ॅप्लिकेशन नसून ब्राउजर एक्स्टेन्शन आहे. फायरफॉक्स ब्राऊजर इन्स्टॉल्ड असेल, तर त्यात अ‍ॅड-ऑन्स इन्स्टॉल करायची सोय आहे.

ऑपेरा, क्रोम वा डिफॉल्ट अँड्रॉईड इ. ब्राऊजरला अ‍ॅडब्लॉक ची सोय आहे की नाही याची मला कल्पना नाही.

कोणी मला मराठी स्तोत्रे, पुस्तके वगैरे साठी एखादे अ‍ॅप्लिकेशन सुचवु शकेल का?

मी Marathi Books मराठी ग्रंथालय डाउनलोड केले पण त्यात मनाचे श्लोक, गिताई दिसत नाही. डिलीट करुन परत डाउनलोड करुन पाहिले पण तरी काही उपयोग नाही झाला

मनाचे श्लोक आहेत त्यात

गिताई पण आहे

सर्च मधे मनाचे श्लोक लिहा मिळेल तुम्हाला

मोबाईल वरुन शोधायला अडचण असेल तर गुगल क्रोम हे ब्राउझर वापरा त्या असणारे "प्ले" मधे गेल्यावर तुम्ही साईट वरुन तुमच्या मोबाईल मधे अप्लिकेशन पाठवु शकतात

मला ज्या मधे हे सगळं वाचता येईल असे एकच अ‍ॅप हवे होते. असे आहे का कोणते? नाहीतर शेवटचा पर्याय म्हणून वेगवेगळेच करावे लागतील......

नीधप..

अ‍ॅड ऑटोमॅटीक चालु होत आहेत का ? गेम्स खेळताना ब्राउझर चालु करताना...... ? असे असेल तर तुम्ही कोणत्यातरी अप्लिकेशन ला अ‍ॅड करताना..मेलवेअर ला प्रवेश दिला आहे.. कोणतेही अ‍ॅप्लिकेशन्स डाउनलोड करताना काळजीपुर्वक ऑप्शन्स बघा..

काही दिवसांपासुन हा प्रोब्लेम चालु झाला आहे.. गेम्स वगैरे डाउनलोड करताना .. अ‍ॅड्स चालु होतात.

अ‍ॅड्लॉक मार्केट मधे आहे.. प्लेस्टोअर मधे बघा सर्च करुन

fm radio india

नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा.

मला android वर road navigation for driving यासाठी एखादे चांगले apps हवे आहे.

मी जेजुरी, कोल्हापुर, पंढरपूर, तुळजापूर आणि रेणुकामाता माहुर असा देवस्थान darshan plan करत आहे, त्यासाठी वाहन चालवताना उपयोगी पडेल असे एखादे app सुचवावे.

धन्यवाद...

सोनीच्या मोबाईल मधे चांगले नॅविगेटर आहे........

व्यवस्थीत दाखवते...........तुम्ही गुगल मॅप चे नॅविगेटर वापरुन बघाअ

नित्या,
फोन कोणता आहे तुमचा?
त्यात डीफॉल्ट गूगल मॅप्स असेलच.
पूर्वी त्यात नॅव्हिगेशनचे वेगळे सब अ‍ॅप होते. आजकाल एकत्र आहे. अतीशय सुंदर अ‍ॅप आहे ते. अगदी आता समोर ३०० मीटरवर फ्लायओव्हर येईल, लेन बदलून अमुक लेन ला जा, इतपत नीट सूचना देते. कोणत्याही थर्ड पार्टी नॅव्हिगेशन अ‍ॅप पेक्षा शंभरपट चांगले असा माझा अनुभव आहे.

नॅव्हिगेटर्ला जीपीएस चालू करावे लागते ते ताबडतोब ब्याटरी खायला सुरुवात करते आणि फोन तापतो हे आणखी वेगळे. अगदी इमर्जन्सीत म्हनजे नव्या गावात वगैरे ठीक आहे. मी दिल्लीला टॅक्सी चालकाला नॅव्हिगेट्रच्या साह्याने रस्ता दाखवला . तो तर वेडाच झाला...

हूडा,
ब्याटरी खाणे चालते. कारमधे चार्जर बसवता येतो.
एसी गाडी असलेली बरी. अन्यथा ऐन वेळी 'युअर फोन हॅज रिच्ड क्रिटिकल टेम्परेचर' असे म्हणून फोन बंद पडतो.
गरज नस्ताना स्क्रीन ऑफ करून ठेवणे चांगले.
चालत्या गाडीत जीपीएस फिक्स लवकर मिळत नाही.
लोक एसी बंद करून पेट्रोल वाचवायचा प्रयत्न करतात, तिथे प्रॉब्लेम्स येतात.
खरे तर एअर ड्रॅगमुळे जास्त इंधन खर्च होते..
<< विस्कळित प्रतिसाद. माझाच.

Kindly please suggest app which having Time planning and tracking option in itself.

म्हणजे नक्की काय हवंय तुम्हाला? ट्रॅकिंग कसलं? टाईम प्लॅनिंगसाठी कॅलेंडर सारखी PIM अ‍ॅप्स असतातच फोनमधे.
रच्याकने: आजकालच्या फोनमधे वरून अ‍ॅड करायलाच हवं अशी अ‍ॅप्स फार कमी असतात. डिफॉल्ट अ‍ॅप्स तुमच्या ९९.९९% गरजा पूर्ण करतात. अगदी व्हॉट्सॅप देखिल प्रीइन्स्टॉल्ड येते आजकाल.
अपवाद काही दीडशहाण्या फोन्स चा, ज्यात फाईल ब्राऊजर दिलेला नसतो इ.

Pages