अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समस आल्यावर त्यांचे नंबर लिहुन ठेवायचे मग..... त्या अ‍ॅप्लिकेशन मधे टाकायचे..........

बाजो... शेवटी तो कंम्पुटर आहे....जो पर्यंत आपण सांगणार नाही तो पर्यंत त्याला तरी कसे कळणार...अजुन आपण २१ व्या शतकातच आहोत.. तुम्ही २२ - २३ व्या शतकातिल गोष्ट करत आहात Happy

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Daily expenses : म्हणुन एक अप्प्लिकेशन आहे.......आपला रोज चा खर्च त्यात कॅटेगरी नुसार लिहायचा......हिशोब करायला एकदम सोप्पा आहे............

कालनिर्णयचे मराठी कॅलेन्डर अ‍ॅन्ड्रोइड मार्केतमध्ये उपलब्ध आहे. त्यात आलार्म आणि नोट्सची व्यवस्था आहे. दिनविशेश सगळे आहेत. मात्र विकत आहे. रु.१०५ . ५०% डिस्काऊन्ट साईट आणि मार्केटमध्ये म्हटलेय पण मिळाला नाही. तरीही १०५ मध्ये वाईट नाही मोबाइलमध्ये सदैव कालनिर्ण्य.

म्हणा... 'मोबाईलात कालनिर्णय असावे..."

samsung galaxy y मधे auto power on option आहे का? खूप शो धले पण मिळाला नाही.

True Caller म्हणून अ‍ॅप्स हल्लीच घातलय. बहुतेक निनावी नंबर ट्रेस होतात... नावासकट
Night Mode स्क्रीनचा प्रकाश बराच कमी करता येतो.

Rainbow contacts

जुन्या (कोणत्याही मेकच्या) मोबाईल फोनवरून नव्या मोबाईल फोनमध्ये फोन काँटॅक्ट्स ट्रान्स्फर करण्यासाठी अत्युत्तम!

>> कालनिर्णयचे मराठी कॅलेन्डर अ‍ॅन्ड्रोइड मार्केतमध्ये उपलब्ध आहे. त्यात आलार्म आणि नोट्सची व्यवस्था आहे. दिनविशेश सगळे आहेत. मात्र विकत आहे. रु.१०५ . ५०% डिस्काऊन्ट साईट आणि मार्केटमध्ये म्हटलेय पण मिळाला नाही. तरीही १०५ मध्ये वाईट नाही

बा.जो., कालनिर्णय मार्केट मध्ये आता चकटफू उपलब्ध आहे. ही लिंक बघा -
कालनिर्णय

तारे, ग्रह बघण्यासाठी - Google Sky Map

अस काही App आहे का -

मला telephone bridge no आणि bridge code/ leader code सेव्ह करुन schedule करायचं आहे.. म्हणजे सकाळी फोन रिंग देऊन automatically dial करेल...

.......

१. समस साठी : mysms आधी फोनवर इन्स्टॉल करून घ्यायचे, मग संगणकावर app.mysms.com या साईटवर जाऊन फोन नंबर एकदाच रजिस्टर करायचा. नंतर केव्हाही समस पाठवणे, वाचणे, उडविणे (डिलिट), इ. साठी फोन वापरायची गरज नाही, वेबसाईट आणि फोन मधे मेसेजेस सिन्क होतात.

२. जुन्या हिंदी चित्रपट गीतांसाठी : बॉलिवूड एव्हरग्रीन, कोणतेही निवेदन नाही, जाहिराती नाहीत, केवळ जुनी चांगली गीते !

३. डासांना पळवून लावण्यासाठी : अ‍ॅन्टी मॉस्किटो

४. जपानी भाषेचा (लिपीचा) अभ्यास करण्यासाठी : ओबेन्क्यो

५. भारतीय रेल्वे साठी : IRCTC

धन्यवाद...........समस साठी हवे होते ....... मोबाईल विकतोय ..त्या आधी ऑफिस समस चे काय करावे कळत नव्हते..... हे वापरुन बघतो

.

सॅमसंग टॅब वर डिफॉल्ट ब्राऊजर जो आहे, तो अतीशय उत्तम आहे. त्यात अगदी फ्लॅश फाईल्सही चालतात.
फायरफॉक्स हव्या त्या पेजची पीडीएफ बनवून देते. म्हणून ठेवले आहे. माबोच्या धाग्यांचे ब्याकप्स व्यवस्थीत रहातात मग.

>> माबोच्या धाग्यांचे ब्याकप्स व्यवस्थीत रहातात मग. Lol
अर्थात माझ्याकडे टॅब नसल्याने default browser वापरता येणार नाही. Sad
सद्ध्या गुगलचा वापरत आहे. ऑपेरा पहावा का वापरून ? Uhoh

महेशजी, टॅब नसला तरी प्रत्येक फोनमधे डीफॉल्ट अँड्रॉईड ब्राउजर आहे ना? माझा लै जुना ग्यालेक्षी ३ आहे एक. त्यातही आहेच.

इब्लिस, मला वाटले टॅब मधला डिफॉल्ट आणि इतर फोनमधला डिफॉल्ट ब्राउजर वेगळा असतो.
गॅलॅक्सी ३ लै जुना कसा असेल, काही काळापुर्वीच तर आला आहे. Uhoh

महेशजी,
लै जुना म्हणजे GT-i5801 अशा मॉडेलचा गॅलेक्सी ३ आहे.. सुमारे ३-४ वर्षांपूर्वी घेतलेला. अत्ता आलाय तो S3 आहे. अगदी नवीन नवीण अँड्रॉईड असतानाचा आहे तो. त्या आधी डायरेक्ट चायना वापरत असे मी. ईबुक्स साठी. नवा घेताना हा स्वस्त अन अ‍ॅप डाऊनलोड करता येते असे म्हणून सौ.नी मला गिफ्टला होता. खूप आवडता फोन आहे तो माझा.

टॅबमधला डीफॉल्ट चांगला/बेटर आहे कारण अँड्रॉइड चे आइस्क्रीम सँडविच अन अपग्रेड टू जेलीबीन असे व्हर्जन्स त्यात असतात. ऑसनुसार परफॉर्मन्स बदलतो असे वाटते.

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

हैयो हैय्यय्यो!
ह्येच तर दुपारी डोस्क्यात आल्तं की लोक लाल कुंकू आन बाकी ब्ल्याक व्हाईट कसं करतात.
धन्स बर्का भो

इथे अ‍ॅन्र्डॉईड्ची कौतुकं वाचुन मी पण अ‍ॅ. फोन घेतला काही दिवसांपुर्वी. सुरुवातीला प्ले स्टोर मधुन पटापट अ‍ॅप्स डाऊन्लोड होत होते पण मग नंतर फक्त डाऊन्लोडींगच्यावेळीच एरर यायला लागलेत. बाकी सर्फीग होतंय फक्त डाऊन्लोड होत नाहीय. वोडाफोन केअरला विचारले तर सांगतात की सॅमसंगच्या किंवा गुगलच्य साईटचा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडुन नाही. जिथुन हॅन्डसेट घेतला तिथे दाखवला तर सांगतात की वोडाफोनचा प्रॉब्लेम आहे, एअरटेलच कार्ड टाकलात तर प्रॉ. होणार नाही. त्याच हॅन्डसेटमध्ये '१ मोबाईल मार्केट' मधुन अ‍ॅप्स डाऊन्लोड होतायत. असं होऊ शकतं का? फक्त 'प्ले स्टोअर' आणि 'सॅमसंग अ‍ॅप्स' मधुन आणी तेही फक्त डाऊन्लोडींग्साठीच प्रॉब्लेम होतोय बाकी सर्फींग होतंय व्यवस्थित. इथे सॅमसंग-वोडाफोन युजर ना कोणाला असा प्रॉब्लेम येतोय का? काय करु आता?

तुमच्या फोन ची मेमरी एक तर संपली असेल अथवा तुम्ही जे अप्लिकेशन डाउनलोड करत आहात ते आपल्या मोबाईल ला सुटेबल नाही आहे

APP 2 SD नावाचा एक अप्लिकेशन डाउनलोड करुन घ्या....तो आपल्या फोन मेमरीमधले अप्लिकेशन आपल्या मेमरीकार्ड मधे स्टोर करतो या मुळे आपली फोन मेमरी मोकळी राहते

तसेच.......google.com वर जाउन तिथे वर play म्हणुन लिन्क असेल...तिथे जाउन आपला फोन मधला रजिस्टर केलेला इमेल आयडी ने लोग इन करा...... आता तुम्हाला तिथुन अप्लिकेशन घेताना बाजुला दाखवले जाते की आपला फोन त्या अप्लिकेशन ला सुटेबल आहे की नाही ते बघा...आणि तिथुनच डाउन्लोड करा

Pages