तुम्हालाही आलाय का असा अनुभव?

Submitted by मुग्धटली on 7 December, 2013 - 02:34

गेल्या आठवड्यातील गोष्ट. घराच्या अगदी जवळ, ऑफिसच्या जाण्या-येण्याच्या रोजच्या वाटेवर आईबाबांच घर असुनही बरेच दिवस झाले त्यांना भेटले नव्हते. एका संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर गाडी घेउन मुख्य रस्त्याला लागल्यावर आतुन आवाज आला इथेच आई-बाबा आहेत जवळच कुठेतरी आणि नजर शोध घेउ लागली.

दोनच मिनिटाच्या अंतरावर एक पेट्रोल पंप आहे तिथे आई-बाबा दिसले. परमानंद म्हणजे काय ते अनुभवायला तेवढा क्षण पुरेसा होता.

तुम्हालाही आलाय का असा अनुभव? असेल तर इथे नक्की शेअर करा.

टिपः- यात कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतु अथवा प्रसंगवर्णनात कोणतीही अतीशयोक्ती नाही.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अनुभव आल्यानंतर कधीतरी अचानकच ' The Secret' हे Law of attraction शी संबंधित पुस्तक हाथात पडलं आणि जे काही घडत होत ते का घडताय याचे संदर्भ लागत गेले… आज या सर्व गोष्टी फार आश्चर्य कारक वाटत नाहीत त्यामागची कारणं कळतात म्हणून बहुदा …

एखाद्या मित्राची आठवण तरळली आणि तिचा/त्याचा फोन....... हे मी व माझ्या आईमधे बर्‍याचदा घडते.
माझे एक नातलग दिवंगत होण्याआधी , रेल्वेपास काढताना अगदी प्रकर्षाने जाणवत होते की हा पास काढु नये.आपल्याला नातलगाकडे जायला लागणार.(ते पुण्याजवळ रहायचे). नंतर मी भेटून येतानाही मला चैन नव्हती.परत त्यांच्याकडे जायला लागेल असं सतत वाटत होते .हे मी घरीही बोलून दाखवले होते.घरी आल्यावर मी फोनवरून चौकशी केल्यावर कळले की त्यांना हॉस्पिटलमधे हलवले. दुसर्‍या दिवशी मी परत नातलगाकडे गेले.८ दिवसांनी ते गेले.
२-३ प्रसंग तर असे आहेत की मला आधीपासून काहीतरी unpleasant होईल असे वाटत होते आणि तसे ते झाले.
कदाचित बोलाफुलाला गाठ असेलही.

अतीशय उत्तम धागा आणि महत्त्वाचाही अभिनंदन व धन्स !

मी माझ्या अश्या अनेक अनुभवांपैकी एक अनुभव शेअर करणार आहे

माझा पहिला गझल मुशायरा होता आदल्या रात्री मी मुशायर्‍यात कोणत्या रचना घेवू कसे सदरीकरण करू ह्याबाबत गुरुआज्ञा घ्यायला म्हणून बेफीजीना भेटायला गेलो आमची "बसायची" (;))जागा ठरलेली असते नेहमी प्रमाणे देर रात तक गझल्चर्चा झाली मी घरी गेलो दुसर्‍यादिवशी मुशायरा पुण्यातच होता गेलो कविमेळावा होता दिवस्भराचा कार्यक्रम ! गझल मुशायरा शेवटी होता मी अस्वस्थ !! पराकोटीची अस्वस्थता मला कहीतरी रहून जात आहे अशी भावना खात होती ........

आणि झालंही तस्सच ! ऐन् वेळी बेफीजी कुठूनशे सभागृहात दाखल झाले ..माझी गझल ऐकायलाच ते आले आहेत असे मन सांगत होते
घोषणा झाली ..मंचावर शायराना बोलावण्यात आले आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही बेफीजींच्या सोबत मी त्यादिवशी एकाच मंचावर एक शायर म्हणून उपस्थीत असणार आहे हे समज्ल्यावर ह्या विचारानेच माझा पार मेलेला आत्मविश्वास जिवंत झाला गझलमुशायर्‍याने अख्खा दिवसभराचा काव्यमेळावा खाऊन टाकला
विशेष म्हणजे आदल्या रात्री बेफीजींनी मला ताकास तूरही दिले नाही की तेही त्या मुशायर्‍यात निमंत्रित शायर आहेत उलट मला असे काही विचारत होते कुठे आहे कार्यक्रम कधी आहे की त्या कार्यक्रमाबद्दलची माहीती त्यांच्या गावीही नसावी Happy

ऐन वेळी दुसरे काही काम केन्सल झाल्याने ...मुशायरे सहसा टाळणारे बेफीजी आले होते असे मला नंतर लोक म्हणाले मला ते अजाही पटत नाही !

त्याचं काय होतं की माझी एक सूप्त इच्छा होती की आयुष्यातला पहिला मुशायरा ..आपण एखाद्या ग्रेट शायरासोबत मंच शेअर करावा ...बेफीजींइतका ग्रेट ! बेफीजीच असतील तर काय मजा येइल ? ...

विठ्ठलाने आपली एखादी इच्छा पूर्ण करणे म्हणजे काय ह्याचा अनुभव मी त्यादिवशी घेतला !!!

व्वॉव क्या बात है! मयी तुझे अनुभव तर बेस्टच... मला वाटल होत माबोकर वेड्यात काढतील मला, पण सगळेजण एकसे एक अनुभव सांगत आहेत...

मयी माझा ही अनुभव असाच आहे. एखाद्या व्यक्तिची आठवण आली किंवा बोलण्यात उल्लेख आला की मला हमखास ती व्यक्ती भेटते किम्वा फोन येतो इ. Happy

ज्यांना असे अनुभव वारंवार येतात त्यांच्या पत्रिकेत काहीतरी योग असतो असे शरद उपाध्ये यांच्या एका भाषणात ऐकल्याचे आठवते आहे. डिटेल्स आठवले तर इथेच टाकेन.

छान धागा मुग्धा. पण दुर्दैवाने मला चांगल्या गोष्टींचा अनुभव नाही.

अंजली अशा इन्ट्यूशन्स नी नेहमी चांगल्याच गोष्टी घडतात असं नाही काही. कधी कधी वाईटही घडतात Sad

निंबुडाचा असाच एक धागा असल्याचं आठवतयं, त्यावर मला आलेला अनुभव मी शेअर केला होता.

किती वेळा इच्छापूर्तीचे अनुभव येतात आणि किती वेळा 'जे वाटलं तसं होत नाही' याचं गणित मांडलं तर ५०:५० आहे असं म्हणता येईल !

अवांतरः नर्मदा परिक्रमेबाबतच्या पुस्तकांमधले अनुभव आठवले! 'अमुक खावंसं वाटलं आणि ते कसं मिळालं' याची वर्णनं करणारे अनुभव ....

अशा इन्ट्यूशन्स नी नेहमी चांगल्याच गोष्टी घडतात असं नाही काही. कधी कधी वाईटही घडतात >>>>> हो तेच ना. मला नेहमी वाईटाचेच इन्ट्यूशन मिळते Sad

माझ्या स्वप्नात आली की ती व्यक्ती गचकते >>>>>>>> वर्षा जी म्हणुन अजुन मी आपल्याबरोबर असलेल्या कोणत्याही गटग ला हजेरी लावली नाही Biggrin

माझ्या स्वप्नात आली की ती व्यक्ती गचकते <<< रोजच्या स्वप्नात एक राजकीय नेता आणायला काय घ्याल? हवं तर मी आठवण करून देत जाईन.. ईमेलवर फोटो, नांव, गाव, पत्ता पाठवेन. मनावर घ्याच Happy