'पितृऋण' प्रिमिअर - फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 6 December, 2013 - 00:53

प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी यांना साईटवर असताना अचानक त्यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी एक व्यक्ती दिसते आणि सुरू होतो एक शोध, एक प्रवास वर्तमानकाळातुन भूतकाळाचा. वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची एका मुलाची धडपड म्हणजे ’पितृऋण.

सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची कथा, सचिन खेडेकर यांची दुहेरी भूमिका, प्रदीर्घ काळानंतर तनुजा यांचे मराठी चित्रपटात पुनरागमन, 'महाभारत' या मालिकेमुळे नितीश भारद्वाज अभिनेते म्हणून सर्वांच्या परिचयाचे झाले. 'पितृऋण' हा त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा सिनेमा, कौशल इनामदार यांचे कर्णमधुर संगीत, वाई, कोकण, सातारा येथील मनमोहक लोकेशन्स आणि महेश अणे यांची सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये.

सचिन खेडेकर यांचा व्यंकटेश कुलकर्णी (दोन्ही) आणि तनुजा यांनी साकार केलेली "भागिरथी" केवळ अप्रतिम!!!

सचिन खेडेकर, तनुजा, सुहास जोशी यांच्या कसदार अभिनयाने नटलेला आणि मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेला हा चित्रपट दिनांक ६ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आवर्जुन पहावी अशी हि कलाकृती आहे.

सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आणि आयएमई मोशन पिक्चर्स निर्मित व नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' या चित्रपटचा प्रिमिअर काल मुंबई येथे पार पडला त्याच सोहळ्याचा हा फोटो वृतांत. या प्रिमिअरला मायबोलीकर वल्लरी, सामी, घारूअण्णा, विनय भिडे आणि जिप्सी यांची उपस्थिती होती.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
सचिन खेडेकर आणि तनुजा

प्रचि ०४
तनुजा

प्रचि ०५
श्रीरंग गोडबोले, सचिन खेडेकर आणि तनुजा

प्रचि ०६
नितिश भारद्वाज

प्रचि ०७
नितिश भारद्वाज, तनुजा आणि काजोल

प्रचि ०८
तनुजा आणि काजोल

प्रचि ०९

प्रचि १०
सचिन खेडेकर

प्रचि ११

प्रचि १२
काजोल

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
श्रीरंग गोडबोले

प्रचि १७
सुनिल बर्वे

प्रचि १८

प्रचि १९
नेहा शरद

प्रचि २०
सुहिता थत्ते आणि सुनिल बर्वे

प्रचि २१
सुहिता थत्ते

प्रचि २२
सुहिता थत्ते आणि ऐश्वर्या नारकर

प्रचि २३
ऐश्वर्या नारकर

प्रचि २४
पूर्वी भावे

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
गायिका हम्सिका अय्यर (चेन्नई एक्स्प्रेस फेम)

प्रचि २८

प्रचि २९
सुमित राघवन

प्रचि ३०
फुलवा खामकर

प्रचि ३१
संदिप कुलकर्णी, सुमीत राघवन, श्रीरंग गोडबोले, तुषार दळवी

प्रचि ३२
पल्लवी सुभाष

प्रचि ३३
अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष

प्रचि ३४
तुषार दळवी

प्रचि ३५
मृणाल देव कुलकर्णी

प्रचि ३६
आशुतोष गोवारीकर

प्रचि ३७
तनुजा आणि सई परांजपे

प्रचि ३८
नेहा जोशी

प्रचि ३९
संदिप कुलकर्णी

प्रचि ४०
टिम 'पितृऋण'

प्रचि ४१

प्रचि ४२
केतकी विलास

प्रचि ४३
ओंकार कुलकर्णी

प्रचि ४३

प्रचि ४४
महेश मांजरेकर

प्रचि ४५
मृणाल देशपांडे

प्रचि ४६
राजन भिसे

प्रचि ४७
सौरभ गोखले

प्रचि ४८
सिद्धार्थ चांदेकर

प्रचि ४९
विजय पाटकर आणि विजय कदम

प्रचि ५०
संगीतकार कौशल इनामदार

प्रचि ५१
अमृता सुभाष

प्रचि ५२
महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी (उजवीकडुन पहिले)

प्रचि ५३
नागेश भोसले

प्रचि ५४
केतकी विलास आणि पूर्वी भावे

प्रचि ५५
दया डोंगरे
स्टार मायबोलीकर्स Happy
सामी, सामीची आई, वल्लरी, घारूअण्णा आणि विनय भिडे
प्रचि ५६

प्रचि ५७

प्रचि ५८

प्रचि ५९

प्रचि ६०

प्रचि ६१
मायबोलीकर घारूअण्णा, जिप्सी, सामीची आई, वल्लरी आणि सामी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी! मस्त फोटो. फिस्ट २ आईज!!

तनुजा, काजोल, सुनिल बर्वे, सई परांजपे, नितिश भारद्वाज छानच. अमृता सुभाष क्युट Happy
फोटो पाहतांना जाणवतं; तनुजाचं वय जसं थांबलय वाढायचं. वेरी ग्रेसफुल.
तू आंतरराष्ट्रीय स्तरावर क्लिकक्लिकावा यासाठी मनापासून शुभेच्छा!

दिसले गं बाई दिसले...

जिप्सी यू आर जस्ट अमेझिंग.... मस्तच फोटोज आलेत सगळे...
काजोल काय क्लासी दिसतेय.... पुन्हा १दा प्रेमात पडले तिच्या Happy

मी खरंच मिस केला हा इव्हेंट Sad हे फोटोज बघितल्यामुळे खूप प्रकर्षाने जाणवतंय Sad

कित्ती मस्त दिसत्येय काजोल!! मला प्रचंड आवडते ती! Thank you जिप्सी! बाकीचे फोटोज देखील खूप सुरेख विशेषतः अमृता सुभाष चा कित्ती गोड फोटो आलाय!

मस्त फोटो रे जिप्सी.

तू आंतरराष्ट्रीय स्तरावर क्लिकक्लिकावा यासाठी मनापासून शुभेच्छा! >>> +++१

सुंदर फोटो! अचानक पकडल्या गेलेल्या क्षणांचे फोटो जास्तं आवडले.

काजोल, सई परांजपे आणि तनुजा यांचे काही फोटो निव्वळ लाज़वाब!

प्रचि क्रमांक ३२ मधली मुलगी गोड आहे.

मजा आली बघायला. थँक्यू जिप्सी!

प्र.चि. ४८ मधील सिद्धार्थ चांदेकर बरोबरची मुलगी आत्ताच्या ' एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधली आहे का?

दिसले, दिसले फोटो.

काजोल-तनुजाचा एकमेकींशी डोकं झुकवून बोलतानाचा प्रचंड आवडला. काजोलला 'नथ जऽराशी तिरकी कर' असं कुणीच कसं सांगितलं नाही? तनुजानंही नाही?

प्रचि ६०ला बेक्कार हसले Rofl बेसावध राहून घारूच्या तावडीत सापडल्याचा पुरेपूर पश्चात्ताप झालेला दिसतोय राजन भिसेच्या चेहर्‍यावर Rofl

जिप्सी, मस्त फोटो. तू प्रोफेशनल्सपेक्षा कुठेही कमी नाहीस. सरळ पुढे मुसंडी मार तुझ्या फोटोग्राफी कलेला घेऊन. आम्ही आहोतच तुझ्या मागे तुला मॉरल सपोर्टसाठी Wink . नुसतंच आपल्या बाब्याचं कौतुक आपल्यातच किती करायचं? जरा जगातही झळकू दे ना Happy
------
प्रचि ६०ला बेक्कार हसले हसून हसून गडबडा लोळण बेसावध राहून घारूच्या तावडीत सापडल्याचा पुरेपूर पश्चात्ताप झालेला दिसतोय राजन भिसेच्या चेहर्‍यावर >>>>> अगदी अगदी Biggrin मी पण जाम हसतेय तो फोटो पाहून.

घारू, काय एवढं सांगत होतास रे राजन भिसेंना? ते एवढे का बावचळलेत, लॉस्ट झालेत? Proud

प्र.चि. ४८ मधील सिद्धार्थ चांदेकर बरोबरची मुलगी आत्ताच्या ' एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधली आहे का?

>> हो चैत्राली..

मस्त फोटो. केवढे नवीन चेहरे आहेत. निम्म्यापेक्षाही जास्त ओळखता येत नाहीत किंवा माहित नाहीत. तनुजा, काजोल, सई परांजपे वगैरे आवडले.
गुड जॉब जिप्सी.

मस्त फोटो! Happy

तनुजा गोड दिसते आहे. तिचा आणि काजोलचा एकत्र फोटो (क्र. ९) आणि तिच्यासह सई परांजपेचा (३२) फार आवडले.
काजोलची नथ कैतरीच दिसते आहे.

मस्त फोटो...

काजोल फक्तच नथ घालून राहिली? गळ्ञात कानात काही घातलं असतं तर जास्त शोभलं असतं....

ऐश्वर्या नारकर वेट्लॉस प्रोगाममधून बाहेर आल्यासारखी वाटतेय Wink

जिप्सी सगळ्या फोटोजना एक मस्त फ्रेशनेस आहे. गुड जॉब Happy

मस्त फोटो...

काजोल फक्तच नथ घालून राहिली? गळ्ञात कानात काही घातलं असतं तर जास्त शोभलं असतं....

ऐश्वर्या नारकर वेट्लॉस प्रोगाममधून बाहेर आल्यासारखी वाटतेय Wink

जिप्सी सगळ्या फोटोजना एक मस्त फ्रेशनेस आहे. गुड जॉब Happy

मस्तं आलेत प्रचि! जिप्सीची दृश्य पकडायची नजर अगदी तयार आहे. क्यामेर्‍याच्या आधी जिप्सीच्या मनात फोटो उमटत असणार. यावर पैज लावणार कोणी...? Wink

प्रचि ४३ दोनदा लिहिले गेलेय. तर दुसर्‍या प्रचि ४३ मध्ये पार्श्वभूमीवर ज्येष्ठ (हिंदुत्ववादी) पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी आहेत का? प्रचि ३५ मध्ये मृणाल देव-कुलकर्णी यांनी घातलेल्या अंगरख्यावर कुठला संस्कृत ग्रंथ छापला आहे? वलयांकित गजबजाटात माझ्यासारख्या हिंदुत्ववाद्याला देखील निरीक्षणीय दृश्ये सापडली म्हणजे जिप्सी खरोखरंच महान छायाचित्रकार आहे. Biggrin

-गा.पै.

वावावावावा!! अप्रतिम काजोल!! तनुजापण सुंदर!!! काजोल गळ्यात कधीच घालत नाही, तिचा गळा छान प्लेन आहे.
३३ मधील जोडी फार गोड आहे.
३८ मधली कोण आहे? काय सुंदर हसणे आहे तिचे?
४२ मधलीचा ड्रेसचा गडद रंग आवडला.
५६ मधे खेडेकर कॅमेराकडे का नाही बघत?

सुंदर फोटो जिप्सी.

सगळे फोटो मस्त.
३८ मधली कोण आहे? काय सुंदर हसणे आहे तिचे?>>>>>> तीचे नाव बहुतेक नेहा आहे. तू तिथे मी मधली अनघा राजे. Happy

मस्त आहेत फोटो ..

तनुजा त्या (रागोवच्या) भूत (?) मध्ये जशी होती यानंतर एव्हढा मेक-ओव्हर होऊ शकेल असं वाटत नव्हतं .. मस्त दिसते आहे ती ..

काजोलही एकदम छान ..

बर्वे काकांची दाढी पांढरी व्हायला लागली की .. Happy

कृष्णकाका भारद्वाज ह्यांचं हासणं अजूनही तसंच आहे .. Happy (पण चेहेर्‍यावर थोडेफार "जॉब्ज" केलेले दिसत आहेत .. ;))

सर्वांचे हावभाव छान टिपलेत.

काजोल तर खुपच सुंदर दिसतेय. कोणीतरी तिलाही या धाग्याची लिंक द्या. जिप्सींना नक्कीच बक्षीस मिळेल तिच्याकडून.

रच्याकने, जिप्सीभाऊ जरा रोडावलेले दिसतायत. Happy

Pages