मंगळागौरीचे खेळ

Submitted by aas on 4 August, 2008 - 19:23

ईथे कोणाला पुण्यातील मंगळगौरी ग्रुप्सची माहिती आहे का?

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरूर. तुम्हाला प्रिन्ट घेता येइल.

मन्गळागौर. १०१ - अ.
नवविवाहित स्त्रिया लग्नानन्तर ५ व. श्रावणातल्या मन्गळवारी मन्गळागौरिची मनोभावे पूजा करतात. आपल्या पतिचे आयुष्य वाढण्यासाठी देवीला प्रार्थना करतात. चौरंगाला केळीचे खुंट बान्धुन त्या मखरात देवी मन्गळागौरिला बसवितात. तिची षोडशोपचारे पूजा करतात. स्वतः वेचुन आणलेली पत्रि व फुले तिला वाह्तात. १६ वातिन्च्या दिव्यानी तिची आरती करतात. रात्री खेळून मन्गळा गौर जागवितात. अखंड सौभाग्य व पतिच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना सर्व बायकांनी करायची असते. पुपो चा नैवेद्य असतो.बरोबरीच्या नवपरिणीत बायकांना बोलवायचे असते पूजेला. संध्याकाळी हळदी कुन्कु असते. तेन्व्हा फराळ द्यायचा असतो.

कहाणी.

आट्पाट नगर होते. तिथे एक वाणी होता. त्याला मुलगा नव्ह्ता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या घरी भिक्षा घेत नाही म्हणून हा चालता होई.
ही गोष्ट तिने नवर्याला सान्गितली. त्याने तिला एक युक्ती सान्गितली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोड्ला. बाईवर फार रागवला. मुल बाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बुवानी उ:शाप दिला. ते म्हणाले," आपल्या नवर्याला सान्ग. निळ्या घोड्यावर बस. निळी वस्रे नेस. रानात जा. जिथे तो अडेल तिथे खण. देविचे देउळ लागेल.

बाकीचे पुढील भागात.

अश्विनीमामी, मला वाटतं मायबोलीवर इतके दिवस झाल्यावर आता तुम्हाला मराठीतून लिखाण जमायला हवे. तुमच्या वरच्या प्रतिसादात बर्‍याच टायपो झाल्यात. त्यामुळे वाचताना रसभंग होतो आणि पुढचे वाचावेसे वाटत नाही. तेव्हा कृपया ते वरचे पोस्ट एडीट करणार का?

जरूर.

मंगौ १०१ - ब
कहाणी चा उरलेला भाग लिहिण्याआधी, ही माहिती टाकत आहे.
उद्यापन: ५ व. व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करायचे असते. त्यासाठी आपल्या मं गौ ५ व. पूर्ण झाल्या असल्या पाहिजेत. किन्वा मग घरातील इतर स्रीयान्पैकी कुणाची तरी मंगौ असायला पाहिजे. तेन्व्हा ताम्ब्यामधे सोन्याचा
नाग ठेवून त्याची पूजा असते. यावेळी उद्यापन करणार्‍या मुलीच्या आइला ते वाण व आहेर द्यायचा असतो.

मंगौ १०१ - क

रात्री चे खेळ.
ह.कु. झाल्यावर, देवीला दुधाचा नैवैद्य दाखवायचा. त्याला मग जाईच्या फुलाने विरजण लावायचे. घरातील सर्व
स्त्रीया व नवविवाहिता, मुली माजघरात/ अंगणात जमतात. आता देवीच्या आगमनाप्रित्यर्थे रात्र खेळून घालवायची आहे.
सुन्दर नवे उखाणे सोबत असु द्या. ..... हत्तीच्या डोक्यावर मोत्यान्ची जाळी इ.
खालील खेळ खेळले जातात. ( को. ब्रा. समुहात प्रामुख्याने.) माहिती सौज्ञन्य: सा. बा.(त्यांचे माहेर शनिवार पेठ पुणे)
Disclaimer: Please protect yourself from physical injuries. play at your own risk.
१) फुगडी चे प्रकार.
बस फु. - बसून. घसर फु.- घसरत घसरत. दंड फु. - एकमेकीना दंड लावुन
चार जणींची. तवा/ परात फु. पाय तव्यात/ परातीत ठेवून. हे करताना उ. घ्यायचे. पकवा घालायचा.
पावलाला पावले जोडून फु खेळतात.( only for experts, try at your own risk)
२) झिम्मा: साधा दोघींचा. खूप जणींचा. लाडू झिम्मा.( लाडू वळल्यासारखा हात करुन आवाज करायचा.)
३) सइबाईचा कोंबडा.
४) सूपारी, गाठोडे : बाइने जमीनीवर बसुन अंगाचे गा. सारखे बनवायचे व फिरायचे. इतरानी तिला सोडवायचे.
५) पिन्गा घालणे.
६) साळुंकी साळकी तुझी माझी पालखी.
७) गोफ विणू बाई गो. वि.
८) लाट्णे फिरवून खेळायचे.
९) किस बाई किस दोड्का किस.
१०) नखुल्या बाई नखुल्या
११) नाच ग घुमा कशी मी नाचू.
१२) खुर्ची का मिर्ची जाशील कैसी सासू मारीते. बरे करीते.
१३) अटूशा बाई अटूशा.
१४) सवती सवती चे भांड्ण. सर्व बायका पुर्वी आपण आमच्या घरात ४० चोर शिरले खेळायचो तश्या उभ्या राह्तात. एक जोडी मग त्या कमानीतून फिरते व म्हणते. अगं अगं सुनबाई माझ्या पाट्ल्या घेतल्यास का.
असे सर्व दागिने व सर्व नातेवाइक घेवुन. सूनबाइ नाही नाही म्हणते. नर्म चेष्टा! विनोद.
१५) शिवाय होम मिनि. सारखे खेळ आहेतच. अन्ताक्षरी सुद्धा.
मजा येणार.

मंगौ १०१ - ड
उत्तरपूजा.
त्या नैवेद्य दाखविलेल्या दुधाचे दही जमले असेल. त्याचा दही भात कालवून देवीला परत नैवेद्य दाखवायचा.
आरती करायची. व पुढील मंगळवारी कुठे भेटायचे ते पक्के करून निरोप घ्यायचा. कार्यक्रमाची सांगता.

मदत समिती.

मंगौ कहाणी पोस्ट केली तर चालेल का. का संक्षिप्त रुपात लिहु? सांगा ना.

अश्विनीमामी, पुढची कहाणी द्या ना!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

माधवी, पुण्यात रहातेस ना? संपूर्ण चातुर्मास आण त्यात सगळ्या कहाण्या विधिंसकट आहेत. शिवाय आरत्या, स्तोत्रे इ.इ. सगळच आहे. Happy
माफी हा सल्ला दिल्याबद्दल.. आवडले नसेल तर दुर्लक्ष करावे.. Happy

माफी हा सल्ला दिल्याबद्दल.. आवडले नसेल तर दुर्लक्ष करावे.. >>> न आवड्ण्यासारखे काय आहे त्यात?? Happy संपूर्ण चातुर्मास पुस्तक मला माहित आहे. पण online काही माहिती मिळाली तर बघावी असा माझा प्रयत्न आहे.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

मंगौ कहाणी भाग २
तिची प्रार्थना कर. तुला पुत्र देईल," असे सांगून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितले. वाणी रानात गेला. घोडा अडला . तिथे खणले. देविचे देउळ लागले. सुवर्णाचे देउळ. हिरेजडित खाम्ब. माणकांचे कळस. आत देवीची मुर्ती. त्याने मनोभावे पूज केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. तो म्हणाला, " घरदार आहे. गुरंढोरं आहेत. धनद्रव्य आहे पण पोटी पुत्र नाही. म्हणून मी दु:खी आहे." देवी म्हणाली. " तुला संततीचे सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तुला वर देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध मिळेल. कन्या घेतलीस तर बालविधवा होइल. इच्छा असेल ते मागून घे. "

त्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने सांगितले, " माझ्या देवळाच्या मागच्या बाजूस जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे एक आम्ब्याचे झाड आहे. तू गणपतीच्या पोटावर पाय दे. एक फळ घे." देवी अद्रुश्य झाली.
त्याने खूप आम्बे घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला एकच फळ मिळाले. ते खावुन त्याची बायको गरोदर
राहिली. त्यांना मुलगा झाला. उभयतांना खूप आनंद झाला. त्या मुलाची त्यांनी ८व्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी त्याचे लग्न करायचे ठरले. काशियात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असे त्याने उत्तर दिले. काही दिवसांनी त्याला मामाबरोबर यात्रेला पाठविले. मामा भाचे काशीला जावू लागले.

कहाणी : 3

त्यांना वाटेत एक नगर लागले. तिथे काही मुली खेळत होत्या. त्या भांडत होत्या. एक सुन्दर मुलगी होती तिला दुसरी म्हणू लागली" काय रांx द्वाड मुलगी आहे!" तेंव्हा ती मुलगी म्हणाली. " माझी आइ मन्गळागौरी चे
व्रत करते. आमच्या कुळात कोणी रांx होणार नाही. , मग मी तर तिची मुलगी आहे. " हे मामांनी ऐकले. त्यांच्या
मनात आले, " हिच्याशी आपल्या भाच्याचे लग्न करावे. म्हण़जे हा दीर्घायुषी होईल.परंतू हे कसे घडावे?
त्या दिवशी त्यांनी मुक्काम केला. त्याच दिवशी त्या मुलिचे लग्न होते. लग्नाच्या वेळेला मुलगा मांदा झाला.
मुलाच्या आइवडीलांस पंचाइत पडली. कोणी तरी प्रवासी मिळाला तर बरे होइल. त्याला पुढे करुन वेळ साजरी
करू म्हणून ते धर्मशाळा शोधू लागले. तेंव्हा मामा भाचे द्रुष्टीस पडले. गोरज मुहुर्तावर लग्न लागले.

मंगौ कहाणी :४
त्या दोघांना गौरिहरापाशी निजवले. दोघे झोपी गेली. मुलीला देवानं द्रुष्टांत दिला." अगं मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करण्यास साप येइल त्याला पिण्यासाठी दूध ठेव. कोरा करा जवळ ठेव. दूध पिवून साप कोर्‍या कर्‍यात शिरेल. अंगच्या चोळीने तोंड बान्धून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे." तिने सर्व तयारी केली. द्रुष्टान्ताप्रमाणे सर्व काही घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. तिने त्याला लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर तिला आपली अंगठी दिली. तो पहाटे उठून मार्गस्थ झाला.

मुलीने दुसर्‍या दिवशी सकाळी उठून स्नान केले. आपल्या आईला वाण दिले. आई उघडून पाहते तर तो हार निघाला. आईने आपल्या कन्येच्या गळ्यात तो हार घातला. पुढे पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला
आणले. ती म्हणाली," हा माझा वर नाही. मी याच्या बरोबर खेळणार नाही." रात्रीची लाडवाची व अंगठीची खूण काही पटेना. तिच्या आईबापांना पंचाईत पडली. आता हिचा नवरा कसा सापडावा?

नंतर त्यांनी अन्नछ्त्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय मुलीने हातात अंगठी घालुन धुवावे. आईने पाणी
घालावे. भावाने गन्ध लावावे आणि बापाने विडा द्यावा असा नित्यक्रम चालू केला. हजारो लोक येवून जेवू लागले.

मंगौ कहाणी :५

इकडे मामा भाचे कशीस गेले. पुष्कळ दान धर्म केला. तीर्थेयात्रा केल्या. ब्राम्हणांचे आशिर्वाद घेतले. एका दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण घ्यायला आले. मन्गळागौर आडवी आली. त्या दोघांचे युद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौर तिथेच अद्रुश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामाला सान्गू लागला," मला असे स्वप्न पडले. " मामा म्हणाला," ठी़क झाले. तुझ्यावरचे संकट टळले. उद्या आपण घरी जावू. " ते परत येवू लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येवून सान्गितले," अन्नछ्त्र आहे तिथे जेवायला
जा." हे म्हणाले," आम्ही परान्न घेत नाही. " दासींनी यजमानिणीस सान्गितले. त्यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्य चांगले केले. पाय धुताना मुलीने नवर्‍याला ओळखले. नवर्‍याने अंगठी ओळखली. मुलीच्या आईबापांनी विचारले, " तुजजवळ काय खूण आहे? " त्याने लाडवाचे ताट दाखविले. सर्वांना आनंद झाला.
भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेवून घरी आले. सासुने सुनेचे पाय धरले व तुझ्यामुळे माझा
मुलगा वाचला असे म्हणाली.

तिने सान्गितले," मला मंगळागौरीचे व्रत असते. तिची ही क्रुपा."

सासर-माहेरची, घरची-दारची माणसं सर्व एकत्र आली. आणि त्या व्रताचे उद्यापन केले. तिला मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला होवो. आणि आपले सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा.
ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

धन्यवाद अश्विनिमामी! छान वाटले वाचुन. Happy
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

आश्विनिमामी, मजा आली गोष्ट वाचून. पण काही वाकयांचा अर्थ लागला नाही. उदा. "लग्नाच्या वेळेला मुलगा मांदा झाला". कृपया सांगाल का?