मटकी - फरसबी भाजी

Submitted by प्राची on 31 March, 2010 - 04:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोड आलेली मटकी १ वाटी,
बारीक चिरलेली फरसबी २ वाट्या,
लाल मिरची पावडर, गोडा मसाला, धने-जिरेपूड, किसलेले आणि खमंग भाजलेले खोबरे, थोडासा गूळ ,मीठ, फोडणीचे साहित्य.

क्रमवार पाककृती: 

१. कढईत फोडणी करून (हळद फोडणीतच घालावी.) त्यात फरसबी चांगली परतून घ्यावी. मग मटकीही घालून परतावी.
२. थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे.
३. अर्धवट शिजले की त्यात इतर साहित्य घालून चांगले मिक्स करावे.
४. परत झाकण ठेवून शिजवावे.
५. फरसबी-मटकी शिजली की गॅस बंद करावा.
६. वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून वाढावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

१. गूळ नको असल्यास घालू नये.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करून बघेन. मटकी-फरसबी कॉम्बिनेशन कधी खाल्लं नाहीये. सु.खो. ऐवजी ओ.खो. च घालेन मी पण. (आज्जी फरसबीची मटकीशिवाय ओ.खो. आणि गुळ घालून अशीच भाजी करायची. ती आठवली. )

du kho n o kho donhi ghalayche yaat. pan o kho nusatech mix karun ghyayche. shijvayche nahi.

आम्हाला डबेवाल्या काकूंकडून ही भाजी माहिती झाली होती. त्या हि मि घालायच्या आणि नारळाचा चव. भांडुप सोडल्यापासून खाल्लीच नाहीये ही भाजी. आता करेन एकदा.

मी सेम अशीच करते पण सु.खो. ऐवजी ओ.खो. >>> मी पण. कधी कधी तर खोबरंच घालत नाही. तरी चांगलीच लागते.