केरळ डायरी - भाग ९

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भाग १: http://www.maayboli.com/node/22402
भाग २: http://www.maayboli.com/node/25445
भाग ३: http://www.maayboli.com/node/25476
मधले भाग अजुन लिहायचे आहेत.
भाग ७: http://www.maayboli.com/node/23569
भाग ८: http://www.maayboli.com/node/23702

तसे मला बोटीतुन नुसता डाव-डाव करायला आवडत नाही. पण इथे एकतर आवडते पक्षी-प्राणी दिसायची शक्यता, व दूसरे म्हणजे त्या भल्या मोठ्या रांगेत न लागता अरण्यनिवासमधुनच (पैसे देऊन) मिळालेले तिकीट. पण तिथे एक नाही, दोन नाही तर चांगल्या सहा बोटी होत्या प्रवासी कोंबायला. माझी बोट एकाच मजल्याची होती. आत शिरता-शिरता हे मोट्ठे लाईफ जॅकेट दिले त्यांनी - पूर्ण पेरीअर तलाव त्यात मावता. शरीरात अडकवल्यावर मान वळवता येईल तर शपथ. मुळात अशा ट्रीप्सवर दोनच प्रकारचे लोक जातात: "तो/ते पहा" म्हणाणारे, आणि "कुठे/कुठे?" असे विचारणारे. त्या लाईफ जॅकेट्समुळे मात्र या बोटींवर फक्त पुढेच पाहु शकतील असे लोक झाले. हे बोटवाल्यांना चांगलेच माहीत असावे. नंतर काहीही दिसले, की पूर्ण बोट ३६० अंशातुन फिरवल्या जायची. प्राण्यांना नाहक त्रास होऊ नये या चांगल्या विचाराने किनाऱ्याच्या खूप जवळ बोट नेत नसल्याने अनेकदा ते "काहीही" म्हणजे स्टीमगाडीतील इतर बोटींमधील आमच्याकडे उलट पहाणारे मनुष्यप्राणीच असत.

sP1010077.jpg

दोन्ही कॅमेरे व एक दुर्बीण घेऊन माझ्या खुर्चीत स्थीरावलो तोच खाली कठडा नसल्याचे लक्षात आले - म्हणजे बॅकपॅक ठेऊन देणे कठीण - ती पण सांभाळावी लागणार. आणि खुर्च्या कशातर साध्या प्लॅस्टीकच्या स्क्रु वापरून परमनंट केलेल्या.

sP1010019.jpgsP1010018.jpg

तलावातुन अनेक बोटे बाहेर यावीत तसे मृत वृक्षांची खोडे बाहेर आली होती. काहींचा पक्षांनी कल्पकतेनी घरट्यांकरता उपयोग केला होता - यात बहुसंख्य पाणकावळे होते.
स्नेकबर्ड्स, फीश इगल्स व दोन-चार प्रकारचे खंड्या पण हजेरी लाऊन गेले, पण अपेक्षेपेक्षा कमीच होते पक्षी.

sP1292018.jpgsP1010063.jpgsP1010086.jpgsP1010049.jpgsP1010114.jpg

जे प्राणी दिसत ते दूरवर असत. नॅशनल जिओग्राफीकचा एक नियम आहे - प्रत्येक फोटोत मनुष्य असायलाच हवा (जिथे ह्युमेनली शक्य असेल तिथे) - ते का ते एखादा प्राणी चित्रात असतांना फोटो घेतला की लक्षात येते. महाकाय हत्ती समोर असुनही मागचे वृक्ष पहा कसे त्यांना मुंग्यासारखे भासवतात. अमेरीकेत मूनींग नावाचा एक विचित्र प्रकार असतो - एका विशिष्ट दिवशी लोक रेलवे लाईन्सच्या बाजुला जमतात व गाडी आली की गाडीकडे पाठ करुन कमरेखालील वस्त्रे खाली करतात. हत्तींच्या एका कळपानेही जणु काही आमच्या बोटींना मूनींग केले.

sP1010027.jpgsP1010061.jpg

हरणे व डुकरे मात्र खूपच बारीक वाटली इतक्या दुरुन. किनाऱ्याजवळ जाऊ शकु अशी यांची एक वेगळी सहल असते - या वेळी ती घेणे शक्य नव्हते. औषधाला म्हणुन दोन-चार हेरॉन्स जेटी जवळ पोचता-पोचता दर्शन देऊन गेले

sP1010020.jpgsP1010080.jpgsP1010126.jpg

विषय: 

Lol
नशीब ती लाईफजॅकेटस होती. दोनवर्षांपूर्वीच्या भयानक अ‍ॅक्सिडेंटमुळे आता सुरक्षा व्यवस्था चांगलीच आवळली आहे.
मला लाईफजॅकेटसपेक्षा त्या सरकारीपणाचा राग आला. टुरिस्टफ्रेंडली कसे नसावे याचा वस्तुपाठ.
३:३० च्या बोटराईडसाठी १ वाजेपासून रांगेत उभे रहा रे, तेही पोराबाळांसकट वगैरे. वैताग होता नुसता.
आणि प्राणी पक्षी दिसले हे नशीब, कारण परत आल्यावर माझ्या दोन कलिग्सने सांगीतले की त्यांना नुसतेच डिझेलफ्युम्सचे फुकट धुम्रपान घडले होते.
हे ऐकल्यावर मी हत्तींचा कळप न दिसल्याचे अजिबात वाईट वाटुन घेतले नाही. Proud

हत्तींचा कळप भारी.

तलावातुन अनेक बोटे बाहेर यावीत तसे मृत वृक्षांची खोडे बाहेर आली होती <<< असे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. सही. पण हे कसे झाले? तलावाचे विस्तारण केले आहे का? की ती खोडं मुद्दाम तलावात रोवली आहेत?

इजाजत सिनेमात रेखा नसीर हनीमूनला जातात तो असाच झाडे तळ्यातून वर आलेला प्रदेश आहे. व तिथे धुके पण आहे. त्या तसल्या बोटीतून गेल्याबद्दल काळजी वाटली. ते खूप लोक भरतात व अपघात होऊ शकतो. हत्ती मस्त आहेत. ते घरटे पण मस्त आता एक व सात भाग वाचते.