मला देव भेटला होता..

Submitted by रमा. on 2 November, 2013 - 10:22

डोळे उघडत होते हळू-हळू..वेगळाच प्रकाश दिसत होता लांबून..खूप सुंदर अनुभव घेतला होता मी..मला देव भेटला होता.

I.C.U. बाहेरचा तो लांबच लांब कॉरीडोर..भकास..शांत..दोन-तिन बाकडी टाकलेली त्या तिथे..एका स्ट्रेचरवर मी झोपलेली वाट बघत..समोर स्पेशल रूम नं. १ दिसतेय. इतका अविस्मरणिय अनुभव घेऊन मी कधी एकदा आईला भेटेन असं झालेलं मला आणि मला इथेच का ठेवलय? इतकं काय खास झालं होतं?? मला देव भेटला होता.
I.C.U. मधून काढून रूम मध्ये न्यायला इतका का वेळ? माझी चिडचिड व्हायला लागलेली..स्ट्रेचरवर पडल्या-पडल्या मी इकडे-तिकडे बघतेय..शेजारच्या त्या बाकावर एक बाई बसलेली..

कमालीचा ओळखीचा वाटतो नाही का चेहरा हिचा? अगदी शांत, सौम्य वगैरे..वात्सल्याला मूर्त रूप दिलं तर अगदी अशीच दिसेल. मी उगीचच बघतेय का हिच्याकडे केव्हाची? का ही टक लाऊन बसलीआहे माझ्याकडे? बोलावं का काही? हिचं कोणी अ‍ॅडमिट असेल का इथे? नक्कीच बरं झालेलं असेल. इतकी शांत, समाधानी दिसती आहे..की डॉक्टर असेल? पण कपडे तर डॉक्टरचे वाटत नाहीत..

अचानक तिच बोलायला लागते, "बरं वाटंतय का आता?"
किती शांत आणि आपुलकीचा आवाज आहे हिचा..

मी - "अं..हो, बरं वाटतय आता..खूप शांत पण वाटतय.. तूम्ही माझ्या घरच्यांना पाहीला का हो कुठे आसपास? मला आता इथून रूम मध्ये हलवणार आहेत म्हणे"..

ती - "पडून रहा शांत, येतील थोड्या वेळात. "
माझा नुकताच घेतलेला अनुभव सांगावा का हिला? हसेलच मला ही..पण हसेना का?
मी- "अहो, किती वाजलेत? रात्र आहे ना आता?"
ती इतकी गोड हसली,
ती -"नाही गं, दुपार आहे. येतील तुझ्या घरचे..बोलायचय का तुला? बोल माझ्याशी तोपर्यंत.."
मी - "तुमचं कुणी अ‍ॅडमिट आहे का इथं?"
ती - "हो, मैत्रीण आहे माझी"..

प्रस्तावना नं करता पटकन सांगून टाकावं हिला..
मी - "अहो, मला ना, मला देव भेटला होता हो आत्ता.."
ती खळखळून हसली..

मी अतिशय उत्साहाने - "कसं सांगू तुम्हाला, निव्वळ अवर्णनिय..असा निळसर, शांत, केशरी प्रकाश..आणि असा एक आश्वासक हात मला धीर द्यायला..खरं सांगतेय मी..मला बरं नव्हतं ना..मी, मी मरून जाईन असं वाटत होतं. पण मग त्या वरांड्याचा कोपरा दिसतोय ना तो अंधारा,तिथेच होता देव..माझ्याशी बोलला..'तुझी वेळ नाही आली अजून, आत्ता एवढीच भेट पुरे' असं म्हणाला.."

मी इतकी उत्साहाने सांगतेय, आणि हिच्या चेहर्‍यावरची माशी हलेना.
ती- "देव भेटला होता?? बरं..छानच की मग..कसा होता दिसायला? बाई होता, की पुरुष होता?"

खरच की, मला आतापर्यंत हा प्रश्नच पडला नव्हता, खरच कसा होता दिसायला??
मी- "नाही हो, असा चेहरा नव्हता..आणि बाई की पुरुष काही आठवत नाहीये, पण मला खरच त्या तिथल्या कोपर्‍यात दिसला त्या प्रकाशात देव. "

ती नुसतीच बघत माझ्याकडे..माझी आता चिडचिड व्हायला लागली, मी इतका उत्कट प्रसंग शेअर करतेय आणि ही आपली खिल्ली उडवतेय की काय? जाऊ देत. मला काय करायचय?घरचे का येत नाही आहेत अजून? किती वेळ झालाय..माझा धीर सुटत चाललेला आता..
"डॉक्टर, नर्स.." मी ओरडतेय पण कोणी ढिम्म थांबायला तयार नाही. कोण, कुठली ही बाई, आणि एखाद्या जुन्या मैत्रीणीसारखी गप्पा मारतेय.

ती- "कोल्हापूरची ना तू?"
मला परत उत्साह - "हो, तुम्ही कसं ओळखलं?"
ती- "तू गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतला होतास ना? पाहिलय मी तुला.."
मी-"अहो, पण ते शाळेत..खूप, खूप वर्ष झाली त्याला..
ती - "तो श्लोक आठवतोय का?
"नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः"
आठवतोय का अर्थ??"
मी, ब्लँक- "हो म्हणजे,थोडा, थोडा..त्याचं एकंदर सार म्हणजे, आत्म्याचा नाश कधीही होत नाही, तो अविनाशी आहे..असं काहीसं आहे ना? कोणतेही शस्त्र त्याचे तुकडे करू शकत नाही की, कोणतेही..."
माझे शब्द विरत जात आहेत, आणि माझा स्ट्रेचर हालायला लागतो, आणि हे काय मी इथेच आहे अजून हिच्याशी बोलत,
"अहो, मला घेऊन जा ना, मी इथे आहे"
शेवटी मीच पळत जाऊन बेड मध्ये शिरते..खूप सारा निळा प्रकाश सगळीकडे..डोळे दिपून जातात परत..डोळे उघडले तर आई-बाबा समोर , "आत्ता उठलीस, बरं वाटतय का बब्या, आम्ही इथेच आहोत तुझ्यासोबत"

मी बाहेर बघतेय, ती कुठे गेली? बाहेर त्या लांब कॉरीडोर मध्ये कुणीच नाही. अचानक त्या कोपर्‍यात ती म्हणत जाताना दिसते, "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः"..
परत वात्यल्यरूपी चेहरा आणि तोच शांत आवाज
."तुझी वेळ नाही आली अजून, आत्ता एवढीच भेट पुरे"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चैतन्य, वास्तवात असाच काहीसा तुटक अनुभव आलेला, म्हणून असेल असा अपुरेपणा कदाचित.. पण अजून साजेशा शब्दात व्यक्त होण्याचा प्रयत्न करत राहीन.

रमा, छान लिहिलं आहेस. जितकं अनुभवलं आहेस तितकंच लिहिल्यामुळे लिहिण्यातला प्रांजळपणा जाणवतोय.

निळा प्रकाश..... ह्म्म :-). अशीच शक्य तितकी मनाने शुद्ध रहा. अजून अजून वेगवेगळ्या टप्प्यांवर तो भेटत राहील तुला. स्त्री की पुरुष हा विचार करु नकोस. तसा विकल्प मनात आला तर त्याचं 'अर्धनारीनटेश्वर' रुप आठव Happy

Shlok chukicha aahe ithe. Tumhi kuthla mhantay to mahit nahi pan 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः" ha shlok dole kiti prabhavi asatat te sangto. You can distroy a weapon with eyes and you can burn even water with eyes thats the meaning of above two lines. Because of the wrong reference, could not read the rest.

Vidya.

वेगळंच..
माझा स्वताचा विश्वास नाही यावर.. तुला येईल अनुभव तेव्हा विश्वास बसेल असे म्हणालात तरी हसेलच.. पण आपण लिहिलंय प्रामाणिक.. लिखाणसुद्धा छान..

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२३।।

इस आत्माको शस्त्र काट नहीं सकते, आग जला नहीं सकती, जल गला नहीं सकता और वायु सूखा नहीं सकता । २३

http://susanskrit.org/gita-chapter-two/101-2010-05-24-10-00-35.html

विद्या,
नैनं म्हणजे, न एनम..येथे, डोळ्याचा काहीही संबंध नाही..येथे 'तुमचा अभिषेक यांनी दिलेला अर्थ बरोबर आहे.

Shlok chukicha aahe ithe. Tumhi kuthla mhantay to mahit nahi pan 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः" ha shlok dole kiti prabhavi asatat te sangto. You can distroy a weapon with eyes and you can burn even water with eyes thats the meaning of above two lines. Because of the wrong reference, could not read the rest.

Vidya.
>>.
मला पण अभिषेक ने लिहिलेला अर्थ माहित होता .
जाणकरांनी प्रकाश टाकावा .

अन चुकला असला तरी , भावनाओ को समझो Happy
Shlok chukicha aahe ithe.Because of the wrong reference, could not read the rest. >> काय गरज आहे ? चुकून त्यानी (आम्ही) घेतलेला अर्थ बरोबर निघाला तर ? Happy

Shlok chukicha aahe ithe. Tumhi kuthla mhantay to mahit nahi pan 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः" ha shlok dole kiti prabhavi asatat te sangto. You can distroy a weapon with eyes and you can burn even water with eyes thats the meaning of above two lines. Because of the wrong reference, could not read the rest.>>>
Uhoh

छान अनुभवकथन..!

प्रशासक,
'आई ने अकबरी' नंतर माबो च्या इतीहासात 'नैनं' चा समावेश केला गेला जावा अशी विनंती.

हे मिस केलं होतं. Happy

गीतेमधला तो श्लोक वाचला की इतके दिवस श्रद्धाचा इमान धरमचा रीव्ह्यू आठवायचा. अता सलमान खान आठवेल. "तेरे मस्त मस्त दो नैन" Lol

रमाजी,
नमस्कार,
लेखन सुरेख आहे. एक डॉक्टर म्हणून हा अनुभव मी रोजच घेतो.
काही वर्षांपूर्वी माझी अञ्जिओप्लास्टी झाली तेंव्हा हा अनुभव मी घेतलाय, आज तुमच्या लेखात त्याला शब्द सापडले, इतकेच !
अभिनंदन !

विद्या भुतकर | 13 November, 2013 - 09:44

Shlok chukicha aahe ithe. Tumhi kuthla mhantay to mahit nahi pan 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः" ha shlok dole kiti prabhavi asatat te sangto. You can distroy a weapon with eyes and you can burn even water with eyes thats the meaning of above two lines. Because of the wrong reference, could not read the rest.

Vidya.

<<

प्रकटोनी.... _/\_

अरे हे राह्यलं होतं वाचायचं.
रमा तुम्ही छान लिहिलंय.

विद्या भुतकर.. शक्तिशाली डोळे... Rofl

Pages