नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना.....

तुम्हाला अपडेट आवडतात हे माहीत झाल्यामुळे मीदेखील लिहिताना थकत नाही....अमुक एक भाग जरी पसंत पडला नाही तरी..... [ काल परत पौर्णिमा दाखविलीच....त्यावेळी तुम्हा सर्वांची आठवण झाली].

इंदूबाई.....हे पात्र नेमके कशासाठी गोखल्यांच्या कुटुंबात आहे यावर आता विचार व्हायला हवा. कोणतीही ठाशीव भूमिका नाही या पात्राकडे. केवळ नर्मदावन्स....बेबीआत्या जे काही बोलतात त्याचीच पुनरावृत्ती करत राहणे आणि जान्हवीला पाहिले की चेहरा जणू आता कोणतेतरी संकट येणारच गोखल्यांवर असेच करायचा. हे फार विचित्र वाटते. बरे, या स्वभावातहे सातत्य नाहीच. परवा हीच इंदूसासू जान्हवीसोबत 'गझनी' चित्रपटातील गाण्याबाबत हसतखेळत दंगा घालीत बसल्याचे दाखविले होते, शिवाय जान्हवीला 'ये ते म्हण ना गाणे....' असे गोडीगुलाबीने सांगते होती...म्हटल्यावर टाळ्याही वाजवल्या....आणि काल परत तोच नन्नाचा पाढा.... "जान्हवी ही ब्याद आहे....बाहेर गेली पाहिजे...". ज्या मुलावर ही स्त्री आपल्या अपत्यागत प्रेम करीत आहे त्याच मुलाने स्वतःहून पत्नी म्हणून आणलेल्या मुलीची अशी अवहेलना केलेली दाखविणे कथालेखिकेला किती योग्य वाटत असावे यावर विचार करावा की नको असे वाटत आहे.

[चर्चा करून तरी काय पदरी शून्यच पडणार !]

काल परत पौर्णिमा दाखविलीच....त्यावेळी तुम्हा सर्वांची आठवण झाली>>>> मला पण

हे दोघे मरायच्या का गोष्टी करताहेत्,आताशी कुठे ससार सुरु झालाय्,
नाहीतर कोणाचा तरी Accident,खुन की बोतल,मग सेवाभाव, मन जिन्कणे वैगेरे फिल्मी दाखवणार असतील, Lol
हे दोघेही कधी कधी येड्यासारखे सात जन्म,तु माझ्या आत्म्यात वैगेरे वैगेरे म्हणत असतात.भयकर फील्मी श्टाईल!( अनुस्वार देता येत नाहीये मला :अओ:)
जान्हवी चे म.सु मस्तच.तीला ड्रेस मधे पाहुन मलाच हुश्श झाल

[चर्चा करून तरी काय पदरी शून्यच पडणार !]>>>> म दे किन्वा त्याची team हा धागा वाचत असतील का?
आणी वाचुनही सुधारणा करतील अशी अपेक्शा नको करुयात,शेवटी सगळी TRP ची गणित आहेत Sad

ह्या घरातल्या बायका खासकरून ती आत्या आणि ती इंदूबाई जरा अतीच करतात. गोखले घराण्याला म्हणे शाप आहे लग्न न टिकण्याचा. तर झालेले लग्न कसे टिकवता येईल ते पहायचे / प्रयत्न करायचा की हे कधी एकदा मोडेल आणि घर पहिल्यासरखे होईल ह्याची वाट पहायची Uhoh

काल परत पौर्णिमा दाखविलीच....त्यावेळी तुम्हा सर्वांची आठवण झाली>>>> मला पण>>>> मला पण............

इंदूबाई.....हे पात्र नेमके कशासाठी गोखल्यांच्या कुटुंबात आहे यावर आता विचार व्हायला हवा. कोणतीही ठाशीव भूमिका नाही या पात्राकडे. केवळ नर्मदावन्स..>>>>+१०००००

रानभूल...

अनुस्वार देताना खालील की वापरा :

उदा. " तंत्रमंत्र" हा शब्द तुम्हाला टाईप करायचा आहे, तर प्रथम साधा t घ्या आणि लगेच तिथे Shift दाबून धरून m बटन दाबा..... तं असे अक्षर येईल...पुढे टीआर बटन घेतले की त्र शब्द येईल.....मंत्र शब्दासाठी हीच क्रिया.

रानभुल....अगं धन्यवाद ठीक आहे, ते मी स्वीकारले.... पण अनुस्वार आला की नाही, ते तरी सांग.

जान्हवी चा तो निळा ड्रेस किती बटबटीत आहे. आणि गळ्यात ती दोन दोन मंगळसूत्र, आणि त्या ड्रेसची ती सोनेरी किनार, फारच ------ वाटते हे सगळे कॉम्बिनेशन.

तंत्रमंत्र,पंकज,वेदांत.... Wink
हे हे हे,जमेश बरं का मामा,Thank you, thank you Happy

या निमित्ताने मला एक आवर्जुन सांगावेसे वाटेल कि मराठी लिहीण्याचा संबंध जणु काही सपंला होता.१० वी नतंर फारशी वेळच आली नाही कधी.केवळ याद्या करायला मराठी लिहीलं जायचे त्यातही निम्याहुन अधिक English शब्द असायचे.
पण आता मस्त वाट्तयं. Happy

<,मग ही नवराबायको भावुक होऊन काहीतरी फिल्मी संवाद....'मी गेल्यावर तू राहशील ?....तू गेल्यावर मी राहाणार नाही...यम न्यायला आल्यावर मी सांगणार माझी सावित्री आहे ती मला न्यायला येईन...." असले चावूनचावून चोथा झालेले प्रेमाचे संवाद....रडतरडत हसतहसत म्हणत बसतात.>> Lol

रानभुल...

बघं...किती सोप्पं होते ते...! गुरू चांगला असला की सारे जमते....आता गुरुदक्षिणा किंवा मामादक्षिणा देण्याची तयारी ठेव. मी ३० नोव्हेम्बर व १ डिसेम्बरला पुण्यात आहेच....त्यावेळी बॅग भरून घेऊन जाईन.

शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ आज बर्‍याच दिवसांनी शशिकलाबाईंचा आरडाओरडा पाहायला मिळाला आणि त्यामागील कारणही योग्यच असल्याने ते पाहाणार्‍यांना सुसह्य वाटले [सांगितले पाहिजेच की हे काम करणार्‍या आशा शेलार यानी त्याना मिळालेल्या झी अवॉर्डची योग्यता आज आपल्या अभिनयाने दाखविली आहे....फार सुरेख अभिनय केला त्यानी]. पिंट्या मध्यरात्र झाली तरी आलेला नाही म्हणून काळजीत असलेल्या पतीपत्नीसोबत चाळीतील मनिषही आहेच. शेवटी बाबा मुलीला...जान्हवीला फोन लावतात...त्यावेळी ती झोपलेली असते म्हणून श्री फोन घेतो...वडिलांचे नाव पाहून तो जान्हवीला उठवितो....ती उठते....'हॅल्लो बाबा, बाबा' असे दोनतीन वेळा म्हणते, पण इकडे नेमक्या त्याचवेळी पिंट्या घरात येतो....चप्पल काढतो आणि आईवडिलांचे गोंधळलेले चेहरे पाहून त्यानाच विचारतो 'काय झालंय ?".....सदाशिवराव फोन ठेवतात पण दुसरीकडे फोनवर असलेल्या जान्हवीला चैन पडत नाही. तिला वाटते घरी नक्की काही तरी घडले आहे. श्री तिची अवस्था पाहून आपण आत्ताच घरी जाऊ या का ? असेही विचारतो, पण जान्हवी इथे घरात काय सांगायचे या चिंतेने आपण सकाळीच निघू या....तू ऑफिसला जाताजाता मला घरी सोड असे सुचविते....श्री त्याला होकार देतो.

मात्र सहस्त्रबुद्धे यांच्या घरी आईने पिंट्यावर चक्क हात उगारला आहे....तिची काळजी ही की काहीही कामधाम नाही म्हणून पोरगा कुठे जुगार खेळायला लागला आहे की आणखीन काही व्यसने त्याला लागली आहेत या चिंतेत आहे....पण पोरगा तिचे बोलणे उडवून लावतो आणि ते पाहून प्रथमच सदाशिवराव बायकोची बाजू घेऊन पिंट्यालाही बोलतात....हे मनिष तिथेच थांबून पाहात असतो. पिंट्या समजून चुकतो की मनिषने आईबाबांचे कान भरले आहेत....त्याच्यावर काहीतरी बोलतो आणि वर निघून जातो. दुसर्‍या दिवशी सकाळी परत गडबडीने तो बाहेर जायला निघतो तर शशिकलाबाई त्याला अडवितात आणि 'प्रथम तू कुठे चालला आहेस हे सांग....नाहीतर तुला इथून सोडणार नाही..." पिंट्या अजिबात दाद देत नाही....आईला बाजूला सारून तो बेदरकारपणे बाहेर निघून जातो. दोघेही हतबुद्ध होऊन बसतात.

श्री आणि जान्हवी चाळीत आले आहेत पण जान्हवी श्री ला 'तू माझ्यासोबत येऊ नकोस....तुला सकाळपासून ऑफिसचे फोन येताहेत...तू जा अन् मला न्यायला सायंकाळी येशील त्यावेळी बाबांना भेट..." यावर श्री तिची थोडी थट्टामस्करी करतो...तीही खूष होते....आणि तो गेल्यावर घराकडे वळते. चाळीच्या सुरुवातीलाच असलेल्या एक मावशी तिला भेटतात....त्या दोघींची बोलणी होतात...तर त्या बाईकडून जान्हवीला कळते की आपली चाळ मालकाने एका बिल्डरला विकली असून आता ही इमारत पाडली जाणार आहे....जान्हवीला धक्काच बसतो...आणि त्याच भ्रमात ती आपल्या घराकडे वळते...वाटेत मनिष गाडीवर बसलेला असतो...मनिषच्या मनी पिंट्याने सकाळीदेखील केलेला त्याचा अपमान सलत असतो....जान्हवी त्याला पाहून आनंदित होते. पण तो काही तिला जास्त सांगत नाही...फक्त 'मी आता ऑफिसला जायच्या गडबडीत आहे...संध्याकाळी मी येतोच तुमच्या घरी त्यावेळी बोलू..." असे म्हणून गाडी सुरू करतो आणि निघून जातो.... गोंधळलेली जान्हवी घरी येते....तिथे आईची पिंट्याच्याबाबतीतील टेप आता सुरू होईल....सोमवारी.

मामा मस्त. आशा शेलार यांनी 'गुंतता हृदय हे' मध्येपण खूप चांगले काम केले होते, इथे पण छान केलेय.

हो नक्कीच मामा,तुम्हाला भेटायला आवडेलच Happy

नीळुमामा चा पत्ता कट केलेला दिसतोय्,बरं झालं,पण त्याची लबाडी उघड व्हायला हवी.

जान्हवीच्या आईचे काम करतात त्याचं नाव आशा शेलार नसुन आशा चांदोरकर आहे,या नावानी FB वर Acc
आहे.

जाहिरातीत बघितल की बेबीआत्या आणि आईआजी सोनाराकडुन आलेल्या दागिन्यांच्या बिलाबद्दल बोलत आहेत. त्यामध्ये सोनाराने गोखल्यांच्या कडुन ३ चंद्रहारांची खरेदी झाल्याचा उल्लेख आहे. मला ना खूप दिवसापासुन एक शंका आहे. मालिकांशी संबंधित कोणीतरी नक्की माबोवर आहे आणि नित्यनेमाने मालिकांच्या धाग्याचा वाचक आहे. कारण बर्‍याच वेळा अनुभवल आहे की मालिकेत अपेक्षित असणार्‍या घटनांची चर्चा इथे झाल्या झाल्या तिकडे मालिकेत त्या घटना घडत असतात.

रानभुल....

आईचे नाव 'आशा शेलार' हेच आहे....तर भावाचे नाव रोहन गुजर....

http://www.youtube.com/watch?v=gtXVincdNYI

ह्या लिंकवर जान्हवीसह हे दोघेही कलाकार आहेत....मुलाखत देत आहेत....जरूर बघ.

हम्म......
आता हे पण पहा..

https://www.facebook.com/asha.chandorkar

नाव कुठ्लं का असेना त्याचां अभिनय १+ आहे.त्या character राग येतो ही त्यांची acting चांगली असल्याची पावतीच आहे.
>>>>नित्यनेमाने मालिकांच्या धाग्याचा वाचक आहे. कारण बर्‍याच वेळा अनुभवल आहे की मालिकेत अपेक्षित असणार्‍या घटनांची चर्चा इथे झाल्या झाल्या तिकडे मालिकेत त्या घटना घडत असतात. +++१००.. मलापण असच वाटत. Wink

आशा यांची कदाचित दोन्ही आडनावे असतील एक माहेरचे एक सासरचे, मी माझ्या भाचीला विचारेन, माझी भाची त्यांच्याबरोबर 'गुंतता हृदय हे' मध्ये होती.

मग ही नवराबायको भावुक होऊन काहीतरी फिल्मी संवाद....'मी गेल्यावर तू राहशील ?....तू गेल्यावर मी राहाणार नाही... >>>

जान्हवी अगदी गुणी, सरळ मुलगी दाखवलीय आणि सासवाही दुष्ट अशा नाहीत त्यामुळे कधी ना कधीतरी समेट होणारच. त्यापलीकडे सिरियल खेचायची तर श्री ची उचलबांगडी करायची आणि जान्हवी ह्या सासवांची मुलगी बनून आधार देते असं काहीतरी दाखवायचं अशी एक दुष्ट शंका मला येते. मी तुझ्याआधी जाणार नाही, तुझ्यानंतर जाणार नाही, तुझ्याबरोबरच किंवा आम्ही एकमेकांच्या जीवाचे तुकडे आहोत हे बरेचदा येतं ह्या सिरियलमध्ये त्यावरुन ....:अओ:

सोमवार दि. १८ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ मालिकेचे १००+ भाग झाले आहेत....मालिका गाजतही आहेच; पण आजच्या भागावे एक वैशिष्ठ्य म्हणजे प्रथमच श्रीरंग गोखले एक मिनिटही पडद्यावर आला नाही.....चुकल्यासारखे वाटले मला तरी. भागाची सुरुवातच बेबीआत्या आणि इंदूबाई यांच्या जान्हवीविरोधी बोलण्याने झाली....म्हणजे "मी जरी तिची माफी मागितली असली तरी याचा अर्थ माझ्या तेवढ्या बोलण्यापुरती ती माफी होती. तिची माझ्याशी गाठ आहे..." यावर मठ्ठ चेहरा करून त्या इंदूबाईने हो हो करायचे....किती दिवस ही सूडबुद्धी [आणि तीही अकारणच] दाखवत बसायचे हे देवस्थळींचा देवच जाणे.

इकडे शशीकलाबाई घरी धाय मोकलून रडण्याचे नाटक करीत आहेतच. जान्हवी घरी येते आणि आईबापाचा आवाज ऐकून सुन्न होते. तिला नेमकं कळत नाही की नेमके पिंट्याने केले तरी काय आहे. आई म्हणणारी ती स्त्री केवळ "माझा पिंट्या नादाला लागला....व्यसनी झाला....दारु पित असेल..." असले भरमसाट बिनबुडाचे आरोप करीत आहे. वडील जान्हवीकडे पाहून हताशपणे गप्प बसतात. शांताबाई जान्हवीसाठी पोहे चहा घेऊन येते; पण जान्हवी ते घेऊ शकत नाही कारण तिच्यावर दडपण आले आहे....मात्र शशीकलाबाई ती बशी घेऊन पोहे मटकावत बसतात...दुसरीकडे शिव्याही चालूच. मतलबीपणाने हळूच जावयाला फोन लावण्याबद्दल जान्हवीला सूचनाही करते...पण सदाशिवराव त्याला निक्षून विरोध करतात. आपल्या घरातील त्रासाच्याबाबतीत जावयाला काय सांगायचे ? हा योग्य असा विचार ते बोलून दाखवितात. जान्हवीही श्री ला फोन करणार नाही म्हणते....मग परत लबाडीने शशीकलाबाई 'आपली चाळ पाडणार आहेत...तेव्हा ते तरी जावईबापूना सांग..." म्हणजे आता हे एक नवीन कथानक मालिकेला जोडले जाणार.

गोकुळमध्ये सार्‍या बायका जमलेल्या आहेत आणि त्यांचा विषय चालला आहे जान्हवीला नोकरी करायला परवानगी द्यावी का ना द्यावी. नर्मदाबाई, सरस्वती आणि शरयू यांचे म्हणणे होकारार्थी आहे तर इंदूबाई नेहमीप्रमाणे 'कशाला आणि का नोकरी केली पाहिजे तिने ?...' असला पाढा गिरवित बसली आहे. शेवटी आईआजी हॉलमध्ये आल्यावर नर्मदा त्यानाच विचारू असे म्हणतात...पण त्यांचे धाडस होत नाही. शेवटी बेबीआत्या विचारते, "जान्हवी नोकरी करते असे म्हणत आहे....आपण परवानगी द्यायची का ?" यावर प्रथमच आईआजी स्त्री ने नोकरी करणे किती स्वागतार्ह आहे याबाबतचे मत मांडतात. उलट मी स्वतः नोकरी करीत होते आणि तुम्हीही नोकरी केली असती तर ते मला आवडलेच असते....पण जान्हवी ही तुमची सून आहे आणि माझा श्री ने तिच्याशी लग्न करायला विरोधच होता त्यामुळे आता तिच्या भविष्याच्या संदर्भातील जो काही निर्णय तुम्हाला घ्यावासा वाटतो तो तुम्ही घ्या....मी त्यात लक्ष घालणार नाही.." असे म्हणून त्या निघून जातात.

आता या सार्‍या बायका जान्हवीने नोकरी करावी वा ना करावी यावर आपापसात मतदान घेत आहेत. यावर उद्याच्या भागात चर्चा होईल.

हो आज श्री नव्हता पहिल्यांदाच असं झालं असावं. Happy
आजचा नोकरीवर झालेला काथ्याकुट अजिबात आवडला नाही. किती ताणतायत.
आईआजी तर कायम सुनांवर चिडलेली असते असंच वाटतं. कधीच धड बोलत नाही. नेहमी एक वैतागलेला सूर दाखवलाय.

<पण जान्हवी ही तुमची सून आहे आणि माझा श्री ने तिच्याशी लग्न करायला विरोधच होता त्यामुळे आता तिच्या भविष्याच्या संदर्भातील जो काही निर्णय तुम्हाला घ्यावासा वाटतो तो तुम्ही घ्या..>

भागिरथीबाईंनी असे सांगितले का? त्या सुनांना, आता घरातले निर्णय तुमचे तुम्ही घ्या. एवढ्यातेवढ्यासाठी माझ्याकडे येऊ नका. जान्हवीने ड्रेस घालण्याबाबतही त्यांनी हेच सांगितले होते. मी नसेन (म्हणजे वर जाईन) तेव्हा काय कराल? असे सांगत असतात. पण ते काही त्या बायकांच्या डोक्यात शिरत नाही. कालच्या भागात बेबीच्या डोक्यात ते शिरले. अर्थखाते हाती येणार म्हणून ती खूष आहे.

जान्हवीला आईला आपल्या सासरापासून सुरक्षित अंतर ठेवायची कसरत करावी लागणार आहे.

Pages