Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशू..... गोड म्हणून नाही तर
आशू..... गोड म्हणून नाही तर बदल म्हणून कोल्हापूरी मटनाचा मी उल्लेख करत आहे ना !! आता हे ठीकच की सार्या वस्तू असल्या तर झटदिशी शिरा करता येईल....पण आमच्याकडे पाहुणा मित्र आला की पाच मिनिटात मटणाची तयारी सुरू करता येते....मस्तपैकी.
तुम्ही कुणीही या कोल्हापूरला.....एक नंबरी तयारी करतो मीच ! आमची दक्षी आहे कोल्हापूरची पण ती देखील साजुक तुपाची वाटी जवळ घेऊन बसणारी पोरगी आहे.
आशूडी, हल्ली प्रत्येक मराठी
आशूडी, हल्ली प्रत्येक मराठी मालिकेमधे दर दोन तीन एपिसोडमधे "साजुक तुपातला शिरा" केलेला दाखवलेला आहे त्यावरून तो विनोद आहे.
गोड म्हणून कोल्हापूरी मटणकोंबड्यामासे ??<<< कोल्हापुरात जावई पाहुणचाराला आला की अशा जेवणालाच "गोडधोड केलंतं" म्हणून सांगतात.
ताटात नावाला म्हणून एखादा गोड पदार्थ असतोच, पण मुख्य हीरो वरचेच सर्व. त्यातही मटणाचा मान पहिला. जावईच असे नाही, कुणीही पाहुणा असेल तर कोल्हापुरी लोक एकदम खुश!!
साजुक च word का बोलतात ही
साजुक च word का बोलतात ही लोक..... नुसता तुपातला शिरा बोलले तरी समजते की.........
विषय 'गोड' म्हणून काहीतरी
विषय 'गोड' म्हणून काहीतरी करावं हा चालला होता आणि तिथे गोखले, सहस्त्रबुद्धे आणि मटणकोंबड्यामासे हे काहीच्या काही अस्थानी वाटलं.
कोल्हापुरात जावई पाहुणचाराला आला की अशा जेवणालाच "गोडधोड केलंतं" म्हणून सांगतात >> हे माहीत नव्हतं.
बाकी केळाचं शिकरण पण गोड आणि पटकन करण्यासारखे आहे हे लक्षात आलेलं दिसत नाही अजून सिरीयलवाल्यांच्या.
अहो पण बासुंदी, श्रीखंड, खीर,
अहो पण बासुंदी, श्रीखंड, खीर, गाजर हलवा, दुधी हलवा, रबडी, आहेतच ना? आता सहस्त्रबुद्धयांच्या घरी ठीक आहे शिरा कारण त्यांच्या परिस्थितीला पहाता तो सुद्धा क्वचितच होत असेल त्यांच्या घरी, पण गोखल्यांना तर बासुंदी, श्रीखंड, खीर इ. परवडत असेल ना, त्यांनीही शिराच करावा?
विषय 'गोड' म्हणून काहीतरी
विषय 'गोड' म्हणून काहीतरी करावं हा चालला होता आणि तिथे गोखले, सहस्त्रबुद्धे आणि मटणकोंबड्यामासे हे काहीच्या काही अस्थानी वाटलं.<<< त्यात काय अस्थानी? मटणमासे खाणारे गोड खात नाहीत का? आणि गोखले-सहस्रबुद्धे ही मालिकेतली नावं आहेत की. विषय "गोड" म्हणून करण्यापेक्षा एकंदरीतच सीरीयलमधे बनवले जाणारे पदार्थ (नॉट ओन्ली गोड) असा आहे बहुतेक!
असो.
बासुंदी, श्रीखंड,खीर करायला
बासुंदी, श्रीखंड,खीर करायला थोडा वेळ लागतो...साजुक तुपातला शिरा कसा पटकन जमण्या सारखा आहे...
खीर होते की पटकन.
खीर होते की पटकन.
नंदिनी, बाय द वे ज्या त्या
नंदिनी,
बाय द वे ज्या त्या शिरेलित गोड म्हणून फक्त साजूक तुपातला शिराच का करतात म्हणे? दुसरे पदार्थ संपले का दुनियेतले? >>
अशोक. | 20 November, 2013 - 14:20
अगं दक्षिणा....दुसरे पदार्थ संपले नसतील..... पण तुमचा श्री पडला गोखल्यांचा आणि जान्हवी सहस्त्रबुद्धयाची.... मग याना कोल्हापूरी मटणकोंबड्यामासे कसे चालतील ?
>> मी फक्त या दोन पोस्टवर लिहीले आहे.
नंदिनी....एक विशेष
नंदिनी....एक विशेष सांगतो.....मागे जान्हवीची मुलाखात झाली....म्हणजे ती लग्नानंतरची पैठणी वगैरे नेसून ताम्हण घेऊन विठ्ठल रखुमाईच्या देवळात [अर्थात मुंबईतील] आली आहे....आणि एबीपी माझा तर्फे तिची मुलाखात घेतली जात आहे. प्रश्न विचारता विचारता तिला एक प्रश्न असाही आला की ती नेहमी देवळात जाते का ? तर तिने उत्तर दिले...."नेहमीच जायला मिळते असे नाही. पण अधुनमधून जाते. अर्थात ज्यावेळी मी जेव्हा नॉन-व्हेज खाल्ले असेल त्यावेळी मात्र जात नाही...." म्हणजे प्रधान फॅमिलीला मटणाचे वावडे नाही.... केतकरदेखील त्यातील असतील.
जिथे तिथे पचका केलाच पाहीजे
जिथे तिथे पचका केलाच पाहीजे असा काही नियम आहे का आशूडी. व्यवस्थित चर्चा चाललिये निरागस लोकांची ती पहावत नाही का? गोखले सहस्रबुद्धे ही नावं नसती घेतली तर इतका इगो हर्ट झाला असता का? मामा, द़क्षिणा तुमचे चालु देत. इग्नोर मोड ऑन करा.
बर, बरं!
म्हणजे प्रधान फॅमिलीला मटणाचे
म्हणजे प्रधान फॅमिलीला मटणाचे वावडे नाही >> प्रधान सीकेपी असणार, तसे हल्ली सगळे खाउन पाह्त असतात.
येस्स.... nshelke .... आमच्या
येस्स.... nshelke .... आमच्या कोल्हापुरात जेव्हा नॉन-व्हेज ची पार्टी असते त्यावेळी सर्वच जातीगटातील मित्र असतात..... मटण खरेदी देखील देशपांडे आणि वडेर नावाचे दोन मित्र करतात....तर अभ्यंकर कांदा-कोथिंबीर कापत बसलेले असतात, झकासपैकी....आम्ही पाटील, पवार, जाधव....बाकीची तयारी. कुणाला काहीच चुकल्यासारखे वाटत नाही.
फार मजा असते मात्र.
(No subject)
काहीही चर्चा! असो!
काहीही चर्चा!
असो!
रिया.... वेल... असू
रिया....
वेल... असू दे....तेवढाच जरा इंटरेस्टिंग बदल....मलाही त्या सासवांच्या स्वयंपाकघरातील 'आज भाजीला काय करावे ? मटकी करू का ?" अशा टाईपच्या संवादांनी वैताग आलाच होता....तो पर्यंत हा काहीसा झणझणीत बदल इथे झाला, बरे वाटले.... तरी, हलकेपणाने घ्या इथली चर्चा सर्वांनी....उगाच रुसूफुगू नका.... आमच्या शरयूसारखे !
शिरा, शिकरणीच्या जोडीला आपण
शिरा, शिकरणीच्या जोडीला आपण शेवयांची खीर पण घालूयात.
अय्या! मध्यमवर्गीय घरात चटकन होणारे गोड पदार्थ सगळेच शकारी आहेत.
अशोक भाऊ चर्चा
अशोक भाऊ
चर्चा मस्त......
शरयू चे काय घेउन बसलात.. ति तर अळवावरचे पाणी....
वेल... असू दे....तेवढाच जरा
वेल... असू दे....तेवढाच जरा इंटरेस्टिंग बदल....मलाही त्या सासवांच्या स्वयंपाकघरातील 'आज भाजीला काय करावे ? मटकी करू का ?" अशा टाईपच्या संवादांनी वैताग आलाच होता....तो पर्यंत हा काहीसा झणझणीत बदल इथे झाला, बरे वाटले.... तरी, हलकेपणाने घ्या इथली चर्चा सर्वांनी....उगाच रुसूफुगू नका.... आमच्या शरयूसारखे !>>>>>
शरयुच्या लक्षात तरी रहाणार आहे का कशावर रुसायचय ते?
नाय नाय मंजूदीदी, पण गोखले
नाय नाय मंजूदीदी, पण गोखले मध्यमवर्गीय नाहीत ना आणि सुधारस राहीला की.
अशोक., आम्ही पण मजेतच करतोय हो ही चर्चा.
मध्यमवर्गीय घरात चटकन होणारे
मध्यमवर्गीय घरात चटकन होणारे गोड पदार्थ सगळेच शकारी आहेत.<<< चटकन म्हणजे किती चटकन? पाहुण्यांसाठी रांधायच्या इतर स्वैपाकाचा दीड दोन तासाचा वेळ लक्षात घेतला तर पुरणाची खीर, कडबू, गव्हल्याची खीर (ही तर शकुनाचे म्हणून करतात), बासुंदी, गुलाब जाम हे पदार्थ काही कठिण नाहीत!!
तेवढंही जमत नसेल तर सरळ सुधारस नामक भंपक प्रकार बनवा की सरळ!!
शरयुच्या लक्षात तरी रहाणार
शरयुच्या लक्षात तरी रहाणार आहे का कशावर रुसायचय ते?>>> म्हणूनच मामा म्हणत आहेत....विसरून जा शरयूसारखे
आता अजून ताव येणार एकेकाला !!
आता अजून ताव येणार एकेकाला !! कुठं काही चांगलं चाललेलं आवडतच नाही ह्या असल्या मेंट्यालिटीच्या लोकांना. यंव अस्थानी अन त्यंव अस्थानी.
पुरणाची खीर, कडबू, गव्हल्याची
पुरणाची खीर, कडबू, गव्हल्याची खीर ,सुधारस....अरारारारा
पुन्हा हो आशू, सुधारस
पुन्हा
हो आशू, सुधारस राहिला.
नंदिनी, एकीकडे भाजी चिरता चिरता रवा भाजता येतो, तसं पुरणाचं करता येतं का? तर नाही. खाली लागलं करपलं की निघाली इज्जत. शेवया घरात असतातच, तसे गव्हले असतात का? तर नाही.
रच्याकने, त्या सहा बायकांना घरात काही कामधंदे नसतात कुचूकुचू करण्याशिवाय, त्यांच्यावर गव्हले काढायचं काम सोपवलं पाहिजे.
मंजूडी, पुरण प्रेशर कूकरला
मंजूडी, पुरण प्रेशर कूकरला शिजवा. वेळ पण वाचेल,. इंधनदेखील!! पुपो करयला वेळ लागतो ठिक, खीर करायला वेळ लागत नाही. कडबूलापण नाही. पुर्या- पोळ्या भिजवलेली कणीक असतेच की.
गव्हले आमच्याकडे घरात असतातच, त्यामुळे तो ऑप्शन आला. शेवया तरी असणार असे गृहित धरू.
फिरनीचा पण ऑप्शन दिला असता पण "तांदळाची खीर" म्हणून काही जणांना चालणार नाही...
जसा की आमच्याकडे पाहुण्यांना जेवणात शीरा वाढलेला चालणार नाही!!
(आज माझ्याकडे वेळ असल्याने मी इथे टीपी करत आहे) धन्यवाद.
नंदिनी, एकीकडे भाजी चिरता
नंदिनी, एकीकडे भाजी चिरता चिरता रवा भाजता येतो, तसं पुरणाचं करता येतं का? तर नाही. खाली लागलं करपलं की निघाली इज्जत. शेवया घरात असतातच, तसे गव्हले असतात का? तर नाही.
खूप दिवसांनी धमाल चालली आहे इथे.
रच्याकने, त्या सहा बायकांना घरात काही कामधंदे नसतात कुचूकुचू करण्याशिवाय, त्यांच्यावर गव्हले काढायचं काम सोपवलं पाहिजे.>>>>>>
नंदिनी, एवढे options द्यायला
नंदिनी, एवढे options द्यायला लागलीस तर आईआजी स्वैपाकाचे काम तुझ्याच गळ्यात मारतील
गव्हले काढायचं काम गोखले
बेस्ट म्हणजे जान्हवीच्या आईला आणि इतर पाच सासवांना आपल्या बेत काय करावा चा पत्ता देणे.
Pages