Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेबीआत्या माफी पण कशी
बेबीआत्या माफी पण कशी अरेरावीने मागत होती. शी..जाम डोक्यात जातं हे कॅरेक्टर माझ्या.
श्री पण जरा आज टिपीकल वाटला. घरात लक्ष नसणे इ. इ.
जान्हवीने प्रथम बेबीआत्यांचा
जान्हवीने प्रथम बेबीआत्यांचा निकाल लावला पाहिजे....कारण आजीनंतर हीच जरा जास्त अरेरावी करते...
इकडे बर्याच दिवसांनी शेवटी
इकडे बर्याच दिवसांनी शेवटी शशिकलाबाई घरी आल्या आणि आल्याआल्या सख्ख्या भावाने आपल्याला कसे फसविले बापाच्या इस्टेट प्रकरणात याचा पाढा सदाशिवरावांच्या पुढे मोठ्या आवाजात वाचतात>>>>> त्यांच्याबरोबर तो मामा परत आला नाही हे बघुनच आनंद झाला आणि या निमित्ताने शशिकलाबाईंना आपल्या भावाची लायकी कळल्याचा तर परमानंद झाला, कारण त्यामुळे आता ते मामाचे कॅरेक्टर परत बघायला मिळणार नाही याहूऊऊऊऊऊऊ
मुग्धा.... होय..... एरव्ही
मुग्धा....
होय..... एरव्ही अनेक भाचेभाच्यांना आपला मामा आला किंवा दिसला तरी आनंद होत असतो; पण ह्या मालिकेने 'मामा' ने नाते अक्ष्ररशः इतके बदनाम केले की तो आता यापुढील भागात दिसणार नाही याबद्दल प्रेक्षक आनंद व्यक्त करू लागले आहेत.....काय मिळविले दिग्दर्शकाने अशा सुंदर नात्याची चिरफाड करून ?
त्यातही त्या वाघ्याने लग्नच्या दिवशी डल्ला मारलेल्या त्या चंद्रहाराचे पुढे काय झाले याचा काहीच उल्लेख नाही. म्हणजे तो त्याला आयताच पचला असेच मानावे लागेल. अजूनी जान्हवीला पत्ताच नाही की तिच्या गळ्यातील चंद्रहार हा श्री ने आपल्या पैशांनी आणला होता....सारेच विचित्र.
<काय मिळविले दिग्दर्शकाने अशा
<काय मिळविले दिग्दर्शकाने अशा सुंदर नात्याची चिरफाड करून >
महाभारतातले दोन मामा आठवा.
ह्या बायकांनी श्रीला गुळाचा
ह्या बायकांनी श्रीला गुळाचा गणपती करून ठेवले आहे. घरात लक्ष नाही काय. धिस इज २०१३!
पुरुष एंटायर घरे हाउस कीपिन्ग केटरिन्ग निगुतीने चालवतात. मला नसतं आवडल माझ्या नवर्याला कोणी असे गुंडाळलेले.
होय..... एरव्ही अनेक
होय..... एरव्ही अनेक भाचेभाच्यांना आपला मामा आला किंवा दिसला तरी आनंद होत असतो; पण ह्या मालिकेने 'मामा' ने नाते अक्ष्ररशः इतके बदनाम केले की तो आता यापुढील भागात दिसणार नाही याबद्दल प्रेक्षक आनंद व्यक्त करू लागले आहेत.....काय मिळविले दिग्दर्शकाने अशा सुंदर नात्याची चिरफाड करून ?>>>> काय तर
त्यातही त्या वाघ्याने लग्नच्या दिवशी डल्ला मारलेल्या त्या चंद्रहाराचे पुढे काय झाले याचा काहीच उल्लेख नाही. म्हणजे तो त्याला आयताच पचला असेच मानावे लागेल. अजूनी जान्हवीला पत्ताच नाही की तिच्या गळ्यातील चंद्रहार हा श्री ने आपल्या पैशांनी आणला होता....सारेच विचित्र.>>>>>> अहो मामा अशा बर्याच गोष्टी दिग्दर्शक नंतर विसरतो... पण प्रेक्षकांच्या लक्षात असत. एक उदा. स्टार प्रवाहवरील स्वप्नांच्या पलिकडले ही मालिका मी सुरुवातीला बघत होते. त्यात त्या घरातील मोठ्या सुनेला वडील नसल्याचा उल्लेख होता. काही दिवसांनी या लोकांनी त्या सुनेच्या आईच पात्र घरात घुसडल तेव्हा ती आई गळाभर ठसठशीत मंगळ्सूत्र, कपाळाला भलमोठ्ठ पौर्णिमेच्या चंद्राच्या आकाराच कुंकु, हातभर हिरव्या कच्च बांगड्या अश्या मेकअप मध्ये दाखवली होती. आता इथले काही जण म्हणातील की तिने फक्त पांढर्याच साड्या नेसाव्या का? मंसु घालुच नये का वगैरे... माझही अस म्हणण नाहीये की तिने फक्त पांढर्याच साड्या नेसाव्या, मंसु घालुच नये, पण तरीही साधासा पेहराव शोभला असता जर दिग्दर्शकाने आधीचे सीन्स लक्षात ठेउन पुढचे सीन्स शुट केले तर.... अस आपल माझ मत आहे...बाकी इथे जाणकार मंडळी आहेतच
श्रीचे कालचे जानुला समजावणे
श्रीचे कालचे जानुला समजावणे आवडले की माझ्यापेक्षा तुझी या घरातली ईमेज चांगले होणे आवश्यक आहे, काही चुक झाली तर खुशाल माझ्या नावाने बिल फाड, अर्थात जानु असं नाही करणार म्हणा, पण हे सपोर्टिव्ह असणं खुप मॅटर करते नवीन नवरीच्या आयुष्यात...
बेबीआत्याचे म्हणणे होते की बाहेरचा माणुस शरयुच्या विसरभोळेपणाचा फायदा घेऊ शकतो, पण ह्यांच्या घरात तर एकही बाहेरचा माणुस आत्तापर्यंत दाखवलेला नाही, अनिल ,शिवदे मॅडम सोडुन..
अमा +१ मला तर असं वाट्लं की
अमा +१
मला तर असं वाट्लं की श्री घरात नाही धर्मशाळेत येतो की काय मग.. यायचं.. गोड गोड बोलायच.. झोपायच नि निघुन जायच परत.. उलट त्याने थोडी जबाबदारी घ्यायला हवी ना..
श्रीचे कालचे जानुला समजावणे
श्रीचे कालचे जानुला समजावणे आवडले की माझ्यापेक्षा तुझी या घरातली ईमेज चांगले होणे आवश्यक आहे, काही चुक झाली तर खुशाल माझ्या नावाने बिल फाड, अर्थात जानु असं नाही करणार म्हणा, पण हे सपोर्टिव्ह असणं खुप मॅटर करते नवीन नवरीच्या आयुष्यात...>>>>> दिपुला अनुमोदन.. आणि हे अस फार कमी घरातुन होत ही अत्यंत खेदाची बाब आहे.
बेबीआत्याचे म्हणणे होते की
बेबीआत्याचे म्हणणे होते की बाहेरचा माणुस शरयुच्या विसरभोळेपणाचा फायदा घेऊ शकतो, पण ह्यांच्या घरात तर एकही बाहेरचा माणुस आत्तापर्यंत दाखवलेला नाही, अनिल ,शिवदे मॅडम सोडुन.. >> +१००
ती आत्या बाहेरची १०० माणसे येतात म्हणाली, पण एकही माणून दाखवत नाहीत, अगदी कामवाली बाई / माळी / वॉचमन ही नसावा कारण अनिल खुशाल घुसायचा घरात आणि शरयू ही रात्री-बेरात्री बाहेर पडलेली दाखवली आहे.
शरयू भाजी आणायला एकटी बाहेर
शरयू भाजी आणायला एकटी बाहेर जाते तेव्हा कळणारच की बाकीच्यांन्ना तिचा विसरभोळेपणा.
शरयू भाजी आणायला एकटी बाहेर
शरयू भाजी आणायला एकटी बाहेर जाते तेव्हा कळणारच की बाकीच्यांन्ना तिचा विसरभोळेपणा.>>>>> एकदा गेली होती ना शरयु फेसपॅक लावुन भाजी आणायला बाहेर, तेव्हाच कळल असेल लोकांना
मला श्रीची व्यक्तिरेखा एकदम
मला श्रीची व्यक्तिरेखा एकदम जस्टीफाईड वाटते. पाच बायका ( आईआजी सोडून ) ज्यांना घरकामाशिवाय काही विरंगुळाच नाही आणि घरकाम सोडून बाकी काही जबाबदार्या घ्यायची धमक / कुवत नाही अशा असतील तर तो कशाला उगीच घरात लक्ष घालेल.
लक्ष घालत नाही ह्यापेक्षा ही इज लीस्ट बॉदर्ड ! बिनमहत्त्वाचे निर्णय तो त्यांना घेऊ देतो पण शेवटी स्वतःला हवे तेच करतो. त्याबाबतीत एकदम स्वतंत्र आहे.
सुरुवातीपासून तो जान्हवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला दाखवलेला आहे आणि लग्नानंतर इतर बायकांच्या उपस्थितीत ते अजिबात बदललेले नाही हे बघायला मस्त वाटते
भरत.... "...महाभारतातले दोन
भरत....
"...महाभारतातले दोन मामा आठवा..."
होय...तिथेही दोन मामा होतेच. पण एक आपल्या शंभर भाच्यांच्या कल्याणासाठी का होईना प्रतिपक्षांविरुद्ध वाकड्यातिकड्या चाली खेळतो....आणि त्यांच्यासाठी युद्धात मरूनही जातो..... मालिकेतील मामा ?...केवळ भाच्यांनाच फ़सवित आहे असे नसून प्रत्यक्ष सख्ख्या बहिणीलाही इस्टेटीवरून ओरडायला लावत आहे.
दुसरा मामा...महाभारतातील...त्याला तर शापच होता....भाच्याच्या हातून मरण्याचा, त्याप्रमाणे तो मेला. मालिकेतील मामाला मात्र एवढा ताडमाड वाढलेला भाचा वठणीवर आणत नाही....वास्तविक लग्नाच्या त्या आदल्या दिवशीच पिंट्याने आणि मनिषने मामाने केलेली चोरी पकडायला हवी होती.
अशोक मामा खरच तुम्ही वकील
अशोक मामा खरच तुम्ही वकील व्हायला हवत.....
मामांच्या विश्लेषणाबद्दल अनुमोदन.....
व्वॉव....मुग्धा.... मी आणि
व्वॉव....मुग्धा.... मी आणि वकील ? नको रे देवा.... माझ्या नोकरीतील ड्युटीमुळे मी वकीलांच्या जत्रेतच असतोय नित्यनेमाने. त्यांचा कोर्टाच्या आवारात चाललेला दंगा पाहून त्या गावाला जायला नकोच वाटले मला.
तरीच तरीच मी म्हणते अस वकीली
तरीच तरीच मी म्हणते अस वकीली स्टाईलमध्ये विश्लेषण तुम्ही कस काय देउ शकता.... रच्याकने तुम्ही काय करता? आणि कुठे रहाता?
एरव्ही अनेक भाचेभाच्यांना आपला मामा आला किंवा दिसला तरी आनंद होत असतो>>>> अगदी माझा ४ वर्षाचा भाचा(नणंदेचा मुलगा) तर त्याच्या मामाला(माझा नवरा) त्याचा मित्रच समजतो. अगदी जिवलग मित्र असल्यासारखे दोघजण खेळतात काय? भांडतात काय? काही विचारु नका.....
.....
.....
काय हे मामा? असला कसला
काय हे मामा? असला कसला प्रतिसाद?
अगं मुग्धा.....तुझी विपू पेटी
अगं मुग्धा.....तुझी विपू पेटी पाहा ना.... इथे सगळे डिटेल्स देणे योग्य वाटले नाही....कारण शेवटी हा धागा आहे श्री आणि जान्हवीसाठी.... त्यात आमचा इतिहास कशाला ? असा विचार केला, अन् लिहिलेले परत काढून टाकले व तुझ्या पर्सनल पेजवर त्याला नेले.
ओ... बघते...
ओ... बघते...
काल जान्हवी ड्रेस मध्ये खुप
काल जान्हवी ड्रेस मध्ये खुप गोड दिसत होती.
शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर
शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ आजच्या भागात इंदूसासूचे डोके कशामुळे तरी भणभणले होते. त्या तिरीमिरीत जान्हवीला लागेल असे तिरके बोलली होती. त्यामुळे अस्वस्थ होऊन नर्मदाआई तिच्या खोलीत जाते. तिला विचारता इंदूबाई जान्हवीच्या विरोधातील ती जुनीच गुळगुळीत झालेली रेकॉर्ड वाजवते....'जान्हवी आल्यापासून घर बदलले....आईनी दार बंद करून घेतले....श्री चे कामे आम्हाला करू देत नाही....तोही तिचीच बाजू घेतो...." इ.इ....याला नर्मदाबाई समजावणीच्या स्वरात बोलतात....नंतर आपल्या घरातील सार्यांच्याच संसाराला अशी दृष्ट का लागत असावी असाही प्रश्न विचारतात. तर त्याला उत्तर म्हणून ही बया म्हणते, "आपल्या घरात आलेली ही ब्याद गेली म्हणजे सारे काही छान होईल..." [काय अर्थ घ्यायचा या वाक्याचा प्रेक्षकांनी ? म्हणजे यांचे घर सुशेगात तेव्हा होणार, ज्यावेळी जान्हवी म्हणजे नवी सून बाहेर पडेल ? काहीही दाखविणे चालले आहे.] यानंतर मग आपल्याला सहानुभूती मिळावी यासाठी इंदूबाई नवर्याच्या आणि मुलाच्या अपघाती निधनाचा विषय पुढे आणून नर्मदाबाईसमवेत मनसोक्त रडून घेतात.
सदाशिवराव सहस्त्रबुद्धे यांचे घर ~ कलाबाई आणि पिंट्याची वादावादी. कशाबद्दल ? तर एक कप चहा करून दे म्हणून....तो म्हणतो 'माझा चालेल का ?" यावर मग आरडाओरडा....जान्हवीची आठवण. बापाकडे पाहून पिंट्या गप्प बसतो आणि घराबाहेर पडतो....तेवढ्यात शेवंताबाई स्वयंपाकाला म्हणून येतात. तिच्याशी कलाबाईचा तोंड फाटेस्तोवर वाद. शेवंताबाईदेखील तोडीला तोड उत्तर देतात....चहा करायला सांगितल्यावर त्या सदाशिवरावांना कमी साखरेचा लागतो म्हणून तसाच करतात तर कलाबाईचा त्याबद्दल्र राग. इथेही आदळाआपट चालूच आहे....पिंट्याच्या वरच्या झोपायच्या जागेत मामाची ट्रंक सापडली आहे. त्यात काय आहे हे त्याला माहीत नाही. तो आई आणि बाबांना सांगतो. बहीण म्हणणारी बाई 'उघड आणि दे टाकून' असे म्हणते तर बाप "नको नको....दुसर्याची ती वस्तू...चोरलेल्या...., तो येऊ दे आणि घेऊन जाऊ दे....". म्हणजे कदाचित ट्रंक उघडल्यावर बरीच रहस्ये बाहेर येतील असे वाटते.
'गोकुळ' मध्ये सरूमावशीकडून जान्हवीला इंदूआईच्या नशीबाची कहाणी ऐकायला मिळते. नवरा आणि मुलगा गेलेल्या बाईचे जीवन किती दु:खाने भरलेले असेल याचे जाणीव तिला होते आणि नंतर रात्री श्री बेडरूममध्ये आल्यावर ती हाच संवाद त्याच्याशी करून अपघाताविषयी आणि इंदूआईच्या जीवनाविषयी जास्त माहिती घेते...तेव्हा तिला त्यांच्या वर्तनाबद्दल काहीच वाईट वाटत नाही. मग ही नवराबायको भावुक होऊन काहीतरी फिल्मी संवाद....'मी गेल्यावर तू राहशील ?....तू गेल्यावर मी राहाणार नाही...यम न्यायला आल्यावर मी सांगणार माझी सावित्री आहे ती मला न्यायला येईन...." असले चावूनचावून चोथा झालेले प्रेमाचे संवाद....रडतरडत हसतहसत म्हणत बसतात.
इकडे रात्रीचे बारा वाजून गेले असले तरी पिंट्या घरी आलेला नाही म्हणून आईवडील आणि मित्र मनिष घरी काळजीत आहेत. त्याच्या सा-या मित्रांना फोन करून झाले आहेत. तेव्हा शेवटचा प्रयत्न म्हणून जान्हवीला फोन करतात....जान्हवी त्यावेळी गाढ झोपेत आहे पण श्री काम करीत बसला आहे...तो फोन घेतो आणि सदाशिवरावांचा फोन आहे, म्हणून काळजीने जान्हवीला उठवितो....ती बोलायला सुरू करणार तोच इकडे घरात पिंट्या पाय ठेवतो....सदाशिवराव फोनवर काहीच बोलत नाहीत....जान्हवीचे काळजीने 'हॅलो, हॅलो' चालू आहे.
मामा मस्त अपडेट्स. हल्ली सलग
मामा मस्त अपडेट्स. हल्ली सलग बघतच नाही. तुमचे अपडेट्स वाचायला आवर्जून येते.
जान्हवीचे एरवी घरी म्हणजे
जान्हवीचे एरवी घरी म्हणजे माहेरी कधी फोन न करणे खटकते थोडे. बाबांशी ती क्लोज आहे ना मग दाखवायला पाहिजे अधे मधे.
इंदूबाईची स्टोरी म्हणजे
इंदूबाईची स्टोरी म्हणजे घराघरातून पदर डोळ्याला लागले असणार. श्री खरेच खूप शानपट्टी बोलतो कि नाही?
प्रत्येक प्रश्नाला त्याच्याकडे असे सुविचार सुलिखित तयार असते. व ह्या बाया त्याचे ऐकून शांत होतात.
रिडिक्युलस. आदर्श पात्र दाखवायच्या नादात त्याला अगदी गोड दूध साखर बनवून टाकले आहे. आपली काहीच तक्रार नाही. काल जोडी अगदी गोड दिसत होती. जान्ह व्ही फारच क्यूट दिसत होती. ते माहेरच्या घरचे शॉट आले कि मी आवाज बंदच करून टाकते. जानवीची दोन मंगळ सूत्रे आहेत ना? एक मोठी आणि एक तीन पदरी गळ्या बरोबर? शोभते तिला. ड्रेस पण आवडला.
मामा, मस्त अपडेट्स
मामा, मस्त अपडेट्स
मामाश्रींचे अपडेट वाचून आता
मामाश्रींचे अपडेट वाचून आता मालिका पाहायची गरज नाही असे वाटू लागले आहे
जणू काही तो एपिसोडच डोळ्यासमोर घडतो अस वाचताना जाणवत
एक तीन पदरी गळ्या बरोबर>>>>>
एक तीन पदरी गळ्या बरोबर>>>>> किती छान आहे ना ते डिझाईन? मला खूप आवडले...
Pages