विजापूर बदामि ऐहोळे पट्टडकल

Submitted by Srd on 16 November, 2013 - 23:33

भाग पहिला

बरेच वर्षाँपासून माझ्या मनाशी ठरवलं होतं की एकदा तरी कर्नाटकातील बदामि येथे जायचेच.हम्पि बदामिपासून एकशेसाठ किमि आहे.मला एका कार्यक्रमाला डिसेंबरमध्ये हुबळीला जायचे असल्यामुळे त्यावेळी हम्पि आणि लखुंडि जमणार होते.

यावेळी फक्त विजापूर,बदामि करून परतणार होतो.
गोलगुंबज फोटो

..याठिकाणी सर्व ऐतिहासिक वास्तु असल्यामुळे मी एकटेच जायचं ठरवलं .बरेच अंतर पायी फिरावं लागतं .केवळ प्रमुख ठिकाणी भोज्याला हात लावून यायचे तर काही मजा नाही .
गोलगुंबज वरून
इब्राहिम रौजा, बिजापूर.

नक्षीदार जाळी . इ०रौजा.

बनशंकरी तलाव.

रथ बनशंकरी.

अगस्ति तलाव.

दुर्गमंदिरातील शिल्प.

दुर्गमंदिरातील शिल्प.

..या महिन्यात फॉक्स ट्रावलर चानेलवर 'गोल्डन चैरिअट' नावाची अर्ध्या तासाची जी फिल्म दाखवत आहेत त्यात इकडची धावती दृष्ये आणि गाडीतील सोयी दाखवत आहेत .
राजस्थान मधिल 'पैलिस ऑन वील्स 'आणि महाराष्ट्रातील 'डेक्कन ऑडसि ' सारखीच ही कर्नाटकातील 'गोल्डन चैरिअट 'नावाची आलिशान सुखसोयिची रेल्वे गाडी आहे .
तिकीट एकहजार+ डॉलर आहे Sad .
मुंबईहून थेट गाडी विजापूरपर्यंतच आहे .तिथून ८० किमी बदामि याच सोलापूर गदग रेलवे लाईनवर येते .
'आपल्या' मुंबई बिजापूर फास्ट पैसिंजरचे(५१०२९) जाण्यायेण्याचे स्लिपरचे तिकीट (१५०रु/)काढले . Happy :)शिवाय बिजापूर ते बदामिचेही (११४२३ इक्सप्रेस)गाडीचेही बसण्याचे (५०रु).

गेल्या वर्षी केलेल्या सहलीचे वर्णन .ठाण्याहून(रविवार ,सात ऑकटो २०१२ला ) रात्री साडेअकराला मुंबई विजापूर गाडीने (५१०२९)प्रवास
सुरू झाला..

बिजापूर/पंढरपूर जाणाऱ्या ५१०२९/५०१२७ गाडीच्या पुढच्या अकरा डब्यांना शिर्डी जाणाऱ्या ५०१३३गाडीचे सहा डबे मागे जोडलेले असतात . त्यामुळे प्रचंड गोंधळ असतो .

या दोन गाड्या दौंड ला सकाळी सहावाजता वेगळ्या केल्या .सोलापूर नंतर होटगीच्यापुढे दुधनी येथे गाडी कर्नाटकात जाते .स्टेशनच्या पाट्या कानडीत दिसू लागल्या .

पाऊस चांगला झाला होता शेते हिरवीगार दिसत होती .दोन तीन मोठी गावे गेल्यावर बिजापूर दहा किमि आल्यावर उजवीकडे गोलगुंबज दिसायला लागला .
दुपारी दीडला एक तास उशिरा विजापूरला पोहोचलो .

स्टेशनच्या बाहेरच गोलगुंबज आणि आवार आहे .प्रवेश थोडा पुढून आहे .प्रथम मला हॉटेल शोधायचे होते .रिक्षाने बस स्टैंडला आलो .आजुबाजूला फिरून हॉटेल ललिता महाल मध्ये रुम(रु४०० ) घेतली .तीन मजली ,स्वच्छ ,तीस एक खोल्या आणि रेस्टोरंटही होते .तयार होऊन लगेच जेवण घेतले .

अडीच वाजता बाहेर पडलो .अदिलशाहची राजधानी हीच का हा प्रश्न पडतो .काही रस्ते फारच घाण आहेत .डुकरे फिरतात .दुर्गंधि फार .

रिक्षाने परत स्टेशन रोडवरच्या गोलगुंबजच्या प्रवेशद्वाराशी आलो .तिकीट घेऊन आत गेलो .अनपेक्षित स्वच्छता ,सुंदर बागेत म्युझिअम इमारतीच्या मागचा घुमट फारच सुरेख दिसतो .म्यु०अमला वेगळे तिकीट आहे .चार मिनारांच्या आतून अरुंद जिन्याने घुमटाच्या वरच्या सज्जात जाता येते हीच ती प्रसिध्द जागा . काय छान प्रतिध्व नि ऐकू येतात ! सात वेळा स्पष्ट ...घुमटाचा व्यास अडतीस मिटर्स जगात दुसरा क्र मोठा आहे .आतमध्ये तीन मकबरे .या दोन गोष्टींमुळे ताजमहालपेक्षा वेगळा आहे .फक्त चुना विटांचे काम ,कलाकुसर नाही तरी अतुलनीय .

विजापूरच्या युसुफ अदिल खान(अदिल शाह) याने १४८९ मध्ये
गुलबर्गाच्या बहामनी सुलतानापासून वेगळे होऊन अदिलशाही घोषित केली .१६८६ला
औरंगजेबाने जिंकून मोगलांचा ताबा आला .
मुहमद अदिल शाहने(१६२६ ते
१६५६)स्वत:साठी गोलगुंबज हे थडगे बांधायला घेतले . ते पूर्ण होण्याच्या
अगोदरच त्याचा मृत्यु झाला .

इब्राहिम रौजा हे थडगे इब्राहिम अदिलशाहने(१५८० - १६२६)राणीसाठी
बांधले पण प्रथम तोच मेल्यावर त्याचे झाले.येथे भव्यतेपेक्षा कलाकुसर अधिक आहे आणि छान बाग आहे.

'मलिक -ए -मैदान' ही दीड मिटर व्यासाची पंचावन टनी तोफ ठेवलेली आहे.यादवांनी बनवून घेतलेल्या या तोफेवर चेहरा आहे.
युध्दात ती बहामनीँकडून अदिलशाहांकडे आली.त्यांनी अरेबिक मध्ये त्यावर लिहून घेतले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाग दुसरा
अगस्ति गुहेतील शिल्प

गोलगुंबज पाहून बसने 'वर्कशॉप'ला आलो. येथे आत इब्राहिम रोजा आहे समोरासमोरच्या दोन इमारतीपैकी पूर्वेकडची डावीकडे आहे मकबरा आणि उजवीकडे मशिद.
मकबऱ्याची कलाकुसर खूपच छान आहे.

बदामि गुहेतील शिल्पे

इकडे फारच कमी लोक येतात. इथून शिवाजी सर्कलला तोफ ठेवली आहे. दुर्गंधिमुळे नकोसे वाटते.
मशिदि, उपलि बुरुज, गगन महाल, आणि बारा कमान पाहिले नाही.

कुल्फि विकणारी मुले
मंगळवार ९ ऑकटोबर.सकाळी सोलापूर हुबळी गाडी(११४२३)ने बदामिला आलो.आलमट्टि धरणाच्या
बाजूने गाडी जात होती.भरपूर पाणी.छान दृष्य.
बदामि म्युझिअम

कदंब राजांकडून चौथ्या शतकात चालुक्यांनी
राज्य मिळवले आणि आठव्या शतकांपर्यंत त्यांची सत्ता या ठिकाणी होती.
प्रथम
ऐहोळे(ऐवळि),बदामि आणि नंतर पट्टडकल (पट्टडकलु) येथे त्यांची राजधानी
होती.

भूतनाथ मंदिरातून अगस्ति तलाव

या हिंदू राजांची शिव,देवी आणि विष्णू ही दैवते होती.राजचिन्ह
वराहवतार होते.यांनी भारतातील पहिली देवळे बांधली,निरनिराळ्या बांधकामांचे
प्रयोग केले. येथे दिडशेच्यावर देवळे आहेत.

बदामि गुहेतील शिल्पे

चार कोरिव गुंफा आहेत.कोठेही आता पुजा होत नाहीत आणि मुसलमानांनी फोडलेली नाहीत त्यामुळे
पाहायला मजा येते.बदामि गुंफा परिसर(बस स्टैंड पासून १किमि):
मोठा रम्य अगस्ति तलाव,मागे लाल डोंगर.

अगस्ति गुहेतील शिल्प

आपल्याला एका क्षणात आताच्या बदामि गावातून सहाव्या शतकातील
'वटापि'मध्ये नेतात.येथे छान स्वच्छता ठेवली आहे.

म्युझिअम: सुटी शिल्पे आहेत.भूतनाथ मंदिरे: ही दोन साधीच पण तलावाच्या काठावर असलयामुळे रम्य आहेत.

बनशंकरी तलाव

-अगस्ति गुहा :दोन फुटी प्रवेशातून आत गेल्यावर अगस्ति ? आणि विषणूचे शिल्प आहे. म्युझिअमच्या डोँगरावर येथे पूर्वी दुर्ग होता.अगस्ति शिलासन -वरचे शिवालय
-फरसबंदि वाटेने (खूप छान). खालचे शिवालय जाता येते.

दुर्गदेवी ,ऐहोळे

बदामि आणि ऐहोळे ही दोन शहरे पुराणकाळात वटापि आणि इल्वला या नावाने ओळखली जात होती.या नावाचे दोन मायावी भाऊ होते.अशी कथा सांगतात की हे दोघे लोकांना फार असुरि पध्दतिने मारत असत.सर्व नीट पाहायला दोन तास लागले.

अप्सरा आणि कलश

पाच किमीवरच्या बनशंकरी इथल्या शाकंबरि देवीची पुजा होते,देऊळ दुपारी बंद असते. या देवळाच्या समोरचा मोठा तलाव आणि
त्याभोवती दगडी खांबांचा मार्ग फारच छान आहे.