बेवारस (लघुकथा)

Submitted by जयनीत on 15 November, 2013 - 05:14

'' ऐ चल उठ! चल नीघ इथून!''

'' कुठून कुठून येतात साले!!''

भिका-याला पिटाळण्यात आले

पुतळा पाण्याने धुण्यात आला

'एकदम चकाचक'

पुण्यतिथी धडाक्यात साजरी झाली

दिवसभर तिथे मग जोरदार भाषणाच्या फैरी झडल्या

हारतु-यांच्या राशीं वर राशी पडल्या

रात्री आंधारात भिकारी दबकतच पुन्हा निवा-याला आला

इकडे तिकडे बघुन मग फुलांच्या मऊशार शेजेवर निवांत झोपून गेला

अगदी उशीरा पर्यंत

दुस-या दिवशी त्याला कुणीही हटकले नाही

पुतळ्या मागच्या आडोश्यातला त्याचा शेजारी

अन त्याच्या थाळीतल्या शिळ्यापाक्या तुकड्यांचा वाटेकरी

बेवारस काळ्या कुत्र्या शिवाय

तिथे अजून कुणीही भटकले नाही.

(समाप्त)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

छान