कारल्याची पथ्यकर भाजी

Submitted by दिनेश. on 12 November, 2013 - 03:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
कारल्याची चिंचगूळाची भाजी तशी नेहमीच केली जाते. पण ती कडू लागू नये म्हणून जे उपाय करतात ते मी टाळले आहेत.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश कारल्याची भाजी कशीही केली तरी मस्तच लागते.
ही पण रेसिपी छान आहे Happy
मला काचर्‍या जास्ती आवडतात.

दिनेशजी तुम्ही पथ्यकर लिहीलेत म्हणून विचारते. तूर डाळ खरे तर अतीशय पित्तकारक असते, कारले पण पित्तकारक असते. त्यामुळे चवीला छान म्हणून आठवड्यातुन एकदा ही भाजी ठीक राहील. परंतु याच कारल्याच्या जोडीला तुरी ऐवजी मूग डाळ वापरली तर चव बदलेल पण पचायला हलकी असेल असे वाटते, असे माझे वैयक्तीक मत आहे. मी कुणावर ते लादत नाहीये, पण तुम्हाला पाककला आणी पालेभाज्या/ फळभाज्यांविषयी चांगली माहिती आहे म्हणून विचारत आहे, कृपया गैरसमज नसावा.

वेगवेगळे प्रयोग करुन पहाणार्‍यांनी तूर व मुग अशा दोन्ही डाळ्या वापरायला हरकत नसावी. यात तेल नसल्याने पथ्यकर असावी. साजुक तुप एक चमचा या प्रमाणात फार नाहीये, त्यामुळे पथ्यकर म्हणता येईल. अहो पण शेंगदाणे पण तेवढेच पित्तकारक असतात, मग ते वगळले तर चालणार नाही का? बाकी रेसेपी चवदारच आहे.:स्मित:

मिलिंदा,
तेल / तूप / गूळ / मीठ / ( मांसाहार Happy ) यापैकी काहीही वगळून ही भाजी करता येते ( अशीच रेसिपी मला विचारली होती. ) एरवीही भाज्या तेलात परतणे योग्य नाहीच. त्यात तेल भाजी परतण्यासाठीच नव्हे तर शिजण्यासाठीही तेलच वापरले जाते.

अश्या प्रकारे कुठलीही भाजी करता येते ( दूधी, पडवळ, अलकोल, कोबी, घेवडा, पालेभाज्या ). आणि यात तंत्रात बर्‍याच अंशी जीवनसत्वे राखली जातात. मसाल्याचाही स्वाद खुलतो ( कोरडे भाजल्याने ) शिवाय अश्या भाज्या चोरट्या होत नाहीत.

रश्मी,
काहीजणांनाच तूरडाळ पचायला जड जाते. (आपण भारतीय लोक चणाडाळ / उडीदडाळ पण सहज पचवू शकतो.) पण ती नीट शिजवली व सोबतीने मेथी / मोहरी /हळद / हिंग (फोडणीत) / चिंच / गूळ वापरले तर ते अतिशय योग्य ठरते. शिवाय टरफलासकट कडधान्य न वापरता डाळ केल्याने ती आधीच पचनास सोपी असते.

हळद, हिंग, मेथी, मोहरीची फोडणी हा कदाचित केवळ भारतातच केला जाणारा प्रयोग असावा. आणि शरीराला
आवश्यक असणारे पण अगदी कमी प्रमाणात लागणारे घटक मिळवायचा तो चटकदार प्रयोग आहे.

( संदर्भ - स्वयंपाकघरातील विज्ञान, ले. डॉ. वर्षा जोशी )

या सर्व माहितीचे सोप्या भाषेत विवेचन वरील पुस्तकात आहे. अगदी अवश्य संग्रही ठेवावे असे पुस्तक आहे हे.

शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी असेल किंवा त्यांनी पित्ताचा त्रास होत असेल तर गोष्ट वेगळी. पण महाराष्ट्रात बर्‍याच भागात, शेंगदाण्याचा सढळ हस्ते वापर होतो.
अगदी इथे अंगोलातही भाज्यांमधे आणि सूपमधे दाण्याच्या कूटाचा सढळ हस्ते वापर होतो. अशी अंगोलातली कोबीची भाजी खुपच छान लागते.

कारल्याची भाजी कडूच लागायला हवी >>>>. +१००
ही भाजी छानच आहे. नक्कीच करणार.
पण पालकात पालक दिनेशदांचा(कॉर्न पालक) .......अग्दी हातखंडा चविष्ट आणि आयत्या वेळी आलेल्या पाहुण्यांना करून घालता येते.
तसंच कारल्यात कारलं वर्षूचं. अगदी ब्येष्टच! आता नाव नाही आठवत.पण कारल्याच्या चकत्या करून बडिशोप पावडर आमचूर किचन किंग मसाला. आहाहा तोंपासु!

कारल्याची भाजी कडूच लागायला हवी >>> अगदी अगदी.

मी कारल्याचे काप करून ते १-२ चमचे तेलावर परतते मग ती गरम असतानाच त्यावर तिखट, मीठ, हळद आणि आवश्यक असेल तर तेल (ऑ ऑ) चोळून डाळ-भात/चपाती किंवा नुसतीच चट्टामट्टा करत खाते.

अश्या प्रकारे कुठलीही भाजी करता येते ( दूधी, पडवळ, अलकोल, कोबी, घेवडा, पालेभाज्या ). आणि यात तंत्रात बर्‍याच अंशी जीवनसत्वे राखली जातात.>> म्हणजे प्रेशर कूकिंगच्या तंत्राने का? मीऑलमोस्ट सगळ्या भाज्या याच पद्धतीने करते. चमचाभर तेल घेऊन त्यात फोडणी करते. दाण्याचा कूट, चिंचेचा कोळ-गूळ हेदेखील वापरत नाही. या पद्धतीने केल्याने भाज्यांची मूळ चव जशीच्या तशी राहते. मसालादेखील ऑप्शनमधे असतो माझ्या रेसिपीमधे. प्रत्येक भाजीमधे अर्धीवाटी इतकी तरी भिजवलेली चणा-मूग-मसूर डाळ घातलेली असते. उप्लब्ध असतील तर मोड आलेले कडधान्ये. ताजा नारळ फोडला तर डाळीऐवजी खोबरे. डाळी भिजवल्याने प्रेशर कूकरला दोन ते तीन मिनिटे पुरतात. कडधान्य असेल तर एखाद मिनिट जास्त.

फ्लॉवर, दोडका, बीट, दुधी, पडवळ, दोडका, कोबी, फ्लॉवर, बटाटे, वांगे, पालक, मेथी, कारली, बीन्स, मुळा, उसळी या सर्व वरील मेथडनेच. किचनमधला निम्मा वेळ वाचतो या प्रेशर कूकिंग मेथडने.

कारलं म्हटलं की भरपूर लसूण घालून आणि हव्या तर बटाट्याच्या चकत्या घालून तेलावर परतून केलेल्या काचर्‍याच आवडतात मला. अशा त्या कुरकुरीत काचर्‍या अन बरोबर दहीबुत्ती! Happy

हो नंदिनी, भाज्यांमधली प्रथिनांची कसर भरून काढायला डाळ / कडधान्य / दाणे हवेतच.
मी वर उल्लेख केलेय ते पुस्तक आहारशास्त्रापेक्षा भौतिकशास्त्राच्या दृष्टीकोनातून लिहिलेले आहे.

मामी, काचर्‍या वगैरे मी पण कधी काळी आवडीने खात होतो. आता मात्र ( वय वाढल्याने ) असा विचार करू लागलोय.

<मी वर उल्लेख केलेय ते पुस्तक आहारशास्त्रापेक्षा भौतिकशास्त्राच्या दृष्टीकोनातून लिहिलेले आहे.>

रसायनशास्त्राच्या. भौतिकशास्त्राचा भाग किरकोळ आहे. Happy

रोहन प्रकाशनाचं हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

चिनूक्स ऐकत नाही हां.

ते स्वयंपाकघरातील विज्ञान पुस्तक आहे माझ्याकडे. नवीन स्वयंपाक शिकणार्‍या प्रत्येकाने वाचायलाच हवं इतकं सुंदर पुस्तक आहे. चिनूक्स म्हणतो तसं किचनमधील केमिस्ट्री व्यवस्थित सांगितली आहे त्यामधे. त्याखेरीज स्वयंपाकघरातील उपकरणे, अमुक एक पदार्थ असाच का शिजवावा? कमीतकमी वेलेत शिजवण्यासाठीचे टिप्स वगैरे छान आहेत.

हो चिनूक्स,
त्यांची प्रसाधन आणि वाद्ये या विषयावरची पण पुस्तके आहेत. मला आवडलेली गोष्ट म्हणजे
नव्या आवृत्तीत त्या आधुनिक संशोधनाची भर घालत असतात.

तुरीची डाल शिजायला ठेवली तरी माझे पित्त वाढते. आणि त्यात ही दुपारच्या वेळी तर जास्तच त्रास होतो. एकदा दुपारी कारले खावून कॉलेज ला गेले होते तर 2 तासात उलटी होवून बाहेर पडले. त्या दिवसापासून कारले नेहमी रात्रीच्या जेवणासाठी करते.
मलाही कारल्याच्या कचर्‍या आवडतात.

तूरडाळ एकदम नो नो. भयानक पित्त चढते, त्यात कारलं... शेंगदाणे.

मी नुसती कारल्याची भाजी केलीच कधी तर त्यात मूगाची डाळच घालून करते कोकम घालून. मग पित्त होत नाही.

पिंकी / झंपी.. हा त्रास नेहमीच होतो का ? महाराष्ट्र, गुजराथ, तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील लोकांना सहसा व्हायला नको. कारण परंपरेने आपण हि डाळ खात आलोय.
राजस्थान - मूगडाळ, पंजाब / हरयाना - उडीदडाळ, बंगाल - मसूरडाळ.. अशी साधारण विभागणी असते.

तूरीने मलादेखील पित्त होतं. कारल्याने पण तर नक्की होतंच. मी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, तमिळनाडू या चारही राज्यांमधे राहून देखील.

आमटी आम्ही मूग-मसूर अथवा तूर-मूग अशीच करतो,. पण कारले, वांगे वगैरे पित्तकर भाज्या असतील तर त्या दिवशी फक्त मुगचं वरण.

ह्यात बरेचसे साहित्य पित्तकर असल्याने चिंचेऐवजी कोकम टाकले तर चालेल का? कारण कोकम पित्तशामक असतेना? पित्तावर थोडा उतारा होईल. आम्हीपण बरीच वर्षे मुगडाळ वापरतो नेहमीच्या जेवणात तूरडाळ नाही खात.

भाजी आवडली, पित्ताचा त्रास असल्याने कोकमाचा वापर करून बघेन.

दिनेशदा, आम्ही लहानपणापासुन तुरदाळीचीच खिचडी खात आलोय. खान्देशसारख्या उष्ण प्रदेशात घराघरात रोज संध्याकाळी तुम्हाला तुरीच्या दाळीचीच खिचडी रांधलेली आढळेल.आम्ही शेपु,पालकची पातळ भाजी तुरदाळ व दाण्याचा कुट लावुन करतो. मेथीची भाजी, दाळ वांगे या सगळ्यात तुरदाळ असते. Happy
जळगावला लोकांच्या रोजच्या जेवणातल्या भाज्या (अगदी पालेभाज्यासुद्धा) दाण्याचा कुट + हिरवी मिरची लावुन केलेल्या असतात...भर उन्हाळ्यातसुद्धा.
अर्थात हे सर्व आपापली प्रकृती पित्त, कफ, की वात आहे यावर अवलंबुन असतं.

आमच्या कडेपन सात दिवसात ५ वेळा तरि तुरडाळीचे आमटी / वरण असते. ( मि तुरडाळ आणी मुगडाळ मिक्सच करुन ठेवते . आमटी मध्ये कोकम असतेच)..

अर्थात हे सर्व आपापली प्रकृती पित्त, कफ, की वात आहे यावर अवलंबुन असतं.>>++१११