Submitted by डॉ अशोक on 12 November, 2013 - 00:20
बायको म्हणजे.....
(कविवर्य फ.मु. शिंदे यांची माफी मागून)
बायको म्हणजे नुसते नाव नसते
सार्या आयुष्याला केलेला घेराव असते
जवळ असते तेंव्हा जाणवत नाही
दूर जाते तर "जा" म्हणवत नाही
पंगत संपते, पानं उठतात
भरल्या पोटी आसवं दाटतात
बायको हातात तशीच ठेवते काही
नवर्यालाच कळावं असं काही-बाही
बायको असते एक धागा
संसाराच्या देवळातल्या पणतीची जागा
घर हंसतं तेंव्हा तिही हंसते विसरून भान
घर रडलं की
ती ही सैरभैर, घालून खाली मान
बायको घरात नाही?
तर मग कुणाशी बोलतात जाइ-जुई?
बायको खरंच काय असते?
आपल्या मुलाची आई असते
बहिणीची ताई असते
तर नवर्यासाठी
काहीच्या काही असते
बायको असते जन्माची जोडीदार
मैत्रीण आणि प्रेयसी दोन्हीची दावेदार!
-डॉ. अशोक
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरय अगदी ! सुंदर गुंफलीये
खरय अगदी ! सुंदर गुंफलीये कविता ...
वा ! काका मस्तय !
वा ! काका मस्तय !
अप्रतिम काका..
अप्रतिम काका..
काका विडंबनाचा प्रयत्न छान
काका विडंबनाचा प्रयत्न छान झालाय आवडला
चला आता तर वैभवला सुद्धा ही
चला आता तर वैभवला सुद्धा ही कविता आवडली !!
शेवटच्या दोन ओळी सर्वात विशेष
शेवटच्या दोन ओळी सर्वात विशेष वाटल्या.
अप्रतिम.
अप्रतिम.