सावलीचा आकाशकंदील

Submitted by प्रीति on 11 November, 2013 - 10:19

सावलीने केलेला आकाशकंदील प्रचंड आवडला. सीटिएमएमने ह्या वर्षी आकाशकंदील स्पर्धा ठेवली होती आणि त्यात हाच आकाशकंदील करुयात म्हणुन ठरविले. सावलीने टेंपलेट तर पाठविली पण बाकी सामानाची जमवा जमव करे पर्यंत शुक्रवार उजाडला, स्पर्धा शनिवारी. शुक्रवारी ४ वाजता सुरु करुन रात्री ११ पर्यंत काम चालले. सावली तु खरचं महान आहेस. हा आकाशकंदील करताना सगळे टुल्स व्यवस्थित जमविले पाहिजेत. बारीक कापायचे काम साध्या पेपर कटरने केल्याने बराच वेळ लागला. क्विलींग टुल वापरताना मज्जा आली. छोट्या फुलपाखरांवर थोडं स्पार्कल लावलं.
सावली खुप खुप धन्यवाद!
आम्हाला दुसरं बक्षिस मिळालं.

akashkandil 001.jpgakashkandil 002.jpgakashkandil 003.jpgakashkandil 004.jpg

आकाशकंदीलाचा व्हिडिओ इथे बघायला मिळेल.
http://vishesh.maayboli.com/node/1432

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! इथे फोटोपण!!
आत्ताच तुझ्या इमेलला रिप्लाय केला आणि फोटो दाखव असे लिहीले होते. Happy
सुंदर झालाय कंदील. छोटी फुलपाखरेही मी केलीत त्यापेक्षा सुबक झालीत.
दुसर्‍या पारितोषिकाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

रच्याकने, जिन्याच्या भिंतींना दिलेला रंग खुप आवडला. मस्त दिसतोय.

अजुन एक रच्याकने; 'सावलीचा आकाशकंदील' हे नाव ' जादुई फुल' , 'अंधाराचा दिवा' अशा काहीशा पर्‍या / जादू इ. असलेल्या बालकथांचे नाव वाटतेय. Wink

सहीच ! सावलीचा आकाशकंदिल एक्दम मस्त ! Happy
लाईट लावलेला एक फोटो हवा आहे. खूप उत्सुकता आहे कसे दिसेल ह्याची.

अतिशय सुरेख आणि कल्पक आहे हा आकाशकंदील. खरंच क्रिएटीव आहे. मस्त !
इथे फोटो दिल्याबद्दल थँक्स. अगदी वेगळा आहे त्यामुळे करुन पहावासा वाटतोय.

अप्रतिम!!!

आकशकंदिल तर सुरेखच झालाय, पण फोटो काढण्यासाठी पण सामान किती सुबकपणे मांडून ठेवलय!

या आकाशकंदिलाची कृती कुठे शेअर केलेली आहे का? नसल्यास करणार का प्लीज?

अजुन एक रच्याकने; 'सावलीचा आकाशकंदील' हे नाव ' जादुई फुल' , 'अंधाराचा दिवा' अशा काहीशा पर्‍या / जादू इ. असलेल्या बालकथांचे नाव वाटतेय.
>>>>>>> हं.......मलाही असंच काहीसं वाटलं. :स्मित :

मस्त !!

सावलीचा आकाश कंदील..?
... कंदीलाच्या रोषणाईमधे.. 'सावली' कशी .... या उत्कंठेतुन धागा उघडला..
आणि हा आकाशकंदील बघायला मिळाला...
खुपच छान झालाय..
आणि अभिनंदन ....पारितोषिकासाठी...:)

सगळ्यांना खुप धन्यवाद!
लाईट लाऊन फोटो काढला नाहीए, काढल्यावर नक्की टाकेन.
अजुन एक रच्याकने; 'सावलीचा आकाशकंदील' हे नाव ' जादुई फुल' , 'अंधाराचा दिवा' अशा काहीशा पर्‍या / जादू इ. असलेल्या बालकथांचे नाव वाटतेय.>> Happy

अशक्य सुंदर आहे तो कंदील. मला शिकायला आवडेल. स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आहे का व्हिडिओत? घरी गेल्यावर चेक करता येइल.

हो शूम्पी, व्हिडिओत मस्त स्टेप बाय स्टेप दिलयं सावलीने. मोठ्या फुलपाखराची टेंपलेट मी सावलीकडुन मागविली आणि छोटी फुलपाखरं नवर्‍याने नेट्वरुन शोधुन प्रिंट केली.

Pages