मदन आणि यम

Submitted by अश्विनी भावे on 7 November, 2013 - 04:46

कुठेतरी ऐकलेली कथा आहे....

एकदा यम (म्रुत्यु देवता) कामासाठी एका वनात फिरत होते. फिरता फिरता खूप उशीर झाला.
यम देवता दमून विश्रन्ती साठी एका गुहेमध्ये गेले. झोपण्या आधी त्यानी आपला धनुष्य बाण काढून ठेवला. आणि ते झोपी गेले.

योगायोगानी त्याच वेळी मदन (प्रेम देवता) त्या गुहेत आल्या. अन्धार असल्यामुळे झोपलेले यम महाराज मदनाला दिसले नाहीत. मदनाने सुद्धा आपले धनुष्य बाण काढून ठेवले.

दुसर्‍या दिवशी सकाळी यम घाईघाईनी गुहेतून बाहेर पडले. आणि चुकुन जाताना आपले काही बाण गुहेत विसरले आणि त्याऐवजी काही बाण मदनाचे घेतले.

काही वेळानी मदन सुद्धा उठले आणि शिल्लक राहीलेले बाण घेउन बाहेर पडले..

ह्या दोन्ही देवतानी केलेल्या ह्या घोळाची शिक्षा मात्र आपण मनुष्य भोगतो आहोत.......... कसे काय??

हेच बघा ना... जगात किती तरी तरुण अगदी कमी वयामध्ये मदनानी उचललेला चुकीचा बाण लागून मरण पावतात.
आणि या उलट यमाचे चुकीचे बाण लागल्यामुळे कितीतरी म्हातार्‍याना म्हातारचळ लागून ते कामातूर होतात.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यावेळी बारकोडींग नव्हतं ना म्हणून असं झालं. Wink
पण मला खोटी वाटते ही गोष्टं.
नुसते बघूनही बाण कुणाचे ओळखता येत असले पाहिजे.
मदनाच्या बाणाला मस्तं लाल गुलाबी पिसं लावलेली असतील आणि यमाच्या पांढरी किंवा काळी.

saati aaplyala he asa serial baghun vatat..banasarkhe ban asanyachi shakyata pan ahech na..

He he he .... LOL!!!! Pan he jast karun purushanchya babatit hota ki kkay?>>>>>मामी णिषेध.... Happy बायकन्ना होतच नसेल असं कशावरून?

ही 'ऐकलेली' कथा तुम्हीच बनवली आहे का हो?
आणि यम बाण मारून प्राण घेतो हा फंडा पहिल्यांदाच ऐकला. माझ्या माहितीप्रमाणे यमराज रेड्यावरून येऊन माणसाला डबलसीट घेऊन जातात.

माझ्या माहितीप्रमाणे यमराज रेड्यावरून येऊन
माणसाला डबलसीट घेऊन जातात.>>हा हा Lol

बरं केलंत कथा सांगितली ..अस्मादिकांना ठाऊक नव्हती .

बायकन्ना होतच
नसेल असं कशावरून?>>जोरदार अनुमोदन नानांना !

हहगलो
एखाद्याला दोघांनी एकाच वेळी बाण मारले आणि दोन्ही मदनबाण निघाले, तर ... सुपर ड्यूपर कामातूर >> जाम गोची होइल.

actually, ghyayala yamadut yetat aani te yamapashacha vaapar karataat.
Companycha maalak kadhich salesman banun maal vikat naahi.

हि खूप जुनी कथा आहे. कॉपीराईटचा भंग करु नका. संदर्भ देवून लिहा.

मस्त कथा आहे. पण यम माणसाला मेल्यावर रेड्यावरून डबलसीट घेऊन जातो हे जास्तच आवडलं.
सुशांत यांचे त्याबद्दल अभिनंदन. मस्त कॉमेडी आहे.

माझ्या माहिती नुसार यमराज यांची आयुधे गदा व फास ही आहेत. >>> ही कथा त्या आधीची आहे , यमाने नंतर हत्यारं बदलली . Lol

कथा आणि प्रतिसाद! Rofl Rofl

कुछ हजम नहि हुआ...

माझ्या माहिती नुसार यमराज यांची आयुधे गदा व फास ही आहे.

>> खुप शंका काढणार्यालोकांसाठी ते बाण वापरतात.
मस्त आहे कथा!.