Pineapple cake

Submitted by Anvita on 7 November, 2013 - 01:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाटी मैदा
१ वाटीहून थोडीशी जास्त साखर
४ अंडी ( ३ घेतली तरी चालतात . कदाचित मग मिश्रण घट्ट वाटले तर थोडे दूध घालायला लागेल )
३/४ कप तेल
१.५ चमचा बेकिंग पावडर
pineapple essence (वापरला नाही तरी चालतो कारण pineapple tin मधील पाणी वापरायचे आहेच )
pineapple tin ( त्यातील pineapple आणि पाणी दोन्हीही वापरायचे आहे )
pineapple tin नसेल तर फ्रेश pineapple वापरला तरी चालेल .
whipping cream ( मी cool whip वापरले आहे)

क्रमवार पाककृती: 

मैदा,साखर, अंडी, essence , तेल, बेकिंग पावडर सगळे एकत्र फेटून घ्यावे . मिश्रण घट्ट वाटल्यास थोडेसे दूध घालावे . मिश्रण oven proof भांड्यात ओतावे . त्याआधी भांड्याला तेल/ बटर लावावे व मैदा भुरभुरून घ्यावा म्हणजे केक भांड्याला चिकटणार नाही.
oven ३५० deg F ला preheat करावा . मग केक bake होण्याकरता ठेवून द्यावा . साधारण अर्ध्या तासात बेक होतो .
केक गार झाल्यावर बरोबर मधोमध कापावा . त्याचे दोन भाग होतील . pineapple tin मधले पाण्यात थोडे साधे पाणी व साखर मिसळून ठेवावी .
आता हे अननसाचे पाणी दोन्ही केक वर हळूहळू साधारणपणे केक moist होई पर्यंत घालावे . मग दोन्हीही केक वर cool whip पसरून घावे . मग अननसाचे तुकडे पसरवावेत .सगळ्यात शेवटी एका केक च्या तुकड्यावर दुसरा ठेवावा व नित सगळ्या बाजूने cool whip लावून घावे.

image_0.jpg

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अनविता, प्रतिसादात खाली , मजकूरात image किंवा link द्या. असे लिहिलेले आहे, त्यातल्या image या शब्दावर क्लीक करा.
आणखी माहितीसाठी मदतपुस्तिका पहा.

image upload होते आहे पण ती प्रतिसादात दिसत नाहीये. काय माहित काय चुकते आहे . खरे तरमी आधी एकदा एक image व्यवस्थित टाकली होती .

.

चैत्राली, ब्रिज, सुहास्य,वर्ष-म केक आवडल्याबद्दल धन्यवाद!
दिनेशजी टाकता आला एकदाचा फोटो !

स्वाती, सीमा , लाजो धन्यवाद .
पुढच्या वेळी केला कि नक्की तसा फोटो काढेन . पण तो केक अमेरिकेत असताना करायची इथे cool whip साठी बहुतेक फ्रेश क्रीम आणून फेटावे लागेल . खरेतर हा उद्योग एकदा केला पाहिजे मुलांना पण खूप आवडतो हा केक.

हो चवीला छान लागतो . pineapple pastry सारखी चव असते . इथे भारतात pineapple pastry मध्ये खूप essence घालतात . त्यामुळे एकडची तितकी आवडली नाही. अर्थात मी पुण्यात try केली ४-५ ठिकाणी इतरत्र माहित नाही.
pineapple pastry पण अशीच करतात . फक्त छोटे आयताकृती तुकडे करायचे .

आरती धन्यवाद ! तुझ्या सूचनेनुसार इथे पण फोटो पाककृती मध्ये टाकता आला . हा cake तुझ्यासाठी

अन्विता, मी पण असच विचारून शिकली ईकडे. त्यात धन्यवाद नको. Happy
छान केक दिसत आहे.
अग हा केकचा धागा वर आणलास तेव्हाच ठरवल बनवायचा पण ३ अंडी मार खात आहेत. घरी अननस आहे. अंड्यांसाठी काही पर्याय नाही का??