स्विस सहल - भाग ७ ( शेवटचा ) झुरीक आणि परतीचा प्रवास

Submitted by दिनेश. on 28 October, 2013 - 05:34

माझा पुर्ण दिवस सहलींवरच जायचा पण मुक्काम झुरीक मधे होता. तरी सकाळी लवकर उठून व संध्याकाळी
मी नदीकाठी एक फेरफटका मारत असे. झुरीक स्टेशनसमोरचा रस्ता जरा गजबजलेला असतो. तिथे अनेक दुकाने आहेत. त्यामूळे पर्यटकांची गर्दी असते. पण बाकीचे भाग निवांत आहेत.

संध्याकाळी कूप या सुपरमार्केटमधून कॉफीचे दोन ग्लास आणि थोडेसे खायला घेऊन मी भटकत असे.
तिथेही अर्थातच फुलाफळांची रेलचेल होती. रात्री १० वाजेपर्यंत दिवसासारखा उजेड असायचा. तर तिथले आणि माझ्या आवडत्या देशाचे निरोप घेतानाचे फोटो.

१.लाल मोहक फळे

२.निळी फळे

३. पांढरी फुग्यासारखी फुले

४. म्यूझियमच्या मागचे गार्डन

५. तिथला एक सुंदर पुतळा ( असे सहा आहेत तिथे )

६. तिथेही अनवट राग होताच

७. सहली जिथून निघतात तिथे प्लम्स चे झाड आहे, पण फळे पिकली नव्हती.

८. नदीकाठचा पांढरा तुरा

९. नदीकाठचेच जांभळट फुल

१०. नदी

११. वरच्या फोटोतली गुलाबी फुले, जरा जवळून

१२. झाडाची झुकलेली फांदी

१३. लाल मण्यासारखी फळे

१४. बदकाची सुंदर पोझ

१५. आणखी एक पोझ

१६. पाय टाकूनी जळात बसला, असला ???

१७. लगेच विचारपूस करायला आलेले बदक.

१८. नदीजवळच्या उद्यानातले एक शिल्प

१९. सध्या झुरीक स्टेशनचा विस्तार होतोय. मार्ग थोडे बदललेले आहेत. पण त्याने स्टेशनसमोरच्या
बागेला मात्र धक्का लागलेला नाही.

२०. ट्रेनची वाट बघताना

२१. ट्रेनचा वरचा मजला. झुरीकहून एअरपोर्टला जायला ट्रेन फार स्वस्त आणि सोयीची आहे. १२ मिनिटात थेट विमानतळाच्या तळमजल्यावरच जातो आपण.

२२. मधे ओर्लिकॉन नावाचे स्टेशन लागते. ( तिथेही मी राहिलेलो आहे. )

२३. कातार एअरवेज ची खिडकी खास होती. तो काळा अर्धचंद्राकृती भाग दाबून काचेचा रंग जास्तीत जास्त मोरपिशी करता येत होता. शिवाय पायलटचे सर्व खिडक्यांवर नियंत्रण होतेच. ( विमान उडताना आणि उतरताना सर्व खिडक्यांवरील तावदाने उघडी ठेवावीत असा नियम आहे. एरवी हवाई सुंदर्‍यांना प्रत्यक्ष फेरी
मारून ते साधावे लागते. ) यापुढचे फोटो किंचीत धूसर आहेत कारण ते (उडत्या ) विमानातून काढलेले आहेत.
या विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यावर बंदी नव्हती.

२४. विमानातून झुरीक

२५. विमानातून झुरीक विमानतळ

२६. विमानातून दिसलेले लेक ( बहुतेक लेक झुरीक )

२७. आल्पस

२८ आप्ल्स

२९ दरीमधून जाणारी नदी

३०. निळे सरोवर

३१. परत आल्प्स

३२. एक सुंदर आकाराची नदी दिसली. पण आजूबाजूला वस्ती दिसत नव्हती

३३. ती नदी टायग्रीस असावी असे वाटले.

३४. पण टायग्रीस नव्हती हे समोरच्या फलकावरुन कळले.

३५. टायग्रीस मग लागली पण फोटोच्या कक्षेत नव्हती.

३६. भूगोलातली फॉन थ्यूनन थिअरी ऑफ सिटी एक्स्पांशन आठवली ना ?

या बरोबरच हि मालिका संपवतोय. मला या सहलीने खुप आनंद दिला. फोटोच्या रुपात का होईना, तुम्हाला
दाखवू शकलो यातच समाधान. इतक्या वेळा जाऊनही स्विस परत भेटीचे निमंत्रण द्यायला विसरत नाही.
आणि मी पण तसे वचन द्यायला चुकत नाही.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव... नुस्ती ब्यूटी!!!!!!!!

कोणकोणत्या फोटो ची तारीफ करू.... समजतच नाहीये..

शोभा + १००

कोणकोणत्या फोटो ची तारीफ करू.... >>>>>>>>>>वर्षे, आता असं म्हण, "तारीफ करू क्या उसकी जिसने इन्हे बनाया! " Happy

आभार दोस्तानो.
विमानाने पुर्ण उंची गाठल्यावर साध्या कॅमेराने असे स्पष्ट फोटो काढता येतील असे मलाही वाटले नव्हते.

शोभे, वर्षू - मी नाही तो बनानेवाला Happy

अतिशय सुंदर सफर! स्वित्झर्लंडला जाऊन आल्याचं समाधान मिळालं तुमच्यामुळे. Happy
विमानातून काढलेले फोटो पण सहीच आहेत.