सोनाली ....

Submitted by पुरंदरे शशांक on 31 October, 2013 - 00:17

सोनाली .......

आमच्याकडे अनेक माऊ अचानक येऊन रहातात, मग तशाच अचानक जातातही - त्यातलीच एक - सोनाली - तिचे अनेक नैसर्गिक भाव टिपताना माझ्या दोन्ही मुली त्यात अगदी रमून जात ...... त्यातील काही विशेष फोटो इथे शेअर करीत आहे .....

s3.jpgs2.jpgs1_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा.... मस्त चालेल...
"सोनाली" च्या रीफ्लेक्शन ला पुर्ण फोटो मधे घेतले तर ... अगदीच पर्फेक्ट बसेल

अमेझिंग. खूप मस्त आलेत फोटो. आवडले.
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.

रूनी मला पण Wink

शशांक, मस्त आहेत फोटो. एका मैत्रीणीने तिच्या मांजराचा खेळतानाचा एक फोटो मुलाला भेट म्हणून दिला आहे...आमचं तेवढंच घरगुती पशुप्रेम Proud

रूनी +१ , मलाही तेचं आठवलं, धडा होता मराठीत तिच्यावर - मला नव्हता पण मोठ्या मैत्रिणिंच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतयं Happy

ओह मांजर म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय. मला अशी सोनेरी मांजरं फार आवडतात.

सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.

मलाही तेच आठवलेले..

एनीवेज, सिंहीण नसली तरी मांजर काय सिंहापेक्षा कमी नाहीय.. तोच रुबाब, तीच ऐट, तेच चालणे आणि तोच आपण राजा असल्याचा आव..

मस्त आहेत फोटो सगळे.. तिस-या फोटोत पिल्लुही आहे काय?

तिस-या फोटोत पिल्लुही आहे काय? >>>>> ती सोनाली पिल्लू असताना काढलेले हे फोटो आहेत - ती सोनाली एका खेळण्यातल्या माऊशी खेळतीये - अग्दी रमून खेळायची त्या खेळण्याशी ....

Pages