मी वाचलेले पुस्तक : दुर्दम्य : लोकमान्य टिळकान्चा जीवनपट ( लेखक गन्गाधर गाडगीळ )

Submitted by पशुपत on 16 October, 2013 - 00:35

एका धाडसी आणी कणखर व्यक्तीमत्वाचे प्रखर बुध्धी , देशप्रेम , मित्रप्रेम , समाजप्रेम , साहस , निर्धार असे विविध पैलू दखवणारी कदम्बरी. खरे तर ही परीपूर्ण "पटकथा" आहे. प्रसन्गान्ची उत्तम निवड आणी बारकाव्यान्सहित वर्णन यामुळे नाट्यमयता अखेर पर्यन्त टिकून राहते.
टिळकान्च्या व्यक्तीमत्वाची छाप दीर्घकाळ मनावर रहाते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी, दहावी-बारावीच्या दोन्ही सुट्ट्यांमधे वाचलेलं. मी टिळकमय झाले होते आणि अजूनही ते भारावलेपण टिकून आहे. वाचायला हवं पुन्हा. आणखी नव्याने उलगडेल हा थोर माणूस.
गाडगीळांच्या कन्येचा 'बाबा, हे टिळक आपले कुणी नातेवाईक आहेत का हो?' हा प्रश्नही जाम म्हणजे जामच आवडला होता तेव्हा. या पुस्तकामुळे गाडगीळही आवडायला लागले.

टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.