Submitted by सखा on 22 October, 2013 - 11:51
उरकून घेण्या सारखा
सुर्यास्त पहायचा
वाघ मागे लागल्या
सारखा किल्ला चढायचा
डोळ्या ऐवजी कॅमेर्यानेच
जास्तं निसर्ग पहायचा
ताजी हवा फुफ्फुसात
भरून घ्यायच्या ऐवजी
बका बका शेंगा खायच्या
वर सतत फोन बघायचा
तेव्हा माझ्या जवळ
अजिबात फिरकू नका
असं त्यांना स्पष्टपणे
समुद्र किनारा म्हणाला
-सत्यजित खारकर
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा!
अरे वा!
तेव्हा माझ्या जवळ अजिबात
तेव्हा माझ्या जवळ
अजिबात फिरकू नका
असं त्यांना स्पष्टपणे
समुद्र किनारा म्हणाला
मस्त... चपखल वर्णन.
हायकूच्या जवळ जाणारं काव्य
हायकूच्या जवळ जाणारं काव्य
(तांत्रिक दृष्ट्या म्हणत नाही!)
मस्त
मस्त
छान .
छान .