तमाशा

Submitted by समीर चव्हाण on 18 October, 2013 - 02:08

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच काही झाले आहे
बरेच काही होते आहे

भ्रम तृष्णेचा गोल फिरवतो
वळते नाही, कळते आहे

दुनिया एक तमाशा मोठा
कुठे कुणाचे चुकते आहे<<< वा वा

शेर आवडले.

वाह, मस्तचे सगळी गजल .....

भ्रम तृष्णेचा गोल फिरवतो
वळते नाही, कळते आहे >>>>> हे क्लाऽसच .....

बेफीजींनी उल्लेखलेलेच शेर मलाही जास्त आवडले इतर शेरही आवडलेतच
मला शेरांपेक्षा काही सुटे मिसरे जास्त भावले जसे>> कशातुनी बाहेर पडावे << हा मिसरा इतका भिडला की असे वाटले की मी याला कधीपासूनचा ओळखतो जणू तो माझ्या आतच कितीतरी दिवसापासून राहतो आहे

धन्यवाद

भ्रम तृष्णेचा गोल फिरवतो
वळते नाही, कळते आहे..फार आवडला..

नेहमीप्रमाणे न रहावून-

तना जरी दे शीतल छाया
चंदन रानी जळते आहे
-रमा

धन्यवाद.

बेफीजींनी उल्लेखलेलेच शेर मलाही जास्त आवडले इतर शेरही आवडलेतच

प्रत्येकाला आपआपल्या आवडीनुसार, अनुभवानुसार वेगवेगळे शेर क्लिक होतात.
हे स्वाभाविक आहे. उदा. तुझ्यावाचुनी चा शेर अनंत आणि चित्तरंजन ह्यांना फार-फार आवडला होता. इथे बहुतेकांना मत्ला आणि भ्रम आवडल्याचे दिसते. मात्र आपली आवड दुस-या कोणाच्या आवडीने प्रभावित होणे हे चांगले लक्षण नाही, असे वाटते. प्रभाव असतो, असावा, मात्र त्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे चांगले. सुरुवातीच्या दोन-चार वर्षे भटांच्या प्रभावाखाली होतो. त्यातून बाहेर आलो म्हणून आज जे काही बरे-वाईट लिहितो त्यावर आपला रंग देत आहे, प्रयत्नशील आहे. एखाद-दुस-या रचनेवर, विचारावर प्रभाव हेही मान्य आहेच. जसे माझ्या रचनांवर अधेमधे अनंत, चित्तरंजन, आणि भूषण ह्यांचा प्रभाव मला स्वतःला जाणवतो. मात्र सगळ्यातून स्वतःची ओळख, स्वतःचा विचार होणे महत्त्वाचे वाटते. ह्यासाठी अधिकाधिक वाचायला हवे, चिंतन हवे.
कमी-जास्त बोलल्यास राग नसावा.

समीर

धन्यवाद सर
आपण एखाद्याच्या लेखनावरील दुसर्‍याचा प्रभाव ह्या बद्दल सांगीतलेत ते १००% पटले
पण आपला गैरसमज नको व्हायला म्हणून सांगू इच्छ्तो की इथे दिलेला प्रतिसाद मी बेफीजीना ते शेर आवडले ह्या प्रभावातून दिलेला नाही मी गझल वाचता वाचताच मला जास्त आवडले शेर शोधून पाहिले मग खाली प्रतिसाद वाचायला सुरुवात केली तर बेफीजीनाही तेच शेर आवडले आहेत हे कळून आले मग मी तेच कोट करण्या ऐवजी फक्त ते वाक्य प्रतिसादात दिले इतकेच
बेफीजींचा प्रतिसाद येण्या आगोदर माझा प्रतिसाद येवू शकला असता तर आपणास वरील गैरसमज झाला नसता असे वाटते आहे किंवा बेफीजीनी तो प्रतिसाद देण्या आधी कुणी इतरानी तो दिला असता व मीही क्ष यांच्याशी सहमत म्हटले असते तर अश्याही वेळी आपणास हा गैरसमज झाला नसता असे वाटते आहे
अनेकदा काही गझलांवर माझा प्रतिसाद आधी आला व नंतर बेफीजींचा पण दोघाना अधिक आवडलेले गझलेचे शेर सेमच निघाले आहेत असाच प्रकार माझ्या व इतरही काही प्रतिसादकांच्या बाबतीतही झाला आहे असेही स्मरते
असो आपल्या 'प्रभाव' ह्या मुद्द्याशी मी सहमत आहे आपण त्यातून सांगत आहात ते लाख् मोलाचे आहे त्याबद्दल धन्यवाद
लोभ असावा राग नको :).
(.तसेही ह्या प्रतिसादात मी आणि तुमच्या प्रतिसादात तुम्ही राग येण्यासारखे काही म्हटले आहे असे वाटत नाही आहे मलातरी )

मी शेवटच्या शेराच्या पहिल्या ओळीबद्दलही बोललो बाकी कुणे कुठे काही बोलले त्या ओळीवर Happy

ओ नाही हो जोशी... समीरजी सरच आहेत नुसते सर नाहीत तर प्रोफेसर आहेत ते आयाय्टीत ...त्यामुळे खरेतर प्रोफेसर म्हणाल्यास योग्य ठरले असते पण प्रोफेसर म्हटले की देवपूरकर आठवतात म्हणून समीरजीना सरच म्हणूयात आपण लोक्स .. Happy

जयदीपः
मागे एकदा मस्त ... सर अशी कमेंट तुम्ही दिली होती म्हणून म्हटले.
तसा मी नेहमीच मस्त असतो.
असो, वैभव मी सर (प्रोफेसर नव्हे) गणिताचा आहे गझलेचा नव्हे.
प्रोफेसर म्हटले की देवपूरकर आठवतात ह्याच्याशी पूर्ण सहमत.