लिहावे स्वतः तर गदारोळ होतो

Submitted by बेफ़िकीर on 4 October, 2013 - 11:56

लिहावे स्वतः तर गदारोळ होतो
अभिप्राय द्यावा तरी घोळ होतो

कुणाला नकोशी अशी आज माशी
कधी एक संपूर्ण मोहोळ होतो

किती टेकड्यांचे सपाटीकरण हे
तरी हायवेचा कसा बोळ होतो

मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो

कशाला इथे यायचे हे कळेना
इथे रोजचा हल्लकल्लोळ होतो

तुला 'बेफिकिर' भेटला की तुझाही
समुद्रापुढे तुच्छ ओहोळ होतो

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला बहुतेक मागे फुटकळ शेरांमध्ये वाचला होता ..बेस्टच आहे !

मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो>>सुंदर

मक्ता नेहमीप्रमाणेच दर्जेदार !

लिहावे स्वतः तर गदारोळ होतो
अभिप्राय द्यावा तरी घोळ होतो......... दं ड व त !!!

किती टेकड्यांचे सपाटीकरण हे
तरी हायवेचा कसा बोळ होतो..........अफाट निरिक्षण क्षमता ! मान गये !

मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो.........क्या बात ! क्या बात !!

ल्लकल्लोळ ?? माझ्या माहितीनुसार ल ला ल नसतो बहुधा . माझे काही चुकत असल्यास क्षमस्व
सर्व शेर छानच

कशाला इथे यायचे हे कळेना <<< ह्या ओळीवरून एक सुटा शेर आठवला

ह्या इथे यावे आसे काहीच नाही
छान वाटावे असे काहीच नाही

धन्यवाद

किती टेकड्यांचे सपाटीकरण हे
तरी हायवेचा कसा बोळ होतो

मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो

हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.

माशी 'मोहोळ' होतो ... ? असे चालते का/?<<<<<
चालते नक्कीच चालते का व कसे ते पहा ......
या शेरात शायर स्वतःबद्दल बोलत आहे मी हा शब्द शेरात कुठेही नाही पण होतो ह्या क्रियापदाचा वापर इथे शायर स्वतःबद्दल बोलताना करत आहे हे लक्षात घावे . काल आणि आज परिस्थिती कशी बदलली आहे हे शायर सांगत आहे . आज मी कुणाला नकोशी झालेली एक माशी आहे कधी (काल /पूर्वी) मी कुणाला नकोसे असे एक अख्खे मोहोळ होतो (आता मी लोकाना किती हवासा वाटू लागलो आहे पहा !! Happy )

मी मधे बोललो त्याबद्दल क्षमस्व बेफीजी

मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो

>> व्वाह !! मस्त..

(मला माझा एक शेर आठवला..)