लिहावे स्वतः तर गदारोळ होतो

लिहावे स्वतः तर गदारोळ होतो

Submitted by बेफ़िकीर on 4 October, 2013 - 11:56

लिहावे स्वतः तर गदारोळ होतो
अभिप्राय द्यावा तरी घोळ होतो

कुणाला नकोशी अशी आज माशी
कधी एक संपूर्ण मोहोळ होतो

किती टेकड्यांचे सपाटीकरण हे
तरी हायवेचा कसा बोळ होतो

मला तू सुचावीस हे वाटते पण
मला तू सुचवलीस ती ओळ होतो

कशाला इथे यायचे हे कळेना
इथे रोजचा हल्लकल्लोळ होतो

तुला 'बेफिकिर' भेटला की तुझाही
समुद्रापुढे तुच्छ ओहोळ होतो

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - लिहावे स्वतः तर गदारोळ होतो