आजही माझी अवस्था काल होती तीच आहे

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 01:49

गझल जुनी आहे आज सादर करण्याचे कारण की ही कधी व का सादर करायची हे माझे फार पूर्वीच ठरले होते
त्या कारणाचा व माझ्या व्यथित मनोवस्थेचा , मध्यंतरात घडलेल्या कोत्याही प्रसंगाचा तसूभरही संबंध नाही ह्याची वाचकांनी क्रूपया नोंद घ्यावी व कसलाही गैरसमज करून घेवू नये

ज्याना आवडणार नाही त्यान्नी प्रतिसाद देऊ नयेत !!!
ही माझी स्वतःची अत्यंत आवडती गझल असून ह्यावर कुठलीही टिंगल टवाळी अजिबात खपवून् घेतली जाणार नाही
__________________________________

जुनी गझल :

आजही माझी अवस्था काल होती तीच आहे
आजचाही शेर माझा विठ्ठलासाठीच आहे

पुण्यवंतांच्या कधी मयतासही मी जात नाही
जे मला म्हणतात.. माझा शेरही पापीच आहे

चालवा खटला कितीही काळ माझ्या पातकांचा
साक्ष 'तो' देणार माझी आयत्यावेळीच आहे

सांगण्या माझी चहाडी प्रकृती गेली तिथे पण
त्या बिचारीला न कळले त्या विटेवर मीच आहे

स्वर्ग म्हणतो "वैभवा ये ! " मीच तिकडे जात नाही
जाणतो वैकुंठ माझा भीवरेकाठीच आहे

_____________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"स्वर्ग म्हणतो "वैभवा ये ! " मीच तिकडे जात नाही
जाणतो वैकुंठ माझा भीवरेकाठीच आहे " >>> व्वा !.... हा सर्वात विशेष.
---------------------------------------------------------------------------------------------------------

"ज्याना आवडणार नाही त्यान्नी प्रतिसाद देऊ नयेत !!!" >>> हे अजिबात पटण्यासारखं नाही.
लेखनकर्त्याकडे लेखनाचे प्रताधिकार असतात, पण मताधिकार मात्र केवळ वाचकांकडे.

आवडली रे आवडली... एकदम आवडली. Happy Happy

माझ्यासाठी हासिल-ए-गजल >>>

सांगण्या माझी चहाडी प्रकृती गेली तिथे पण
त्या बिचारीला न कळले त्या विटेवर मीच आहे

छान जमलीये..
पण "ज्याना आवडणार नाही त्यान्नी प्रतिसाद देऊ नयेत !!!" >>> हे अजिबात पटण्यासारखं नाही.+१

स्वर्ग म्हणतो "वैभवा ये ! " मीच तिकडे जात नाही
जाणतो वैकुंठ माझा भीवरेकाठीच आहे

जीवास भिडल्या रे ओळी

vaibhavjee...

tumhi khup chaanach lihita...

sagle sher aprateem ahet vaibhavjee...

"ज्याना आवडणार नाही त्यान्नी प्रतिसाद देऊ नयेत !!!" >>> हे अजिबात पटण्यासारखं नाही.
लेखनकर्त्याकडे लेखनाचे प्रताधिकार असतात, पण मताधिकार मात्र केवळ वाचकांकडे.
> > >
उल्हास भिडे, १०० % अनुमोदन.
-------------------------------------

वैभव,

"स्वर्ग म्हणतो "वैभवा ये ! " मीच तिकडे जात नाही
जाणतो वैकुंठ माझा भीवरेकाठीच आहे "
> > >
म्हणजे काय अर्थ लावावा बरे ?

सर्वांचे मनःपूर्वक आभार
राजपुर स्वर्ग , वैकुंठ व भूवैकुंठ ह्यातला फरक लक्षात आल्यावर आपल्याला हा शेर समजेल असे वाटते