देशाला शेतकर्‍याची गरज नाही.............

Submitted by चिंतामण पाटील on 4 October, 2013 - 08:10

मायबोलीवर अनेक वर्ष मी आहे. इतक्या विषयांवर मायबोलीकर गप्पा मारतात की विचारता सोय नाही. अगदी सिरियाची समस्याही त्यांना आपली वाटते. पण शेतकरी त्यांना आपला वाटत नाही. मी याच चालू घडामोडीत अत्यंत महत्वाचे.... या सदरात शेतकरी सुरक्षा विधेयक तयार करण्या बाबत सगळ्यांना आवाहन केले. कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. ते सोडा, शेती आणि शेतकरी यातही शेतकरी सुरक्षा विधेयक मांडलं पण रिस्पॉन्स नाही. यावरुन मला आता पटायला लागलय की या देशाला शेतकर्‍याची गरज नाही. या नंतर शेतकरी ह्या विषयावर मी पण लिहिणार नाही. आधी मायबोलीवरच यायचं नाही असं ठरवलं होतं पण मायबोलीवर राग काढणं बरोबर नाही असं वाटलं. म्हणून मायबोली साथ नाही सोडणार पण शेतीवर काही लिहायचं नाही हे मात्र नक्की. कारण या देशाला शेतकर्‍याची खरच गरज नाही. चुकलं असल्यास सगळ्यांची क्षमा मागतो.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटील अहो रागावू नका...
ज्या देशाला शेतकर्‍याची गरज नाही तो काय अमेरिकेहून बिग्-मॅक आणून खाणार आहे का?

पण 'विधेयक तयार करणे' वगैरे मायबोलीकराला जमले नाही म्हणजे त्याला शेतकरी नको असे होत नाही.

उद्या तुम्ही म्हणालात, 'भारतातून युरोपला चालत कसे जायचे' याचा आराखडा तयार करा, तर तेवढा अनुभव असल्याशिवाय उगाच त्यात हात घालणे उचित नाही .. नाही का?

तेव्हा रागावू नका, Break the task into small pieces so that people can look into it..

क्षमा करा आम्हाला पाटील ,लाजच वाटते आहे स्वत:ची, पण गोष्टीगावाचे म्हणतात ते बरोबर आहे.
Break the task into small pieces so that people can look into it..
इथे बरेचसे लोक शहरी मानसिकतेचे आहेत, त्यांची जाणीव तुमच्यासारखे लोक बदलू शकतात.

पाटील बुवा इथले माबोवरची मंडळी बहुतकरुन पांढरपेशे आयटी वगैरेत काम करणारी आहेत, यांना शेतीतली बाराखडीहि माहीत नसावी ..त्यांच्याकडून शेतकर्याँचे विधेयक तयार करण्याची अपेक्षा बाळगणं योग्य नाही, जो शेतात राबतो तोच त्याविषयी अधिकारवाणीने बोलू शकतो

पाटील तूम्ही मुटे आणि मी, आपण तिघांनी विधेयक तयार करुयात... मी पण एक शेतकरी आहे. हाडाचा नसलो तरी शेती माझा पुरक व्यवसाय जरुर आहे .

पाटील भाऊ,
असा राग मानु नका.

माबोवर शेती संबधीत, शेतकरी असणारे लोक खुप कमी आहेत, जे शेतीशी निगडीत आहेत, त्यांच्या पर्यंत तुमचा विषय पोहोचणं जास्त महत्वाच आहे. ते नक्कीच यावर लिहितील.

ते गझलेत दंग असावेत
शक्यता आहे..

धीरज,गोष्टीगावाचे
अनुमोदन..

मंडळी तुमचं शेती फिल्ड नाही मान्य. पण काही मंडळीतर या क्षेत्राशी निगडीत नक्कीच आहे. आणि जरी नसाल तरी एकदा त्या धाग्यावर तर जा आणि वाचा. काही नक्कीच सुचेल.

व्वा !

ईथेही टवाळखोरांना प्रवेश आहेच ! आधुनिक पणा थोडा शेती विषयात दाखवला असता तर असे होत करु शेती

व्यवसायातले देशबंधु उदासीन झाले नसते.

खायला आयतं मिळतं आहे ना ? मग ते कोणी पिकवलं, काय कष्ट करुन आणि कुठे पिकवलं हे ज्या लोकांच्या

रिकाम्या डोक्यात शिरत नाही, ते काय दिवे लावतात आता विधेयक तयार करण्यात पाहुया Happy .

अहो पाटील साहेब ! तुम्ही मनापासुन लिहिले आहे, बोलत आहात, पण अश्याच मनापासुन बोलणार्‍या माबो

करांच्या धाग्यावर काही नतद्रष्ट येतात आणि त्या धाग्याचा नास करतात.

नुसती पोकळ हवा सोडणारे भरपूर आहेत ईथे, तेव्हा थोडं ....

पाटील साहेब !

मिळाला ना खरा तण ? म्हणुनच तिकडे म्हणालो होतो, अगदी थोडावेळ थांबा, आपल्या आपण प्रगट होतील Happy

हा, हा, हा, हा ...... सगळेच मासे आहेत, पट्कन गळाला लागतातच........खरोखरंच अक्कल नाहीये.

हा, हा, हा, हा, हा, हा, हा.

अजुन येतील.