पुरेसे धडधडत नाही ...

Submitted by सुशांत खुरसाले on 3 October, 2013 - 05:35

खरा वेडावलो नाही, पुरेसे धडधडत नाही..
अता होईल ती माझी असे काही घडत नाही !

दिशा माझी,नशा माझी जगाने टाकली बदलुन..
जिथे मी हरवलो होतो तिथे मी सापडत नाही !

न याचे दुःख आहे की ,तिची आशासुधा सरली..
खरेतर खंत याची की ह्रदय माझे रडत नाही !

मला जे शिकवले ,ते शिकवले आहे दुराव्यांनी..
तुझी जवळीक आता त्यामुळे मज परवडत नाही !

कशाला तू 'सुशांता' वागतो आहेस बाजारू..
जगाच्या आवडीची वाट जर तुज आवडत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुशांत, सगळेच शेर आवडले.. तरीही हा एक अगदी थेट आहे -
>>मला जे शिकवले ,ते शिकवले आहे दुराव्यांनी..
तुझी जवळीक आता त्यामुळे मज परवडत नाही !

समोर बसून बोलल्यासारखा. आवडलीच गझल

गझल आवडली.

न याचे दुःख आहे की तिची आशासुधा सरली..
खरेतर खंत याची की ह्रदय माझे रडत नाही !

शक्यतो बदलुन टाळावे.
कसे ते सांगत नाही मात्र दिसतेय की बदलुन सहज बदलता येइल.

दिशा माझी,नशा माझी जगाने टाकली बदलुन..
जिथे मी हरवलो होतो तिथे मी सापडत नाही !

खूप आवडले अनेक शेर.

'परवडत' हा शेर सर्वात विशेष वाटल'

"न याचे दुःख आहे की ,तिची आशासुधा सरली.." >>> यात 'सुधा' हे 'सुद्धा' करिता वापरले आहे की .... ??

सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार .

उल्हासजी, 'आशासुधा' मध्ये सुध्दा या अर्थाने वापरलंय खरं पण 'आशेचं अमृत' असासुध्दा एक विचार आहे .:)

धन्यवाद!

छानच.

अप्रतिम गज़ल!!! मला सगळेच शेर मनापासून आवडले.

दिशा माझी,नशा माझी जगाने टाकली बदलुन..
जिथे मी हरवलो होतो तिथे मी सापडत नाही !>>> व्वा! हा शेर विशेष आवडला.

दिशा माझी,नशा माझी जगाने टाकली बदलुन..
जिथे मी हरवलो होतो तिथे मी सापडत नाही !

कशाला तू 'सुशांता' वागतो आहेस बाजारू..
जगाच्या आवडीची वाट जर तुज आवडत नाही

हे दोन्ही आवडले...