Submitted by सुशांत खुरसाले on 3 October, 2013 - 05:35
खरा वेडावलो नाही, पुरेसे धडधडत नाही..
अता होईल ती माझी असे काही घडत नाही !
दिशा माझी,नशा माझी जगाने टाकली बदलुन..
जिथे मी हरवलो होतो तिथे मी सापडत नाही !
न याचे दुःख आहे की ,तिची आशासुधा सरली..
खरेतर खंत याची की ह्रदय माझे रडत नाही !
मला जे शिकवले ,ते शिकवले आहे दुराव्यांनी..
तुझी जवळीक आता त्यामुळे मज परवडत नाही !
कशाला तू 'सुशांता' वागतो आहेस बाजारू..
जगाच्या आवडीची वाट जर तुज आवडत नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला जे शिकवले ,ते शिकवले आहे
मला जे शिकवले ,ते शिकवले आहे दुराव्यांनी..
तुझी जवळीक आता त्यामुळे मज परवडत नाही !<<< वा वा
धन्यवाद बेफिजी .
धन्यवाद बेफिजी .
छानच परवडत सर्वाधिक छान
छानच
परवडत सर्वाधिक छान
छान गझल....
छान गझल....
सुशांत, सगळेच शेर आवडले..
सुशांत, सगळेच शेर आवडले.. तरीही हा एक अगदी थेट आहे -
>>मला जे शिकवले ,ते शिकवले आहे दुराव्यांनी..
तुझी जवळीक आता त्यामुळे मज परवडत नाही !
समोर बसून बोलल्यासारखा. आवडलीच गझल
छान गझल.
छान गझल.
मस्तच सुशांतजी
मस्तच सुशांतजी
गझल आवडली. न याचे दुःख आहे की
गझल आवडली.
न याचे दुःख आहे की तिची आशासुधा सरली..
खरेतर खंत याची की ह्रदय माझे रडत नाही !
शक्यतो बदलुन टाळावे.
कसे ते सांगत नाही मात्र दिसतेय की बदलुन सहज बदलता येइल.
दिशा माझी,नशा माझी जगाने
दिशा माझी,नशा माझी जगाने टाकली बदलुन..
जिथे मी हरवलो होतो तिथे मी सापडत नाही !
खूप आवडले अनेक शेर.
'परवडत' हा शेर सर्वात विशेष
'परवडत' हा शेर सर्वात विशेष वाटल'
"न याचे दुःख आहे की ,तिची आशासुधा सरली.." >>> यात 'सुधा' हे 'सुद्धा' करिता वापरले आहे की .... ??
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार .
उल्हासजी, 'आशासुधा' मध्ये सुध्दा या अर्थाने वापरलंय खरं पण 'आशेचं अमृत' असासुध्दा एक विचार आहे .:)
धन्यवाद!
मस्त गझल !
मस्त गझल !
छानच.
छानच.
धन्यवाद मुक्तेश्वर आणि
धन्यवाद मुक्तेश्वर आणि अमेयजी!
अप्रतिम गज़ल!!! मला सगळेच शेर
अप्रतिम गज़ल!!! मला सगळेच शेर मनापासून आवडले.
दिशा माझी,नशा माझी जगाने टाकली बदलुन..
जिथे मी हरवलो होतो तिथे मी सापडत नाही !>>> व्वा! हा शेर विशेष आवडला.
दिशा माझी,नशा माझी जगाने
दिशा माझी,नशा माझी जगाने टाकली बदलुन..
जिथे मी हरवलो होतो तिथे मी सापडत नाही !
कशाला तू 'सुशांता' वागतो आहेस बाजारू..
जगाच्या आवडीची वाट जर तुज आवडत नाही
हे दोन्ही आवडले...
धन्यवाद !
धन्यवाद !
परवडत शेर आवडला. शिवाय - रडत
परवडत शेर आवडला. शिवाय - रडत नाही, सापडत नाही आणि बजारू हे सुटे मिसरेही!!