भ्रम : शतशब्दकथा

Submitted by अमेय२८०८०७ on 3 October, 2013 - 12:55

तिसर्‍या बाळाच्या जन्मानंतर तो डायरेक्ट विमानतळावरुन, बायकोला घेऊन जाण्यासाठी दवाखान्यात आलेला.
"पासष्टाव्या वर्षी नॉट बॅड", स्वतःशीच फुशारलेला. साठीत लग्न केलं म्हणून कुत्सित हसले, त्यांचे मिठाई खाताना पडणारे चेहरे आठवून सुखावलेला.

आधीच्या दोन्हीवेळी बापाचे वय, गोंडस बाळे पाहून डॉक्टरसुद्धा आशर्यचकित !
"शरीरात दम आहे डॉक्", त्यानं अभिमानानं सांगितलेलं," अजून आपण एवढे फिट, बायको तरुण आणि सुंदर, पोरं होणारच गोरी-गुटगुटीत!!"

तिसरं बाळ नाssही म्हंटलं तरी सावळंच.
गाडीत बसताना ड्रायव्हरचे पांढरेशुभ्र दात काळ्या रंगावर मात करून हास्य सांडणारे.

"पाच वर्षातला तिसरा ड्रायव्हर! दिसायला वेडाविद्रा पण कामाला वाघ, आधीचे दोन छाडमाड - नुसते दिसायला हीरो - कामचोर ऐतखाऊ ल्रेकाचे!!"

बायको मांडीवरील तान्ह्याला बाप दाखवत मजेत बसलेली.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अमेय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

धन्स Happy