आधुनिक सीता - १३

Submitted by वेल on 2 October, 2013 - 11:22

भाग ८ - http://www.maayboli.com/node/45392
भाग ९ - http://www.maayboli.com/node/45427
भाग १० - http://www.maayboli.com/node/45475
भाग ११ - http://www.maayboli.com/node/45523
भाग १२ - http://www.maayboli.com/node/45579

********************************************************

"तू काल रामण्णाबद्दल विचारत होतीस .." सकाळी नाश्ता करताना रफिक आला आणि त्याने मला विचारले.
मी प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिले. "फातिमाने नाही सांगितलं मला. पण असं समजू नकोस की ती मला सांगणार नाही. आमच्याकडे वडिल, भाऊ, नवरा आणि मुलगा ह्यांचा प्रत्येक शब्द पाळण्याचं आणि त्यांच्या मनाविरुद्धा काहिहि न करण्याचे संस्कार असतात बायकांवर. आता मला कसं कळलं. मला ऐकू आलं. मी बाहेर उभा नव्हतो बरं का. मी ह्या खोलीत मायक्रोफोन बसवलेत. तुझ्याशी कोण काय बोलतं ते मला ऐकू येण्यासाठी. कॅमेरा बसवायचा विचार होता पण मग म्हटलं तू अनकम्फर्टेबल होशील आणि तुझं कपडे बदलतानाचं वगैरे रेकॉर्डिंग झालं असतं आणि ते मलाच नसतं आवडलं. मी तुला इथे तुझ्या मनाविरुद्ध डांबून ठेवलं आहे पण त्याचा अर्थ असा नव्हे की मी तुझा गैरफायदा घेईन. मी तुला हे सांगतोय कारण तुला कळायला हव की माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे आणि तेही तुझा गैरफायदा न घेता. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तुझं जेवण तुझा चहा तुझा नाश्ता सगळं रामण्णा बनवतो. माझी इच्छा आहे की तुला तुझ्या चवीचं खायला मिळावं. तो रोज इथे येऊन जेवण बनवतो दिवसातून तीन वेळा. कारण तुला ता़जं जेवायला मिळावं. पन तू त्याला भेटायचा प्रयत्न करू नकोस. कारण ते तुला घरातली कोणतीही व्यक्ती करू देणार नाही. फातिमा आणि माझी बहिण सलमा तुला ते करू देणार नाहीत. आणि तू जर स्वतःच्या ताकदीचा वापर केलास तर.. तर त्या दोघींच्या ताकदीपुढे तुझी ताकद कमी पडेल. कारण त्यांनी जन्मापासून मांसाहार केलाय आणि तू शाकाहार. आणि चुकून जर हे सगळं दॄष्य माझ्या मोठ्या अम्मीच्या नजरेला पडलं तर मीदेखील तुला मदत करू शकणार नाही. ती खूप क्रूरपणे वागू शकते आणि त्यात तिला माझ्या बाकीच्या अम्मींची मदत मिळू शकते. तेव्हा प्लीज. वेडेपणा करू नकोस. तुला जे काही हवय. जी माहिती हवीये ती मला विचार. तुला जे माहिती असणं गरजेचं आहे ते सगळं मी तुला सांगेन. तुला अजून काही माहिती हवी आहे?" " हो. तू माझं काय करायचं ठरवलं आहेस?" "अगं काय करायचं म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे. मला तुझं प्रेम हवं आहे. तू हवी आहेस कायमची." "असं जबरदस्तीने प्रेम मिळवता येतं का?" " मी फक्त तुला इथे डांबून ठेवलं आहे. तुझ्यावर जबरदस्ती नाही केलेली. तुला अजून पर्यंत मी स्पर्श देखील नाही केलाय. तुला हा चांगुलपणा दिसत नाही का माझा? तुला मनोरंजनासाठी इथे टी.व्ही. लावून दिलाय. तुझा मूड चांगला राहावा म्हणून फक्त कार्टून चॅनेल ठेवलय. ज्यायोगे तू सतत हसत राहावीस. तुझ्यासाठी रामण्णाला जेवण करायला बोलावलय. तुला माहित आहे तुझं जेवण बनवायला रामण्णाला बोलावता यावं म्हणून मला वेगळं किचन बनवायला लागलं. तुला माझ्या घरच्यांकडून काहीही त्रास होऊ नये म्हणून मी माझी सौदीबाहेरची सगळी कामं माझ्या मॅनेजरना हॅण्डल करायला सांगितली आहेत. अजून काय करू ग? तुला मरू देणं आणि तुला परत जाऊ देणं ह्या दोन गोष्टी सोडून काहीही माग. मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर, मी आता नाही राहू शकत तुझ्याशिवाय." असं बोलता बोलताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मी गोंधळून गेले. "मला काही सुचत नाहीये. तू आत्ता जा इथून प्लीज जा. तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं ना तर तुला समजलं असतं की खरं प्रेम डांबून ठेवण्यात नसतं. जे आपलं असतं ते आपल्याकडे येतं नेहमीच येतं. पण तुला प्रेम म्हणजे काय हेच माहेती नाही." मी तिटकार्‍याने बोलले. "तू शिकव ना ग मग, खरं प्रेम काय असतं तू कर ना माझ्यावर खरं प्रेम. प्रेम नसलं तरी करता येतं ना. मी नाही तुझ्याइतका महान पण मग तू हो ना महान. तू कर ना माझ्यावर प्रेम." "रफिक प्लीज तू जा इथून मला आता काही सुचत नाहीये. तू जा." रफिक निघून गेला.

फातिमा आत आली. तिने मला खुणेने खायला सांगितलं. आज रामण्णाने मला उपमा बनवून पाठवला होता. सागरला आवडतो तसा. ह्यासगळयात सागर दोषी आहे असं मला वाटतच नव्हतं कधी कधी शंका येऊन जायची पण ती क्षणभरच. सागरवरचं माझं प्रेम माझी निष्टा इतकी स्ट्राँग आणि डीप होती की फ्रस्ट्रेशन मध्ये आलेले विचार लगेच विरून जायचे. 'कुठे आहे माझा सागर. कसा आहे. भारतात परत गेला असेल का तो? भारतात एकटा गेल्यावर काय झालं असेल त्याचं. आई बाबा दादा ह्यांना काय उत्तर दिलं असेल त्याने? दादाने नक्की पोलिसात तक्रार केली असणार. रफिकने दिलेले पैसे सागरने वापरले असतील का स्वतःला पोलिसांपासून वाचवायला का तुरुंगात असेल तो. आजी आजोबा ह्यांना धक्का बसला असेल. त्यांची तब्बेत बरी असेल ना? आणि सागरच्या आजी, आधीच त्यांना बी.पीचा त्रास आहे, कशा असतील त्या. अरे देवा एवढी उत्तरं तरी दे ना मिळवून. मला कळू दे ना सगळ्यांची ख्याली खुशाली. सगळं नीट असेल ना? असलंच पाहिजे. माझ्यामुळे, माझ्या दिसण्यामुळे, माझ्या लकबींमुळे जे भोगतेय त्याचे परीणाम फक्त माझ्यावर व्हायला हवेत. घरच्यांना नको रे त्रास देऊ देवा. काय चालू आहे हे माझ्या आयुष्यात. साधं आयुष्य जगणारी मी हे का होतय माझ्यासोबत? का माझ्याचसोबत असं का व्हावं? श्रीरामा मला सोडव रे. माझ्या सागरला बळ दे रे.' डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि डोळे बंद करून अनभवीतपणे मी रामरक्षा म्हणू लागले. सुरुवातीला मनात म्हणत असलेली रामरक्षा मी मोठ्याने कधी म्हणू लागले मलाच कळलं नाही.
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम् ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

रामरक्षा संपेपर्यंत मला खूप ताजतवानं आणि प्रसन्न वाटत होतं. मी हात जोडले. आणि नेहमीच्या सवयीने मी मारुतीस्तोत्र सुरू केलं. "भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारूती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना..."

मारुतीस्तोत्र चालू असताना रफिक कधी आत आला आणि फातिमा कधी बाहेर गेली मला कळलंच नाही. मारूतीस्तोत्र संपवून मी डोळे उघडले. रफिक हसर्‍या चेहर्‍याने बसला होता. "ह्या रावणाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून श्रीरामाला आणि हनुमानाला आठवत होतीस का?" मला संताप आला. "अग, रागावू नको. मी मस्करी केली. पण मला बरं वाटलं. तू प्रार्थना म्हटलीस म्हणजे तू नॉर्मलला यायला सुरुवात झाली. मी एक करतो, एका आयपॉडवर सगळे श्लोक प्रार्थना मिळतील तेवढी मराठी आणि हिंदी गाणी तुला कॉपी करून आणून देतो. तुला बरं वाटेल. चालेल ना? आणि हो तू वाचत असलेली पुस्तकं पण आज संध्याकाळी घेऊन येतो. तेवढाच तुझा वेळ चांगला जाईल." मी काहीही बोलले नाही. फक्त त्याच्याकदे पाहत राहिले. "गप्प बसणं म्हणजे होकार. मी घेऊन येतो. आणि जमल्यास काही मराठी मासिकं पुस्तकं सुद्धा घेऊन येतो. किंवा तुला मी ई-बुक रीडर आणून देतो. तुला हवी ती पुस्तकं तुला डाऊनलोड करून देत जाईन. वाच तू. हो पण त्यावर तुला ईमेल वापरता येणार नाही बरं का. पुस्तक वाचणं सोडून बाकी सगळं डिसेबल करून देणार मी तुला." मी शांतपणे ऐकून घेत होते. श्रीरामानेच विचार दिला आणि ताकद दिली माझ्या वाचेत. मी माझ्या स्वभावानुसार बोलून गेले. "खूप हुशार आहेस रे तू. खूप पुढचा विचार करतोस." "करतो ना? अग शाळेत असताना चेस खेळायचो मी. चँपियन होतो. तुला येतं का? येत असेल तर खेळूया कधी." "मला नाही येत फारसं." मी खोटं बोलले. "फारसं येत नाही म्हणजे थोडं येतं ना, चल मी शिकवतो तुला. आजपासून रोज संध्याकाळी आपण चेस खेळू. तुला चालेल का नाही हे विचारत नाहीये. मला तुझा सहवास हवाय. आणि तो फक्त शारिरीक नाही तर बौद्धिकसुद्धा."इतके बोलून तो हसून निघून गेला.

मला नवल वाटत होतं ह्या माणसाचं. कुठल्या मातीचा बनला होता हा? इतका विचार करणारा इतका चांगुलपणे वागणारा माणूस ह्याला इतकं साधं कळू नये की काहिही केलं तरी मला आतून आनंद होणार नाही आहे.

क्रमशः
पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45630

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चाललीय कथा सीता आधुनिक आहे तर तिने स्वतः स्वतःची सुटका करुन घेतली अस वाचायला आवडेल
कथा तुमची आहे तेव्हा तुम्हीच ठरवा वाचायला आवडेल

Maanaskanyaa,

Soochanaa aawadali. Pan kathechya shevatabaddal mee attach bolane yogy naahi honaar. Seeta raavanachya kaidetoon baher yayala havi pan mag ram tyasathi kay prayatn karnar, koni hanuman yenar bibhishan kon kay madat karanar? Seeta swatacgi sutaka swata karnar ka raavan tila gharabaher kadhnar ka raavanacha anthoun seeta sutanar ka ajoon kaahi, options khoop aahet, mala lihayala khup chhan watatay. Manache kangore,manasik dhirya, ajun barach kahi yayachay, tumhi kantalst nahi aahat he pahum khoop chham watatay.

Khoop khoop aabhar