आधुनिक सीता - १२

Submitted by वेल on 1 October, 2013 - 12:41

भाग ७ - http://www.maayboli.com/node/45278
भाग ८ - http://www.maayboli.com/node/45392
भाग ९ - http://www.maayboli.com/node/45427
भाग १० - http://www.maayboli.com/node/45475
भाग ११ - http://www.maayboli.com/node/45523

********************************************************************

टी.व्हीवर फक्त कार्टून चॅनेल? मी माझा हा शॉक विसरून लवकरात लवकर नॉर्मल व्हावं म्हणून हे रफिकने मुद्दम केलं होतं का? रफिकला समजतं का दुसर्‍याच्या मनाची काळजी घेणं की दुसर्‍या कोणी सांगितलं. इतकं जर त्याला समजत असेल तर त्याने मुळात मला इथं असं डांबून का ठेवावं? तेही सागर पासून दूर करून. इतका विचार करू शकणारा माणूस, बायकोला नवर्‍यापासून दूर करू शकतो असा जबरदस्तीने? का खरच रफिकने म्हटलं तसं सागरने मला इथे रफिकच्या सांगण्यावरून आणलं होतं? पण कधी सागरच्या वागण्यात, बोलण्यात, डोळ्यात अगदी स्पर्शातदेखील असा खोटेपणा दिसला नाही. त्याच्या डोळ्यात तरळणारं प्रेम खोटं होतं? त्याचं रुणझुणतं हसू खोटं होतं? त्याचा प्रेमळ स्पर्श खोटा होता? त्याने मला फुलवणं, सुखाच्या परमोच्च बिंदूला नेणं तेही खोटं होतं? एवढा चांगला अभिनय कोणी करू शकतं? सिनेमात नाही प्रत्यक्षात? थोडे थोडके नाही इतके दिवस? काय खरं आणि काय खोटं? मी विचारांच्या गुंत्यात गुंतून जात होते. अगदी प्रत्येक क्षणाला. समोरचे कार्टून पाहायचे, जेवायचं झोपायचं आणि सतत विचार करायचा काय खरं - काय खोटं. रोज रफिक भेटायला यायचा, मी कार्टून पाहात असायचे. रोज फातिमा यायची जेवण घेउन, मी कार्टून पाहात असायचे. मी स्वतःची बॅग देखील उघडून पाहिली नव्हती. रोज फातिमाच बॅगेतून कपडे काढून द्यायची. रोजचे कपडे तीच धुवायला न्यायची. असे किती दिवस गेले कोणास ठाउक.

एक दिवस फातिमाने मला माझा लाल रंगाचा ड्रेस काढून दिला बॅगेतून. हा तोच लाल रंगाचा ड्रेस होता, जो मी सागरला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा घातला होता. असा भडक रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीला हा मुलगा नक्कीच पसंत नाही करणार हा विचार करूनच मी तो लाल ड्रेस घातला होता. तो ड्रेस पाहून मात्र पुन्हा एकदा माझा बांध फुटला. मी पुन्हा एकदा ओक्साबोक्शी रडू लागले. फातिमा माझं रडणं पाहून कळवळली आणि तिने मला जवळ घेतलं. सर्वसाधारणपणे कोणी रडल्यावर आपण म्हणतो रडू नको, फातिमा मला म्हणत होती, "क्राय, क्राय. नो स्टॉप. क्राय, क्राय. नो स्टॉप." मला तिच्या बोलण्याची जाणीव बर्‍याच वेळाने झाली. मी चमकले, तिच्याकडे पाहू लागले. ती ओशाळं हसली. "यु क्राय, यु फील गुड. नो स्टॉप, यु क्राय." ही माझ्याशी इतकी चांगली का वागतेय? तिला वाईट वाटलय का तिच्या नवर्‍याने मला असं पळवून आणल्याबद्दल? का तिला राग आलाय? मी तिच्याकडे फक्त पाहात राहिले. तिच्या मनात काय चाललंय ह्याचा वेध घेता येतो का ते पाहात. "युवर फेवरेट ड्रेस? सागर गेव यु?" तिने विचारलं. मी नकारार्थी मान हलवली. "आय वोअर इट व्हेन आय मेट हिम फर्स्ट." "ओह. यु वॉण्ट डिफरण्ट ड्रेस?" "येस." "चेक बॅग" आणि मला जाणीव झाली मी माझी बॅग इथे आल्यापासून उघडली नव्हती. डोळे पुसून मी बॅग उघडली.

बॅग उघडली तसे मला आठवले. भारतात जायचं तिकिट आता कधीही येणार म्हणून मी भरून ठेवली होती. तशीच होती ती. म्हणजे माझे महत्वाचे कागदपत्र, पैसे दागिने सगळं असेल ह्यात? माझी रिसेप्शनची साडी? आणि माझं मंगळसूत्र? मला त्या दिवशी इतक्या दिवसानंतर जाणीव झाली, माझ्या गळ्यात माझं मंगळसूत्र नव्हतं. माझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, त्याही हातात नव्हत्या. कुणी काढून घेतलं ते सारं? कुठे गेलं ते सारं? सागर परत घेऊन गेला का? का रफिकने काढून घेतलं? मी बॅग भराभरा उपसू लागले. ह्या बॅगेत माझ्या कपड्यांशिवाय काहीही नव्हतं. माझे कागद्पत्र, माझं मंगळसूत्र, बांगड्या, सोन्याची चेन, सोन्याचा नेकलेस काहीच नव्हतं इतकच कशाला, ह्या कपड्यांमध्ये माझी रिसेप्शनची साडी देखील नव्हती. "माय ज्वेलरी? माय सारी? माय डॉक्युमेण्ट्स? माय सेकण्ड बॅग?" "आस्क हिम. आय नो नो." "प्लीज प्लीज कॉल रफिक. आय वॉण्ट टू टॉक टू हिम." फातिमा न बोलता बाहेर गेली.

थोड्या वेळाने रफिक आत आला. "सरि..ता, तू मला बोलावलस, किती आनंद झालाय मला." "माझे दागिने, कागदपत्र, माझी रिसेप्शन्ची साडी कुठेय सगळं माझं मंगळसूत्र कुठेय रफिक?" " अग, शांत हो. एवढ विचारायला बोलावलस? मला वाटलं तुला माझी आठवण आली. असो हेही नसे थोडके. तुझे दागिने, तुझं मंगळसूत्र आणि तुझी रिसेप्शनची साडी सगळं सागर घेऊन गेलाय. तुला इथे ह्या सगळ्याची काय गरज आहे? आणि तुझे कागद्पत्र आणि तुझा पासपोर्ट माझ्याकडे सुरक्षित आहे. खरंतर ह्या सगळ्याची सुद्धा तुला गरज नाही पण तरिही मी ते ठेवलय व्यवस्थित. अजून काही? तू हॉस्पिटलच्या लायब्ररीतून घेतलेली पुस्तकं सगळी परत केलीत. ती हवी तर आणून देतो. तुझा तेवढाच वेळ चांगला जाईल. खरं तर त्या पुस्तकांची सुद्धा तुला गरज अशी नाही. पण ज्ञान नेहमीच घेत राहावं. तुला काही हवं असेल तर मला सांग. मी त्यातलं योग्य ते आणून देतो." "थोडं विष दे आणून म्हणजे मी सुटेन ह्या नरकातून." "सरिता मला मान्य आहे की तू मनाविरुद्ध ह्या घरात राहते आहेस. पण तू म्हणतेस तसा नरक नाहिये हा. मी तुला खूप सुखात ठेवेन, तुझ्यावरची बंधनदेखील कमी होतील हळू हळू. त्याला मात्र वेळ लागेल. तू पूर्णपणे माझी झालीस की मग. अग ह्या घरात कोणत्याच बाईला नरकात असल्यासारखी वागणूक नाहिये. पूर्वी होती. माझ्या अम्मींना. बहिणींना. आणि तू तर माझी प्रेयसी आहेस मी तुला कसा त्रास होऊ देईन ग. विश्वास ठेव मी वाईट माणूस नाहिये. फक्त तुझ आकर्षण मी नाही थांबवू शकलो स्वतःला. माझी प्रेयसी सुनिता, दिसायला तुझ्याचसारखी. तुझ्या लकबी देखील तशाच. तू प्रचण्ड हुषार आहेस माहित आहे मला. तुला सायकॉलॉजी मध्ये पी.एचडी करायचय ना. तीदेखील खूप हुषार करियर ओरिएण्टेड. नाही करू शकलो तिच्याशी लग्न. आता मात्र तुझ्यासोबत आयुश्य काढायचय मला." " तू वेडा आहेस का. आमच्यात कितीही सारखेपणा असला तरी ती म्हणजे मी नव्हे. आमचा स्वभाव वेगळा असू शकतो. आणि मी सागरची बायको आहे." "आहे नाही होतीस. तो तुला इथे सोडून गेलाय." "अरे असं माझ्या मनाविरूद्ध मला डांबून ठेवताना तुला काहीच कसं वाटत नाही.?" "हे बघ मला काय हवय हे जास्त महत्वाचं. तुला काय आवडतं काय नाही हे दुय्यम आहे. आणि तुझ्याबद्दल म्हणत असलीस तर तुला माझ्या आयुष्यातून जाता येणार नाही. बाकी काय हवं ते मिळेल. आणि हो मी वेडा नाहिये, मला माहित असतं मी काय करत असतो. मला काय हव असत आणि मला ते कसं मिळवायचं आहे. मी एक खूप चांगला बिझनेसमन आहे. तुला काही हवं आहे का?" "नको. थँक्स." "तुला ती पुस्तकं आणून देऊ?" "ठीक आहे." रफिक निघून गेला. मी सुन्नपणे तशीच बसून राहिले.

थोड्या वेळाने फातिमा चहा घेऊन आली. अगदी मला हवा होता तसा. हा चहा सुद्धा नक्कीच रामण्णाने बनवला होता. त्याला जमायचा मला हवा तसा चहा. मी फातिमाकडे टक लावून पाहिले. "फातिमा, रामण्णा मेड धिस टी?" फातिमाने दचकून माझ्याकडे पाहिलं, माझ्या तोंडावर हात ठेवला. "नो टॉक ऑफ हिम. प्लीज." कोणी बोलावलं होतं रामण्णाला? कोण एवढं विचार करत होतं माझा?

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45598

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ भाग लगोलग टाकल्याबद्दल थॅन्क्स.
वाचत आहे.
हे सर्व भाग सरिताच्याच नजरेतुन आहेत का?
खरे काय झाले असावे याची उत्सुकता ताणली आहे. रामण्णाकडुन समजेल कदाचित.

अरे वा.. मस्त आहे हा भागपण.. उत्सुकता जाम वाढल्ये... पुढचा भागपण असचा लौकर येऊ दे [ आणि थोडा अजून मोठापण Wink ]

वल्लरीच, सगळे भाग वाचते आहे.. उत्सुकता वाढतेय. ऑफीसमधून जमतील तसे परीच्छेद मध्ये मध्ये वाचत असल्याने प्रत्येकवेळेस प्रतिक्रिया द्यायला जमतेच असे नाही. प्लीज रोज एक भाग टाकत राहा.

काल याआधीच्या भागापर्यंत नवर्‍याला स्टोरी सांगितली तर चिडला... म्हणे अर्धवट भुंगे कशाला सोडतेस डोक्यात Proud सो आम्ही दोघंही वाचतोय... लवकर लिही प्लीज धन्स Happy

अरे वा.. मस्त आहे हा भागपण.. उत्सुकता जाम वाढल्ये... पुढचा भागपण असचा लौकर येऊ दे [ आणि थोडा अजून मोठापण ] +१